Topic icon

सैनिकी अधिकारी

0
मी तुम्हाला सैन्याच्या प्रत्येक विभागाच्या प्रमुखांना काय म्हणतात याबद्दल माहिती देऊ शकेन.

भारतीय सैन्य (Indian Army):

  • पद: लष्करप्रमुख (Chief of the Army Staff - COAS)
  • लष्करप्रमुख हे भारतीय सैन्याचे सर्वोच्च अधिकारी असतात.

भारतीय नौदल (Indian Navy):

  • पद: नौदल प्रमुख (Chief of the Naval Staff - CNS)
  • नौदल प्रमुख हे भारतीय नौदलाचे सर्वोच्च अधिकारी असतात.

भारतीय वायुसेना (Indian Air Force):

  • पद: वायुसेना प्रमुख (Chief of the Air Staff - CAS)
  • वायुसेना प्रमुख हे भारतीय वायुसेनेचे सर्वोच्च अधिकारी असतात.

भारतीय तटरक्षक दल (Indian Coast Guard):

  • पद: महासंचालक (Director General)
  • महासंचालक हे भारतीय तटरक्षक दलाचे प्रमुख असतात.
उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 3000
6
भारतीय सैन्य रेजिमेंटमध्ये विभागलेले असले तरी त्याचे सात व्यावहारिक आणि भौगोलिक विभाग आहेत. अशा प्रत्येक विभागास कमांड असे नाव दिलेले आहे.

कमांड - भारतीय सैन्यातील सात कमांड
चीफ ऑफ स्टाफच्या नेतृत्त्वाखाली असते. हा अधिकारी लेफ्टनंट जनरल पदावरील अधिकारी असतो. प्रत्येक कमांडमध्ये १-२ कोर असतात. भारतीय सैन्यात सहा लढाऊ कमांड, एक प्रशिक्षण कमांड आणि तीन मिश्र कमांड आहेत.
कोर - प्रत्येक कोरचा कमांडिग ऑफिसर (जीओसी) असतो. हा सहसा लेफ्टनंट जनरल पदावरील अधिकारी असतो. प्रत्येक कोरमध्ये ३-४ डिव्हिजन असतात.
डिव्हिजन - प्रत्येक डिव्हिजनचा सेनापती जनरल ऑफिसर कमांडिंग (जीओसी) असतो. हा सहसा मेजर जनरल पदावरील अधिकारी असतो. एका डिव्हिजनमध्ये ३-४ ब्रिगेड असतात. भारतीय सैन्यात सध्या एकूण ३७ डिव्हिजन आहेत. यांत ४ रॅपिड डिव्हिजन, १८ पायदळी डिव्हिजन, १० डोंगरी डिव्हिजन, ३ चिलखती डिव्हिजन आणि दोन तोफखान्याच्या डिव्हिजनांचा  समावेश आहे.
ब्रिगेड - प्रत्येक ब्रिगेडचा नेता ब्रिगेड कमांडर असतो. हा सहसा ब्रिगेडियर किंवा ब्रिगेडियर जनरल पदावर असतो. एका ब्रिगेडमध्ये साधारण ३,००० सैनिक असतात. यात तीन पायदळ बटालियन आणि त्यांच्या कुमकेचा समावेश असतो. भारतीय सैन्यात डिव्हिजनांमधील ब्रिगेडांबरोबरच स्वतंत्र अस्तित्त्व असलेल्या ५ चिलखती ब्रिगेड, १५ तोफखान्याच्या ब्रिगेड, सात पायदळी ब्रिगेड, १ पॅराशूट ब्रिगेड, ३ हवाई संरक्षण ब्रिगेड,४ अभियांत्रिकी ब्रिगेडा आणि २ हवाई संरक्षण समूह आहेत. प्रत्येक स्वतंत्र ब्रिगेड आपापल्या कोर कमांडरच्या हुकुमाखाली असते.
बटालियन - प्रत्येक बटालियनचा नायक बटालियन कमांडर  असतो. हा सहसा कर्नल पदावर असतो. प्रत्येक बटालियनमध्ये अनेक कंपनी असतात. यांतील एकतरी कंपनीमधील एखादीतरी प्लाटून घातक प्लाटून प्रकारची असते. बटालियन  ही भारतीय सैन्याचा मूळ एकक मानला जातो.
कंपनी - कंपनीचा नेता कंपनी कमांडर असतो. हा मेजर किंवा लेफ्टनंट कर्नल पदावर असतो. एका कंपनीमध्ये ३ प्लाटून असतात.
प्लाटून - प्लाटून कमांडर प्रत्येक प्लाटूनचा नेता असतो. हा सहसा जुनियर कमिशन्ड ऑफिसर पदावरील अधिकारी असतो. प्रत्येक प्लाटूनमध्ये तीन सेक्शन असतात.
सेक्शन: प्रत्येक सेक्शनचे नेतृत्त्व हवालदार करतो. हा सहसा नॉन कमिशन्ड ऑफिसर असतो. प्रत्येक सेक्शनमध्ये १० सैनिक असतात.