Topic icon

डेटा वापर

0

तुमचा मोबाईल डेटा लवकर संपण्याची अनेक कारणे असू शकतात. खाली काही सामान्य कारणे दिली आहेत:

  • ॲप्सचा पार्श्वभूमीवरील वापर (Background App Usage): अनेक ॲप्स तुम्ही त्यांचा सक्रियपणे वापर करत नसतानाही पार्श्वभूमीवर (background) डेटा वापरत असतात. उदा. सोशल मीडिया ॲप्स नवीन नोटिफिकेशन्स, मेसेजेस किंवा फीड रिफ्रेश करण्यासाठी डेटा वापरतात.
  • व्हिडिओ आणि म्युझिक स्ट्रीमिंग: YouTube, Netflix, Spotify, Amazon Prime Video यांसारख्या प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ किंवा म्युझिक पाहणे किंवा ऐकणे खूप डेटा वापरते, विशेषतः उच्च रिझोल्यूशनमध्ये (High Resolution).
  • ॲप अपडेट्स आणि ऑपरेटिंग सिस्टम अपडेट्स: तुमच्या फोनवरील ॲप्स आणि ऑपरेटिंग सिस्टम (उदा. Android किंवा iOS) आपोआप अपडेट्स डाउनलोड करतात, ज्यामुळे खूप डेटा खर्च होऊ शकतो.
  • उच्च रिझोल्यूशन फोटो आणि व्हिडिओ: तुम्ही उच्च रिझोल्यूशनचे फोटो किंवा व्हिडिओ अपलोड किंवा डाउनलोड करत असाल, तर त्यासाठी जास्त डेटा लागतो.
  • सोशल मीडियाचा जास्त वापर: Facebook, Instagram, WhatsApp, TikTok यांसारख्या सोशल मीडिया ॲप्सवर ऑटो-प्ले व्हिडिओ आणि इमेज लोडिंगमुळे खूप डेटा वापरला जातो.
  • क्लाउड सिंक्रोनायझेशन (Cloud Synchronization): Google Photos, OneDrive, iCloud यांसारख्या सेवा तुमच्या फाइल्स आणि फोटोंना आपोआप क्लाउडवर सिंक्रोनाइज करत असतात, ज्यासाठी डेटा लागतो.
  • मायक्रोफोन आणि लोकेशन सेवा: काही ॲप्स पार्श्वभूमीवर तुमचा लोकेशन डेटा किंवा मायक्रोफोन वापरून माहिती गोळा करतात, ज्यासाठी डेटा लागतो.
  • गैरवापर (Malware/Virus): काहीवेळा तुमच्या फोनमध्ये असलेले मालवेअर किंवा व्हायरस तुमच्या नकळत डेटा वापरू शकतात.
  • हॉटस्पॉट किंवा टेथरिंगचा वापर: तुम्ही तुमचा मोबाईल डेटा इतरांसोबत हॉटस्पॉटद्वारे शेअर करत असाल, तर डेटा लवकर संपू शकतो.
  • डेटा सेव्हर मोड चालू नसणे: अनेक स्मार्टफोन्समध्ये 'डेटा सेव्हर' किंवा 'डेटा वाचवा' असा पर्याय असतो, तो चालू नसल्यास डेटा जास्त वापरला जाऊ शकतो.

हे टाळण्यासाठी, तुम्ही तुमच्या फोनच्या सेटिंग्जमध्ये जाऊन कोणत्या ॲप्सनी किती डेटा वापरला आहे हे तपासू शकता आणि अनावश्यक ॲप्सचा पार्श्वभूमीवरील डेटा वापर बंद करू शकता. तसेच, ॲप अपडेट्स फक्त वायफायवर होतील असे सेट करू शकता.

उत्तर लिहिले · 11/10/2026
कर्म · 5830
0
नाही, चार्जिंग मात्र लवकर संपते, डेटा नाही लवकर संपत.
उत्तर लिहिले · 12/6/2020
कर्म · 15
1
तुम्ही एक काम करा, जिओचे सिम घ्या आणि अनलिमिटेड नेट चालवा.
उत्तर लिहिले · 2/2/2019
कर्म · 3445
2
मोबाईल च्या setting मध्ये जावा.
त्यात data usage म्हणून option असतो त्यावर click करा.
मग त्यामध्ये आपल्याला कोणत्या app किती data use केलाय समजेल.
.
🙏
उत्तर लिहिले · 29/1/2019
कर्म · 22320
3
नमस्कार दादा🙏
कोणत्या ऍप ने किती डेटा वापरला आहे हे माहिती करून घेण्यासाठी तुम्ही तुमच्या मोबाईल च्या सेटिंग मध्ये जा नंतर 'वायरलेस अँड नेटवर्क' या ऑपशन मध्ये 'डाटा युझेस' या नावाचे ऑपशन भेटेल त्यावर जा.  नंतर आपल्याला संपूर्ण अॅप ची जे तुमच्या मोबाईल मध्ये आहेत त्यांची सर्व माहिती मिळेल, कोणत्या अँप ने किती डाटा वापरला हे समजेल, तो डाटा केव्हा ऊस केला हे सुध्दा आपण पाहू शकतो.  हे आपल्या मोबाईल वर पण असते मोबाईल कंपनीने ते फिचर्स तुमच्या मोबाईल ला दिले असतील तर...🙏
उत्तर लिहिले · 25/12/2018
कर्म · 310
26
कृपया लेख पूर्ण वाचा, 

     💐*दीड जीबीच्या डेटाने आयुष्य हिरावलंय!*💐 

राहुल खिचडी, एबीपी माझा, मुंबई 
बुलेटीन जवळपास सेट झालं होतं. पण पावणे आठ वाजले असतील, बातमी येऊन धडकली. पंजाबमध्ये रेल्वेने 10 ते 12 जणांना चिरडलं. बातमी उतरवली. पण  रेल्वेच्या अपघाताची भीषणता वाढतच होती. मृतांचा आकडा एव्हाना 50 वर पोहोचला. आणि मग एक दृश्य ठळकपणे समोर आलं. अपघात होतानाची दृश्ये एका मोबाइल कॅमेऱ्यात रेकॉर्ड झालेली मिळाली आणि अपघातातल्या मृतांचा आकडा वाढण्यामागचं एक कारण समोर आलं. 

मोबाईल... 

रावण दहनाचा सोहळा अगदी रेल्वे रुळाला लागून. त्यामुळे हजारभर लोक रुळांवरच उभे होते. एका दृश्यात नीट पाहिलं तर रेल्वे येण्याआधी रुळांवर उभ्या असलेला प्रत्येक माणूस एक तर रावण दहन आपल्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड तर करत होता, किंवा फेसबुकद्वारे लाईव्ह तरी करत होता. रेल्वे अगदी धडकण्याच्या आधीही प्रत्येकाच्या हातातले मोबाईल. रावणाच्या दिशेने लुकलुकत होते. त्यांच्या मोबाईलच्या मेमरीत रावणाचा सर्वनाश व्हर्च्युअली सेव्ह होत होता, पण आपल्या आयुष्याचा रिअल एंड मात्र दिसत नव्हता. 

अनेक अपघातग्रस्तांच्या मोबाईलमध्ये तो सेव्हही झाला असेल. पण आयुष्याचा गेम ओव्हर झाल्यानंतर लाईफलाईन मिळून काय उपयोग? 

आता या अपघाताला इतर कारणे असूही शकतील. त्याला नाकारणे अयोग्य ठरेल. मेलेल्या माणसांबद्दल वाईट बोलूही नये. पण रेल्वेच्या रुळांवर उभे राहून मोबाईलमध्ये शूट करणे हा शुद्ध मूर्खपणा आहे. 

पण असं का होतंय? सगळ्याच गोष्टी आपल्याला आपल्या मोबाईलवर हव्या असं का वाटतं? याचा शोध घ्यायला हवा! 

पूर्वी रस्त्याने जाताना ओळखीची माणसं दिसायची... 

कारण आपल्या प्रत्येकाच्या माना वर असायच्या. आजूबाजूच्या घटना, वस्तू.  त्यांचे आकार.  माणसं. त्यांचे आवाज,  पदार्थ. त्यांचे सुवास हे सगळं काही अनुभवायचं. पण आता समोरुन बाप गेला, तरी मुलाला आणि बापालाही पत्ता लागत नाही! कारण सगळ्यांच्याच माना त्या मोबाईलपायी झुकल्या आहेत. 

त्या अर्धा बाय पाव फुटाच्या विस्मयकारक दुनियेने आपल्याला जणू हिप्नोटाईज केलय. हल्ली लोकलमध्ये तर. हेडफोन घालून बहिरी झालेली आणि डोळ्यात मोबाईलची एचडी स्क्रीन घालून आंधळी झालेली माणसं नॉर्मल आणि पेपर किंवा पुस्तक वाचणारी माणसे ॲबनॉर्मल झाली आहेत. 

सोशल मीडियावर नोटिफिकेशन आलं नाही, तर अस्वस्थ होणारी पिढीच जन्माला आली आहे, असं माझं मत आहे! मोबाईल वाजलेला नसतानाही मोबाईल खिशातून काढून नोटिफिकेशन चेक किती जण करतात, हे तर वेगळं सांगायला नको! 

विशेष म्हणजे माणसांचे फक्त अटेन्शन मिळवण्यासाठीच काही जण सोशल मीडियावर असतात. अपेक्षित माणसांकडून रिप्लाय आला नाही, तर काही जण अस्वस्थच नव्हे. हिंसकही होतात म्हणे! 

माहितीचा अफाट खजिना या मोबाईलने आपल्याला दिला आहे खरा. पण त्यातलं काय वापरायचं? किती वापरायचं? कुठे वापरायचं? हा कॉमनसेन्स  मात्र दिला नाही. मोबाईल वापरताना जणू अक्कल गहाण पडते. मनावरचा ताबा सुटतो आणि आपल्या मनाचा ताबा तो मोबाईल घेतो. 

पूर्वी शेजारी मिक्सर आला, तर मत्सर वाढायचा. शेजारी फ्रीज आला, की आपली डोकी गरम व्हायची. ईर्ष्या वाढीस लागायची. पण आता त्याचीही गरज पडत नाही. एखाद्याच्या पोस्टला लाईक किती, कॉमेंट्स किती? त्याचे फॉलोअर्स किती? ही कारणे द्वेषासाठी पुरेशी आहेत. व्हॉट्सॅपवरचे ग्रूपमधले नोटिफिकेशन किती जण सीरियसली पाहतात? स्क्रोल करुन चॅट डिलीट करणारेही आहेत. पण न पटणाऱ्या मुद्द्यावरुन भांडून ग्रूप सोडणारेही हळवे आहेत. पण प्रश्न असा आहे, की त्यातून साध्य काय होतय? 

या मोबाईलने आणखी एक प्रमाद केला आहे. जगण्यातली एक्स्क्लुझिव्हिटीच कायमची संपवून टाकली आहे. कारण सगळ्यांनाच सगळं माहिती आहे. पूर्वी... एखाद्या मुद्द्यावर अभ्यास केलेला... तो मुद्दा कोळून प्यालेला माणूस असायचा.. पण आता...  या व्हॉट्सॅप युनिव्हर्सिटीच्या जमान्यात... प्रत्येक माणसाला सगळं काही माहित आहे. भले ते चुकीचे का असेना. कारण हल्लीचं जग.. फक्त परसेप्शनवर जगतय... इथे रियालिटीला फार महत्त्व नाही... 

प्रत्येक थरारक गोष्ट आपल्या मोबाईलमध्ये असायला हवी... अशी काहितरी विचित्र आणि भ्रामक अपेक्षा सध्या प्रत्येकात आहे.. कारण या मोबाईलने खऱ्या आयुष्यातली एक्साईट्मेंटच घालवून ती तळहातावरच्या मोबाईलपुरती मर्यादित ठेवली आहे! 

असो... तर शेवटी जाता जाता एक अनुभव शेअर करतो... आम्ही मालवणला गेलो होतो... मित्राने डॉल्फिन राईडची व्यवस्था केली होती... सुमारे शंभर एक डॉल्फिन आजूबाजूला उड्या मारत होते... आमच्या सोबतची माणसे ते क्षण मोबाईलच्या स्टोरेजमध्ये सेव्ह करत होती... आम्ही ते आमच्या मनातल्या स्टोरेजमध्ये सेव्ह करत होतो... त्यांच्या व्हीडिओंचे काय झाले माहित नाही.... आमच्या मनातला व्हीडिओ १० वर्षानीही ताजा आहे! 

आपल्या प्रत्येकाच्या हातत अल्लाउद्दीनचा दिवा आला आहे... पण तो दिवा विझलाय, आणि आपण त्या अंधारातच चाचपडतो...  जे आपल्या घरातली ज्येष्ठ मंडळी टीव्हीबाबत बोलायचे, तेच आज आपल्याला मोबाईलबद्दल बोलावं लागतय...मोबाईल वाईट नाही... त्याचा अतिरेकी वापर वाईट आहे...  काल झालेला अपघात फेसबुकवर किती...जणांनी लाईव्ह पाहिला असेल? त्यांचं का झालं असेल? त्या फ्री मिळणाऱ्या दीड जीबीच्या डेटाने एकदा मिळणारं आयुष्य हिरवून घेतलंय...
उत्तर लिहिले · 13/12/2018
कर्म · 115390