Topic icon

महिला समस्या

3
*भारतीय सामाजिक समस्या व तरतुदी*🕕

*सामाजिक समस्या व त्याची कारणे*🕑
*महिलांविषयक योजना*🕘

1. डवाकरा योजना -1982

2. न्यू मॉडेल चर्खा योजना -1987

3. नोरडा प्रशिक्षण योजना -1989

4. महिला सामख्या योजना -1993

5. राष्ट्रीय महिला कोश योजना -1993

6. राष्ट्रीय मातृत्व लाभ योजना -1994

7. इंदिरा महिला योजना -1995

8. ग्रामीण महिला विकास योजना -1996

9. राजराजेश्वरी विमा योजना -1997

10. आरोग्य सखी योजना -1997

11. महिला आर्थिक विकास महामंडळ -24 फेब्रुवारी 1975

12. महाराष्ट्र राज्य महिला आयोग -1993

13. महाराष्ट्र राज्य समाज कल्याण सल्लागार बोर्ड -1960

व्याख्या
"सामाजिक समस्या म्हणजे अशी एक परिस्थिती जी समजतील बहुसंख्य लोकांच्या मूल्याशी विसंगत असून त्या परिस्थितीत बदल करण्यासाठी प्रत्यक्ष कृती करण्याची आवश्यकता आहे. असे त्या लोकांचे मत असते. "

सामाजिक समस्येची स्वरूपात्मक वैशिष्ट्ये :

1. प्रचलित समाज मूल्यांशी विसंगती

2. सार्वत्रिकता

3. समजातील बहुसंख्य , लक्षणीय सदस्यांची धारणा

4. सामाजिक सापेक्षता

5. संवेदन भिन्नता

6. सामूहिक सामाजिक उपयोजनेची आवश्यकता

सामाजिक समस्येची कारक :

1. सामाजिक विघटक

2. मूल्य संघर्षक

3. सामाजिक परिवर्तन

4. सांस्कृतिक पाश्च्यायन

5. स्वार्थी हितसंबंधांच्या मूल्यांचा आग्रह

6. मूल्ये संघर्षाला प्रेरक ठरणारे परिवर्तन

7.मूल्ये संघर्षाला प्रेरक ठरणारा बहुजिनसी समाज

8. प्रमाणकश्युन्यता

9. समाज व समूहसापेक्ष मूल्ये यांतील संघर्ष

10. सदोष सामाजिकिकरणातून मूल्यव्यवस्थेतील अनावस्था

11. संस्थागत प्रमाणके व सांस्कृतिक असमतोल

सामाजिक समस्यांचे निराकरण
1. उपचारात्मक व पुनर्वसनात्मक उपाययोजना

2. प्रतिबंधात्मक उपाययोजना
स्त्रियांच्या समस्या
1. स्त्री स्वातंत्र्याचा अभाव

2. स्त्री-पुरुष भेदभाव

3. दारिद्र्य

4.अर्धवट शिक्षण

5. सामाजिक रूढी-परंपरा

6. स्त्रियांवर होणारे अत्याचार

7. नोकर्यांतील होणारे अत्याचार

8. आजाराचे वाढते प्रमाण

9. राजकीय व सामाजिक प्रतिंनिधीत्वाचा अभाव

स्त्री विकासासाठी घटनात्मक बिगर घटनात्मक तरतुदी
1. मूलभूत अधिकार

2. मार्गदर्शक तत्वे

3. सरकारी नोकर्यांमध्ये 30 टक्केवारी आरक्षण

4. स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये 11 व्या घटनादुरुस्तिनुसार 50 टक्केवारी आरक्षण विशेष विभाग व कायदा

5. हिंदू कोडबील

6. हुंडा प्रतिबंधक कायदा.

7. गर्भपातास कायदेशीर मान्यता.

8. राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना

स्त्री लिंग भेदावर विषमता
1. स्त्रियांची बौद्धिक क्षमता पुरुषांपेक्षा कमी असते.

2. स्त्रिया योग्य निर्णय घेऊ शकत नाहीत.

3. मुलगी हे परक्याचे धन असते.

4. पुत्रप्राप्ती झाली तर स्वर्ग मिळतो

5. स्त्रियांचा दर्जा सदैव खालचा ठेवावा .

6. स्त्रीला विकासाची संधी देण्याची गरज नाही.

7. मुलीचा जन्म म्हणजे पापाचे फळ होय.
उत्तर लिहिले · 23/7/2019
कर्म · 569265
6
21व्या शतकातील स्त्रियांसमोरील आव्हाने!



शीर्षकावर नजर टाकल्यावर कदाचित हा एक गैरसमज होण्याची भीती नाकारता येत नाही की, आजवरच्या स्त्रीपुढील आव्हानं ही तिच्या आताच्या आव्हानांपेक्षा खूप वेगळी आहेत, पण तसं अजिबात नाही. बारकाईनं विचार केल्यास हे आपल्या लक्षात येईल की काळानुरूप ती स्वतः:ला बदलवत गेली तरी तिच्या मूळ आव्हानांत वाढच झालीय. 

हो! तुमची चढलेली भुवई, हे काय भलतंच! हा डोळ्यातला भाव पाहून ही, मी पुन्हा हेच म्हणेन की, तिच्या मूळ आव्हानांत वाढच झालेली आहे. नाही पटत! ठिकय! चला, बघूयात आपण. 

पूर्वीच्या काळी स्त्री ही उपभोग्य वस्तू, तिचा उपभोग घेणे हा पुरुषाचा मूलभूत हक्क. हा हक्क बजावण्यासाठी पुरुषजात कधीही, केव्हाही, कुठेही तत्पर असलेली. आपणास दिसून येते. पण - परिणाम? भोगायचे ते फक्त स्त्रीनेच. त्या परिणामातून उत्पन्न अन्य बाबींची जबाबदारी, फक्त आणि फक्त स्त्रीचीच. त्यासाठी शारीरिक, मानसिक, सामाजिक, आर्थिक कुचंबणा पण फक्त तिचीच. आजही तिच्या या स्थितीत फारसा फरक नाही, तथाकथित शिक्षित, पुरोगामी समाज व अत्याधुनिक गर्भनिरोधकाच्या सोयी, सवलती असून सुद्धा स्वत:चा बचाव, पुरषाची मानसिकता मुळातूनच संस्कार, विचारानं बदलवण्याच आव्हान म्हणूनच पुरातन ही, पुरोगामी ही. 

आता बघूयात शिक्षणाकडे, प्राथमिक शिक्षणाचा हक्क मूलभूत आहे, पण निम्नस्तरातील मुलींना आईला घरकामात मदत, भावंड सांभाळण्याची जबाबदारी यामुळे त्यापासून वंचित राहावे लागते. मध्यमवर्गियात पण या बाबतीत तिला दुय्यम स्थानच. हे माहीत असूनही, ती झगडतेय, स्वत:ला शिक्षित करून घेण्यासाठी, सिद्ध करण्यासाठी. आपल्या परीनं उपलब्ध शासनमान्य सोयी सवलतींची माहिती घेण्याचा प्रयास करतेय. या आव्हानाला पेलण्यासाठी तिला सबंधितांनी मदत केली पाहिजे. म्हणजे पालक, शिक्षक, ग्रामसेवक, प्रसारमाध्यम, सामाजिक संस्था, कार्यकर्ते इत्यादीने.


स्त्रीसाठी 30% राखीव जागा ज्या आहेत त्याचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी स्वत:ला समर्थ केले पाहिजे हे आव्हान. 100%आरक्षणासाठी, सर्वंकष प्रयत्नांच आव्हान हे ही आहेच. 

आज कायद्यात तिच्यासाठी अनेकानेक चांगल्या तरदूती असलेल्या कागदावरती तरी आपणास दिसतात. पण त्याची समग्र माहिती, त्याचा उपयोग करून घेण्यासाठीची स्वत:ची मानसिकता तिला तयार करावयाची आहे. या बाबत तिचा आत्मविश्वास जगवायचं काम सामाजिक संस्था, कार्यकर्ते, कायदातज्ञांनी स्वत:ला झोकून देऊन केला पाहिजे. 

अन्यायग्रस्त महिलेचा पाठीशी केवळ तिच्या पालकांनीच नव्हे तर सर्व सखींनी, समाजाने उभं राहावे अस तिला वाटत असले, ते संस्कार रुजवण्याचं कामही तिलाच करावं लागणार आहे. न कंटाळता, अतीव धीरानं, कारण - हे बदल पटकन होणार नाहीत. हा अन्याय शारीरिक, आर्थिक, मानसिक, सामाजिक, कौटुंबिक, भावनिक सुद्धा असणार आहे. हे आव्हान हिमनगासारखे, 1/3 भाग यातला दिसणारा. प्रत्यक्षात किती खोल याचा अंदाज करणे कठिणच. 

स्वसंरक्षणासाठी तिला शारीरिक दृष्ट्या स्वत:ला फिट ठेवलंच पाहिजे. त्यासाठी जूडो, कराटे, लाठी शिक्षण. उपलब्ध सुविधांचा सुयोग्य, समयोचित वापर करणे. उदा: त्रास देणाऱ्या गुंडाविषयी, फोन वरून चटकन पालक, दक्षता समिती व पोलिस ठाण्यास माहिती देणे. स्वत:च्या पोशाख, हावभाव, आचरणातून चुकीचा संदेश जाणार नाही, याची काळजी घेणे. एकटीने प्रवास, वास्तव्य करताना आवश्यक ती काळजी घेणे. MM Sचे बळी तर होत नाहीत ना? याबाबत दक्ष राहणे. नोकरीच्या ठिकाणी स्वत:च्या हक्काविषयी, अधिकाराविषयी माहिती घेणं, जागरूक राहणं, स्वत:ला अपडेट करणं आव्हानच नं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज तिच अस्तित्वच चहू अंगाने नाकारायचा जो सर्वतोपरी प्रयत्न चाललाय, तो नेटानं नेस्तनाबूत करायचा. यामध्ये पुराणकालीन दाखले देणं. उदाहरणार्थ संकटकाळी देवांनी सुद्धा मोहिनी रूप म्हणजे स्त्री रूप घेऊन दुष्टांचा नाश केला. देवाला, संतांना माउली म्हणून हाक, जन्मदात्रीच महत्त्व, इंदिरा गांधी, लता मंगेशकर, पी. टी उषा, कल्पना चावला, इंद्रा नूयी, चंदा कोचर, मेधा पाटकर, मनीषा म्हैसकर, तेजस्वींनी, शीतल महाजन, किरण बेदी, सिंधुताई सकपाळ आदी कन्या घराण्याचा दीपिका म्हणून प्रकाशित, त्यासाठी दिव्यांची (कुलदीपक) गरज नाही. यात डॉक्टरांची भूमिका सर्वात महत्त्वाची. जनमत जागरण ही आवश्यकच. 

आज करियर घडविण्यासाठी ती धडपडतेय. निरनिराळ्या क्षेत्रातल्या संधी, दोन्ही हात पसरून तिला बोलावताहेत. वर उल्लेखित कन्यकांमुळे तिलाही वाटतंय I Can do it नव्हे I must do it. पण पुन्हा पुरूषप्रधान समाज, संस्कार, कुटुंबसंस्थेतील तिचा सहभाग, दुय्यम स्थान, ह्या शिवाय आपण ही काही क्षणांसाठी लहान मूल व्हावं. इतरांनी यांत पालक, भावंड, मित्रमैत्रिणी, सहचराने आपले लाड पुरवावे. ही नैसर्गिक ऊर्मी, मुळातच भावनाशील पिंड, मातृत्वाची ओढ, मानसिक, शारीरिक आधाराची ओढ... करियर साठी या साऱ्यांवर पाणी सोडायचं? कसावीस होतेय ती. घालमेल होतेय तिच्या जीवाची, कसा साधायचा समतोल? हे ही आव्हानंच न? 

शिक्षणानं, आर्थिक स्वातंत्र्यानं, तिला विचाराचं बळ दिलंय, संपूर्ण नाही पण काही निर्णय ती स्वत: ठामपणे घेण्याचा प्रयत्न करतीय. त्या बदलत्या सामाजिक परिस्थितीमुळे, सीमित कुटुंबामुळे आजही मुलींनी आईवडीलाचं घर सोडून सासरी राहणे समाजमान्य असल्याने, आपल्या आजारी आईबाबांची आर्थिक काळजी, वृद्धत्वात आधार-शाब्दिक, मानसिक, शारीरिक, सामाजिक हो! अगदी आर्थिक सुद्धा! घेण्याच आव्हान तिच्या पुढं आहे. यात तिला संनांधितांची साथ मिळेलच याची खात्री आपण ठामपणे देऊ शकत आही. कारण पुन्हा पुरूषप्रधान संस्कृती. पण हे शिवधनुष्य ती पेलतीय. आपण यात तिला मानसिक, सामाजिक आधार देऊन सक्षम करूयात. 

केवळ आधुनिक भैतिक सुखसुविधा, जीवनशैली, वस्त्रप्रावरण यांचा अंगिकार नव्हे तर स्वत्व, सत्त्व टिकवण्यासाठी आवश्यक विचारांना आपलंसं करण्याच आव्हान ही तिच्यासमोर ठाकलंय. 

पर्यावरण रक्षण, प्रदूषण, जलसंरक्षण या सारखी ही आव्हानं तिचा पाठलाग करताहेत. आपल्या व्यवस्थापनाच्या अंगभूत गुणानं हसवायचंय यांनाही- भारत महासत्ता बनू पाहतोय. पण त्यासाठी आवश्यक सशक्त, सक्षम, संस्कारित, सुशिक्षित युवापिढी घडवण्याच आव्हान तिला पेलायचंय. 

या सर्व बाबींचा विचार केला तर तिला खरोखरच अष्टभुजा दुर्गेचा रूप घ्यायचा आहे. मला वाटत, हे सावित्रीबाईंच्या डोळ्यातलं स्वप्न वास्तवात उतरताना, हळूवारपणे पूर्णत्वास येताना जाणवत आहे. आपण, आपल्या परीनं खारीचा वाटा उचलूया. 

जय हिंद! जय महाराष्ट्र! जय स्त्री शक्ती!
उत्तर लिहिले · 2/10/2018
कर्म · 2630
0

होय, महिला समस्या सामाजिक आहेत.

स्पष्टीकरण:

  • लैंगिक समानता नसणे: आजही अनेक समाजांमध्ये महिलांना पुरुषांच्या बरोबरीचे मानले जात नाही. त्यांना शिक्षण, नोकरी आणि इतर संधींमध्ये समान वागणूक मिळत नाही.
  • घरगुती हिंसा: अनेक महिलांना त्यांच्या घरात शारीरिक, मानसिक आणि भावनिक हिंसा सहन करावी लागते.
  • बालविवाह: आजही अनेक ठिकाणी लहान वयात मुलींचे लग्न लावून दिले जाते, ज्यामुळे त्यांचे शिक्षण आणि आरोग्य धोक्यात येते.
  • हुंडा मागणी: हुंडा मागणी हे एक सामाजिक Kry आहे, ज्यामुळे महिलांचा मानसिक आणि शारीरिक छळ होतो.
  • कामाच्या ठिकाणी लैंगिक Kry: कामाच्या ठिकाणी महिलांना लैंगिक Kryाचा सामना करावा लागतो, ज्यामुळे त्यांचे करिअर आणि मानसिक आरोग्य धोक्यात येते.

हे सर्व मुद्दे दर्शवतात की महिला समस्या केवळ वैयक्तिक नाहीत, तर त्या सामाजिक समस्या आहेत, ज्या समाजाच्या विचारसरणी आणि दृष्टिकोनमुळे निर्माण होतात.

अधिक माहितीसाठी आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

  1. राष्ट्रीय महिला आयोग (http://ncw.nic.in/)
  2. महिला व बाल विकास मंत्रालय (https://wcd.nic.in/)
उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 5240