Topic icon

शतके

12
पूर्ण वाचा  सर्व समजेल

कालाय तस्मै नमः...


तर 24 तास म्हणजे 8 प्रहर म्हणजे 1 अहोरात्र
1 अह म्हणजे 1 रात्र म्हणजे 12 तास किंवा 4 प्रहर
1 प्रहर म्हणजे 3 तास किंवा 6 नाडीका
2 नाडीका म्हणजे 1 तास किंवा 60 मिनिटे किंवा 1 मुहूर्त
1 नाडीका म्हणजे 30 मिनिटे किंवा 15 लघु
1 लघु म्हणजे 2 मिनिटे किंवा 120 सेकंद म्हणजे 15 काष्ठा
1 काष्ठा म्हणजे 5 क्षण म्हणजे 8 सेकंद
1 क्षण म्हणजे 3 निमेष म्हणजे 1.6 सेकंद
1 निमेष म्हणजे 3 लव म्हणजे 0.53 सेकंद
1 लव म्हणजे 3 वेध म्हणजे 0.17 सेकंद
1 वेध म्हणजे 100 त्रुटी म्हणजे 0.056 सेकंद
1 त्रुटी म्हणजे 3 त्रसरेणू किंवा 0.00057 सेकंद
1 त्रसरेणु म्हणजे 3 अणु म्हणजे 0.00019 सेकंद
1 अणु म्हणजे 2 परमाणू म्हणजे 0.000063 सेकंद
1 परमाणु म्हणजे 0.000032 सेकंद अर्थात सेकंदाचा बत्तीस दशलक्षांवा भाग.


आपण बघितले की
24 तास म्हणजे 8 प्रहर म्हणजे 1 अहोरात्र
अश्या 15 अहोरात्री म्हणजे 1 पक्ष (कृष्ण आणि शुक्ल)
अश्या दोन पक्षांचा 1 मास (चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन)
असे 2 मास मिळून 1 ऋतु (वसंत, ग्रीष्म, वर्षा, हेमंत, शरद आणि शिशिर)
3 ऋतूंचे 6 मास म्हणजे 1 अयन (उत्तरायण आणि दक्षिणायन)
असे 6 ऋतु मिळून 12 मास म्हणजे 1 संवत्सर
अशी 100 संवस्तरे म्हणजे सामान्य मनुष्याच्या आयुष्याची परम मर्यादा!


तर मानवाचं 1 वर्ष किंवा संवत्सर म्हणजे देवाचा 1 दिवस
असे 360 देव दिवस म्हणजे देवाचे1 वर्ष
देवाचं1 वर्ष म्हणजे मानवाची 360 वर्षं
अशी देवांची 1200 वर्ष म्हणजे 1 कलियुग अर्थात मानवाची 4,32,000 वर्ष
देवांची 2400 वर्षं म्हणजे 1 द्वापारयुग म्हणजे मानवाची 8,64,000 वर्ष
देवांची 3600 वर्ष म्हणजे 1 त्रेतायुग म्हणजे मानवाची 12,96,000 वर्ष
देवांची 4800 वर्ष म्हणजे 1 कृतयुग किंवा सत्ययुग म्हणजे मानवाची 17,28,000 वर्ष
देवांची 12000 वर्ष म्हणजे 1 चौकडी अर्थात मानवाची 43,20,000 वर्ष
अश्या 1000 चौकड्या म्हणजे ब्रह्माचा 1 दिवस म्हणजे मानवाची 4,32,00,00,000 वर्ष
अश्याच 1000चौकड्या म्हणजे ब्रह्माची 1 रात्र म्हणजे मानवाची 4,32,00,00,000 वर्ष
अश्या 2000 चौकड्या म्हणजे ब्रह्माची 1 अहोरात्र म्हणजे मानवाची 8,64,00,00,000 वर्ष (8 अब्ज, 64 कोटी वर्ष)
थोडक्यात म्हणजे मानवाची 8.64 अब्ज वर्ष. समर्थ रामदास स्वामींनी सुद्धा त्यांच्या दासबोधात (दा.६.४.१ ते ४) पण हेच सविस्तर सांगितलंय.
उत्तर लिहिले · 28/2/2020
कर्म · 2660
0

सध्या 21 वे शतक चालू आहे. हे समजण्यासाठी आणि मागील शतके समजून घेण्यासाठी खालील माहितीचा वापर करू शकता:

शतक म्हणजे काय?
  • शतक म्हणजे 100 वर्षांचा काळ.
  • पहिला शतक 1 AD (After Death) पासून सुरू झाला.
शतके कशी मोजायची?
  • सध्याच्या वर्षात 100 ने भागा.
  • जर बाकी 1 पेक्षा जास्त असेल, तर भागाकारात 1 मिळवा.
  • उदाहरणार्थ: 2024 हे वर्ष 21 व्या शतकात येते (2024/100 = 20.24, भागाकार 20 आहे, त्यात 1 मिळवा म्हणजे 21).
आधीची शतके:
  • 20 वे शतक: 1901 ते 2000
  • 19 वे शतक: 1801 ते 1900
  • 18 वे शतक: 1701 ते 1800

अधिक माहितीसाठी तुम्ही हे पाहू शकता: विकिहाऊ - शतक कसे मोजायचे?

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 2200