9
Answer link
_*आपल्या गावच्या सरपंचांनी गावातील कोणत्या कामासाठी किती निधी खर्च केला?*_

वरील फोटो मध्ये दाखविल्याप्रमाणे तुम्ही तुमच्या गावच्या निधीचा खर्च तुम्ही पाहू शकता.
तुम्ही दर पाच वर्षांनी सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांना निवडून देता. मात्र गावासाठी ते किती निधी आणतात आणि काय कामं करतात, याची कल्पनाही ग्रामस्थांना नसते.
रस्ते, पाणी अशी कामं केलेली तर दिसतात, मात्र याव्यतिरिक्त काय कामं केली जातात, त्यासाठी किती निधी मिळतो, याची सविस्तर माहिती आता वेबसाईटवर उपलब्ध आहे.
पंचायत राज मंत्रालयाने सर्व माहिती ऑनलाईन उपलब्ध करुन दिलेली आहे, ज्यावर आपल्या गावासाठी सरपंचाने किती निधी आणला, याची सविस्तर माहिती मिळणार आहे.
_*माहिती कशी मिळवाल?*_
या लिंकवर क्लिक करा
http://www.planningonline.gov.in/ReportData.do?ReportMethod=getAnnualPlanReport
क्लिक केल्यानंतर तुम्ही पंचायत राज मंत्रालयाच्या प्लॅन प्लस या वेबसाईटशी जोडले जाल.
*वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला ज्या वर्षाचा तपशील पाहिजे, ते वर्ष टाका*
(उदा; *2017-2018*)
*त्यानंतर राज्य निवडा* (उदा; *महाराष्ट्र*)
- राज्य निवडल्यानंतर तुम्हाला नेमकी कशाची माहिती निवडायची आहे, तो पर्याय निवडा, जसं की ग्रामपंचायतीची माहिती हवी असेल तर ग्रामपंचायत निवडा आणि जिल्हा परिषदेची माहिती पाहिजे असेल तर जिल्हा परिषद हा पर्याय आहे.
जिल्हा निवडल्यानंतर पुढे तालुका निवडावा लागेल
(उदा; *अक्कलकोट*)
तालुक्यानंतर तुमच्या ग्रामपंचायतीची यादी येईल.(उदा; *अक्कलकोट-बोरगांव (दे)*)
ग्रामपंचायत निवडून गेट रिपोर्टवर क्लिक करा, तुम्हाला सर्व माहिती मिळेल(उदा; *बोरगांव(देशमुख)*
उदा.,मला *महाराष्ट्रातील सोलापूर* जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील *बोरगांव (देशमुख)* या गावचे तपशील पहायचे असल्यास खालील लिंकवरील पेज उघडेल ज्यामध्ये *बोरगांव* गावासाठी मंजूर झालेला निधी आपल्याला दिसून येईल
तुमच्या गावचा निधी पाहण्यासाठी खालील लिंक उघडून पहा.
http://www.planningonline.gov.in/ReportData.do?ReportMethod=getAnnualPlanReport