
भारतातील पुरस्कार
4
Answer link
पद्मविभूषण, पद्मभूषण , पद्मश्री हे भारत सरकारमार्फत देण्यात येणारे नागरी पुरस्कार आहेत, यांना पद्म पुरस्कार देखील म्हणतात. भारतरत्न पुरस्कारानंतर देण्यात येणारे हे सर्वोच नागरी पुरस्कार आहेत.
1954 मध्ये पद्म पुरस्कारांची स्थापना करण्यात आली. हे पुरस्कार दरवर्षी प्रजासत्ताक दिनी जाहीर केले जातात. पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या तीन श्रेणींमध्ये हा पुरस्कार दिला जातो.
- "असाधारण आणि विशिष्ट सेवेसाठी" पद्मविभूषण पुरस्कार दिला जातो. पद्मविभूषण हा भारतातील दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे(पहिला भारतरत्न आहे).
- "उच्च श्रेणीतील प्रतिष्ठित सेवेसाठी" पद्मभूषण. पद्मभूषण हा भारतातील तिसरा (तृतीय) सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे.
- "विशिष्ट सेवा" साठी पद्मश्री. पद्मश्री हा भारतातील चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे.