ग्रामपंचायत कामकाज
0
Answer link
गावातील दिवाबत्ती ग्रामपंचायत मार्फत कधी लावली जाते याची माहिती:
गावातील दिवाबत्ती (street lights) व्यवस्था ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत येते. दिवाबत्ती लावण्याची वेळ आणि पद्धत काही गोष्टींवर अवलंबून असते:
- सूर्यास्ताची वेळ: दिवाबत्ती साधारणपणे सूर्यास्ताच्या वेळेनंतर लावली जाते. सूर्यास्ताची वेळ बदलते, त्यामुळे दिवाबत्तीची वेळ देखील बदलते.
- स्वयंचलित दिवे: आजकल बहुतेक ग्रामपंचायती स्वयंचलित दिवे (automatic street lights) वापरतात. हे दिवे प्रकाश कमी झाल्यावर आपोआप सुरू होतात आणि सकाळी प्रकाश वाढल्यावर बंद होतात.
- ग्रामपंचायतीचे निर्णय: काही वेळा ग्रामपंचायत विशेष निर्णय घेऊन दिवाबत्तीची वेळ ठरवते. उदाहरणार्थ, एखाद्या उत्सवाच्या वेळी किंवा विशेष कार्यक्रमात जास्त वेळ दिवाबत्ती सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.
- दिव्यांची देखभाल: ग्रामपंचायत दिव्यांची नियमित देखभाल करते. खराब झालेले दिवे बदलणे किंवा त्यांची दुरुस्ती करणे हे देखील ग्रामपंचायतीचे काम आहे.
अधिक माहितीसाठी:
- महाराष्ट्र शासन (Government of Maharashtra)
- ग्राम विकास विभाग, महाराष्ट्र शासन (Department of Rural Development, Government of Maharashtra)
तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये संपर्क साधून अधिक माहिती मिळवू शकता.
4
Answer link
मित्रा,
एखाद्या कामास जिल्हाधिकारी यांच्याकडून मंजुरी असल्यास ते काम ग्रामपंचायत मधील ग्रामसेवक, सरपंच व इतर सदस्यांची मदत घेऊन पूर्ण करू शकतात.
ग्रामपंचायत ही गट विकास अधिकारी यांच्या अधिपत्याखाली येते.
मोठे काम असल्यास त्यांना पंचायत समिती तील सर्व अधिकारी यांच्या मदतीने काम पूर्ण करता येते.

7
Answer link
*ग्रामपंचायतीने करावयाची कामे तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या ग्रामपंचायतीच्या कामाची यादी !*
मित्रांनो आपल्या देशातील बहुतांश जनता ग्रामीण भागात राहत असते , महाराष्ट्राचा जरी विचार केला तरी ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांचे प्रमाण खूप जास्त आहे त्यामुळे ग्रामपंचायतीने करावयाची कामे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे जेणेकरून प्रत्येक गावातला माणूस आपल्या गावाच्या विकासाबद्दल जागरूक होईल आणि यामुळे ग्रामपंचायत स्तरावर मोठ्या प्रमाणात मिळणाऱ्या निधीचे सुयोग्य नियोजन करता येईल. ग्रामपंचायतीमधील विकास प्रक्रिया एकात्मिक व सर्वसमावेशक होईल. गावातील नागरिकांचा आणि गावचा शाश्वत विकास होईल. लोकसहभागातून मर्यादित संसाधनाद्वारे आपल्या ग्रामपंचायतमधील समस्या सोडविता येतील. गावातील नागरिक, लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्या समन्वयातून विकास करणे साध्य होईल.ग्रामपंचायतीने करावयाची कामे : शेतजमीन सुधारणा,छोटे पाटबंधारे,पाण्याचे नियोजन व पाणलोट क्षेत्र विकास,दूध उत्पादन- पशुसंवर्धन, कुक्कुटपालन, मत्स्य व्यवसाय,सामाजिक ,वनीकरण,वनशेती व वनसंपत्ती उत्पादन,लघुउद्योग, कुटिरोद्योग, खादी ग्रामोद्योग,घरे,पिण्याचे पाणी,जळण आणि चारा,दळणवळणाची साधने, रस्ते, पूल, फेरीबोट, जलमार्ग इ.विद्युतीकरण,दारिद्रय निर्मूलन, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण, प्रौढशिक्षण व अनौपचारिक शिक्षण, तंत्रशिक्षण व व्यावसायिक मार्गदर्शन, ग्रंथालय,आरोग्य व स्वच्छता-ग्रामीण आरोग्य केंद्र, दवाखाना व रुग्णालय, कुटुंबकल्याण,महिला व बालकल्याण,समाज संपत्तीचे संरक्षण,आर्थिक-सांस्कृतिक कल्याण,अनुसूचित जाती-जमातीसाठी कामे,अपंग व मतिमंदाकडे विशेष लक्ष पुरवणे,सार्वजनिक वितरण व्यवस्था, बाजार आणि जत्रांची कामे इ.ग्रामपंचायत अधिनियम कलम ४५ अन्वये पंचायतीचे प्रशासकीय अधिकार व कर्तव्ये निश्चित करून दिलेली आहेत. या कलमाच्या अनुषंगाने ग्रामसूची किंवा अनुसूची- १ मध्ये वेगवेगळ्या १२ विभागांच्या संबंधी ७८ विषयांची जबाबदारी ग्रामपंचायातीकडे सोपविण्यात आली आहे.
अनुसूची १ मध्ये नमूद केलेले विभाग आणि त्याअंतर्गत विषयांची संख्या याचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे :
ग्रामसूची किंवा अनुसूची : कृषि, पशुसंवर्धन ,वने ,समाजकल्याण,शिक्षण,वैद्यकीय आणि आरोग्य,इमारती व दळणवळण,पाटबंधारे,उद्योगधंदे व कुटीर उदयोग, सहकार, स्वसंरक्षण व ग्राम संरक्षण सामान्य प्रशासन.ग्रामसभेची भूमिका : ग्राम संसाधन गटाची ग्रामसभेत स्थापना करणे. कामाची निवड करणे. निधीच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता देणे. कामाच्या प्रगतीवर आणि गुणवत्तेवर नियंत्रण ठेवणे. विकास योजनांचे सामाजिक एकत्रिकरण करणे. यामुळे आता ग्रामसभेतील प्रत्येक सदस्यावर मोठी जबाबदारी येऊन पडली आहे. आता गावातील प्रत्येक व्यक्तीने ग्रामसभेला हजर राहून व सर्व माहिती समजावून घेऊन ग्रामसभेच्या कामकाजामध्ये सहभाग घेणे आवश्यक आहे.ग्रामपंचायतीची भूमिका : गावातील सर्वांना आराखडा निर्मितीसाठी जागरुक करणे. तीन दिवसीय प्रक्रियेची योग्य प्रचार प्रसिद्धी करणे. प्रत्येक स्थरावर ग्रामसभेला आवश्यक असणारी माहिती व मदत देणे. ग्रामसभेच्या मदतीने चालू वर्षाचा बृहद विकास आराखडा आणि दरवर्षी वार्षिक कृती आराखडा तयार करणे. आवश्यक वाटेल तिथे शासकीय यंत्रणा अथवा सामाजिक संस्थांकडून तांत्रिक सहाय्य घेणे. आपल्या गावातील योजनेतील कामे व खर्च यांच्या काळजीपूर्वक नोंदी ठेवणे, कामाच्या गुणवत्तेचा लेखाजोखा तयार करुन घेणे. गावातील हाती घेतलेली विकास कामे विहित मुदतीत पूर्ण करुन त्यांचे पूर्णत्वाचे दाखले प्राप्त करुन घेणे व ऑनलाईन करणे गरजेचे आहे. गावाला झालेल्या उपलब्ध निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र शासनाला प्लॅन प्लसद्वारे पाठविणे आवश्यक आहे. या ग्रामपंचायत विकास आराखड्यामुळे प्रत्येक गावोगावी विकासाची नांदीच होणार आहे. असेच म्हणावे लागेल.मित्रांनो ग्रामपंचातीच्या कामाबद्दल तुम्हाला माहिती व्हावी हा आमचा उद्देश होता , तुम्हाला पण आणखी काही माहिती असेल तर कंमेंट मध्ये कळवू शकता आणि शेयर करायला विसरू नका .