Topic icon

शीख इतिहास

2
कोण होते, ते शूर आणि थोर धर्मगुरु ते होते,शिखांचे दहावे गुरु गोविंदसिंग. ... गुरु गोविंदसिंग यांचा जन्म दि. २२ डिसेंबर १६६६ रोजी पाटणा शहरात झाला.




शीख धर्मियांचे दहा गुरू

शीख धर्मात एकूण दहा गुरू आहेत. त्यातील पहिले गुरू नानक देव. त्यांच्यानंतर एकूण नऊ गुरू झाले. प्रत्येक गुरूने आधीच्या गुरूंनी दिलेल्या शिकवणीत भर घालून लोकांना उपदेश केला.

दहावे गुरू गोविंदसिंग यांनी आपल्या अनुयायांना सांगितले की, माझ्या मृत्यूनंतर गुरू ग्रंथ साहिबालाच गुरू माना व त्यात सांगितल्याप्रमाणे आचरण करा. अशाप्रकारे पुढे गुरूंची परंपरा बंद झाली.

शीख धर्मातील दहा गुरू-

गुरू नानकदेव
गुरू अंगददेव
गुरू अमरदेव
गुरू रामदास
गुरू अर्जुनदेव
गुरू हरगोबिंद
गुरू हरराय
गुरू हरकृष्ण
गुरू तेगबहादूर
गुरू गोविंदसिंग

उत्तर लिहिले · 16/12/2021
कर्म · 121765