
ऋतू
0
Answer link
सहा ऋतूचीं माहिती :-
- वसंत : चैत्र, वैशाख.
- ग्रीष्म : ज्येष्ठ, आषाढ
- वर्षा: श्रावण, भाद्रपद
- शरद : आश्विन, कार्तिक
- हेमंत : मार्गशीर्ष, पौष
-शिशिर : माघ, फाल्गुन
महिने आणि ऋतू यांच्या समीकरणातून विविध सण आणि व्रते भारतीय परंपरेत साजरी केली जातात.
वसंत ऋतूत गुढीपाडवा, रामनवमी, हनुमान जयंती, बुद्ध पौर्णिमा ,वसंत पंचमी ही व्रते साजरी होतात.
ग्रीष्म ऋतूत वटपौर्णिमा, आषाढी एकादशी अशी व्रते येतात.
वर्षा ऋतूत नारळी पौर्णमा, रक्षाबंधन, हरितालिका, गणेश चतुर्थी अशी व्रते केली जातात.
शरद ऋतूत देवीचे शारदीय नवरात्र, कोजागिरी पौर्णिमा, दीपावली असे सण येतात.
हेमंत ऋतूत मार्गशीर्ष गुरुवार व्रत, दत्त जयंती ,मकर संक्रांती अशी व्रते केली जातात.
शिशिर ऋतूत माघी गणेश जयंती, होळी, रंगपंचमी असे सण व व्रते केली जातात.