Topic icon

प्रश्नावली

2
प्रश्नावली
     प्रश्नावली म्हणजे प्रश्नांची यादी किंवा प्रश्नांची मालिका असा सरळ अर्थ घेता येईल. प्रश्नावलीत दिलेल्या प्रश्नांची उत्तरे हि प्रतीसाद्काला (माहिती देणारा ) स्वतः भरून द्यावी लागतात. यात संशोधक विशिष्ट नमुन्यात छापील स्वरुपात प्रश्नावली प्रतीसादकाकडे पाठवितो. हि प्रश्नावली प्रतीसादकाने भरून द्यावयाची असते. ह्या प्रश्नावलीत संशोधक संशोधन विषयासंबंधी वेगवेगळे प्रश्न विचारतो. हे प्रश्न समजून घेऊन प्रतिसादक उत्तरे देत असतो.
       अन्वेषक स्वतः च्या उपस्थितीत प्रश्नावली भरून घेत असेल तर त्याला अनुसूची म्हणतात.प्रश्नसंच वैयक्तिकरित्या पाठवून माहिती मागितली गेल्यास त्याला प्रश्नावली म्हणून संबोधले जाते.

प्रश्नावलीचे प्रकार
अ. संरचित प्रश्नावली
       या प्रश्नावलीत प्रश्न आधीच निश्चित केलेले असतात.तसेच प्रश्नाचे स्वरूप व प्रश्नाचा क्रम पूर्वनिर्धारित असते.
1)बंदिस्त प्रश्न
           बंदिस्त प्रश्न म्हणजे वस्तुनिष्ठ स्वरूपाचे प्रश्न होय.यात प्रतीसाद्काला प्रश्नाचे उत्तराखाली किंवा दिलेल्या उत्तरापैकी योग्य वाटणाऱ्या
उत्तरावर खूण करावी लागते.येथे प्रतीसाद्काला उत्तर देण्याचे स्वतंत्र राहत नाही. बंदिस्त प्रश्नामुळे संख्यात्मक तथ्ये प्राप्त होतात.
2) मुक्त प्रश्न:
            ज्या प्रश्नाच्या उत्तराची शब्दरचना प्रतिसादक स्वताच्या शब्दात करू शकतो त्या प्रश्नाचा समावेश मुक्त प्रश्नात होतो.मुक्त प्रश्नांची संख्या कमी असली तरी माहिती जास्त मिळते. या प्रश्नाच्या उत्तरातून त्या विषयासंबधी बहुविध माहिती मिळू शकते पण त्या माहितीचे वर्गीकरण करणे संशोधकाला फार अवघड असते.
3.मुक्त आणि बंदिस्त प्रश्न
       अश्या प्रकारच्या प्रश्नावलीत काही प्रश्न बंदिस्त स्वरूपाचे असतात तर काही प्रश्न मुक्त स्वरूपाचे असतात.
ब) असंरचित प्रश्नावली
      या प्रकारच्या प्रश्नावलीत प्रश्नांचा क्रम निश्चित नसतो. 





Priya lagsheeti
उत्तर लिहिले · 8/2/2021
कर्म · 14895