
Parenting
1
Answer link
मुलांना वयाच्या पाच वर्षापर्यत प्रेमाने वाढवायचे , पाच ते दहा वर्ष समजून सांगायचे व दहा ते पंधरा वर्षात कडक शिस्त लावायची आणि पंधरा ते वीस या वर्षात जबाबदारी सांगायची अर्थात वीस ते पंचवीस वर्ष संपूर्ण माणुस बनवून पुढे त्याचे लग्न करायचे हा आदर्श आईचा प्रवास असावा मुलांच्या बाबतीतला ,
या कालावधीत आईने स्वतःला मैत्रीण , वडील व आई या तीन भूमिका पूर्णपणे बजावल्या चं पाहिजे म्हणजे मुलांच्या मनातलं सारं मुलांनी आपल्याला अगदी बिनधास्त सांगितलं पाहिजे मैत्रीण म्हणून, आपला आदर, धाक व वचक त्यान्च्या मनात काही चुकीचं काम करताना वाटला पाहिजे वडील म्हणून, आणि घरी आपली वाट पहाणारी, मायेन प्रेमानं जवळ येऊन आपली अभ्यासाची प्रगती विचारणारी म्हणजे आई असे वागणे पाहिजे ,
जी माता आपल्या मुलांना त्यान्च्या नजरेत स्वतःची आई , मैत्रीण तर वाटतेच पण एक शिस्तप्रिय जबाबदार आई वाटते आपल्या आजी आजोबांची काळजी घेणारी त्यान्ची सून वाटते, एक आज्ञाधारक आदरणीय बाबांची पत्नी वाटते ती स्री आदर्श आई म्हणून घोषित होते आणि असे जर जमले तर आदर्श आई बनले समजावे किंवा आदर्श आई बनण्यांसाठी असे प्रयत्न करावे या मार्गाचा अवलंब करावा