
माहितीपत्रक
2
Answer link
माहितीपत्रकाचे स्वरूप :
माहितीपत्रक म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण माहिती देणारे लिखित स्वरूपातील परिचयात्मक पत्रक होय. माहितीपत्रक हे एक प्रकारे सेवा, संस्था लोकांपर्यंत पोहोचवण्याचे ये साधन आहे. माहितीपत्रकामुळे उत्पादक आणि ग्राहक यांच्यात संवाद निर्माण होतो. उत्पादनाला नवीन बाजारपेठ मिळवण्यासाठी माहितीपत्रक पहिली पायरी असते.
माहितीपत्रक म्हणजे वैशिष्टपूर्ण माहिती भरणे परिचयात्मक पत्रक होय. माहिती हे एका प्रकारे उत्पादने,
सेवा, संस्था केवळ उपलब्धवण्याचे साधन आहे. नवनव्या योजना, उत्पादन, संस्थांकडे लोकांनी डोकावून
पाहावे यासाठीची ती एक खिडकी आहे. जनमत काढणे एक लिखित स्वरूपाचे स्पष्टीकरण ते स्वीकारणे
असते. माहितीच्या प्रमाणात माहिती पुरवणे आणि माहिती एक नाते निर्माण होण्यास मदत होते. नवीन
ग्राहक तयार करण्याची, नवीन काबीज करण्याची ती पहिली पायरी आहे. माहिती पुलीला ग्राहकाला
त्याची माहिती ग्राहक सतत उपलब्ध असू शकते. माहितीपत्रक कमीत, कमी खर्चात ग्राहक
घरबसल्या लाभवता वी. माहिती हे अप्रत्यक्षपणे जाहिराती कार्य करते. माहिती वाचताक्षणीच
मनात लोकांच्या कुतूहल, उत्कंठा, औत्सुक्य जागे झाले , की समजावे माहितीपत्रकाचा हेतू साध्य झाला आहे.
माहितीची गरज
माहितीची सर्वत्र असते. अगदी फळफळावळ आणि भाजीपाला विक्रेत्य संपूर्ण ते लक्षावधी
अधिकाराच्या आलिशान कार विक्रेत्या आवश्यकता अनिवार्य माहितीपत्रकाची भातेच. दिवाळी फराळ, रेडिमेड
जंगल, साड्या, खेळणी, किराणा माल, दिवाळी अंक, पुस्तके, स्टेशनरी, हॉटेल्स, डायनिंग हॉल, मंगल कार्यालय,
फर्निचर, विद्युत उपकरणे, यंत्रसामग्री, वाहन उपकरणे, वाहने, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे,
दूधदु, खाद्यपदार्थ आदीभांची माहितीपत्रके पाहावयासते लाभात.
नाट्यगृहे, चित्रपटगृहे, सहकारी संस्था, आर्थिक आणि शैक्षणिक संस्था, सामाजिक आणि साहित्य संस्था,
सांस्कृतिक आणि लोकसंस्था, हॉस्पिटल्स, पर्यटन संस्था, एलआयसी, पोस्ट, बँक, पतपेढ्या, बचतगट
इतर ठिकाणी माहितीची गरज असते.
कला, संगीत, छोटे वाटाडे, शेतकरी अवजारे , व्याख्या , प्रवासी , प्रवासी
यांच्या इतरही अनेकानेक क्षेत्रे आहेत.
आवश्यक ठरते. आपले संघपण, आपले वैशिष्ट्य , आपल्या ग्राहकाला होणारा फायदा, या गोष्टींकडून निवड
अधोरेखित करायच्या असतील फक्त माहितीपत्राची गरज हमखास असते.
माहितीच्या वर्णनाची रचना
(१) 'माहिती'ला प्राधान्य-
नावच ' माहिती ' पत्रिका माहितीपत्रक 'माहिती'ला सर्वांत जास्त
প্রাধান্য दिले जाते. ज्याने माहितीपत्रक तयार केले आहे, त्यादृष्टीने सुसंगत, सत्य माहिती दिली
गेली पाहिजे. माहिती आटोपशीर, संक्षिप्त असावी. संस्थेशी संबंधित अत्यावश्यक आणि कायदेशीर
मािहती (उदा.,संस्था नोंदणी क्रमांक, संस्था नोंदणी दिनांक, दूरध्वनी क्रमांक, ई-मेल, वेबसाइट, संस्थेचे
बोधचिन्ह, घोषवाक्य, पत्ता, पदाधिकाऱ्यांची नावे, कामकाजाची वेळ इत्यादी.) माहितीपत्रकात दिली
गेलीच पाहिजे. मुख्य म्हणजे माहितीपत्रकातील माहिती वस्तुनिष्ठ, सत्य, वास्तवच असली पाहिजे.
तिच्यात अतिशयोक्त, चुकीची माहिती असता कामा नये. माहितीपत्रकातील माहिती वाचनीयही असली
पाहिजे. तथापि त्यात माहितीचा अतिरेक नसावा.
(२) उपयुक्तता-
आपले माहितीपत्रक उपयुक्त, परिणामकारक कसे होईल याचीही दक्षता घेतली पाहिजे.
वाचून झाल्यानंतर ते चुरगाळून फेकून न देता जपून ठेवण्याची, वापरण्याची इच्छा झाली पाहिजे. असे
उपयोगमूल्य माहितीपत्रकाला केव्हा प्राप्त होईल; तर जेव्हा माहितीपत्रकात वाचकाच्या (ग्राहकाच्या)
जिव्हाळ्याची माहिती दिली जाते तेव्हा.
‘माझ्या दैनंदिन जीवनातील समस्या, अडचणी, प्रश्न यांच्या
सोडवणुकीसाठी हे माहितीपत्रक मला उपयोगी पडेल’ असे ग्राहकाला वाटायला लावणारे माहितीपत्रक
उपयुक्तच असते. माहितीपत्रकातील ‘तुमच्या पालेभाज्यांवर अतिरिक्त कीटकनाशके मारली आहेत
का?’, ‘दुधातली भेसळ ही अशी ओळखा’ अशा वाक्यांकडे वाचकांचे लक्ष गेले, की शहरी व्यक्तींनाही
कृषिप्रदर्शनाविषयीचे माहितीपत्रक उपयोगी वाटू लागते.
(३) वेगळेपण-
इतरांच्या माहितीपत्रकांपेक्षा आपले माहितीपत्रक वेगळे आणि वैशिष्ट्यपूर्ण कसे असेल
याचीही काळजी घेतली पाहिजे. हे वेगळेपण माहितीपत्रकाच्या मजकुरात आणि रचनेत आणले पाहिजे.
इतरांपेक्षा वेगळी, नवी, रोचक, उपयोगी माहिती देणे आणि वेगळा लेआऊट, वेगळा आकार, वेगळी
रचना आणि वेगळा दृष्टिकोन ठेवणे याद्वारे माहितीपत्रकात वेगळेपण आणता येते.
(४) आकर्षक मांडणी (लेआऊट)-
माहितीपत्रकातील माहितीची मांडणी आकर्षक असली पाहिजे. मांडणी
सरधोपट असू नये. माहितीपत्रक दिसताक्षणी ते ‘वाचावेच’ असे वाटले पाहिजे. त्याचा कागद दर्जेदार
असावा, छपाई रंगीत असावी, पहिले पृष्ठ तर खूपच चित्ताकर्षक असावे. त्याचा आकार योग्य असावा.
त्याचे शीर्षक, बोधवाक्य ठसठशीतपणे दिसणारे असावे. माहितीपत्रकाची मांडणी वेधक करण्यासाठी
गरजेनुसार त्या क्षेत्रातले कुशल कलाकार, चित्रकार, संगणक तज्ज्ञ मदतीला घ्यावेत.
(५) भाषाशैली-
‘माहितीपत्रक’ केवळ पाहिले जात नाही, तर ते ‘वाचले’ही जाते. म्हणूनच ते वाचावेसे
वाटावे यासाठी त्याची भाषा आकर्षक आणि वेधक असली पाहिजे. उदा., ‘आमच्या कृषिपर्यटन केंद्रात’
राहायला आलात तर तुम्ही खूप सुखी व्हाल; इथे तुम्ही इतके रंगून जाल, की तुम्हांला दु:ख करत
बसायला वेळच मिळणार नाही’ एवढी सगळी माहिती ‘आता तणावाला वेळ नाही’ एवढ्या चारच शब्दांत
सांगणे म्हणजेच मनाला भिडणारी शब्दयोजना करणे होय! थोडक्यात, भाषाशैली पाल्हाळीक नको तर
मनाची पकड घेणारी हवी.
माहितीपत्रकासाठी आवश्यक मुद्द्यांचा नमुना
समजा, एका कनिष्ठ महाविद्यालयात नवीन शैक्षणिक वर्षापासून विज्ञानशाखा नव्याने सुरू करायची आहे. ही
बाब जास्तीत जास्त प्रवेशोत्सुक विद्यार्थ्यांपर्यंत आणि पालकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवायची आहे. कारण तसे झाले
तरच विद्यार्थी प्रवेश घेण्यासाठी त्या कनिष्ठ महाविद्यालयाशी संपर्क साधतील. तर मग कशी पोहोचवता येईल ही
बाब त्यांच्यापर्यंत...
अर्थातच माहितीपत्रकाच्या माध्यमातून.
कोणकोणते मुद्दे असले पाहिजेत या माहितीपत्रकात...
(१) ते कनिष्ठ महाविद्यालय ज्या शैक्षणिक संस्थेमार्फत चालवले जाते त्या संस्थेचे बोधचिन्ह/बोधवाक्य,
संस्थेच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची नावे.
(२) त्या संस्थेचे नाव/पत्ता/स्थापना वर्ष/दूरध्वनी क्र./मोबाईल क्र./ई-मेल/वेबसाईट.
(३) त्या कनिष्ठ महाविद्यालयाचे नाव/पत्ता/स्थापना वर्ष/दूरध्वनी क्र./मोबाईल क्र./ ई-मेल/वेबसाईट.
(४) संस्था व कनिष्ठ महाविद्यालयास असलेली शासकीय मान्यता/मंजुरी विषयक संक्षिप्त माहिती.
(५) कनिष्ठ महाविद्यालयाशी संबंधित प्राथमिक माहिती (उदा., शासकीय/खाजगी/अनुदानित/विना
अनुदानित इत्यादी.)
(६) कनिष्ठ महाविद्यालयाची थोडक्यात पार्श्वभूमी.
(७) आवश्यक ती सांख्यिकीय माहिती.
(८) कनिष्ठ महाविद्यालयातील सुविधा. (उदा., स्वच्छतागृहे, प्रयोगशाळा, क्रीडांगण, सभागृह, ग्रंथालय,
अभ्यासिका, वसतिगृह, वाहनतळ, उपाहारगृह इत्यादी.)
(९) कनिष्ठ महाविद्यालयाची इतर वैशिष्ट्ये.
(१०) कनिष्ठ महाविद्यालयात होणारे उपक्रम. (उदा., कमवा व शिका, एन.एस.एस., सहली इत्यादी.)
(११) पूरक फोटो.
(१२) संस्थेच्या इतर शाखांमधील परीक्षांचे निकाल.
(१३) कनिष्ठ महाविद्यालयाच्या भविष्यकालीन योजना.
(१४) विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शैक्षणिक सवलती, शिष्यवृत्ती इत्यादी.
(१५) कनिष्ठ महाविद्यालयापर्यंत जाणाऱ्या रस्त्यांची माहिती/नकाशा.
(१६) प्रवेशप्रक्रियेबद्दलची माहिती, प्रवेश क्षमता, प्रवेशाच्या अटी, आवश्यक ती कागदपत्रे, प्रवेशाबाबतची
पात्रता, प्रवेशाची अंतिम तारीख, प्रवेश अर्जाचा नमुना, फी, सुरुवातीला भरायची रक्कम, संबंधित
कोर्सचा कालावधी, प्रवेशाच्या कामकाजाची वेळ, सुट्ट्या केव्हा असतील, संबंधित अधिकाऱ्याचे
नाव, त्यांचा फोन क्र., प्रवेश निश्चित केव्हा होणार त्याची तारीख (यादी जाहीर करणे.) कनिष्ठ
महाविद्यालय सुरू होण्याची तारीख याबद्दलची माहिती.
समारोप
आजच्या काळात आकर्षक आणि नेमकी माहिती पुरवणारे माहितीपत्रक तयार करणे ही व्यावसायिकांची गरज आहे
आणि ते वेळेवर उपलब्ध होणे ही ग्राहकांची गरज आहे. त्यामुळे माहितीपत्रक तयार करणे या गोष्टीला व्यावसायिक मूल्य
प्राप्त होत आहे.
0
Answer link
माहितीपत्रकाचे स्वरूप खालीलप्रमाणे असते:
- शीर्षक: माहितीपत्रकाच्या शीर्षस्थानी कंपनीचे नाव, लोगो आणि माहितीपत्रकाचा विषय ठळक अक्षरात लिहावा.
- परिचय: माहितीपत्रकात कंपनी आणि तिच्या उत्पादनांची किंवा सेवांची थोडक्यात माहिती द्यावी.
- उद्देश: माहितीपत्रक वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश स्पष्टपणे सांगावा.
- उत्पादने किंवा सेवा: कंपनीच्या उत्पादनांची किंवा सेवांची माहिती तपशीलवार द्यावी. प्रत्येक उत्पादन किंवा सेवेचे वैशिष्ट्य, फायदे आणि वापरण्याची पद्धत सांगावी.
- वैशिष्ट्ये: उत्पादने किंवा सेवांची वैशिष्ट्ये नमूद करावी, जसे की किंमत, आकार, रंग, उपलब्धता आणि वॉरंटी.
- संपर्क माहिती: कंपनीचा पत्ता, ईमेल आयडी, वेबसाइट आणि सोशल मीडिया लिंक्स यांसारखी संपर्क माहिती द्यावी.
- ग्राफिक्स आणि चित्रे: माहितीपत्रक आकर्षक बनवण्यासाठी उच्च-गुणवत्तेचे ग्राफिक्स आणि चित्रे वापरावी.
- डिझाइन आणि लेआउट: माहितीपत्रकाचे डिझाइन आकर्षक आणि वाचायला सोपे असावे. योग्य फॉन्ट आणि रंगांचा वापर करावा.
- भाषा: माहितीपत्रकाची भाषा सोपी आणि स्पष्ट असावी.
- इतर माहिती: कंपनीची ध्येये, यश आणि सामाजिक बांधिलकी याबद्दल माहिती द्यावी.
अधिक माहितीसाठी आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता: