
भारतीय सैन्य
भारतीय सैनिकांच्या शौर्य आणि त्यागाच्या अनेक कथा आहेत, त्यापैकी काही प्रमुख कथा खालीलप्रमाणे आहेत:
शौर्य आणि त्यागाच्या कथा
१९६२ चे भारत-चीन युद्ध:
या युद्धात, रायफलमन जसवंत सिंग रावत यांनी अरुणाचल प्रदेशात अकेलेच चिनी सैन्याचा सामना केला. त्यांनी ७२ तासांपेक्षा जास्त वेळ शत्रूंना रोखून धरले आणि अनेक सैनिकांना मारले. त्यांच्या शौर्यामुळे त्यांना मरणोत्तर महावीर चक्राने सन्मानित करण्यात आले.
अधिक माहितीसाठी येथे पहा: https://www.bharatdefencekavach.com/2023/01/jaswant-singh-rawat-biography-of-indian-army-hero.html
१९६५ चे भारत-पाकिस्तान युद्ध:
कंपनी क्वार्टरमास्टर हवालदार अब्दुल हमीद यांनी पाकिस्तानच्या पॅटन रणगाड्यांना निकामी केले. त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता शत्रूच्या रणगाड्यांवर हल्ला चढवला आणि त्यांना नष्ट केले. त्यांच्या या शौर्यासाठी त्यांना मरणोत्तर परमवीर चक्राने सन्मानित करण्यात आले.
अधिक माहितीसाठी येथे पहा: https://www.gallantryawards.gov.in/Awardee/abdool-hamid
१९७१ चे भारत-पाकिस्तान युद्ध:
सेकंड लेफ्टनंट अरुण खेत्रपाल यांनी 'बॅटल ऑफ बसंतर' मध्ये आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांनी अनेक पाकिस्तानी रणगाडे नष्ट केले आणि भारतीय भूमीचे रक्षण केले. त्यांना मरणोत्तर परमवीर चक्राने गौरवण्यात आले.
अधिक माहितीसाठी येथे पहा: https://www.gallantryawards.gov.in/Awardee/arun-khetarpal
कारगिल युद्ध (१९९९):
कॅप्टन विक्रम बत्रा यांनी कारगिल युद्धात अभूतपूर्व शौर्य दाखवले. त्यांनी अनेक पाकिस्तानी चौक्या जिंकल्या आणि 'शेरशाह' या नावाने ते प्रसिद्ध झाले. त्यांच्या शौर्यासाठी त्यांना मरणोत्तर परमवीर चक्राने सन्मानित करण्यात आले.
अधिक माहितीसाठी येथे पहा: https://www.gallantryawards.gov.in/Awardee/vikram-batra
मेजर संदीप उन्नीकृष्णन:
२००८ च्या मुंबई हल्ल्यात, मेजर संदीप उन्नीकृष्णन यांनी दहशतवाद्यांशी लढताना अनेक ओ hostagesयांना वाचवले आणि स्वतः शहीद झाले. त्यांच्या शौर्यासाठी त्यांना अशोक चक्राने सन्मानित करण्यात आले.
अधिक माहितीसाठी येथे पहा: https://www.gallantryawards.gov.in/Awardee/sandeep-krishnan-unnikrishnan
या व्यतिरिक्त, अनेक अज्ञात सैनिक आहेत ज्यांनी देशासाठी आपले जीवन समर्पित केले. त्यांचे बलिदान नेहमीच स्मरणीय राहील.
फरक एवढाच की टाइप्स ऑफ ड्यूटी अँड लोकेशन हाच आहे. सेवा सुविधा सारख्या आहेत. नेव्हीला तुलनेने जास्त भत्ते आहेत.
धन्यवाद
_*15 जानेवारीला का साजरा केला जातो 🔰भारतीय सेना दिवस ?*_
_भारतीय सेना हा भारताचा तो कणा आहे ज्याच्या भरवश्यावर आपला भारत देश हा ताठ मानेने ह्या जगासमोर उभा आहे. आपल्या सीमांची रक्षा करणारे हे भारतीय सेनेचे जवान आपल्या जीवाची परवा न करता अविरतपणे देशासाठी झटत असतात.देशावर कुठलेही परकीय संकट आले की हे जवान त्यांच्यासमोर एक मजबूत भिंती प्रमाणे उभे राहतात.भारतीय जवान देशाच्या राक्षणासोबत सद्भावना” ह्या ऑपरेशन अंतर्गत अनेक समाज उपयोगी कामे करत आहेत._
💫देशात दरवर्षी 15 जानेवारी आर्मी दिन म्हणजेच सैन्य दिवस म्हणून साजरा केला जातो. स्वतंत्र भारताचे पहिले सेनाध्यक्ष के.एम.करियप्पा यांनी या दिवशी त्यांच्या पदाचा स्वीकार केला. करियप्पा यांनी 15 जानेवारी 1949 साली ब्रिटीशांच्या काळातील भारतीय सेनेतील अंतिम शीर्ष कमांडर जनरल रॉय फ्रांसिस बुचर हा पदाभार स्वीकारला होता. निवृत्त झाल्यानंतर तब्बल 33 वर्षांनी करियप्पा यांना ‘फिल्ड मार्शल’ या उपाधीने सन्मानित करण्यात आले होते. या दिवशी सैन्यात परेडसह इतर अन्य कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तसेच दिल्ली व सेनेच्या सर्व मुख्यालयात हे कार्यक्रम पार पडतात.
📅 28 जानेवारी 1899 साली कर्नाटकच्या कुर्गमध्ये शनिवर्सांथि येथे करियप्पा यांचा जन्म झाला. सेकंड लेफ्टिंनेंट पदापासून करियप्पा यांनी नोकरीला प्रारंभ केला. करियप्पा यांनी 1947 मध्ये भारत-पाक युद्धात भरीव कामगिरी केली. 15 जानेवारी 1949 मध्ये भारताचे सेनाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली. यानिमित्तानेच दरवर्षी 15 जानेवारीला ‘आर्मी दिन ‘ साजरा केला जातो.
👨✈कोलकाता येथे 1776 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने सरकारच्या अधीन राहून भारतीय सैन्याची स्थापना केली. भारतीय सैन्याच्या 53 छावण्या आणि 9 सैन्य तळ आहेत. भारतीय सैन्यात सैनिक आपल्या इच्छेने सहभागी होतात.
_१५ जानेवारी १९४९ रोजी जनरल करियप्पा यांनी भारताचे पहिले लष्कर प्रमुख म्हणून सूत्र स्वीकारली होती. भारतातील ब्रिटीश कमांडर इन चिफ जनरल सर फ्रान्सिस बचर यांच्याकडून करियप्पा यांनी सूत्रे हाती घेतली होती. या ऐतिहासिक क्षणानिमित्त १५ जानेवारी हा सैन्य दल दिवस म्हणून साजरा केला जातो. यंदाचे वर्ष हे सैन्य दिनाचे ७१ वे वर्ष आहे..._
🇮🇳 *आर्मी दिन विशेष*
_भारतीय लष्कराबद्दल काही खास गोष्टी_
▪कोलकाता येथे 1776 मध्ये भारतीय सैन्याची स्थापना. भारतीय सैन्याच्या 53 छावण्या आणि 9 सैन्य तळ आहेत.
▪भारतातील सियाचीन हे जगातील सर्वात उंच रणमैदान समुद्रसपाटीपासून तब्बल 5 हजार मीटर उंचीवर आहे.
▪आसाम रायफल ही देशातील सर्वात जुनी पॅराममिलिट्री फोर्स आहे. याची स्थापना 1835 साली झाली होती.
▪भारत-पाकिस्तान यांच्यातील 1971 सालच्या युद्धावेळी पाकिस्तानी सैन्याच्या जवळपास 93 हजार सैनिक आणि अधिकाऱ्यांनी आत्मसमर्पण केलं होतं.
▪जगातील सर्वात उंच बेल पूल
सन 1982 मध्ये भारतीय सैन्याने बांधला आहे.
▪भारतीय सैन्याकडे एक घोडेस्वार रेजिमेंट आहे. जगभरात अशा प्रकारच्या केवळ तीनच रेजिमेंट शिल्लक राहिल्या आहेत.
-----------------
*🧐 जाणून घेऊया भारतीय लष्करातील तिन्ही दलांविषयी...*
*🚁 वायूसेना*
_युद्धाचा काळ वगळता एखादा पेचप्रसंग सोडवण्यासाठी, गुप्त माहिती गोळा करण्यासाठी, शत्रूच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी किंवा एखादी विशेष मोहिम राबवण्यात वायूदलाची भूमिका ही नेहमीच महत्त्वाची असते. भारतीय वायूदलाच्या ताफ्यात सध्या शत्रूवर हल्ला करणारी, लढाऊ, बॉम्बहल्ला, वाहतुकीची विमाने आणि लढाऊ हेलिकॉप्टर्स अशा आयुधांचा समावेश आहे. याशिवाय, राफेलसारखी अनेक क्षमता असणारी लढाऊ विमानेही भारतीय वायूदलाच्या ताफ्यात आहेत._
*🛳 नौदल*
_भारतीय नौदल हे जगातील पाचव्या क्रमांकाचे नौदल आहे. युद्धनौका, पाणबुड्या, आण्विक पाणबुड्या, विमानवाहू युद्धनौका, विनाशिका, कार्वेट अशा सामरिक आयुधांनी भारतीय नौदल सुसज्ज आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील १९७१ साली झालेल्या युद्धात भारतीय नौदलाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. याशिवाय, हिंदी महासागर, अरबी महासागर, बंगालचा उपसागर आणि दक्षिण चीन समुद्रात भारताचे वर्चस्व राखण्याच्यादृष्टीने नौदलाची भूमिका महत्त्वाची आहे._
*🔭 भूदल*
_भूदल हा भारतीय लष्कराचा कणा आहे. भारतीय सीमांचे रक्षण करण्यात आणि दहशतवाद्यांची घुसखोरी रोखण्याचे महत्त्वपूर्ण काम भूदलाकडून केले जाते. गेल्या काही काळातील भूदलाची कामगिरी पाहता सध्याच्या घडीला भारतीय भूदलाची जगातील वैविध्यपूर्ण सैन्यदलात गणना होते. भूदलातील सैन्याची ३५ डिव्हिजन व १३ कॉर्प्समध्ये विभागणी करण्यात आली आहे. भारतीय भूदल हे जगातील तिसरे सर्वाधिक मोठे लष्कर आहे._
💫 _*आज सैन्य दिवस!*_
👉 _15 जानेवारी 1949 रोजी जनरल करियप्पा यांनी भारताचे पहिले लष्कर प्रमुख म्हणून सूत्र स्वीकारली होती. भारतातील ब्रिटीश कमांडर इन चिफ जनरल सर फ्रान्सिस बचर यांच्याकडून करियप्पा यांनी सूत्रे हाती घेतली होती. या ऐतिहासिक क्षणानिमित्त 15 जानेवारी हा सैन्य दल दिवस म्हणून साजरा केला जातो._
*भारतीय लष्कराच्या काही खास बाबी :*
▪ *भारतीय सैन्याची स्थापना*
कोलकाता येथे 1776 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने सरकारच्या अधीन राहून भारतीय सैन्याची स्थापना केली. भारतीय सैन्याच्या 53 छावण्या आणि 9 सैन्य तळ आहेत. भारतीय सैन्यात सैनिक आपल्या इच्छेने सहभागी होतात.
▪ *सर्वात उंच युद्धभूमी*
भारतातील सियाचीन ग्लेशियल हे जगातील सर्वात उंच रणमैदान आहे. समुद्रसपाटीपासून हे मैदान तब्बल 5 हजार मीटर उंचीवर आहे.
▪ *सर्वाधिक संख्येनं युद्धी बंदी बनवले*
भारत-पाकिस्तान यांच्यातील 1971 सालच्या युद्धावेळी पाकिस्तानी सैन्याच्या जवळपास 93 हजार सैनिक आणि अधिकाऱ्यांनी आत्मसमर्पण केलं होतं. दुसऱ्या महायुद्धानंतर ताब्यात घेतलेल्या युद्ध बंदकांची ही संख्या सर्वाधिक आहे.
▪ *जगातील सर्वात उंच पूल*
बेल पुल हा जगातील सर्वात उंच पूल आहे. हिमाचल प्रदेशमधील द्रास आणि सुरू नदीच्या मध्यभागी लद्दाखच्या पर्वतरांगामध्ये हा पूल आहे. सन 1982 मध्ये भारतीय सैन्याने हा पूल बांधला आहे.
▪ *घोडेस्वार रेजिमेंट*
भारतीय सैन्याकडे एक घोडेस्वार रेजिमेंट आहे. जगभरात अशा प्रकारच्या केवळ तीनच रेजिमेंट शिल्लक राहिल्या आहेत. ज्यामध्ये एक भारतीय आहे.
▪ *नौसेना अकॅडमी*
भारतीय नौसेना अकॅडमी, केरळमधील एझिमाला येथे आहे. आशियातील ही भारतीय प्रकारातील सर्वात मोठी नौसेना अकॅडमी आहे.
▪ *गुप्तचर विभाग*
डायरेक्टोरेट ऑफ मिलिट्री इंटेलिजन्स नावाने भारतीय सैन्याची गुप्तचर यंत्रणा काम करते. सन 1941 साली याची स्थापना झाली आहे. सैन्य दलातील भ्रष्टाचार आणि सीमा रेषेवर गुप्त माहिती मिळविण्यासाठी हा विभाग काम करते.
*_📣युद्ध सोडून ही लोकोपयोगी कामेदेखील करतं भारतीय सैन्य!_*
*_◼शाळा उभारणी_*
भारतीय सैन्याने ५३ इंग्रजी माध्यमाच्या सद्भावना शाळांची निर्मिती जम्मू आणि कश्मीरच्या राजोरी, पुछ, बोनियार, उरी ( बारामुल्ला) , खानाबल ( आनंतनाग), करू ( लेह), कारगिल आणि चांडिगाम ( कुपवाडा) ह्या भागात करण्यात आली आहे.आर्मीच्या ह्या शाळा काश्मीर खोऱ्यातील १०००० विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहचवतात आणि जम्मू काश्मीर एकत्र करून हा आकडा १४००० इतका आहे.
*_◼नवीन ग्राम उभारणी_*
अनेक मॉडेल गावांची निर्मती ऑपरेशन सद्भावनाच्या आखात्यारित्या करण्यात आली आहे. कुपवाडा जिल्ह्यात लोलब हे गाव निर्माण करण्यात आलं आहे चांदीगाम मध्ये आणि पुछ मध्ये सागरा मॉडेल गावाची निर्मिती करण्यात आली आहे.
*_◼शैक्षणिक आणि प्रेरणादायी सहली_*
२०१२ ते २०१५ या काळात भारतीय सैन्याने जवळपास २५० शैक्षणिक, राष्ट्रीय एकात्मता जागवणाऱ्या आणि व्यक्तिमत्व विकासावर आधारित सहलींचे आयोजन केले आहे. प्रत्येक सहलीत ३० जणांचा समावेश असतो. ह्या सहलीत पंजाब, डेहराडून, केरळा, कोलकाता, भूभनेश्वर, गोपाळपूर, आग्रा आणि नवी दिल्ली ह्या शहरात नेण्यात येते. यात विद्यार्थ्यांना भारतातील विद्यार्थ्यांशी चर्चा करायला संधी मिळवून दिली जाते.सोबतच भारताचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांची भेट घडवण्यात येते. बऱ्याचदा या सहलीच्या माध्यमातून त्या काश्मिरी विद्यार्थ्यांना काश्मीरच्या बाहेरचं जग बघायची पहिल्यांदा संधी मिळते.
*_◼आरोग्य_*
भारतीय सैन्याकडुन वेळोवेळी काश्मिरात मेडिकल कॅम्पसंच आयोजन करण्यात येतं. सैनिकी रुग्णालयांची निर्मिती करण्यात आली आहे. ह्या रुग्णालयात नागरीकांना अनेक वैद्यकीय सुविधा ह्या मोफत अथवा माफक दरात उपलब्ध होतात.विविध फाउंडेशनच्या माध्यमातून गरजूंना कृत्रिम पाय वाटप केले जाते. आजवर तब्बल ३१०० गरजू रुग्णांना ही मदत करण्यात आली आहे. ह्या योजनेअंतर्गत केवळ माणसंच नव्हे प्राण्यांच परीक्षण केलं जातं व सूचना दिल्या जातात.
*_📍एकीकडे फुटीरवादी विष कालवत असतांना संयमाने लोकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम “सद्भावना” ह्या ऑपरेशन अंतर्गत भारतीय सैन्य करत आहे._*