Topic icon

उत्प्रेरक

2

वनस्पती तूप बनविण्याची प्रक्रिया- सरकी तेल, रेपसीड तेल, मोहडा तेल, सालसीड तेल, मोहरी तेल, धुपा तेल, सोयाबीन तेल, भात-तूस तेल, मका तेल, फुलवारा तेल अशा अनेक प्रकारच्या तेलांपासून हे अनैसर्गिक कृत्रिम घनिभूत तूप बनविले जाते. या तेलांमध्ये सायट्रिक अ‍ॅसिड घालून तापवितात. नंतर कॉस्टिक सोडय़ाने त्याला धुऊन त्याचा रंग पांढरा केला जातो. अजून शुभ्रपणा येण्यासाठी आम्लमाती व कोळशाच्या सान्निध्यात पुन्हा तेले तापवली जातात. त्यानंतर ब्लीचिंग करून शुभ्रपणा वाढविला जातो. या प्रक्रियेमुळे तेलांमधील आवश्यक असलेली सर्व नसíगक मूलद्रव्ये नष्ट होतात. या तेलांना घट्टपणा येण्यासाठी यामध्ये हायड्रोजन गॅस सोडतात. 

या प्रक्रियेसाठी निकेल धातू वापरला जातो, की जो आरोग्यास अतिशय घातक असतो. यानंतर कृत्रिम घनिभूत अनसíगक तूप बनले जाते; परंतु याचा वास नष्ट करण्यासाठी पुन्हा रासायनिक प्रक्रिया करून हे तूप ४ ते ५ तासांपर्यंत २४० अंश ते २६० अंश सेंटिग्रेडला तापवले जाते व सर्वात शेवटी अशा पद्धतीने अनसíगक वनस्पती तूप बनते.
उत्तर लिहिले · 17/8/2018
कर्म · 18015