Topic icon

दर विश्लेषण

4
मित्रा,
रेट अॅनालिसस म्हणजे दर पृथक्करण हा झाला मराठी शब्द.
   आता दर पृथक्करण म्हणजे काय?
समजा आपणास एखादी बाब करून घ्यायची असेल तर त्याचा दर काय असावा.तो कसा ठरविण्यात येतो.त्या बाबतीत तपशीलवार अभ्यास म्हणजे दर पृथक्करण .
समजा आपणास विटाचे बांधकाम 1:6 करावयाचे आहे.
      आता एकास सहा  म्हणजे काय तर एक भाग सिंमेट व सहा भाग वाळू.थोडक्यात काय तर वाळूचे सहा घमेले व एक सिमेंटचे घमेले ह्यांचे मिश्रण करून विटांचे बांधकाम करणे.
     आता एक घनमीटर बांधकाम करण्यासाठी किती विटा,वाळू, सिमेंट लागेल त्यांचा खर्च किती येईल. हे बांधकाम करण्यासाठी किती गंवडी व त्याला मदतीसाठी किती मजुर लागतील त्या साठी किती खर्च येईल. ह्या सर्व बाबी करून घेणारे व त्यांचा नफा असें सर्व बाबीचा विचार करून एका घनमीटर साठी येणारा खर्च म्हणजे त्याचा दर.
ह्या  उपरोक्त सर्व बाबी करणं म्हणजे दर पृथक्करण.
उत्तर लिहिले · 29/1/2019
कर्म · 20800