राष्ट्रीय ध्वज
2
Answer link
🤔 *तुम्हाला माहित आहे का आपला भारतीय राष्ट्रध्वज तयार कुठे केले जातात?राष्ट्रध्वज कसा फडकवावा नियमावली?*
*🔰📶Maha Digi | Special*
🇮🇳 स्वातंत्र्यदिनानिमित्त सर्व सरकारी कार्यालयांत सन्मानपूर्वक राष्ट्रध्वज फडकविला जातो. परंतु भारतात फक्त दोनच ठिकाणी हे राष्ट्रध्वज बनवले जातात. कुठे ते जाणून घ्या...
👍 *भारतातील दोन ठिकाणे* : कर्नाटकातील हुबळी आणि नांदेड या दोनच ठिकाणी खादी ग्रामोद्योग मंडळाकडून राष्ट्रध्वजाची निर्मिती केली जाते.
◼️ नांदेड येथील मराठवाडा खादी ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने खादीच्या कपड्यापासून निर्मिती केला जाणारा राष्ट्रध्वज देशभरात फडकाविला जातो.
◼️ नांदेडमध्ये तयार राष्ट्रध्वज लाल किल्ल्यावरही पाठविला जातो.
📐 *राष्ट्रध्वजाचे आकार* : नांदेडमध्ये सर्वात मोठा १४ बाय २१ फुट आकाराचा ध्वज तयार केला जातो.
◼️ ८ बाय २१ फुट, ६ बाय ९ फुट, ४ बाय ९ फुट, ३ बाय साडेचार फुट, २ बाय ३ फुट अशा विविध आकाराचे झेंडे तयार केले जातात.
🇮🇳 *राष्ट्रध्वज कसा फडकवावा ? जाणून घ्या नियमावली*
⚡ येत्या शनिवारी 15 ऑगस्ट, 2020 रोजी भारताचा 74 वा स्वातंत्र्यादिन होणार साजरा
😍 मोठ्या उत्साहाने देशाच्या अस्मितेचे प्रतीक असलेला राष्ट्रध्वज अशोकचक्रांकित तिरंगा सन्मानपूर्वक फडकवला जातो.
🧐 परंतु अनेकदा चुकून, नकळतपणे आपल्याकडून राष्ट्रध्वजाचा अवमानही होतो. हे टाळण्यासाठी राष्ट्रध्वज नक्की कसा फडकवावा हे आपण जाणून घेऊ.
💁♂ *जाणून घ्या नियमावली..*
▪ संहितेनुसार महत्त्वाचे राष्ट्रीय कार्यक्रम, सांस्कृतिक व मैदानी खेळाच्या वेळी नागरिक कागदाचा झेंडा हातात घेऊन फडकवताना दिसतात. कार्यक्रम झाल्यानंतर तेच झेंडे जमिनीवर इतरत्र फेकलेले दिसतात. ते टाळले पाहिजे.
▪️राष्ट्रीय ध्वजाचा सांप्रदायिक लाभ, पडदा किंवा वस्त्रांच्या रुपात उपयोग केला जाऊ शकत नाही.
▪ प्लॅस्टिकपासून तयार करण्यात आलेल्या झेंड्यांचा उपयोग करू नये.
▪️राष्ट्रीय ध्वज हा सूती किंवा खादीपासून बनवलेला असावा, झेंड्याची लांबी आणि रुंदी 3:2 च्या प्रमाणात असावी.
▪ ध्वज संहितानुसार जेव्हा राष्ट्रीय ध्वज फडकविला जातो तेव्हा त्याला सन्मानपूर्वक उच्च स्थान दिले पाहिजे.
▪️फडकविण्यात येणारा तिंरगा फाटलेल्या, मळलेल्या वा चुरगळलेला स्थितीत असू नये.
▪️तिरंगा एखाद्या कार्यक्रमातील मंचावर फडकावला असल्यास, वक्ता भाषण करत असल्याच्या उजव्या बाजूला ध्वज असावा.
▪️तिरंग्याचा वापर मृतदेहाभोवती लपेटण्यासाठी करता येणार नाही. फक्त शहीदांच्या मृतदेहाभोवती तिंरगा लपेटला जाऊ शकतो.
▪️राष्ट्रीय ध्वज शैक्षणिक संस्थामध्ये प्रेरणा देण्यासाठी फडकावला जाऊ शकतो.
▪️तिरंगा अर्ध्यावर फडकवू नये. सरकारी आदेश असल्याशिवाय सरकारी इमारतीवर राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर आणण्यास मनाई आहे.
▪️तिरंग्यावर कोणत्याही प्रकारची अक्षरे लिहिलेली असू नयेत. टेबल झाकण्यासाठी किंवा मंचाची सजावट म्हणून तिंरग्याचा वापर करु नये.
▪ राष्ट्रीय ध्वज अशा जागेवर फडकवला पाहिजे की, तो सगळ्यांना दिसला पाहिजे. शासकीय इमारतीवर राष्ट्रध्वज फडकवण्याची प्रथा आहे.
▪ रविवार व अन्य सुटीच्या दिवशीही सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत ध्वज फडकवला गेलाच पाहिजे. प्रतिकूल हवामानातही ध्वज फडकवणे आवश्यक आहे.
▪ राष्ट्रध्वज नेहमी स्फूर्तीने फडकवला पाहिजे व आदरपूर्वक ध्वज हळूहळू उतरवला गेला पाहिजे.
▪ ध्वज फडकवताना व उतरवताना बिगूल वाजविलाच पाहिजे.
▪ ध्वज कुठल्याही इमारतीच्या खिडकी, बाल्कनी अथवा दर्शनी भागात आडवा व तिरपा फडकवताना ध्वजातील केशरी रंगांचा पट्टा हा वरच्या बाजूला हवा.
▪️याचसोबत, स्वातंत्र्य दिनानिमित्त यंदा तिरंगा मास्क घालायचे नवीन फॅड आलेले आहे. मात्र, ते अशा पद्धतीने मास्क घालणे म्हणजे तिरंगा झेंड्याचा अपमान आहे. त्यामुळे अशा पद्धतीने राष्ट्रध्वजाचा अपमान करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई केली जाणार आहे.
*राष्ट्रध्वज कसा व कोठे बनतो?या बद्दल माहितीसाठी खालील लिंक उघडा.*
https://www.facebook.com/238044912896496/posts/2621553224545641/?sfnsn=scwspmo
*🇮🇳या दिवशी तिरंग्याला भारताचा राष्ट्रध्वज म्हणून मिळाला होता मान, वाचा ध्वजाशी संबंधित 'या' खास गोष्टी*
🙏भारताचा राष्ट्रध्वज म्हणजेच तिरंगा हा देशाच्या अखंडतेचं प्रतीक आहे. देशात राहणाऱ्या विविध धर्माच्या, जातीच्या, संप्रदायांच्या, विचारांच्या लोकांना एकत्र बांधून ठेवणारा हा एक धागा आहे. या तिरंग्यासाठी आजचा दिवस खूपच खास आहे, कारण आजच्याच दिवशी 22 जुलै 1947 रोजी भारताने अधिकृत रित्या तिरंग्याला भारतचा राष्ट्राध्वज म्हणून स्वीकारले होते. त्यानंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा पहिल्यांदा तिरंगा फडकवण्यात आला. तेव्हापासून आज 2020 म्हणजेच 73 वर्ष भारताची ओळख म्हणून हा राष्ट्रध्वज पाहिला जातो. केशरी, हिरवा, पांढऱ्या रंगाचा तिरंगा आणि त्यावर निळ्या रंगात अशोकचक्र अशा आपल्या राष्ट्रध्वजाचे स्वरूप केवळ रंगच नव्हे तर त्यामागे एक अर्थ घेऊन बनवण्यात आला आहे.
*👉भारताचा राष्ट्रध्वज कोणी बनवला?*
भारताचा राष्ट्रध्वज म्हणजेच तिरंगा हा आंध्रप्रदेश मधील 'पिंगली वैंकैया' यांनी बनवला आहे. त्यांनी हे तिरंग्याचे डिझाईन बनवले आहे. 1963 साली जेव्हा वैंकैया यांचे निधन झाले तेव्हा त्यांनंतर 46 वर्षांनी त्यांच्या प्रतिमेचे पोस्टल स्टॅम्प बनवून त्यांचा सन्मान करण्यात आला होता.
*🧐तिरंग्याच्या डिझाईन मागील अर्थ काय?*
भारताचा राष्ट्रध्वज आपल्या प्रत्येक रंगाचा एक अर्थ लक्षात ठेवून बनवण्यात आला आहे. आपण पाहू शकतो की, यात केशरी, हिरवा आणि पांढऱ्या रंगाचा वापर करण्यात आला आहे. यातील केशरी रंग वीरता, साहस आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांचे प्रतिनिधित्व करतो, पांढरा रंग हा शांतीचे प्रतीक आहे तर हिरवा रंग हा कृषिप्रधान भारताचे व निसर्गाचे प्रतीक आहे.
*💁♂️राष्ट्रीय नेत्यांनी सांगितलं होतं तिरंग्याचे 'हे' महत्व*
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी म्हंटल्याप्रमाणे हिंदू, मुस्लिम, ईसाई, यहूदी, पारसी आणि अन्य सर्व धर्माच्या व्यक्तींसाठी तिरंग्याचा मान राखणे हे अनिवार्य आहे कारण या तिरंग्याखाली उभा असलेला प्रत्येक व्यक्ती हा कोण्या धर्माचा, जातीचा नसून तो एक भारतीय आहे. तसेच भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी सुद्धा तिरंगा हा भारतासाठी बलिदान दिलेल्या प्रत्येक लढवय्याच्या भावनेचे प्रतीक आहे असे म्हंटले होते.
☑️भारतात तिरंग्याशी संबंधित विशेष नियम सुद्धा बनवण्यात आले आहेत. तिरंगा फडकवण्यापासून ते हातळण्यापर्यंत कोणती काळजी घेतली जावी हे फ्लॅग कोड ऑफ इंडिया तर्फे सांगण्यात आले आहे.
-----------–---------------------
💁♂️ *आपल्या देशाचे राष्टीय प्रतिके, हा आपला देशाभिमान आहे, याबद्दल माहिती असायलाच हवी...*
*🔰📶Maha Digi | Special*
☸️ *राष्ट्रीय चिन्ह* : राष्ट्रचिन्ह अशोक स्तंभावरील चार सिंह हे भारताचे राष्ट्रचिन्ह आहेत.
🔸 सम्राट अशोकाची राजधानी सारनाथ येथील शिल्पावरून ते घेतले आहे. यात चार सिंह एकामागे एक उभे आहेत. (मात्र कोणत्याही एका बाजूने पाहता तीन सिंह दिसतात.)
🔸 त्याखालील पट्टीवर एक आराम करणारा, हत्ती, वेगातला घोडा, एक बैल यांच्या शिल्पाकृती आहेत व त्यांच्या मध्यभागी चक्र आहे.
🔸 राष्ट्रचिन्हाखाली 'सत्यमेव जयते' हे मुंडकोपनिषदातील वाक्य देवनागरी लिपित कोरले आहे. घंटाकृती (उलट्या) कमळावर हे विराजमान आहे. २६ जानेवारी १९५० रोजी हे राष्ट्रचिन्ह स्वीकारले गेले.
🐅 *राष्ट्रीय प्राणी (पशू)* : 'पॅंथेरा टायग्रीस' असे शास्त्रीय नाव असलेले 'वाघ' हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे.
🦚 *राष्ट्रीय पक्षी* : 'पॅओ क्रिस्टॅटस' असे नाव असलेला 'मोर' हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे. भारतीय उपखंडात मोर सर्वत्र आढळतो.
🌷 *राष्ट्रीय फूल* : 'नेल्यूंबो न्यूसीफेरा' असे शास्त्रीय नाव असलेले 'कमळ' हे भारताचे राष्ट्रीय फूल आहे.
🏵️ _*शौर्यपदके*_ :
🥇 *परमवीर चक्र* : परमवीर चक्र हा भारताचा सर्वोच्य सैन्य पुरस्कार असून युद्धकाळात गाजवलेल्या अतुलनीय कामगिरी बाबत हा पुरस्कार देण्यात येतो.
🥈 *महावीर चक्र* : हा सुद्धा भारत सरकार द्वारा दिला जाणारा युद्ध कालीन वीरता पुरस्कार आहे.
🥉 *वीर चक्र* : 'वीरचक्र' हे भारतीय सैन्यदलातील जवानांना देण्यात येणारं तिसऱ्या क्रमांकाचं सर्वोच्च पदक आहे. अतुलनीय धाडस आणि शौर्यासाठी हे पदक दिलं जातं.
____________________________________
*🤳🌐आत्ता तुम्ही मिळवू शकता तुमच्या व्हाट्सअप्प वर बातम्या,मनोरंजन,जॉब,माहिती-तंत्रज्ञान,सरकारी योजना,सण-उत्सव,आरोग्य,आहार विषयक लेख ते ही तुमच्या व्हाट्सअप्प वर अगदी विनामूल्य.*
_अपडेट्स मिळवण्यासाठी फॉर्म भरून पाठवा_
https://bit.ly/34kRwdy

4
Answer link
7 डिसेंबर हा राष्ट्रीय ध्वज दिवस म्हणून साजरा केला जातो. म्हणून आपल्या आवडत्या तिरंग्या बद्दल हि काही माहिती
भारतीय राष्ट्रध्वज
२२ जुलै १९४७ रोजी म्हणजे भारत देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या २४ दिवस आधी, घटना समितीच्या बैठकीत ‘तिरंगी ध्वज’ भारताचा अधिकृत राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकृत करण्यात आला. मच्छलीपट्टणम जवळ जन्मलेल्या पिंगली वेंकय्या ह्यांनी तिरंग्याची रचना केली आहे.
तिरंग्याची रचना
भारतीय राष्ट्रध्वजाच्या लांबी व उंचीचे प्रमाण ३:२ असे आहे, तसेच राष्ट्रध्वज खादीच्या अथवा रेशमाच्या कापडाचाच बनवला जावा असा सरकारी नियम आहे.
एकाला एक लागून असलेल्या आडव्या समान प्रमाणाच्या तीन पट्ट्यांचा तो आहे. वरती गर्द केशरी, मध्यभागी पांढरा आणि खालच्या बाजूला गर्द हिरवा, अशा क्रमाने हे तीन रंग आहेत. मधल्या पांढर्या पट्ट्यावर निळ्या रंगाचे धम्मचक्र असून ते सारनाथ येथे असलेल्य सिंहमुद्रेवर असलेल्या अशोकचक्रासारखे आहे. चक्राला २४ आरे आहेत.
ध्वजातील गडद भगवा, पांढरा व हिरवा हे तीन रंगीत पट्टे आणि त्यांचे अर्थ :
रंग - भावना
गडद भगवा - त्याग
पांढरा - शांती
हिरवा - समृद्धी
निळा - चोवीस तास
भारताच्या राष्ट्रीय ध्वजात चार रंगाचा वापर केला गेला आहे. केशरी, पांढरा, हिरवा, आणि निळा. (त्यामुळे भारताचा राष्ट्रीय ध्वज, रंगाचाच विचार केला तर तिरंगा नसून चौरंगा आहे).
डॉ. एस्. राधाकृष्णन् यांनी भारतीय राष्ट्रध्वजाच्या एकूण रचनेचे महत्त्व चांगल्या प्रकारे विशद केले आहे
ध्वजात तीन समान आडव्या पट्ट्यांची रचना करण्यात आली आहे.
वरच्या भागात गडद केशरी रंग आहे.या रंगातून त्याग, धैर्य याचा बोध होतो.मधल्या भागात पांढरा रंग आहे.या रंगातून प्रकाशाचा आणि सत्यमार्गाचा शांती, सत्य, व पावित्र्याचा बोध होतो.खालील भागात गडद हिरवा रंग आहे. हा रंगातून निसर्गाशी वा भूमीशी असलेले नाते दर्शवितो, निष्ठा व समृध्दीोचा बोध होतो.निळ्या रंगाचे अशोक चक्र हे सागराप्रमाणे अथांगता व कालचक्राच व त्यासोबत बदलत जाणारे जग सूचित करतो. जीवन गतिमान असावे व भारतीयांनी शांततापूर्ण आगेकूच करावी असे धम्मचक्र दर्शविते. मूलतः हे चक्र विश्वशांतीचा संदेश देणार्या बौद्ध धर्माचे धम्मचक्र आहे. त्याला ‘अशोकचक्र‘ या नावाने ओळखले जाते.