Topic icon

पाठ

0

फलटण पाठाचा आशय:

'फलटण' हा पाठ एका ऐतिहासिक शहराची माहिती देतो. फलटण हे शहर महाराष्ट्र राज्यात आहे आणि ते एक महत्त्वाचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक केंद्र आहे. या पाठात, फलटणच्या भौगोलिक स्थानाबद्दल, इतिहासाबद्दल, तेथील महत्त्वपूर्ण स्थळांविषयी आणि संस्कृती विषयी माहिती दिली आहे.

पाठातील मुख्य मुद्दे:

  1. इतिहास: फलटणचा समृद्ध इतिहास आहे. हे शहर पूर्वी निंबाळकर घराण्याची राजधानी होती. या घराण्याने या शहरावर अनेक वर्षे राज्य केले आणि शहराच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले.
  2. भूगोल: फलटण हे शहर डोंगराच्या आणि पठारी प्रदेशात वसलेले आहे. याच्या आजूबाजूला अनेक डोंगर आणि ऐतिहासिक किल्ले आहेत.
  3. संस्कृती: फलटणमध्ये विविध प्रकारच्या परंपरा आणि उत्सव साजरे केले जातात. येथे अनेक प्राचीन मंदिरे आहेत आणि धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात होतात.
  4. महत्त्वाची स्थळे: फलटणमध्ये बघण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत, जसे की राजवाडा, जुनी मंदिरे आणि ऐतिहासिक वास्तू. ही स्थळे फलटणच्या इतिहासाची साक्ष देतात.

या पाठाद्वारे, विद्यार्थ्यांना फलटण शहराची ऐतिहासिक, भौगोलिक आणि सांस्कृतिक माहिती मिळते, ज्यामुळे त्यांना आपल्या राज्याच्या इतिहासाची आणि संस्कृतीची जाणीव होते.

अधिक माहितीसाठी, आपण महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या वेबसाइटला भेट देऊ शकता: महाराष्ट्र पर्यटन

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 1700
1
हा स्वाध्याय इयत्ता दहावी चा आहे त्यातील आजी कुटुंबाचं आगळ 


आजी कुटुंबाचं आगळ

आजीचे दिसणे :
आजीला साडेपाच फूट उंची लाभली होती. तिचा वर्ण गोरा होता. उन्हापावसामुळे तिची त्वचा काळपटली होती. आजीच्या वयाची माणसे कमरेत वाकतात. त्यामुळे चालताना काठी घ्यावी लागते. पण आजी अजूनही ताठ कण्याने चालत होती. अजनही तिचे सगळे दात शाबूत होते. डोक्यावरचे सगळे केस पिकले होते.
आजीचे राहणीमान :
त्या काळात इरकली लुगडे उच्च राहणीमानाचे लक्षण होते. हिरव्या व लाल रंगांची नऊवारी इरकली लुगडी व अंगात चोळी हा तिचा पेहराव असे. कपाळावरचं गोंदण दिसू नये म्हणून त्यावर ती बुक्का लावी. ती नेहमी नाली ठोकलेल्या जुन्या वळणाच्या वहाणा वापरत असे.
आजीची शिस्त :
आजीची शिस्त कडक होती. सगळ्यांना सगळी कामे करता आली पाहिजेत, असा तिचा कटाक्ष होता. तिने कामांची वाटणी केली होती. ती कामे आजी सर्व सुनांना आलटूनपालटून करायला लावी. दुपारच्या कामांचेही तिने नियोजन केलेले असे. सुनांनी मुलांच्या बाबतीत आपपरभाव करू नये म्हणून मुलांना खाऊपिऊ घालताना आजीचा सक्त पहारा असे. गल्लीतल्या बायका दुपारी गप्पागोष्टींना येत असत. त्या वेळी ती बायकांनी सांगितलेल्या गोष्टींची शहानिशा करीत असे.




'आजी म्हणजे घराचा आधार
➤ 'आगळ म्हणजे ऊंची-रुंदीला नऊ इंच आणि लांबीला सहा फूट असा भक्कम सागवानी वासा. एकदा आगळ लावली की चोऱ्यामोऱ्या होणे किंवा दरोडा पडणे शक्यच नसे. त्यामुळेच ही आगळ म्हणजे वाड्याला संरक्षणाचे एक भरभक्कम कवच लाभले होते.

प्रस्तुत उताऱ्यात आजीची भूमिकाही अगदी याच प्रकारची आहे. आजीमुळे कुटुंबात सुव्यवस्था नांदत होती. सुना आपापसात हेवेदावे करू शकत नव्हत्या. आपली कामे दुसरीवर ढकलू शकत नव्हत्या. सर्व कामे प्रत्येकीला करावी लागत. या वातावरणामुळे कोणावर अन्याय होत नव्हता. कोणालाही तक्रार करायला वावच राहत नसे. आजीमुळे प्रत्येकीला किंवा प्रत्येकाला भरभक्कम संरक्षण मिळाले होते. हे संरक्षण आगळेइतकेच भक्कम होते.





 मागील पिढीचे चित्रण आले आहे. त्या काळातील हे एक एकत्र कुटुंब होते. आजी ही कुटुंबप्रमुख होती. कुटुंबाच्या सर्व बाबींवर, सर्व व्यक्तींवर आजीचीच सत्ता चालत असे. कोणी कोणकोणती कामे कधी व कशी करावीत, हे आजी ठरवत असे. या पद्धतीमुळे कुटुंबातील सर्व व्यवहारांना एकसूत्रीपणा येतो आणि कामे सुरळीतपणे पार पडतात ; याचा कुटुंबालाच फायदा होतो, हे खरे आहे. पण या पद्धतीमध्ये कोणालाही स्वातंत्र्य राहत नाही. सुनांना साधा चहासुद्धा करून पिण्याची मोकळीक नव्हती. म्हणजे कोणालाही जरासुद्धा हौसमौज करण्याची परवानगी नव्हती. याचाच अर्थ कुटुंबातल्या सदस्यांना जीवनातील लहानसहान आनंदसुद्धा घेता येत नव्हते. त्यातही स्त्रियांना तर पूर्ण पारतंत्र्यातच राहावे लागे. ही चांगली स्थिती अजिबात नाही. आधुनिक काळात म्हणूनच एकत्र कुटुंबपद्धत टिकली नाही.


  ग्रामीण भागात पूर्वी घराभोवती एक भलीमोठी, मजबूत भिंत बांधली जाई. भिंतीत एक मजबूत दार असे. त्याला कड्याकोयंडे असतच ; शिवाय एक भलीभक्कम आगळ बसवलेली असे. एकदा ही आगळ लावली की घर पूर्णपणे बंद होत असे. घरातील कोणीही बाहेर जाऊ शकत नसे किंवा कोणीही बाहेरून आत येऊ शकत नसे. घरावर कोणाचाही हल्ला होणे शक्य नसे. यामुळे घर पूर्णपणे सुरक्षित होई. म्हणून ग्रामीण जीवनात या आगळीला एक महत्त्वपूर्ण स्थान लाभले होते. पाठाच्या शीर्षकावरून असे दिसते की, त्या कुटुंबातील आजी ही त्या कुटुंबाची एक प्रकारे आगळच होती. तिच्या दराऱ्यामुळे कुटुंबाचे सर्व व्यवहार सुरळीत चालत असत. कुटुंबाला आपोआपच पूर्ण संरक्षण लाभायचे. घराची आगळ लावल्यावर आतल्या माणसांना बाहेर जाता येत नसे. म्हणजे त्यांच्यावर बंधने येत. त्याचप्रमाणे आजीच्या नियंत्रणामुळे कुटुंबातील व्यक्तींवर बंधने येत. या बंधनांचा एक चांगला फायदा होई. कुटुंबातील कोणीही गैरवर्तन करू शकत नसे. त्यामुळे कुटुंबाचे व्यवहार कोलमडून पडत नसत. कुटुंबाला अंतर्गत व बाह्य असे दोन्ही अंगांनी संरक्षण मिळे. म्हणून 'आजी : कुटुंबाचं आगळ'  

उत्तर लिहिले · 23/8/2022
कर्म · 53710
0
जिजाऊ आमची सून झाली या पाठातून जेवण झाले का?
उत्तर लिहिले · 3/6/2022
कर्म · 0
0

ध्येयाच्या पराकाष्टा हा पाठ इयत्ता दहावीच्या कुमारभारती पाठ्यपुस्तकातून घेतला आहे.

अधिक माहितीसाठी, तुम्ही महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ ( बालभारती ) यांच्या वेबसाइटला भेट देऊ शकता: बालभारती

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 1700
0

'आजी कुटुंबाचा आगळ' हा पाठ इयत्ता दहावीच्या पुस्तकातील एक सुंदर पाठ आहे. या पाठात लेखकाने त्यांच्या आजीच्या कुटुंबाचा आणि त्यांच्या घरातील आगळ्यावेगळ्या वातावरणाचा अनुभव सांगितला आहे.

या पाठात लेखक त्यांच्या बालपणीच्या दिवसांतील आठवणी सांगतात. त्यांची आजी ही कुटुंबाचा आधारस्तंभ होती. ती घरातील सगळ्यांची काळजी घेत असे. घरातील वातावरण खेळीमेळीचे आणि आनंदी ठेवण्यात आजीचा मोठा वाटा होता.

या पाठात लेखकाने एकत्र कुटुंब पद्धतीचे महत्त्व सांगितले आहे. आजीच्या मार्गदर्शनामुळे घरातील सदस्यांमध्ये प्रेम, जिव्हाळा आणि एकोपा टिकून राहतो, हे त्यांनी स्पष्ट केले आहे.

पाठातील मुख्य मुद्दे:

  • आजी कुटुंबाचा आधारस्तंभ
  • एकत्र कुटुंब पद्धतीचे महत्व
  • खेळीमेळीचे आणि आनंदी वातावरण
  • आजीच्या प्रेमळ स्वभावाचे वर्णन

हा पाठ वाचताना आपल्याला आपल्या बालपणीच्या आठवणी ताज्या होतात आणि कुटुंबाचे महत्त्व अधिक स्पष्ट होते.

तुम्ही हा पाठ तुमच्या शालेय पुस्तकात वाचू शकता.

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 1700
1
दोस्तांनो, मी... अरुण निम... दुर्दैवाचे दशावतार.
उत्तर लिहिले · 2/2/2021
कर्म · 20