Topic icon

कीटक जीवनचक्र

3
डासांचा विचार केला तर ते 2 महिन्यांपेक्षा अधिक दिवस जगू शकत नाहीत. मादी डास नर डासांपेक्षा अधिक दिवस जगतात. मादी डास 6 ते 8 आठवडे जिवंत राहतात. मादी डास दर 3 दिवसांनी अंडी घालतात आणि ते 2 महिने जिवंत राहतात.

जर माणसांना डासांपासून धोका असेल तर तो मादी डासांपासून आहे, कारण मादी डास माणसांचं रक्त पितात. नर डास मात्र झाडांच्या रसावर जिवंत राहू शकतात. मादी डासांना अंडी घालण्यासाठी रक्ताची आवश्यकता असते आणि एक डास 500 पेक्षा अधिक अंडी देतो. डेंग्यू सारखे गंभीर आजार देखील मादी डास चावल्यामुळे होतात.
जगभरात डासांच्या 3 हजार 500 प्रजाती आहेत. पण यापैकी अनेक डासांपासून माणसांना काहीही धोका नसतो.
उत्तर लिहिले · 28/4/2021
कर्म · 55350