0

आजच्या तरुण पिढीला तर आणीबाणी म्हणजे नक्की काय हे माहीतही नाही. ज्यांना पुस्तकांतून वा वृत्तपत्रीय लेखनातून आणीबाणीविषयक माहिती आहे, त्यांना आणीबाणीचा प्रत्यक्ष अनुभव नाही.
ते स्वाभाविक आहे. बरोबर 36 वर्षांपूर्वी, 25 जूनच्या मध्यरात्रीनंतर आणि 26 जूनच्या पहाटे, त्या वेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधींनी आणीबाणी जाहीर केली. 26 जूनच्या सकाळी आठ वाजता देशाला उद्देशून आकाशवाणीवरून भाषण करताना त्या म्हणाल्या की, देशात अराजकसदृश स्थिती निर्माण झाली आहे. देशाचे स्थैर्य आणि सार्वभौमत्व धोक्यात आणले गेले आहे.

लोकांची माथी भडकावली जात आहेत आणि कायदा, सुव्यवस्था व शिस्त प्रस्थापित करण्यासाठी सरकारला काही कठोर पावले उचलणे भाग पडले आहे. ते कठोर पाऊल म्हणजेच आणीबाणी. आचार्य विनोबा भावेंनी आणीबाणीच्या त्या काळाला ‘अनुशासन पर्व’ असे पुढे म्हटले.

आणीबाणी बद्दल अधिक माहिती खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पाहू शकता .

आणीबाणी

आणीबाणी : एक ट्रॅजिडी


उत्तर लिहिले · 6/12/2016
कर्म · 15105