Topic icon

केंद्र शासित प्रदेश

8
भारत देशामध्ये 29 राज्यांसह ७ केंद्रशासित प्रदेश (इंग्लिश: Union Territory) आहेत. हे प्रदेश कोणत्याही राज्याचा भाग नसून त्यांचे प्रशासन थेट केंद्र सरकारद्वारे केले जाते. भारताचे राष्ट्रपती प्रत्येक केंद्रशासित प्रदेशासाठी प्रचालकाची नेमणूक करतात.

भारताचे सात केंद्रशासित प्रदेश खालील आहेत.

१)अंदमान आणि निकोबार
२)चंदीगड
३)दमण आणि दीव
४)दादरा आणि नगर हवेली
५)दिल्ली राष्ट्रीय राजधानी प्रदेश
६)पाॅडीचेरी
७)लक्षद्वीप
उत्तर लिहिले · 20/3/2018
कर्म · 8750