Topic icon

नवीन वर्ष

0

थर्टी फर्स्ट म्हणजे काय

आयुष्यातला जन्मापासून मृत्यूपर्यंतचा प्रवास किती रंजक आहे ना! ह्या प्रवासात आपण अनेक घटनांचे साक्षीदार होतो. अनेकांना अगदी जवळुन पाहतो. अनेक गोष्टींविषयी चीड, शंका, प्रेम-आत्मियता निर्माण होत असते मग ती कुठलीही गोष्ट असेल अगदी स्वतः अनुभवलेली असेल किंवा देशाच्या राजकिय घडामोडीविषयी असेल. त्या प्रत्येकवेळी आपण व्यक्त होतोच असं नाही. आणि हे व्यक्त होण्यासाठीच हा ब्लॉग करावासा वाटला. शेवटी माध्यम कुठलंही असो, नाही का?


थर्टी फर्स्ट म्हणजे काय 
     जोश, नोट आणि होश हे तीन दुरचे मित्र जेव्हा एकत्रित येतात ना तो क्षण?
सगळीकडे न्यु इयर पार्टीच्या सेलीब्रेशनची तयारी अगदी आठवड्याभरापासून चालली आहे. मला पण मित्राने विचारलं 'काय मग आज थर्टी फर्स्टचं काय'? आ..? पण थर्टी फर्स्ट म्हणजे काय   ...... काय लॉजिक काय..? खरंच..! ह्याच्यामध्ये काही लॉजिकच नाहीये ना. की 'बाबा आता मी सगळ्या जबाबदारीतुन मुक्त झालो रे..? की.. 'एखादी देखणी रुपवती लग्नासाठी समोर आणून कुणी तरी उभी केली रे?'... की 'साहेबांनी १५००० पगाराचे पटकन ४०००० रुपडे केले रे? ...काय लॉजिक काय?... 




     पण थर्टीफर्स्टचं समीकरण लोकांच्या इतकं डोक्यात फिट्ट बसलेलं असतं की, दारु शिवाय सेलिब्रेशन? अनेकांच्या कल्पनेतही येऊ शकत नाही. शेवटी कुणी काय करायचं आणि काय नाही करायचं, हे आपण कोण सांगणार ना? तरीपण जे वाटलं ते लिहिलं.. ज्यांना जे करायचंय ते ते करणारच.. 

     खरंतर मनावरच्या जुन्या ओझ्याला निरोप देण्याची ही वेळ.. समजायला हरकत नाही. सकारात्मक दृष्टीनं नव्या जगण्याचं म्हणजेच नव्या वर्षाचं स्वागत करायला हवं. तसं पाहता प्रत्येक दिवस म्हणजे नवीन वर्षच की.. प्रत्येक दिवसाची सुरुवात सकारात्मक दृष्टीनच व्हायला हवी.. मग त्यासाठी थर्टी फर्स्ट कशाला..?
जुने ओझे, ताण ह्यांना बाजुला सारुन स्वच्छ को-या मनानं नवंवर्षाचं स्वागत करायला हवं.
धन्यवाद !


उत्तर लिहिले · 27/12/2022
कर्म · 53715