Topic icon

गुन्हेगारी तपासणी

6
आपल्याला https://pcs.mahaonline.gov.in ह्या वेबसाईटवर नवीन रजिस्ट्रेशन करावे लागेल.
आपली माहिती भरली की जो आपण मोबाईल नंबर देणार त्यावर व्हेरिफिकेशन पिन येईल.
मग पुन्हा लॉगिन करून डाव्या बाजूला सर्व्हिसेस मध्ये कॅरेकटर सर्टिफिकेट वर क्लिक करा.
तिकडे आपला पत्ता, आपली नोकरी अथवा शैक्षणिक माहिती आणि आपल्या राहत्या पत्याच्या हद्दीतील पोलीस स्टेशन बद्दल माहिती देऊन ती सेव्ह करा. सेव्ह केला की त्यांना अँप्लिकेशन मिळाले असा स्क्रीन वर संदेश येतो व अप्लिकेशन आयडी मिळतो.
ओके वर किलक करा आणि मग स्क्रीन आपल्याला डॉक्युमेंट ची सॉफ्ट कॉपी अपलोड करायला सांगतील ते डॉक्युमेंट खालील प्रमाणे:
1 फोटो आणि स्वाक्षरी
2 शाळेचा दाखला
3 (यापैकी कोणतेही 2)पासपोर्ट, आधार कार्ड, बँक पास बुक, लाइट/ टेलिफोन बिल, इलेकशन कार्ड
4 कंपनी चे लेटर
सर्व अपलोड झाले की आपल्याला पेमेंट करायला सांगेल.
पेमेंट झाले की रिसीप्ट ची प्रिंट घ्या. व ती आपल्या पोलीस स्टेशन मध्ये सर्व डॉक्युमेंट सहित जावे. नंतर पोलीस आपल्या घरी येऊन व्हेरिफिकेशन करतात.
उत्तर लिहिले · 9/1/2018
कर्म · 16275