Topic icon

कॉफी

0
भारतात कॉफी उद्योगात अग्रेसर राज्य कर्नाटक हे आहे.

उत्तर लिहिले · 29/10/2021
कर्म · 25850
3
*⭕ उदमांजराच्या विष्ठेतील @बियांपासून तयार होते महागडी @कॉफी, किंमत माहितीये? ⭕*

आजकाल कॉफीशिवाय आपलं पानच हलत नाही. वाईट मूडही फटक्यात ठीक करायचा असेल किंवा झोप घालवायची असेल@ तर एक कप कॉफी पुरेशी ठरते. कॉफीची निर्मिती आणि निर्यात करणारा भारत हा आशिया खंडातला तिसरा मोठा देश आहे. पण आता कॉफी निर्मितीमध्ये भारताने एका पाऊल पुढे टाकायचं ठरवलं आहे. @तेव्हा लवकरच भारत जगातील सर्वात महागडी कॉफी निर्यात करणार आहे. या कॉफीची भारतातील@ किंमत ८ हजार रुपये किलो तर आखाती आणि युरोपीय देशांतील किंमत २० ते २५ हजार रुपये किलोच्या आसपास असेल.आता तुम्हाला ही किंमत ऐकून धक्का बसला असेल. एवढी किंमत असण्यामागचं कारण काय असू शकतं? असा प्रश्न साहजिकच तुम्हाला पडला असेल. @

ही महागडी कॉफी उदमांजरच्या (civet cat) विष्ठेतील कॉफीच्या बियांपासूनतयार केली जाते. हे वाचून तुम्ही नाक वगैरे मुरडलं असेल यात काहीच शंका नाही. पण ही कॉफी अशाचप्रकारे तयार केली जाते. @उदमांजर कॉफीची फळं खातात. फळांचा गर ती सहज पचवते पण बिया मात्र उदमांजरांना पचवता येत नाही.@ तिच्या विष्ठेमार्फत बियाबाहेर फेकल्या जातात. उदमांजर कॉफीची तिचं फळं खाते जी चांगली आणि पिकलेली असतात, अशीही धारणा आहे. @मांजरीच्या पोटात असलेल्याद्रव्यामुळे कॉफीच्या बियांची चव वाढवण्यास मदत होते.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,मग तिची विष्ठा गोळा केल्यानंतर त्यातून बिया वेगळ्या केल्या जातात आणि त्यानंतर त्यापासून कॉफी तयार केली जाते. ‘कूर्ग कन्सॉलिडेटेड कमॉडिटिज’ या कॉफीची निर्मिती करत असून,@ *‘अॅनिमेन’* या ब्रँडखाली तिची विक्री होणार आहे. अनेक ठिकाणी उदमांजरांना पकडून @त्यांना बळजबरीने कॉफीची फळं खाऊ घालण्याची सक्ती केली जाते. पण कुर्गमध्ये मात्र या प्राण्यांवर कोणतीही बळजबरी न करता नैसर्गिक मार्गानेचे तिची निर्मिती करण्यात येणार आहे.@
दै लोकसत्तावरून
*_✍🏼संकलन_*