Topic icon

निवडणूक विश्लेषण

0

काही नेत्यांच्या सभांना हजारोंची गर्दी होऊनही ते निवडणूक जिंकत नाहीत, याची अनेक कारणे असू शकतात. ही काही प्रमुख कारणे आहेत:

  • केवळ गर्दी म्हणजे मते नाहीत: सभेला येणारे लोक केवळ उत्सुकतेपोटी, मनोरंजनासाठी, किंवा विनामूल्य वाहतूक/जेवण मिळाल्यामुळेही येऊ शकतात. याचा अर्थ असा नाही की ते त्या नेत्याला किंवा पक्षाला मतदान करतीलच. अनेकदा लोक नेत्याचे भाषण ऐकण्यासाठी येतात, पण त्यांच्या मनात वेगळाच उमेदवार असतो.
  • स्थानिक पातळीवरील कमकुवतपणा: नेता राज्य किंवा राष्ट्रीय पातळीवर लोकप्रिय असू शकतो आणि त्यामुळे त्याच्या सभांना गर्दी जमू शकते. परंतु, स्थानिक पातळीवर त्या उमेदवाराची किंवा पक्षाची पकड कमकुवत असू शकते. स्थानिक कार्यकर्ते, बुथ व्यवस्थापन आणि घरोघरी प्रचार (door-to-door campaigning) निवडणुकीत अत्यंत महत्त्वाचे ठरतात, ज्यात कमतरता असू शकते.
  • मुद्दे आणि धोरणांचा अभाव: केवळ लोकप्रिय भाषणे देऊन गर्दी खेचणे पुरेसे नसते. मतदारांना त्यांच्या समस्यांशी संबंधित ठोस धोरणे आणि उपायांची अपेक्षा असते. जर नेत्याकडे प्रभावी मुद्दे किंवा विश्वसनीय धोरणे नसतील, तर केवळ गर्दी मतांमध्ये रूपांतरित होत नाही.
  • विरोधी पक्षाची मजबूत रणनीती: एका पक्षाची सभा मोठी असली तरी, विरोधी पक्ष अधिक प्रभावीपणे त्यांच्या मतदारांना संघटित करू शकतो. विरोधी पक्ष मतदारांपर्यंत योग्य संदेश पोहोचवून त्यांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात अधिक यशस्वी होऊ शकतो.
  • असंघटित मतदार किंवा अनिर्णित मतदार: मोठ्या सभांमुळे पक्षाचे समर्थक उत्साहित होतात, परंतु अनिर्णित मतदारांना (undecided voters) आपल्या बाजूने वळवण्यात हे नेते कमी पडू शकतात. निवडणुकीचा निकाल अनेकदा या अनिर्णित मतदारांवर अवलंबून असतो.
  • लाट किंवा प्रभावाचा अभाव: काही वेळा संपूर्ण राज्यात किंवा देशात एखाद्या विशिष्ट पक्षाची किंवा नेत्याची लाट असते. त्या लाटेत इतर नेत्यांच्या सभांना गर्दी असली तरी, ते मतांमध्ये परावर्तित होत नाही.
  • पैसा आणि बाहुबलींचा प्रभाव: दुर्दैवाने, काही निवडणुकांमध्ये पैसा आणि स्थानिक बाहुबलींचा प्रभाव आजही खूप महत्त्वाचा ठरतो. मोठ्या सभांपेक्षा हे घटक मतदारांना अधिक प्रभावित करू शकतात.

थोडक्यात, मोठी गर्दी ही केवळ एका लोकप्रियतेची निशाणी असू शकते, पण ती थेट मतांच्या संख्येत रूपांतरित होतेच असे नाही. निवडणुकीत जिंकण्यासाठी प्रभावी संघटना, स्थानिक पातळीवरील मजबूत पकड, ठोस धोरणे आणि मतदारांशी थेट संवाद हे महत्त्वाचे घटक असतात.

उत्तर लिहिले · 2/6/2026
कर्म · 5280
5
_*‼ निवडणुक एक्झिट पोल कसा काढतात ? ‼*_





____________________________
.     *_माहिती सेवा ग्रूप,पेठवडगाव_*
   *╰──────•◈•──────╯*
____________________________
.        📯 *_दि. २२ आॅक्टेांबर २०१९_* 📯
        एक्झिट पोल खरे नसतात. ते चुकतात. एक्झिट पोल काढणारे कधीच आमच्यापर्यन्त पोहचले नाहीत. मग हे कुठून सर्व्हे आणतात. सर्वसामान्य मतदार कार्यकर्त्यांना पडणारा नेहमीचा प्रश्न.एक्झिट पोल कसे काढले जातात? ते शास्त्रीय असतात का? त्यासाठी कोणते गृहितक असतात याबद्दल सहसा चर्चा होत नाही.
तर इलेक्शन दरम्यान दोन पोल घेतले जातात. पहिला पोल म्हणजे ओपिनियन पोल आणि दूसरा एक्झिट पोल.
*❗ओपिनियन पोल म्हणजे काय?*
ओपिनियन पोल म्हणजे लोकांचा कल कुठल्या पक्षाकडे आहे याचा अंदाज घेणं. हा पोल शास्त्रीय नसतो. संख्याशास्त्र, कुठलेही नियम हा सर्व्हे करताना वापरले जात नाहीत.
╔══╗
║██║      _*M⃟   a⃟   h⃟   i⃟   t⃟   i⃟  * _
╚══╝
▄ █ ▄ █ ▄ 🔳 █ ▄🔲 █
*- - - - - - - - - - - -●*
_*🥀 ᵐᵃʰiᵗi ˢᵉᵛᵃ ᵍʳºᵘᵖ, ᵖᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃºⁿ*_
https://m.facebook.com/story.php?story_fbid=823890204675571&id=100011637976439
____________________________
म्हणून या पोलवर टिका होते. त्यातही इलेक्शन पुर्वी ओपिनियन पोल होत असल्यामुळे असे पोल सत्ताधारी पक्षाच्या बाजूने असतात असा सर्वसामान्य समज असतो. हा पोल कसा काढतात तर पत्रकार लोकांना भेटतात त्यांना प्रश्न विचारतात आणि प्रश्नातून लोकांचा कल समजून घेतात.
*❗एक्झिट पोल म्हणजे काय?*
एक्झिट पोल निवडणुकीनंतर येतात. निवडणुकांचा शेवटचा टप्पा आला की हे पोल बाहेर पडतात. त्यात संख्याशास्त्र असतं. एक्झिट पोल काढण्याचे नियम असतात.त्यामुळे याच पोलबद्दल एक विश्वासार्ह वातावरण असत. आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,अचूक जागांचे अंदाज दाखवता येत नसले तरी देशाचा एकंदरीत कल कोणत्या बाजूने आहे हे सांगण्यासाठी एक्झिट पोल महत्वाचे ठरतात.
*❗एक्झिट पोल काढतात कसे?*
एक्झिट पोल काढण्याचे स्वतंत्र नियम आहेत. ९ कोटी मतदारांमधून काही हजारो लोकांची मते घेवून असे पोल ठरवले जातात हे खरं असल्याने यावर टिका होते. साधारणपणे प्रत्येक मतदारसंघातून काही बुथ ठरवले जातात. या बुथमधून १० व्या १२ व्या १४ व्या अशा क्रमांकाने (दरवेळी असाच क्रम असेल अस नसतं रॅण्डमली हा क्रम ठरवला जातो जस ५ व्या १० व्या किंवा १ ल्या ३ ऱ्या प्रमाणे) मतदारांना गाठण्यात येते. माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,या मतदारांना एक चिठ्ठी देण्यात येते व त्यांनी कोणाला मतदान केले त्या पक्षाच्या चिन्हासमोर खूण करुन ती बॉक्समध्ये टाकण्यास सांगण्यात येते. सध्याच्या काळात हि पद्धत मोबाईल व टॅबवर होते. टॅबवर ज्या पक्षाला मत दिले त्या पक्षाच्या समोर खूण करण्यास सांगितले जाते.
एक्झिट पोल काढण्याच्या या प्रकारात मतदाराने कोणाला मतदान केले हे जाणून घेण्याचा अधिकार एक्झिट पोल घेणाऱ्याला देखील नसतो. अशा प्रकारे प्रत्येक ठिकाणावरून मतदान पार पडल्यानंतर अंदाज घेतला जातो पण ९५ कोटी मतदारांच्या यादीत हि संख्या अगदी नगण्य असते. पण ती व्यापक असण्यावर भर दिला जातो. संपुर्ण भारतभरातून सर्व्हे घेण्यावर भर दिला जातो. 
अशा प्रकारे आकडे गोळा करण्यात आल्यानंतर पुढची पद्धत असते ती मतांची टक्केवारी ठरवण्याची. कोणत्या पक्षाला किती टक्के मते आहेत यावरून एकूण जागांचा अंदाज संख्याशास्त्रज्ञ काढतात. हि पद्धत शास्त्रीय असते. व त्यासाठी ठराविक नियम ठरलेले असतात.
*❗एक्झिट पोल चुकतात का?*
एक्झिट पोल चुकतात याबद्दल सर्वाधिक वेळा २००४ चा संदर्भ दिला जातो. एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार 2004 साली पुन्हा देशात वाजपेयी सरकार येणार होते मात्र प्रत्यक्ष निकाल लागला तेव्हा कॉंग्रेसने जोरदार मुसंडी मारली. या व्यतिरिक्त जागांच्या आकडेवारीमध्ये अनेकदा तफावत असलेली दिसून येते मात्र एक्झिट पोलमध्ये एखाद्या पक्षाकडे असणारा कल हा निकाल लागल्यानंतर सिद्ध झालेला दिसतो. प्रणब रॉय यांनी लिहलेल्या  the verdict decoding indias election या पुस्तकात एक्झिट पोलबाबत अभ्यास केला असून त्यांच्या मते आजपर्यन्त 84 टक्के वेळा एक्झिट पोलचे अंदाज बरोबर आले आहेत.
तरिही एक्झिट पोलबद्दल शंका घेण्यास जागा मिळते कारण इथे घेण्यात आलेले सर्व्हेक्षण हे काही हजार मतांवर अवलंबून असते. कधीकधी ते संपुर्ण २८८ मतदारसंघात देखील घेतले जात नाही. सर्व्हे घेण्यात आलेल्या लोकांची संख्या कधी ३००० हजार कधी पाच हजार देखील असते त्यामुळे बऱ्याचदा असे सर्व्हे चुकतात.
बोलभिडु वरून साभार
____________________________
*🛡ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* *☜♡☞*

    _*🎈 माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव*_🎈
_͓_͓_͓_͓_͓_͓_͓_͓_͓_͓_͓_͓_͓_͓_͓_͓_͓_͓_͓_͓_͓_͓_͓_͓_͓_͓_͓_͓_͓_͓_͓
.       _*ണคн¡т¡ รεvค*_
.       *_:::::∴━━━✿━━━∴::::_*
.            *ℰ⍲‿⍲ℰ*