ध्वनी उपकरणे
8
Answer link
🎤 *मायक्रोफोन* 🎤
********************
माइक नसला, तर हल्ली प्रत्येक वक्त्याचे अडते. रेकॉर्डप्लेअरवर गाणे टेप करायचे असेल, तरी माईक लागतोच. टेलिफोनमध्ये ज्या बाजूला आपण बोलतो, त्या माऊथपीसमध्येही माईक असतोच. त्याचेच पूर्ण नाव मायक्रोफोन. या मायक्रोफोनमध्ये ध्वनीलहरींचे विद्युतलहरींत रूपांतर केले जाते. या लहरी मग जरुरीप्रमाणे अॅम्प्लीफायरकडे पाठवल्या जाऊन त्यांचे वर्धन केले जाते. वक्त्याचा रोजचा आवाज, साधे बोलणे मग पाहिजे तितक्या दूरवर, पाहिजे त्या लहान मोठ्या आवाजात ऐकवता येते. फोनवर बोलत असलो, तर हेच बोलणे जगाच्या पाठीवर दुसऱया फोनमध्ये कोठेही पाठवले जाऊ शकते. कॅसेटवर रेकॉर्ड करण्यासाठी माइकमधून आलेल्या विद्युतलहरींचाच उपयोग केला जातो.
मायक्रोफोनची रचना म्हणजे दोन पातळ धातुंच्या चकत्या एखाद्या सिलेंडरच्या तोंडाशी एकमेकांपासून अगदी थोडे अंतर ठेवून बसवलेल्या असतात. बाह्य चकती ही अगदी पातळ असून ध्वनिलहरींनी सहज कंप पावू शकणारी असते. तर आतील चकती जाड पण पक्की बसवलेली असते. यात मागील बाजूला एक छोटीशी बॅटरी असून तिच्यातून जाड चकतीवर सतत घनभार निर्माण केला जातो. जेव्हा ध्वनीलहरी बाह्य चकतीवर आदळतात व ती कंप पावते, तेव्हा तिच्यावर ऋणभार व आतील चकतीवरचा घनभार यांचा परिणाम होऊन ज्या विद्युतलहरी तयार होतात, त्याच अॅम्प्लीफायरकडे वा दुसऱ्या साधनाकडे पाठवल्या जातात. कंप पावण्याच्या क्षमतेनुसार या लहरींत फरक पडतो. या फरकामुळेच या लहरी जेव्हा लाऊडस्पीकरला पुरवल्या जातात तेव्हा पुन्हा जशीच्या तशी कंपने होऊन मूळ आवाजाबरहुकूम स्वर ऐकू येतात.
मायक्रोफोनचे अनेक आकार व प्रकार बघायला मिळतात. आपल्या नेहमीच्या परिचयाचा म्हणजे वक्त्याच्या समोर स्टँडवर उभा केलेला. याखेरीज हल्ली गायक हातात घेऊन गाणी म्हणतात, तो एक सुटसुटीत प्रकार आढळतोच. तिसरा प्रकार म्हणजे कॉलर माइक. वक्त्याच्या कॉलरलाच हा माईक अडकवलेला असतो. जेमतेम गुंडाच्या आकाराचा हा माईक वापरल्याने वक्ता येरझारा घालत सहज बोलू शकतो. याशिवाय दूरचित्रवाणी किंवा तत्सम कारणासाठी वक्त्यांच्या गळ्यात, कपड्यात लपेल, असाही छोटा माईक घातला जातो. हा माईक दिसत नाही, पण बोलणे मात्र आपल्याला ऐकू येते. कॉलरमाइकचीच ही सुधारित आवृत्ती. नाटकांसाठी वापरले जाणारे माईक हे अत्यंत संवेदनक्षम असतात. क्रिकेट मॅचमध्ये फलंदाजाच्या मागे स्टंम्पखाली वा स्टॅम्पमध्ये असेच माइक बसवण्याची पद्धत हल्ली वापरली जाते. या दोन्ही प्रकारांमध्ये हे माइक सहज दहा फुटांपर्यंतचा बारीकसारीक आवाज टिपू शकतात. त्यामुळेच नाटकातील पात्रे कुठेही असली, तरी त्यांचा आवाज सुस्पष्ट ऐकू येऊ शकतो किंवा फलंदाजाच्या बॅटला लागलेला चेंडूचा आवाजही दूरचित्रवाणीवरून आपण घरी ऐकू शकतो.
याखेरीज माईकचा नवीन प्रकार सध्या आपल्या देशातही वापरात येऊ लागला आहे. या प्रकाराचे नाव कॉर्डलेस माइक किंवा बग. यातील लहरींचे रूपांतर रेडिओलहरींमध्ये केले जाते. या रेडिओलहरी अॅम्प्लीफायरमध्ये नेमक्या पकडल्या जातात. या प्रकारच्या माईकला कसल्याही वायरची गरज नसते. हा माईक पाठवत असलेले संदेश पकडणारी यंत्रणा मात्र रेडिओलहरी पोहोचतील एवढ्या अंतरात लागते. कॉर्डलेस टेलिफोनचा माईक पण याच पद्धतीने काम करतो. ज्या वेळी गुप्तहेर या प्रकारचा माईक वापरतात, त्यावेळी त्याचा आकार अगदी लहान, न सापडणारा असल्याने त्याला बग म्हणतात. एखाद्या फुलदाणीतील फुलांमध्ये कोचाच्या तळाशी भिंतीवरील घड्याळामागेही तो लपवला जातो. महागडे पण शक्तिशाली उपकरण जेव्हा वापरले जाते, तेव्हा या प्रकाराला 'बगिंग' असे म्हणतात. थोडक्यात म्हणजे एखादा किडा, ढेकूण जसा नकळत आपल्या आसपास वावरतो, अगदी तेच यातून व्यक्त करायचे असते.
*'सृष्टी विज्ञानगाथा" या पुस्तकातून*