
लैंगिक கருத்து
5
Answer link
या वाक्यात घाणेरडे असे काही नाही.
मात्र व्याकरणाच्या दृष्टीने हे वाक्य जरा चुकीचे आहे. खोलणे म्हणजे एखादी गोष्ट उलगडणे किंवा मोकळी करण्याच्या हेतूने उघडणे. तोंडाच्या बाबतीत तसे काही होत नाही.
या ऐवजी तोंड उघडा असे म्हणणे जरा योग्य ठरेल. ज्या गोष्टीची उघडझाप होते, तिला उघडा या क्रियापदाने संबोधणे व्याकरणाच्या दृष्टीने अधिक बरोबर आहे.
बाकी कुठलाही शब्द घाणेरडा वाटावा की नाही हे तुमच्या विचार करण्याच्या कल्पकतेवर अवलंबून असते. त्यामुळे घाणेरडा वाटतो म्हणून चुकीचे शब्द वापरणे, किंवा हिंदी व इंग्रजी भाषेचा पर्यायी वापर करणे हा प्रकार मराठी भाषेच्या आणि शब्दभांडाराच्या मुळावर उठू शकतो.
त्यामुळे जमेल तितकं अचूक मराठी बोला, आणि अर्थ काढणाऱ्यांना काय अर्थ काढायचा तो काढू द्या.