यशोगाथा
स्थापना: १९६२
ठळक वैशिष्ट्ये:
- शैक्षणिक गुणवत्ता: शाळेचा निकाल नेहमीच चांगला असतो. बोर्ड परीक्षेत अनेक विद्यार्थी गुणवत्ता यादीत येतात.
- खेळ: या शाळेतील विद्यार्थी तालुका, जिल्हा आणि राज्य स्तरावर विविध खेळ खेळतात.
- सांस्कृतिक कार्यक्रम: शाळेत नियमितपणे सांस्कृतिक कार्यक्रम होतात, ज्यात विद्यार्थी विविध कला सादर करतात.
- उपक्रम: शाळेत विज्ञान प्रदर्शन, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा असे अनेक उपक्रम घेतले जातात.
- शिक्षक: शाळेतील शिक्षक खूप अनुभवी आणि Dedicated आहेत. ते विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देतात आणि त्यांना मदत करतात.
यशोगाथा:
- शाळेच्या अनेक माजी विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात मोठे यश मिळवले आहे.
- गावातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण देणे हे शाळेचे ध्येय आहे.
- शाळेने शिक्षण क्षेत्रात एक चांगली प्रतिमा तयार केली आहे.
अधिक माहिती:
तुम्ही शाळेच्या वेबसाइटला भेट देऊ शकता: यवतमाळ जिल्हा
रेडिओ आणि कॅल्क्युलेटर दुरुस्ती करण्यापासून ते ग्लोबल सॉफ्टवेअर बिझनेस चालवणाऱ्या दोन मराठी उद्योजक भावांनी त्यांच्या बिझनेसमधून आज ३५० कोटींचा टप्पा पार केला आहे. फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात या मराठी भावंडांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. कैलाश काटकर आणि संजय काटकर या भावांनी आज 'क्विकहील टेक्नॉलॉजिस'ला जगाच्या कानाकोपऱ्यात नेऊन ठेवले आहे.
कैलाश व संजय काटकर हे महाराष्ट्रातील एका छोट्याश्या गावात सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आले. काही काळानंतर त्यांचे कुटुंब पुण्यात स्थायिक झाले. तेथे त्यांच्या वडिलांनी मशीन सेटर म्हणून फिलिप्समध्ये काम करायला सुरुवात केली. दहावी नंतर त्यांनी शिक्षण सोडले आणि वडिलांना त्यांच्या रेडिओ रिपेअरिंगच्या कामात मदत करू लागले. हळूहळू त्यांना या कामात गती आली आणि या कामाची गोडीही वाटू लागली. तीन महिन्यातच त्यांना रिपेअरमन म्हणून महिना ४०० रुपये मिळकतीवर काम मिळाले. पण कैलाश तेवढ्यावरच थांबले नाही. बँकेत कॅल्क्युलेटर रिपेअरिंगला जात असताना तेथे काचेत ठेवलेला कम्प्युटर बघून काही काळात कॅल्क्युलेटरची जागा कम्प्युटर घेणार असल्याचे त्यांने अचूक हेरले.. कम्प्युटरचे जग येत असताना बघून त्यांनी कॅल्क्युलेटर सोबतच काम्पुटर रिपेअरिंग सुद्धा शिकून घेतले.
या दरम्यान संजय यांनी सुद्धा आपल्या भावाचा इलेक्ट्रॉनिक्स मधील रस बघून त्यांना हातभार लावण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग घेण्याचे ठरवले. पण कैलाश यांनी संजयला कम्प्युटर सॉफ्टवेअरचे शिक्षण घेण्यास सांगितले. त्यावेळी कम्प्युटर सॉफ्टवेअर शिकण्याची फी ५ हजार होती, आणि सामान्य कुटुंबाला परवडण्यासारखी नव्हती. पण कैलाश यांनी त्यांच्या वाढत्या पगारातून संजयच्या शिक्षणाचा प्रश्न तर सोडवलाच शिवाय मंगळवार पेठेत स्वतःचे एक छोटे दुकान सुद्धा टाकले. काही दिवसांनी त्या दुकानात बिलिंग साठी ५० हजार किमतीचा कम्प्युटर सुद्धा त्यांनी घेतला. इकडे शिक्षणाच्या दरम्यान संजय यांची पहिल्यांदा व्हायरस या गोष्टीशी सामना झाला. बर्याच वेळा प्रॅक्टिकलच्या वेळी कॉम्प्युटर व्हायरसमुळे बंद असायचे. यातूनच संजय यांनी व्हायरस विषयी त्यांनी अभ्यास सुरू केला.
व्हायरसवर उपाययोजना तसेच वेगवेगळे टूल्स त्यांनी लिहिले ज्यामुळे तेव्हाच्या व्हायरसशी सामना करण्याचे सोल्यूशन मिळाले. पुढे हेच टूल्स अँटी व्हायरस म्हणून स्वतःचे प्रॉडक्ट बनवून विकण्याची उद्योजकीय कल्पना कैलाश यांना आली. त्यांनी संजयला ही कल्पना सांगितली आणि त्यांच्या उद्योजकाच्या प्रवासाला सुरुवात झाली.
१९९५ मध्ये चाळीतील एका छोट्या खोलीतून कैलास यांचे कॉम्प्युटर दुरुस्तीचे काम आणि संजय यांचे अँटी व्हायरस तयार करण्याचे काम सुरू होते. कॉम्प्युटर दुरुस्तीच्या कामात चांगलाच जम बसला होता. त्यातून मिळालेल्या उत्पन्नावर खर्च भागत होते. हार्डवेअरचे पार्ट्स लोक विकत घ्यायचे परंतु सॉफ्टवेअर विकत घेणे त्या काळी प्रचलितच नव्हते. शिवाय त्यावेळी इतर मल्टीनॅशनल कंपन्या सुद्धा बाजारात होत्या आणि त्यांचा सामना करणे या बंधूंना कठीण जात होते. कंपनीने १९९८मध्ये www.quickheal.com नावाची स्वतःची वेबसाइट सुरू केली. सुरुवातीला कॅट कम्प्युटर सर्व्हिसेस (CAT Computer Services) असणाऱ्या त्यांच्या कंपनीचे कालांतराने २००७ साली ‘क्विक हील टेक्नॉलॉजिस लिमिटेड’ असे नामकरण झाले. त्यावेळी संजयने ग्राहकांच्या नवनवीन मागणीचा अभ्यास करायला सुरुवात केली. सोबतच कैलाश हे त्यांचे अँटी व्हायरस विकण्यासाठी स्वतः बाजारात उतरले. त्यांच्या बोलण्याच्या प्रभावी शैलीमुळे आणि अनुभवामुळे त्यांना चांगलाच फायदा झाला.
दोघे भावंडांच्या मेहनतीमुळे बिझनेस वाढत गेला. विस्तारत जाणार्या कामासाठी त्यांनी त्यांच्या उद्योगाला कॉर्पोरेट लुक दिला. सोबतच काही लोकांना जोडीला घेऊन एक चांगली टीम तयार केली. पण फक्त पुण्यात राहून त्यांना इतर शहरांमध्ये सेवा देता येत नव्हती. त्यामुळे त्यांनी इतर अनेक शहरांमध्ये क्विकहीलची छोटी छोटी कार्यालये सुरु केली. क्विकहीलचा बिझनेस दिवसेंदिवस वाढत होता. सर्व छोट्या शहरांना लक्ष्य केल्याचा त्यांना त्यांच्या बिझनेसमध्ये खूप मोठा फायदा झाला. सर्वात शेवटी त्यांनी मुंबईकडे मोर्चा वळवला आणि आज आंतरराष्ट्रीय स्तरावर क्विकहीलचा विस्तार झाला आहे. आज संपूर्ण भारतभर क्विकहीलच्या ३३ हून अधिक शाखा आहेत आणि जगभरातून ८० शहरांमध्ये ‘क्वीक हील’चे ग्राहक आहेत.
सौरभ दिवटे
CEO
कॉप्टरव्हीजन इन्फोकॉम प्रायव्हेट लिमिटेड
~ www.Qoptervzn.com ~
कंपनीचे बिजनेसेस -
www.ApnaSaman.com
ईकॉमर्स ( ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट )
www.GrowthApple.com
सॉफ्टवेयर, एप्लिकेशन्स, वेबसाईट्स डेव्हलपमेंट आणि डिजिटल मार्केटिंग ची वेबसाईट
www.GrowthApple.xyz
वेब होस्टिंग, डोमेन, VPS च्या सेवा देणारी वेबसाईट
‘Think big, think fast, think ahead. Ideas are no one’s monopoly.’ याचा अर्थ होतो. मोठा विचार करा. लवकर विचार करा आणि दूरचा विचार करा. विचारांवर कोणा एकाची सत्ता नसते. असे यशाचे प्रेरणादायी विचार देणारे भारतातील महान व्यक्तित्व म्हणजे ‘रिलाययन्स’ कंपनीचे संस्थापक मुकेश अंबानी. ज्यांचे संपूर्ण जीवन इतरांसाठी प्रेरणा आहे, अशा मुकेश अंबानींबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
संपूर्ण नाव- मुकेश धीरूभाई अंबानी
पित्याचे नाव – धीरूभाई अंबानी
आईचे नाव – कोकिलाबेन अंबानी
जन्मतारीख – 19 एप्रिल 1957
जन्मस्थान- उदेन (यमन)
पत्नीचे नाव – नीता अंबानी
बहीण-भाऊ-अनिल अंबानी,दीप्ती सलग,ओंकार,नीना
जन्मतःच एक अभूतपूर्व कार्यक्षमता घेऊन आलेले मुकेश अंबानी यांना लहानपणापासूनच मोठी स्वप्ने पाहण्याची आणि ती पूर्ण करण्यासाठी वाट्टेल ते प्रयत्न करण्याची सवय होती. वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी ते येमेन देशात एका पेट्रोल पंपावर काम करू लागले. त्यापूर्वी ‘बर्माशेल’ नावाच्या कंपनीत ते काम करत असत. ‘बर्माशेल’ सारखी स्वतःची एक कंपनी स्थापन करण्याचे स्वप्न त्यांनी त्यावेळी पाहिले होते. आणि अर्थातच आपल्या अथक प्रयत्नांच्या जोरावर त्यांना ते पूर्ण केले.
१९५८ मध्ये येमेनहून भारतात परतल्यानंतर त्यांनी स्वतःकडील १५,००० च्या रकमेमधून ‘रिलायन्स कमर्शियल कार्पोरेशन (Reliance Commercial Corporation)’ची स्थापना केली. सुरुवातीला कंपनी मसाले आणि अन्य वस्तूंची निर्यात करत असे. काही काळानंतर, सिंथेटीक कपड्यांची वाढती लोकप्रियता लक्षात घेऊन, १९६६ साली त्यांनी अहमदाबादजवळील नरोडा येथे कपड्यांची गिरणी म्हणजेच मिल सुरू केली. या मिलने पहिल्याच वर्षी ९ कोटींचा व्यापार करून १३ लाखाचा नफा कमवला.
१९७५ साली ‘रिलायन्स’ ची उलाढाल त्यामानाने कमी होती. तिचे स्वरूप छोट्या कंपनीचेच होते. त्यावेळी भारतातील २४ कपड्यांच्या मिल्सचे परीक्षण करण्यासाठी विश्व बॅकचे शिष्टमंडळ आले होते. त्यांनी रिलायन्स मिलमधील कपड्यांची गुणवत्ता पाहून असा निष्कर्ष काढला की विकसित देशांमध्ये असलेल्या मिल्ससोबत तुलना होऊ शकेल अशी एकच मिल भारतात आहे, ती म्हणजे ‘रिलायन्स मिल.’ यावरूनच गुणवत्तेच्या बाबतीत मुकेश अंबानी पहिल्यापासूनच किती चोखंदळ होते, हे लक्षात येते. इ.स. १९९९-२००० मध्ये रिलायन्सने २५,००० कोटींची गुंतवणूक करून जामनगर, गुजरात येथे जगातील सर्वात मोठी रिफायनरी सुरू केली. हा प्रकल्प जगातील सर्वात मोठ्या प्रकल्पांपैकी एक गणला जातो.
१९७७ साली ‘रिलायन्स’ ने पहिल्यांदा स्वतःसाठी शेअर्स विकून पैसा उभा केला.
१९८२ नंतर तर कंपनीच्या प्रगतीचा आलेख वेगाने वर सरकू लागला आणि अजूनही हा आलेख वर चढतोच आहे. याचे बहुमोल श्रेय जाते मुकेश अंबानी यांच्या कार्यकुशलतेला.मुकेश अंबानी यांना लावलेल्या लहानशा रोपट्याचे रूपांतर एका मोठ्या वटवृक्षामध्ये झाले आहे. साल २०१२ पर्यंत रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये ८५,००० कर्मचारी काम करत होते. केंद्र सरकारच्या संपूर्ण करापैकी ५ टक्के कर फक्त रिलायन्सकडून भरला जात असे. २०१२ साली जगातील सर्वात मोठ्या आणि श्रीमंत म्हणवल्या जाणाऱ्या ५०० कंपन्यांच्या यादीत ‘रिलायन्स इंडस्ट्रीज्’ चा समावेश होता
१९७० ते ८० च्या दरम्यान निंयत्रित अर्थव्यवस्था होती. तेव्हाही ‘रिलायन्स’ मोठी कंपनी म्हणून विस्तारत होती. १९९१ नंतर मुक्त अर्थव्यवस्थेमुळे तर रिलायन्स उद्योगाच्या क्षेत्रात मोठ्या वेगाने धावू लागली. पेट्रोकेमिकल्स, ऑईल, रिफायनरी, तसेच दूरसंचार, वीज उत्पादन, रस्ते बांधकाम, बंदर, गॅस पाईप लाईन अशा जवळ जवळ सर्वच क्षेत्रात रिलायन्सने आपले पाय भक्कमपणे रोवले आहेत.
बहुराष्ट्रीय कंपन्यांशी असलेल्या स्पर्धेमध्ये भारतीय कंपन्या टिकू शकतात आणि यशस्वीही होऊ शकतात, हा विश्वास भारतीय उद्योजकांमध्ये निर्माण करण्यामागे मुकेश अंबानी यांचा फार मोठा हात आहे.
आपल्या संपूर्ण आयुष्यात त्यांनी रिलायन्स आणि पर्यायाने विकसित भारतासाठी मोठी स्वप्ने पाहिली आणि ती प्रत्यक्षात खरी करून दाखवली.
------------------------------
जगातलं पहिलं पर्यावरणीय पंचतारांकित "ऑर्किड' हे हॉटेल महानगरी मुंबईत सुरु केलं ते विठ्ठल कामत यांनी! जगातले दिग्गज हॉटेल व्यावसायिक असा त्यांचा लौकिक! त्यांच्या "ऑर्किड' हॉटेलनं अनेक पारितोषिकंही मिळवली आहेत. ते मुळचे कर्नाटकातले. पण वडील व्यंकटेश कामत पोटाची खळगी भरायसाठी मुंबईत आले. अपार परिश्रम आणि जिद्दीच्या बळावर त्यांनी "कामत ग्रुप', हा हॉटेल व्यवसाय मुंबईत यशस्वी केला. त्यांचे विठ्ठल हे चिरंजीव! अभियांत्रिकीची पदवी घेतलेल्या विठ्ठल कामतांना आपल्या वडिलांच्या हॉटेल व्यवसायातच स्वारस्य होतं. वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी त्यांनी जगप्रसिध्द हॉटेल व्यावसायिक राव बहादूर ऑबेराय यांना, "मला तुमच्या हॉटेलपेक्षा खूप मोठं हॉटेल मुंबईत बांधायचं आहे', असं आत्मविश्वासानं सांगितलं होतं. हॉटेल व्यवसायातली मुळाक्षरं त्यांनी आपल्या वडिलांच्या व्यवसायातच गिरवली. या व्यवसायातले भले-बुरे अनुभव घेता घेता प्रामाणिकपणा, परिश्रम याशिवाय व्यवसायात यशस्वी होता येत नाही, अशी खूणगाठही मनाशी बांधली आणि जीवनात दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभं असतानाही त्यांनी या ब्रीदापासून माघार घेतली नाही.
वडिलांच्याकडनं फक्त लंडनचं विमानाचं तिकीट काढून घेवून, रिकाम्या खिशानं लंडन गाठलं. तिथल्याच हॉटेलात काम करून पैसे मिळवले, अनुभव घेतला. माणसं पाहिली आणि अनुभवली. जगभर ते फिरले. पण आपल्या भावालाच त्यांना काही ओळखता आलं नाही. याच भावाच्या अट्टाहासानं आणि एका चार्टर्ड अकौंटंटच्या कारस्थानानं ते एका रात्रीत रस्त्यावर आले. खिशात फुटकी कौडी नसताना, मुंबईतलं हॉटेल प्लाझा हे हॉटेल एक कोटी रुपयांना विकत घेणारे विठ्ठल कामत व्यवसायातनं बाजूला फेकले गेले. पुढं फक्त अंधार होता. आत्महत्येचा विचारही मनात आला. पण आपण काही करून दाखवायचं अशी जिद्द पुन्हा उसळली. हॉटेल प्लाझाच्या ठिकाणीच 250 खोल्यांचं हॉटेल ऑर्किड त्यांनी बांधलं.त्याची अफाट प्रसिध्दी झाली. पुन्हा विठ्ठल कामत हे नाव जगभरातल्या हॉटेल व्यवसायात झळकायला लागलं.
पण हे यश त्यांना सहज मिळालेलं नाही. त्यांच्या या विजय गाथेमागं प्रचंड परिश्रम आणि त्यांनी घेतलेल्या अचूक निर्णयांचा इतिहासही दडला आहे. पैसा हा व्यवसायाचा प्राणवायू. पण तो नसला म्हणजे मन सैरभैर होतं. पुढचं काही सुचत नाही. अशा वेळी न खचता पुढं जाणं हेच महत्वाचं असतं. तुमची जिद्द असेल तर यश मिळतंच! असं त्यांचं म्हणणं!
ज्यांनी संकटाच्या वेळी आपल्याला मदत केली, त्यांना कधीही विसरु नका. ज्यांच्या जीवावर आणि श्रमावर तुम्ही यशस्वी होता, त्या व्यवसायातल्या कर्मचारी-कामगारांचे संसार सुखी व्हावे, हेही लक्षात घ्या. आपण मालक नाही, तर त्यांचे सहकारी आहोत, हेही लक्षात ठेवा. ग्राहक आपला देव आहे, याचा विसर पडू देऊ नका. समस्यांच्या कोंडीत डोकं स्थिर ठेवा. पैसा आला म्हणजे उधळू नका. साधं रहा आणि साधंच जगा. असं केलं म्हणजे जीवनात यश मिळतंच, हे आपले अनुभवाचे बोल त्यांनी सातत्यानं सांगितले आहेत. माणसांना नेहमी देणारा असावा, घेणारा नाही, हा धडा आई-वडिलांनी दिला, तो जीवनात आचरणातही आणला. अपयश खुणावत असतानाही, त्याला पायदळी तुडवून यश मिळवलं आणि ते आपलं एकट्याचं नाही. त्यात पत्नी, मुलं आणि व्यवसायातले सहकारी यांचाही वाटा आहेच, असंही विनम्रपणे ते सांगतात. व्यवसायिक माणसांसाठी दोन धोकेबाज गोष्टी म्हणजे भावनेच्या आहारी जाणं आणि नको त्या गोष्टीवर विश्वास ठेवणं, हे दोन दुर्गुण व्यावसायिकांना दूर ठेवायला हवेत. जीभही जगातली सर्वात गोड आणि सर्वात कडू वस्तू आहे. तिचा उपयोग करताना शंभरदा विचार करा. तोंडातून शब्दांचे बाण सुटण्याआधीच ही गोष्ट लक्षात ठेवा, असा लोकसंग्रहाचा-यशस्वितेचा मूलमंत्रही त्यांनी सांगून ठेवला आहे. ज्या त्या वेळी काम करा, आळशी होऊ नका. यशस्वीतेपर्यंत पोहोचणारी शिडी एकाच दिवसात चढता येत नाही, हे लक्षात ठेवा, असंही त्यांचं म्हणणं आहे. चांगला विचार आणि आनंद देण्यानं वाढतो. तसाच सुखाचा मूलमंत्र दिल्यानं यश मिळतं, यावर आपली पूर्ण श्रध्दा आहे, असं पंचतारांकित हॉटेलांची साखळी निर्माण करणारे कामत यशाचा मूलमंत्र सांगून जातात. व्यवसायात यश आणि अपयश हे असतंच. पण अपयशानं डगमगून न जाता नव्या जिद्दीनं पुन्हा शून्यातून नवं विश्व उभारता येतं, हे कामत यांनी आपल्या यशस्वी व्यवसायानं सिध्दही करुन दाखवलं आहे.
- वासुदेव कुलकर्णी
----------------------------------------------------