Topic icon

भूगोलावरील काल्पनिक रेषा

2
🔖कर्कवृत्त हे पृथ्वीवरील पाच प्रमुख अक्षवृत्तांपैकी एक आहे. सूर्य जिथे मध्यान्ही बरोबर डोक्यावर येईल अशा ठिकाणांमधे कर्कवृत्त हे सर्वात उत्तरेकडील अक्षवृत्त होय. कर्कवृत्तावर २१ जून ह्या दिवशी मध्यान्ही सूर्य बरोबर डोक्यावर येतो. कर्कवृत्त विषुववृत्तापासून २३° २६′ २२″ अंश (सुमारे साडेतेवीस अंश) उत्तरेस आहे. विषुववृत्तापासून कर्कवृत्तासारख्याच अंतरावर असलेल्या दक्षिण गोलार्धातील अक्षवृत्तास मकरवृत्त असे नाव आहे. कर्कवृत्त आणि मकरवृत्त ह्या मधील भागास उष्ण कटिबंध असे म्हणतात.