
आम्ल आणि अल्कली
3
Answer link
आम्ल व आम्लारी फरक
आबट चव देणाऱ्या संयुगाना आम्ल म्हणतात. आम्ल पाण्यात विद्राव्य असतात व ते क्षरणकारकही असतात. प्राणी आणि वनस्पतींमध्ये सुद्धा आम्ले असतात. खादयपदार्थांमध्ये असणाऱ्या आम्लाना नैसर्गिक आम्ल किंवा कार्बनिक आम्ल असेही म्हणतात. ही आम्ले क्षीण प्रकृतीची असल्याने त्यांना सौम्य आम्ल म्हणतात. काही आम्ले ही तीव्र प्रकृतीची असतात. ती दाहक असतात. उदा. सल्फ्युरिक आम्ल, हायड्रोक्लोरिक आम्ल नायट्रिक आम्ल या आम्लांना खनिज आम्ल असेही म्हणतात.
(1) आम्ल
(2) आम्लारी – जे पदार्थ तुरट/कडवट चवीचे व स्पर्शाला बुळबुळीत लागतात, त्यांना आम्लारी म्हणतात. उदा. चुन्याची निवळी Ca(OH)2 खाण्याचा सोडा, (NaHCO,), कॅस्टिक सोडा (NaOH) व साबण
(3) दर्शक – जे पदार्थ आम्ल किंवा आम्लारीच्या संपर्कात स्वतःचा रंग बदलतात, त्यांना दर्शक म्हणतात.
(4) पाणी हे आम्लधर्मी किंवा आम्लारीधर्मी नसते.
(5) नैसर्गिक दर्शक – घरातील अनेक पदार्थांच्या साहाय्याने नैसर्गिक दर्शक बनविता येतात. उदा. लाल कोबी, मुळा, टोमॅटो, जास्वंद, गुलाब इ. पासून नैसर्गिक दर्शक तयार करता येतात.
(6) आम्ल – आम्ल हा एक असा पदार्थ असतो की ज्याचे पाण्यातील द्रावण हायड्रोजन आयन (H+) उपलब्ध करुन देते/निर्माण करते. उदा. पाण्यातील द्रावणात हायड्रोक्लोरिक(HCI)(aq)चे विघटन होते. HCI(aa) → H+ +CH
(7) आम्लाचे गुणधर्म – आम्लाची चव आंबट असते, आम्लाच्या रेणूत हायड्रोजन आयन (H+) हा मुख्य घटक असतो, आम्लाचा धातूशी अभिक्रिया होऊन H, वायू मुक्त होतो, आम्लामुळे निळा लिटमस कागद तांबडा होतो.
(8) आम्लाचे उपयोग – रासायनिक शुद्धीकरण प्रक्रियेत, औषधी द्रव्ये, रंग, स्फोटक द्रव्ये, क्लोराइड क्षार बनविण्यासाठी, विद्युत घटात, पाणी जंतुविरहित करण्यासाठी लाकडाच्या लगदयापासून पांढराशुभ्र कागद बनविण्याकरिता आम्लाचा उपयोग होतो.
(9) आम्लारी आम्लारी हा एक असा पदार्थ असतो ज्याने – पाण्यातील द्रावण हायड्रॉक्साइड आयन (OH ) उपलब्ध करुन देतात/निर्माण करतात.
NaOH(aq) Na* (aq)OH (aq) (10) आम्लारीचे गुणधर्म – आम्लारीची चव कडवट असते, त्यांचा स्पर्श बुळबुळीत असतो, आम्लारीमध्ये हायड्रॉक्साइड आयन (OH) हा मुख्य घटक असतो, सामान्यतः धातूंची ऑक्साइड आम्लारीधर्मी असतात.
11) उदासिनीकरण – आम्ल व आम्लारीच्या संयोगाने क्षार व पाणी निर्माण होतात. या रासायनिक अभिक्रियेला उदासिनीकरण म्हणतात. आम्लामध्ये हायड्रोजन आयन (H+) आणि आम्लारीमध्ये हायड्रॉक्साइड आयन (OH) असतात.
आम्ल + आम्लारी ->क्षार + पाणी
HCl + NaOH → NaCl + H2O
0
Answer link
आम्लारी (बेस) पदार्थांची काही उदाहरणे खालीलप्रमाणे आहेत:
- सोडियम हायड्रॉक्साईड (NaOH): याला कॉस्टिक सोडा असेही म्हणतात. हे रासायनिक वस्तूंमध्ये वापरले जाते. Wikipedia
- पोटॅशियम हायड्रॉक्साईड (KOH): याला कॉस्टिक पोटॅश असेही म्हणतात. याचा उपयोग साबण बनवण्यासाठी होतो. Wikipedia
- कॅल्शियम हायड्रॉक्साईड (Ca(OH)2): याला लाइम वॉटर किंवा चुना असेही म्हणतात. हे बांधकाम आणि शेतीत वापरले जाते. Wikipedia
- अमोनियम हायड्रॉक्साईड (NH4OH): हे अनेक পরিষ্কারक उत्पादनांमध्ये वापरले जाते. Wikipedia
- मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड (Mg(OH)2): हे औषध म्हणून अँटासिड आणि रेचक म्हणून वापरले जाते. Wikipedia