Topic icon

लोककला प्रकार

0

लोकनाट्य प्रकार  

अंकिया नाट
अंकिया नाट : अंकिया नाट आसाम राज्यातील पारंपरिक लोकनाट्य आहे. या लोकनाट्यात भाओना या नाट्य अंगाचे सादरीकरण केले जाते. भाओनाचा ...
अंकिया नाट 

आदिवासी कोरकू नाट्य. हे मूलतः विधिनाट्य आहे. महाराष्ट्रातील दंडार, खडी गंमत, आणि सोंगी भजन या प्रकाराशी साम्य असणारा हा नाट्य ...
मच्छिंद्र मालुंजकर

गाबित शिग्माखेळ : होळी सणानिमित्त कोकणच्या गाबीत समाजात सादर होणारे विधीनाट्य म्हणजे शिग्माखेळ होय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात गाबीत समाजातील ...

डरामा, झाडीपट्टीतील. 
पूर्व विदर्भाच्या भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली या झाडीपट्टीच्या जिल्ह्यांतील एक लोकप्रिय लोकनाट्य. या लोकनाट्याने इंग्रजीतील ड्रामा हा शब्द जसाचा ...



दशावतारी नाटके
महाराष्ट्रातील लोकनाट्याचा एक प्रकार. कोकण व गोमंतक येथे सुगीनंतर देवतोत्सवात वा चातुर्मासात जत्राप्रसंगी दशावतारी खेळ करण्याची पूर्वापार प्रथा आहे. विशेषतः ...

नौटंकी 

नौटंकी : भारतातील प्रसिद्ध लोकनाट्यप्रकार. भारतात उत्तरप्रदेशातच नव्हे तर राजस्थान, बिहार, हरियाणा, पंजाब या राज्यात हा लोकनाट्य प्रकार लोकप्रिय आहे ...
नौटंकीमोनिका ठक्कर
पुरुलिया छाऊ

पुरुलिया छाऊ : भारतातील विविध लोकनृत्यापैकी एक लोकनृत्य. प्रामुख्याने भारतातील बंगाल, बिहार आणि ओडिशा या राज्यात प्रसिद्ध. छाऊ नृत्याचे आरंभ ...
पुरुलिया छाऊ शशिकांत कुलथे

पोवाडा
एक मराठी काव्यप्रकार. पोवाडा म्हणजे शूर मर्दाची मर्दुमकी आवेशयुक्त भाषेत निवेदन करणारे कवन, अशी आजची समजूत; परंतु प्राचीन उपलब्ध पोवाड्यांत ...
पोवाडा 

बंगाली जात्रा 
बंगाली लोकनाट्याचा एक प्रकार. बिहार व ओरिसातही तो लोकप्रिय आहे. ‘जात्रा’ म्हणजे यात्रा. निरनिराळ्या सणावारी देवदेवतांच्या मूर्ती रथातून नगरप्रदक्षिणेला काढण्याची ...
चंद्रहास जोशी

भांड पाथर 
भांड पाथर : जम्मू कश्मीरमधील पारंपरिक लोकनाट्य. १५ व्या शतकामध्ये सुलतान जैनुल आबिदीन याच्या काळात जम्मू कश्मीरमध्ये नाटक आणि नाट्यकार ...
भांड पाथर शशिकांत कुलथे
माच 

माच : मध्यप्रदेशातील माळवा आणि त्याच्या आसपास क्षेत्रांतील अत्यंत लोकप्रिय लोकनाट्यशैली. राजस्थानमधील ख्याल शैली आणि उत्तर प्रदेशातील नौटंकी याच्याशी हिचे ...
माच 
मादळ

लोकनाट्य आणि लोकवाद्य. आदिवासी होळीच्या वेळी तारपा, मादळ, ढोल, डेरा, थाळी अशा वाद्यांच्या साथीने होळी साजरी करतात. मादळ हा आदिवासींचा ...
मादळ 
राधा 

झाडीपट्टीतील लोकनाट्य. दंडार आणि खडी गंमत या दोन लोकनाट्यांनंतर लोकप्रियतेच्या कसोटीवर उतरणारे हे लोकनाट्य होय. रात्रभर चालणारा हा लोकरंजनप्रकार राधा ...
राधा 

लप्पक 
स्त्रीप्रधान गंमत प्रकारातील महाराष्ट्रातील नाट्याविष्कार. हा नाट्यप्रकार दलित कलावंतांनी जोपासलेला आणि विकसित केलेला कलाप्रकार असून स्त्रीवर्गात हा नाट्यप्रकार प्रसिद्ध होता ...
मच्छिंद्र मालुंजकर
लळित 


उत्तर लिहिले · 4/7/2022
कर्म · 53815
0
उत्तर:

होय, भारूड हा एक प्रकार आहे.

भारूड:

  • भारूड हे महाराष्ट्रातील एक लोकप्रिय लोकनाट्य आहे.
  • हे अध्यात्मिक विषयांवर आधारित असते.
  • भारूडात एक किंवा अनेक पात्रे असतात.
  • हे गीत, नृत्य, आणि अभिनयाच्या माध्यमातून सादर केले जाते.

भारूड हे प्रामुख्याने संत एकनाथ महाराजांनी लोकप्रिय केले.

अधिक माहितीसाठी:

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 5870
0

आंबेडकरी जलसा (Ambedkarite Jalsa) हा आंबेडकरी चळवळीतील एक महत्त्वाचा भाग आहे. यात प्रामुख्याने खालील माध्यमांचा वापर केला जातो:

  • गायन (Singing): आंबेडकरी जलसामध्ये आंबेडकरी गीते गायली जातात. ही गीते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर, त्यांच्या कार्यावर आणि सामाजिक न्याय, समता या मूल्यांवर आधारित असतात.
  • भाषणे (Speeches): जलसामध्ये विविध वक्ते भाषणे देतात. त्यामध्ये बाबासाहेबांचे विचार, त्यांची शिकवण आणि समाजाला मार्गदर्शन केले जाते.
  • नाटके (Plays): सामाजिक समस्यांवर आधारित नाटके सादर केली जातात. ज्यामुळे लोकांचे मनोरंजन होते आणि त्यांना विचार करण्यास प्रवृत्त केले जाते.
  • नृत्य (Dance): पारंपरिक नृत्य आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जातात.
  • पथनाट्ये (Street Plays): लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी पथनाट्ये सादर केली जातात.
  • पोवाडे (Powadas): पोवाड्यांच्या माध्यमातून ऐतिहासिक घटना आणि सामाजिक संदेश लोकांपर्यंत पोहोचवले जातात.

या माध्यमातून आंबेडकरी विचारधारा लोकांपर्यंत पोहोचवली जाते आणि समाज प्रबोधन केले जाते.

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 5870
2
भारूड हा एक मराठी पद्यवाङ्मयाचा प्रकार आहे. याद्वारे साध्या रूपकांमधून धार्मिक आणि नैतिक तत्त्वज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य केले आहे. अनेक संतांनी समाजप्रबोधनपर भारुडे लिहिली आहेत. ज्ञानेश्वर आणि नामदेव या एकनाथपूर्व तसेच तुकाराम, रामदास या एकनाथांनंतर झालेल्या संतांनी भारुडे लिहिली, पण एकनाथ महाराजांसारखी विविधता त्यांत नाही. संत तुकडोजी महाराजांच्या रचनादेखील प्रचलित आहेत.

इतिहास
‘भारूड‘ या शब्दाचा शब्दकोशातील अर्थ ‘धनगर‘ असा आहे. त्याच्या स्पष्टीकरणासाठी महानुभाव पंथाच्या ऋद्धपुर वर्णन या ग्रंथाचा आधार घेऊन ‘रातप्रभेचे नि घोडे, मेंढिया श्रृंगारती भारुडे‘ असे म्हटले आहे. महाभारतात शकुंतला आख्यान, भारूड सांग हा गीतप्रकार होता. म्हणजेच अथर्वशीर्षांच्या रचनेचा काळ हा सुमारे २५०० वर्षांपूर्वीचा होता. त्यावरून ‘भारूड‘ हा शब्द किमान २००० वर्षे इतका प्राचीन असण्याची शक्यता आहे. वेदकाळी व वेदोत्तरकाळी येते प्रसंगी प्राकृत लोकांचे जानपदाचे, करमणुकीचे प्रकार होत. त्यांतून वैदिक देव व त्यांच्या शौर्यप्रसंगांची स्तुती गायली जायची. याज्ञिक लोकांनंतर यज्ञांची जागा देवपूजेने तर संस्कृत भाषेची जागा प्राकृत भाषेने घेतली, तेव्हा कालमानानुसार पालटते रूप घेऊन जानपद वाङ्मय भारूड स्वरूपात आले असावे. भारुडाचे उगमस्थान म्हणजे हरिकीर्तन आणि कीर्तन परंपरेचे जनक म्हणजे नामदेव महाराज. नामदेव नाचून जे कीर्तन करायचे त्याला लळित म्हणतात आणि लळितातून रूपकाचा जन्म झाला. अध्यात्म सांगायचे ते एखाद्या गोष्टीमधून किंवा रूपकाच्या माध्यमातून. भारुडाचा प्रधान हेतु हाच होता.


प्रकार ==============


भारुडाचे साधारणपणे भजनी भारूड, सोंगी भारूड आणि कूट भारूड असे तीन प्रकार मानले जातात. पैकी भजनी भारूड हे कीर्तनासारखे. कूट भारूड म्हणजे ज्याचा अर्थ लावावा लागतो, जसे 'चिंचेच्या पानी एक देवालय उभारिले, आधी कळस मग पाया रे' किंवा 'मुंगी व्याली शिंगी झाली, तिचे दूध किती...'सारख्या कूट रचना होत.

आजचे स्वरूप
एकनाथमहाराजांनी ४५० वर्षांपूर्वी ‘एडका’ या भारुडाची रचना केली होती. एकनाथांची अशी रूपके सध्याचे एचआयव्ही/एड्ससारखे आजार रोखण्यासाठी तंतोतंत लागू पडतात. म्हणूनच राज्याच्या एड्स नियंत्रण संस्थेद्वारे आज लोककलेच्या माध्यमातून लोकजागृती करण्यासाठी भारुडांचा उपयोग केला जातो.

सादरीकरण
भारूड महोत्सव
वामन केंद्रे यांनी दरवाडी येथे इ.स. २०११ मध्ये भारूड महोत्सव आयोजित केला होता. संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांनी भारुडाची कला जिवंत ठेवली आहे त्यांनी १४ मे २०१६ पर्यंत ‘बहुरूपी भारूड’चे २१०० प्रयोग केले आहेत.
उत्तर लिहिले · 27/11/2020
कर्म · 2910