समाजसेवक
0
Answer link
समाजसेवक समाजातील मागासलेल्या लोकांसाठी आणि गोरगरिबांच्या हक्कांसाठी व त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढतो. तो समाजाच्या हितासाठी आणि लोकांच्या कल्याणासाठी काम करत असतो.
1
Answer link

मदर तेरेसांच्या कितीतरी पट अधिक कार्य करूनही अज्ञात असणारा ‘भगव्या’ कपड्यांतील महात्मा….

शिवकुमार स्वामी कोण आहे, त्याच्या मृत्यूनंतर लाखो लोक इतके दुःखी का आहेत?”हा प्रश्न तुम्हाला पण पडला असेल ना. पण या महात्म्याचे कार्य महान असून देखील अज्ञात राहिले.
एक थोर मानवतावादी समाजसेवक कोण? असे विचारल्यावर मदर तेरेसा हे नाव प्रत्येकाच्या तोंडून येत.
पण मदर तेरेसांच्या कितीतरी पट अधिक कार्य शिवकुमार स्वामी यांचे आहे. ते एक थोर मानवतावादी समाजसेवक, आध्यात्मिक गुरु तसेच शिक्षक होते.
लिंगायत समाजाचे सर्वोच्च मठाधिपती म्हणून श्री. शिवकुमार स्वामी यांची ओळख होती. कर्नाटकातील राजकारणात शिवकुमार स्वामी यांचा बराच दबदबा होता.
त्यांचे कर्नाटकात ३० जिल्ह्यात ४०० पेक्षा जास्त मठ आहेत. लिंगायत समुदायाच्या या स्वामींना चालते-फिरते भगवान असं म्हटलं जात असे. कर्नाटकामध्ये लिंगायत समुदायाचा प्रभाव आहे. त्या समाजासाठी शिवकुमार स्वामी हे वंदनीय गुरू होते.
लिंगायत धर्माची स्थापना करणारे १२ व्या शतकातील संत बसवेश्वर किंवा बसवण्णा यांच्या विचारधारेनुसारच शिवकुमार यांचं वर्तन होतं, असं म्हटलं जात असे.
या धर्माचे अधिकतम लोक कर्नाटक राज्यात आहेत. महाराष्ट्र, तेलंगण, आंध्र प्रदेश, केरळ आणि तमिळनाडूत या धर्माचे बरेच लोक आहेत. हा एकेश्वरवादी धर्म आहे. लिंगायत धर्म: समता, बंधुभाव, नैतिक, समृद्धी आणि प्रगतीचे प्रतीक! अनंतकाळचे जीवन शांतीचा मार्ग.!
जन्मामुळे मानवांना उच्च नीच असा विभाग करते ती जात. जनमल्यापासून सर्व समान आहोत अशी घोषणा करून कोणतीही जात, वर्ग,वर्णभेद न मानता जातीरहित धर्माचा आसक्ती असणात्या सर्वाना दीक्षा संस्कार मिळविता येतो असे सांगणारा तो धर्म.
या धार्मिक संस्कारामुळे व्यक्तिने मिळविलेली योग्यता, पात्रता, यामुळे तो श्रेष्ट अगर कनिष्ट मानला जातो असे सांगतो तो धर्म. यांचे लिंगायत समाजाचे गुरु म्हणजे श्री.शिवकुमार स्वामी यांची ओळख आहे.
श्री. शिवकुमार स्वामी यांचा जन्म १ एप्रिल १९०७ रोजी रामनगर जिल्ह्यातील विरापुर येथे झाला. घरची परिस्थिती तशी बेताची पण त्यांच्यावर पहिल्यापासूनच आध्यात्मिक संस्कार झाले होते.
गंगाम्मा आणि होनगौडाच्या तेरा मुलांपैकी हे सर्वात मोठे होते.त्यांचे प्राथमिक शिक्षण तुमकूर जिल्ह्यातील नागावल्ली या आवी इंग्रजी भाषेतील प्राथमिक शिक्षण झाले.
१९२२६ साली ते मॅट्रिक पास झाले. त्याच काळात सिध्दगंगा मठातील एक निवासी-विद्यार्थीही होते. त्यांनी भौतिकशास्त्र आणि गणित या विषयातील अभ्यास पूर्ण केल्यानंतर कला विषयातील अभ्यास करण्यासाठी बंगलोरच्या सेंट्रल कॉलेज मध्ये गेले.
परंतु पदवी मिळविण्यास असमर्थ होते कारण त्यांना सिद्दागंगा मठाचे नेतृत्व करण्यासाठी उडना शिवयोगी स्वामीचा उत्तराधिकारी म्हणून नामांकित करण्यात आले होते.
शिन्नाना कन्नड, संस्कृत आणि इंग्रजी भाषेत त्यांची बरीच कुशलता होती. जानेवारी १९३० मध्ये श्री मरुलाध्याय सिद्दागंगा मठाचे नेतृत्व करण्यासाठी आपला मित्र आणि वारस गमावल्यानंतर शिवनांच्या जागी प्रमुख शिवयोगी स्वामी यांची निवड झाली.
शिवन्ना, त्यानंतर शिवकुमाराचे नाव बदलले, त्या वर्षी ३ मार्च रोजी औपचारिक पुढाकाराने विरक्तश्रम (भिक्षुकांच्या आदेशात) दाखल झाले आणि त्यांनी शिवकुमार स्वामी यांचे नाव धारण केले.
जानेवारी १९४१ रोजी शिवयोगी स्वामीच्या मृत्युनंतर त्यांनी मठाचा ताबा घेतला. त्यामुळे सिध्दगंगा ह्या सर्वात जुन्या मठाचे प्रमुख म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली.

सर्वजण लिंगायत समाजाचे गुरु तथा कर्नाटकमधील तुमकुरू येथील सिद्धगंगा मठाचे प्रमुख महंत डॉ. शिवकुमार स्वामी म्हणून त्यांना ओळखू लागले.

लिंगायत समाज हा प्रामुख्याने कर्नाटकामध्ये आहे. महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तामिळनाडू या राज्यांमध्ये देखील त्यांचं मोठं प्रमाण आहे. कर्नाटकमध्ये एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात १८ टक्के लिंगायत आहेत.
त्यामुळे कर्नाटकमधल्या प्रभावी जातींमध्ये त्यांची गणना होते.
लिंगायतांचा राजकीय प्रभाव कसा आहे याबाबत पत्रकार इमरान कुरैशी यांनी आपल्या लेखात मांडलं आहे. ते सांगतात, सामाजिक रूपाचा विचार केला तर लिंगायत हे उत्तर कर्नाटकात प्रभावी आहेत.
८० च्या दशकात लिंगायतांनी तत्कालीन मुख्यमंत्री रामकृष्ण हेगडेंना समर्थन दिलं होतं. तर त्यानंतर १९८९ मध्ये वीरेंद्र पाटील यांना समर्थन दिलं होतं.
आतापर्यंत या समुदायाचे ९ मुख्यमंत्री झाले आहेत, असं द इकोनॉमिक टाइम्सनं म्हटलं आहे. त्यामुळे नेहमी राजकीय मंडळी शिवकुमार स्वामी यांना भेटण्यासाठी येत असतं. त्यांचे सामाजिक आणि शैक्षणिक कार्यदेखील महान आहे.
स्वामींनी अभियांत्रिकी आणि विज्ञान, कला आणि व्यवस्थापनासाठी तसेच नॅशनल ट्रेनिंगसाठी महाविद्यालयापर्यंत शिक्षण आणि प्रशिक्षण यासाठी एकूण १३२ संस्था स्थापन केल्या.
त्यांनी शैक्षणिक संस्थांची स्थापना केली जी संस्कृत तसेच आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानाच्या पारंपरिक शिक्षणात अभ्यासक्रम देते. सर्व समुदायांनी त्यांच्या परोपकारी कार्यासाठी त्याचा व्यापक आदर केला. त्यांच्या सव्वाशेपेक्षा जास्त शैक्षणिक संस्था कर्नाटक राज्यात आहेत.
तसेच सिध्दगंगा मठाकडून नऊ हजार विद्यार्थ्यांना अन्न, शिक्षण मोफत दिलं जातं.
या मठात सर्व जाती -धर्माच्या लोकांना प्रवेश दिला जातो आणि समान सेवा दिली जाते. त्यामुळे शिवकुमार स्वामी यांचा जगभर आदर आहे. तसेच त्यांना विविध पुरस्कारानी देखील भूषविले गेले आहे.
मानवतावादी कार्याच्या सन्मानार्थ स्वामी यांना १९६५ मध्ये कर्नाटक विद्यापीठाने डॉक्टर ऑफ लिटरेचरच्या उपाधीने सन्मानित केले होते.
सन २००७ मध्ये कर्नाटक सरकारने कर्नाटक रत्न पुरस्कारासाठी राज्य सरकारचे सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर केले. भारत सरकारने त्यांना पद्मभूषण देऊन गौरव केला.
स्वामीच्या मृत्यूच्या एक आठवड्यापूर्वी, कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी मानवतावादी कामासाठी भारतरत्न देण्याची मागणी केली होती.
श्री. शिवकुमार स्वामी यांच्यावर गेल्या महिन्यात ८ डिसेंबरला ऑपरेशन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्या फुफुसात संसंर्ग झाला होता. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते.
त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र, सोमवारी सकाळी ११ वाजून ४४ मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

श्री. शिवकुमार स्वामी यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी शोक व्यक्त केला.
तर, मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्यासह, कर्नाटकचे भाजपा अध्यक्ष बी. एस. येडियुरप्पा, एम. बी. पाटील, केजे जॉर्ज आणि सदानंद गौडा मठात दाखल झाले होते.

श्री. शिवकुमार स्वामी यांच्यावर (दि.२२)रोजी साडेचार वाजता अत्यंसंस्कार करण्यात आले.
श्री. शिवकुमार स्वामी यांच्या कार्याला सलाम आणि भावपूर्ण आदरांजली !!!

5
Answer link
डॉ. अभय बंग (सप्टेंबर २३, इ.स. १९५० - हयात) हे मराठीडॉक्टर आहेत. ते सर्च या संस्थेमार्फत गडचिरोलीतीलग्रामीण भागात वैद्यकीय सेवा आणि संशोधन असे कार्य करतात. बालमृत्यू नियंत्रणावरील त्यांच्या संशोधनाची दखल भारतासोबतच अनेक देशांनी घेतली असून पाकिस्तान, नेपाळ, बांग्लादेश व अनेक आफ्रिकन देश त्यानी तयार केलेले बालमृत्यू नियंत्रणाचे प्रतिरूप ((मॉडेल) वापरतात.
अभय बंग हे ठाकुरदास आणि सुमन बंग यांचे पुत्र आहेत. ते दोघेही गांधीवादी कार्यकर्ते होते. ठाकुरदास बंग हे गांधीजींना भेटले होते आणि गांधीजींच्या सांगण्यावरून त्यांनी अर्थशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी इंग्लंडला जाण्याऐवजी खेड्यांमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.
अभय बंग हे वर्ध्याच्या सेवाग्राम आश्रमाच्या वातावरणात वाढले. गांधीजीनी सुरू केलेल्या नयी तालीम या शिक्षणपद्धतीत त्यांचे शिक्षण झाले.
त्यांनी नागपूर मेडिकल कॉलेजमधून एम.बी.बी.एस. ची पदवी मिळवली. यात त्यांना तीन विषयात सुवर्णपदके मिळाली. त्यानंतर भारतातील अग्रगण्य समजल्या जाणार्या पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (पी. जी. आय.) या संस्थेत त्यानी काम केले. सार्वजनिक आरोग्य या विषयाचे शिक्षण देणार्या संस्था शोधत ते भारतभर फिरले परंतु त्यांना तसले शिक्षण देणारी एकही संस्था सापडली नाही. नंतर त्यांनी अमेरिकेच्या जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठातून मास्टर्स इन पब्लिक हेल्थ ही पदवी इ.स. १९८४ साली सुवर्णपदकासह मिळवली. तेथे त्यांनी कार्ल टेलरयांच्याकडून सार्वजनिक आरोग्याचे धडे घेतले. यामध्ये ते ९९ टक्के गुणांसह प्रथम आले. ते या संस्थेमध्ये संचालकही होऊ शकले असते. त्यांना अत्याधुनिक रुग्णालयात किंवा रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये काम करण्याच्या संधी चालून आल्या होत्या. पण त्यांनी शहरी, श्रीमंती आणि आरामशीर जीवनशैली नाकारली आणि गडचिरोलीसारख्या दुर्लक्षित भागाला आपले कार्यक्षेत्र म्हणून निवडले.
डॉक्टर अभय बंग आणि राणी बंग हे दोघेही नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये शिकायला होते. त्या दोघांनी प्रेमविवाह केला. डॉक्टर राणी बंग यांच्या घरून यास विरोध होता परंतु शेवटी त्यांना लग्नासाठी घरून परवानगी मिळाली. डॉक्टर झाल्यावर वर्ध्याजवळच्या कान्हापूर आणि महाकाळ या गावात त्यांनी वैद्यकीय काम सुरू केले. समाज परिवर्तनाच्या चळवळीचे हत्यार म्हणून ही वैद्यकीय सेवा होती. परंतु सेवेच्या माध्यमातून समाज परिवर्तन करणे तेथे त्यांना जमले नाही. तेव्हा त्यांच्या कुटुंबाने मिळून चेतना विकास ही संस्था सुरू केली आणि त्यामार्फत रोजगार हमीच्या मजुरांचे संघटन सुरू केले.
त्यांना दोन मुले असून मोठ्याचे नाव आनंद आणि छोट्याचे अमृत आहे. विचारी आणि शांत स्वभाव हे अभय बंग यांचे वैशिष्ट्य आहे. आणि कामाचा झपाटा हे राणी बंग यांचे वैशिष्ट्य आहे.
१. गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी चळवळ :-
"अभय बंग डॉक्टर आहेत, त्यानी फक्त आरोग्याचे काम करावे. त्यानी दारूबंदीच्या भानगडीत पडू नये" असे एका पोलीसप्रमुखांचे मत होते. अशा प्रकारच्या कुठल्याच दबावाला बळी न पडता त्यानी हे आंदोलन लोकांच्या मदतीने यशस्वी केले. १९८८ मध्ये सुरू केलेल्या एका महिला जागरण यात्रेत एका स्त्रीने दारूच्या समस्येबद्दल लक्ष वेधले. त्याबरोबर इतर स्त्रियांनीही त्यांच्या नवर्याच्या दारू पिण्यामुळे होणारे त्रास सांगितले आणि या समस्येवर काय करता येईल यावर अभय बंग आणि इतर सर्वांनी विचार केला. यावर १०४ गावांमध्ये एक अभ्यास करण्यात आला. यात दारूच्या अर्थशास्त्राविषयी माहिती जमवण्यात आली. गडचिरोलीतील अनेक स्वयंसेवी संघटना एकत्र आल्या. आणि यांनी 'गडचिरोली जिल्हा दारूमुक्त करा' अशी मागणी सुरू केली. यासाठी एक दारूमुक्ती संघटना स्थापन करण्यात आली. जिल्ह्यातील ३ आमदारांनी यास पाठिंबा दिला. या काळात अभय आणि राणी बंग यांनी मोठ्या संघर्षाला तोंड दिले. ' अभय आणि राणी बंग यांचे मुडदे पाडू' अशी भाषा एका चौकातील सभेत दारू दुकानाच्या मालकांनी केली होती. यावेळी हिरामण वरखेडे, सुखदेव उईके सारखे आदिवासी नेते अभय बंगांच्या पाठीमागे उभे राहिले. आज गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी आहे. २. नवजात बालकांच्या मृत्यूच्या कारणांचा अभ्यास आणि उपाययोजना :-
३. स्त्रियांच्या आरोग्याच्या प्रश्नावरील संशोधन :-
अमीर्झा आणि वसा या दोन गावांत केलेल्या संशोधनानुसार स्त्रियांमधले गायनॅकॉलॉजिकल आजारांचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणात आहे हे सिद्ध झाले आणि यावरील एक पेपर लॅनसेट मध्ये छापून आला आहे. यातील आकडेवारीवरून हे सिद्ध झाले की ९२% स्त्रियांना कुठल्याना कुठल्या प्रकारचा स्त्रियांचा आजार होता. या रिसर्च पेपरमुळे 'मदर ॲन्ड चाईल्ड हेल्थ' अशी घोषणा बदलून वूमन ॲन्ड चाईल्ड हेल्थ अशी घोषणा झाली. आणि जागतिक आरोग्य संघटनेने महिला आरोग्य वर्षाची आखणी केली. ४. सिकल सेल अनिमियावरील संशोधन
रोजगार हमी योजनेतील किमान मजुरीचा दरामागाचा शास्त्रीय अभ्यास केल्यावर तो दर ४ रुपये नसून १२ रुपये आहे असा निष्कर्ष अभय बंगानी मांडला. आणि तो इतका मुद्देसूद होता की सरकारला तो मान्य करावा लागला. अशा प्रकारचे संशोधन करण्यासाठी अभय बंग प्रसिद्ध आहेत. पी जी.आय. मध्ये प्रथम क्रमांक मिळवूनही त्यानी पी.जी.आय. सोडली याचे कारण त्यांना तेथील संशोधनात 'सामाजिक संबंध' सापडत नव्हता. सामान्य आणि गरीब लोकांना होणारे आजार यावर संशोधन करण्याचे त्यानी ठरवले होते. संशोधन म्हणजे लोकांवर संशोधन नाही तर 'लोकांसोबत संशोधन' हे अभय बंग यांचे सूत्र आहे.
अभय बंग यांनी ब्रेथ काउंटर नावाच्या उपकरणाचा शोध लावला आहे आणि लॅनसेटमध्ये त्यावर एक पेपर प्रसिद्ध केला आहे. यामुळे १२ च्या पुढे मोजू न शिकणार्या ग्रामीण स्त्रिया देखील न्युमोनियाचे यशस्वी निदान आणि त्यामुळे उपचार करू शकतात. नवजात बालकाच्या श्वासांची वारंवारता या उपकरणाच्या साहाय्याने बालक धोकादायक अवस्थेत आहे का हे शोधता येते.
गडचिरोली जिल्ह्याच्या कुपोषणावर व नवजात अर्भकांच्या मृत्यूवर डॉ. अभय बंग व डॉ.राणी बंग यांनी लिहिलेला "कोवळी पानगळ" हा शोधप्रबंध खूप गाजला होता. हा शोधप्रबंध 'लॅन्सेट' या मानाच्या वैद्यकीय मासिकात प्रसिद्ध झाला होता. या शोधप्रबंधामुळे केवळ राज्य व देशाच्याच शासनाला नव्हे, तर जागतिक आरोग्य संघटनेला (डब्ल्यू.एच.ओ) आपले आरोग्याविषयी धोरण बदलावे लागले होते.
'गांधीजी', 'लोक' आणि 'विज्ञान' ह्या अभय बंगांच्या तीन महत्त्वाच्या प्रेरणा आहेत. सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील शिक्षक कार्ल टेलर यांचाही अभय बंगांवर प्रभाव आहे. "लोकांमध्ये जाताना तुमच्या डोक्यातले प्रश्न घेऊन जाऊ नका, लोकांमध्ये जा, त्यांचे प्रश्न समजून घ्या आणि ते सोडवायचा प्रयत्न करा" हे कार्ल टेलर यांचे वाक्य त्यांच्या खूप लक्षात राहिले. एखादी गोष्ट मांडण्यापूर्वी ती अनेक कसोट्यांवर घासून त्यातील सत्य शोधण्याची अमेरिकन लोकांची जिद्द त्यांना प्रभावित करून जाते. लोकांशी संवाद साधण्याची बंग पतिपत्नींची हातोटी विलक्षण आहे. छोट्या छोट्या उदाहरणांचा ते एखादा विषय समजावून देताना उपयोग करतात.
डॉ. अभय बंग आणि राणी बंग यांना आजवर अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले, त्यांतले काही :-
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाकडून डी.लिट. ही सन्माननीय पदवीमहाराष्ट्र सरकारचा महाराष्ट्रभूषण पुरस्कार