प्रश्न असा आहे की त्याला उत्तर आहे.... तरीही म्हणणं ऐकून घ्यायला हवे . अंतर्मुख होऊन विवेकी पालकत्व करताना सर्वसमावेशकता राहते.
आपली माणसं आपल्या मातीत शेतात मरमर श्रमाने उन्हातान्हात थंडी पावसात भिजत शेतकरी कष्टकरी कामगार राबतात. आपण संवेदनशील समाजमन बांधिलकी जपतो .कोणतंही शिवारातील पिक उत्पादन हे शेतकरी वर्गाला जीव की प्राण असते . त्या पिकाची पेरणी लागवड खुरपणी निंदणी कुळवणी कापणी करताना सगळ्यांची नजर एकच राहते , माझ्या घरीदारी मनमंदिरी सुबत्ता यावी.
हां तर प्रश्न असा आहे की, पूर्वग्रहदूषितपणे कोणीही भेदाभेद करूं नये आणि चांगल्याला चांगलं म्हणण्याची रीत परंपरा कायम ठेवली जावी.
मी , एका सहकारी कारखान्याचा ऊस उत्पादक शेतकरी आहे व मी माझ्या कारखान्यास लगातार एकोणपन्नास वर्षे ऊस पुरवला किंवा घातला अगर दिला आहे.
सन २०२३-२४ या हंगामात शेतकऱ्यांकडून अन्यत्र विल्हेवाट झालेली आहे. त्यामध्ये मी एक आहे.कारण ऊस तोडणी फारच उशीराने होणार आणि उभे ऊस पिक पाण्या अभावी वाळणार ...आणि हे कारण कारखान्याकडे निवेदीत केले होते. ऊस तोडणी मध्ये नियंत्रण सुच्चारूपणे सुरू नाही आणि नियोजन कोलमडले आहे हे लक्षात आणून दिले आहे. आणि हे आमचे म्हणणे ऐकून घेतले पाहिजे.कारण जर लागण ऊस आडसाली ८६०३२ वाण सन २०२२च्या जून महिन्यात लावलेले ऊस पिक हे कारखान्याच्या गळीत हंगामात, हंगाम सुरू झाला की , जायला पाहिजे, तसा प्रतिसाद मिळाला नाही आणि शेवटी पट्यावर ऊस आडसाली लागणीचा जाळून तोडून नेत असतील तर त्या सभासदांना त्यांच्या कष्टांचे श्रेय मिळाले कां ? त्याला किती यातना सहन कराव्या लागल्या हे अजमावावे. ज्यांचे ऊस सुरूवातीला जातात ते नशिबवान आहेत , त्यांचा गाॅडफादर हे एक तत्व दृढ विश्वासाने जीवभाव सर्वांठायीं लावतात कां ?
ज्यांचा सुरूवातीला ऊस तुटतो तो अन्य आंतरपिके खोडव्यात घेऊ शकतो . तसेच ऊस तोडताना, ऊस तोडणी मजुरांना खावटी द्यावी लागत नाही.
ज्यांचा ऊस जाळून जातो ,त्याला ऊस तोडणी करणारांना एकरी सहा हजार रूपये खर्च करावे लागले तसेच अन्य आंतरपिके घेण्यात मुकतो व ऊस वजन शेवटी पट्यावर नेताना टनेज घटते हे प्रमाण एकरी समजा वीस टन घटले तर त्यास त्या पिकातून काय मिळाले याचा शोध बोध घ्यावा लागेल .
आता , समजा मी एक एकर आडसाली ऊस शेवटी पट्यावर दिला तर मला एकंदरीत एक लाख रुपयांचा भुर्दंड सोसावा लागला...
ज्यांनी हे हेरले त्यांनी अन्यत्र ऊस विल्हेवाट लावली ते ऊस घालणारे कारखान्याचे हितचिंतक नाहीत असे व्यवस्थापन म्हणू शकते काय ?
अश्या परिस्थितीत, ज्यांना झळ पोहोचली आहे, त्यांच्याकडून कारखान्याने माफीनामा, क्षमायाचना पत्र लिहून घेतले आहे.
असो. अश्यावेळी माफीनामा क्षमायाचना स्विकारली , असे असेल तर ते खोडवे पिक येत्या हंगामात २०२४-२०२५मध्ये कारखान्याने नेहले पाहिजे.
सन २०२३-२४ चे अन्यत्र विल्हेवाट लावलेल्या खोडवा ऊस पिकाचे नियोजन ऊस तोडणी कारखाना करणार काय ?
कारण माझा कारखाना सभासदांच्या मालकीचा असेल तर
गेल्या हंगामात शेतकऱ्यांकडून इतकी अन्यत्र विल्हेवाट कां झाली याचा विवेकी पालकत्व करत असाल तर शोध घ्यायला हवा.
तसेच विश्वासाने स्थिरता विशालता तत्परता शांतता प्रस्थापित करण्यासाठी स्थिर विश्वासाची भावना हवी.
कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील जर सात लाख टन ऊस , हा २०२३-२४ मध्ये बाहेर गेला असेल तर , आजचं वास्तव यथार्थ दर्शन असे कां देत आहे.. ते सुधारणेचा उपाय काय
?
जरूर उपाय आहे, तो आम्ही सुचवला तर अपाय कसा असेल ..
कारण , सात लाख टन ऊस तूटलेले क्षेत्र ,आताचा खोडवा हे पिक शिवारात आहे , त्यांच्या तोडणीसाठी तुम्ही शेतकरी सभासदांना विश्वासात घेऊन राजकारण करावे , पूर्वग्रह बाजूला सारून
द्वेष निंदानालस्ती न करता कारखाना हिताचे रक्षण करणे गरजेचे आहे.
शेवटी काय, कोण चुकत नाही, जवळचे लांबचे , घरचे , आजी माजी संचालक पदाधिकारी ही चुकले आहेत...
जर त्यांना सहृदयता पूर्वक क्षमा केली असेल तर त्या ऊसाचे कस्पट देखील वाया जात नाही, अश्या ऊस तोडणी बाबत विचार व्हावा .
जर हे केले तर , ऊस वाढेल , गळीत वाढेल, उत्पादन वाढेल, मनांची जोडणी होईल, बघा पटलं तर होय म्हणा.
आता , या वर्तमानी सर्वोत्तम प्रेम कामगिरी आहे . कारखान्यातील सत्तेमुळे तुम्ही आम्ही आहोत .सभासदांना सहकार्य केले पाहिजे . निवडणूका येतात ,जातात .. जनाधार वाढला पाहिजे.
ऊस पिक गोडवा साखर आहे , तोंडांत टाका ती गोडच असते . माणूस माणसाला प्रिय असावा तसं ऊस पिक उत्पादन वाढीचे प्रयत्न करावेत.
हा उपाय केला तर सेवा निर्मल होईल व महान कार्य करून सहजतेने विशालतेकडे झेपावत रहाल.
धन्यवाद आणि शुभेच्छा सह आभार !!