शॉप ऍक्ट परवाना कसा मिळणार?
नगरपालिका महानगरपालिका क्षेत्रात व्यवसाय करते वेळी व्यवसाय अधिकृत असल्याचे प्रमाणपत्र म्हणजे शॉप अधिनियम लायसेन्स होय.कोणत्याही व्यवसायाची कायदेशीर सुरुवात शॉप अधिनियम लायसेन्सने होते.दुकानाच्या नावाने बँकेत खाते उघडण्यासाठी व व्यायसायिक कर्ज प्रकरणे करण्यासाठी शॉप अधिनियम महत्वाचे दाखला ठरतो. व्यावसायिकाला विविध शासकीय व खाजगी टेंडर / निविदा भरते वेळी व्यवसायच अधिकृत असल्याचे प्रमाणपत्र जरुरी असते.त्याच प्रमाणे विविध कंपनीच्या तालुका स्तरावरील एजन्सीज मिळविण्यासाठी व्यवसाय दाखला व कमर्शिअल गाळे,दुकानाचा विमा इ.सेवांचा लाभ घेण्यासाठी शॉप अधिनियम महत्वाचे ठरते. शॉप अधिनियम धारकांनाच मुल्यवर्धित कर नंबर काढता येतो. ग्रामपंचायत क्षेत्रात शॉप अधिनियमाची आवश्यकता नसते परंतु गावाची लोकसंख्या १० हजारपेक्षा जास्त असल्यास शॉप अधिनियम लागते.
आवश्यक कागदपत्रे :-
- जेथे व्यवसाय सुरु आहे किंवा करावयाचा आहे त्या शॉपचे नावासहीत तीन फोटो
- मालकाचे तीन फोटो
- व्यवसायाच्या ठिकाणचे / जागेवरील घेतलेले लाईट बिल / टेलीफोन बिल भाडेपावती अथवा खरेदीखत
- जागा स्वमालकीची नसेल तर मालकांचे संमतीपत्र.
- नुतनीकरण असल्यास ओरिजनल शॉपअॅक्ट लायसन्स
- आधार कार्ड मतदान कार्ड पॅन कार्ड झेरॉक्स.
- उपरोक्त कागदपत्रांची पूर्तता करून नजीकच्या महा ई सेवा केंदात गेल्यास तेथे ऑनलाईन शॉप अधिनियम लायसेन्स प्राप्तीसाठी अर्ज करता येतो.
त्यास लागणारी व्यवसाय स्वरुपानुसार योग्य ती फी जमा व्यवसायाचे लायसन अथवा नुतनीकरण करून मिळते.
प्रस्ताव बिनचूक असल्यास किमान ९ दिवसात शॉप अधिनियम परवाना प्राप्त होतो. सदर दाखला हा दुकानाच्या दर्शनी भागात दिसेल अशा ठिकाणी लावावा. शॉप अधिनियम परवाना हा दर वर्षी १५ डिसेंबर पूर्वी नूतनीकरण करणे आवश्यक असते. नूतनीकरण करते वेळी ओरिजनल परवाना जवळ असावा. शॉप अधिनियम परवान्यावर सुट्टीचा दिवसाचा उल्लेख केलेला असतो. हा सुट्टीचा दिवस देणे व्यावसायिकावर बंधनकारक असते. आठवड्यातील सुट्टीचा दिवस ठरविण्याचा अधिकार व्यवसायिकाला असतो.
मात्र महा ई सेवा केंद्रात ही सेवा ऑनलाईन उपलब्ध आहे.
माहिती सौजन्य:
शॉप ऍक्ट परवाना (Shop Act License) कसा मिळवायचा:
शॉप ऍक्ट परवाना, ज्याला दुकाने व स्थापना अधिनियम परवाना देखील म्हणतात, हा भारतातील राज्यांमध्ये दुकाने आणि व्यावसायिक आस्थापना चालवण्यासाठी आवश्यक असलेला परवाना आहे. हा परवाना कामगार आणि रोजगाराचे नियमन करतो.
परवाना मिळवण्यासाठी खालील प्रक्रिया आहे:
-
आवश्यक कागदपत्रे जमा करा:
- अर्जदाराचे आधार कार्ड
- पॅन कार्ड
- व्यवसायाच्या जागेचा पत्ता पुरावा (उदा. भाडे करार, मालमत्ता कर पावती)
- व्यवसायाचे स्वरूप आणि नाव
- कर्मचाऱ्यांची संख्या आणि त्यांची माहिती
- पहिला अर्ज https://www.mahaonline.gov.in/ या वेबसाइटवर करा.
-
अर्ज सादर करा:
- आपल्या राज्याच्या कामगार विभागाच्या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करा.
- कागदपत्रे अपलोड करा.
-
शुल्क भरा:
- ऑनलाइन पद्धतीने शुल्क भरा.
-
पडताळणी:
- कामगार विभागाचे अधिकारी तुमच्या अर्जाची आणि कागदपत्रांची पडताळणी करतील.
-
परवाना जारी करणे:
- पडताळणीत सर्व माहिती योग्य आढळल्यास, परवाना जारी केला जाईल.
महाराष्ट्र शॉप ऍक्ट परवान्यासाठी अर्ज करण्याची ऑनलाइन प्रक्रिया:
- महाराष्ट्र शासनाच्या 'आपले सरकार' पोर्टलवर नोंदणी करा: https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en
- शॉप ऍक्ट परवान्यासाठी अर्ज शोधा आणि निवडा.
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि शुल्क भरा.
टीप:
- परवाना मिळवण्यासाठी लागणारा वेळ आणि शुल्क राज्यनुसार बदलू शकतात.
- अर्ज करण्यापूर्वी आपल्या राज्याच्या कामगार विभागाच्या वेबसाइटवर अद्ययावत माहिती तपासा.