Topic icon

ग्रामसभा

1
हो, येऊ शकते.

पंचायत राज कायद्यानुसार, ग्रामसभेची वर्षातून किमान दोन ते चार वेळा बैठक होणे आवश्यक आहे.

या बैठकांसाठी खालील संदर्भ तारखा आहेत:
 प्रजासत्ताक दिन (26 जानेवारी)
 कामगार दिन (1 मे)
 स्वातंत्र्य दिन (15 ऑगस्ट)
 गांधी जयंती (2 ऑक्टोबर)

असे असले तरी, ग्रामपंचायतींना मात्र त्यांच्या सोयीनुसार इतर तारखांना ग्रामसभा घेण्यास मोकळीक आहे.

उत्तर लिहिले · 2/10/2023
कर्म · 283280
0
ग्रामसभेला आलेल्या लोकांपैकी कोणी मोठ्याने ओरडून भांडण-तंटा करून सभेस गैरवर्तन केल्यास सरपंचांनी खालील गोष्टी कराव्यात:

1. तात्काळ हस्तक्षेप:

  • सरपंच म्हणून, सर्वप्रथम हस्तक्षेप करून भांडण थांबवण्याचा प्रयत्न करावा.
  • 2. शांत राहण्याचे आवाहन:

  • उपस्थित सदस्यांना शांत राहण्याचे आणि सभेचे कामकाज सुरळीतपणे चालू ठेवण्यास सहकार्य करण्याचे आवाहन करावे.
  • 3. समज देणे:

  • गैरवर्तन करणाऱ्या व्यक्तीला समजावून सांगावे की त्यांचे वर्तन सभ्य नाही आणि यामुळे सभेच्या कामात अडथळा येत आहे.
  • 4. नियमांनुसार कारवाई:

  • जर ती व्यक्ती ऐकत नसेल, तर ग्रामपंचायत नियमांनुसार तिच्यावर कारवाई करण्याचा अधिकार सरपंचांना आहे.
  • 5. पोलिसांची मदत:

  • जर परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असेल, तर पोलिसांना बोलावून घ्यावे आणि त्यांच्या मदतीने गैरवर्तन करणाऱ्या व्यक्तीला सभेच्या बाहेर काढावे.
  • 6. सभेचे कामकाज पुढे चालू ठेवणे:

  • अडथळा दूर झाल्यानंतर, सभेचे कामकाज पुन्हा सुरू करावे आणि विषयांवर चर्चा करून निर्णय घ्यावेत.
  • 7. गैरवर्तन करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई:

  • ग्रामपंचायत नियमांनुसार, गैरवर्तन करणाऱ्या व्यक्तीला सभेमध्ये पुन्हा प्रवेश करण्यापासून रोखले जाऊ शकते किंवा तिच्यावर दंड आकारला जाऊ शकतो.
  • 8. नोंदी ठेवणे:

  • सभेमध्ये घडलेल्या गैरवर्तनाची नोंद ग्रामपंचायत Records मध्ये ठेवावी, ज्यामुळे भविष्यात अशा घटना टाळता येतील.
  • संदर्भ:

    • महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, 1959 (Bombay Village Panchayats Act, 1959). Act Link
    उत्तर लिहिले · 25/3/2025
    कर्म · 3000
    0

    ग्रामसभेचे महत्त्व आणि अधिकार खालीलप्रमाणे आहेत:

    ग्रामसभेचे महत्त्व:
    • लोकशाही सहभाग: ग्रामसभा हे गाव पातळीवरील लोकांचे प्रतिनिधित्व करते. लोकांना एकत्रितपणे निर्णय घेण्याची आणि विकास योजनांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळते.
    • पारदर्शकता आणि उत्तरदायित्व: ग्रामसभेमुळे गावातील कारभारात पारदर्शकता येते. अधिकारी आणि लोकप्रतिनिधी लोकांना जाब देण्यास बांधील असतात.
    • गरजांची पूर्तता: ग्रामसभा गावातील लोकांच्या गरजा व समस्यांवर चर्चा करून त्या सोडवण्यासाठी योजना तयार करते.
    • सामाजिक न्याय: दुर्बळ आणि वंचित घटकांना त्यांचे प्रश्न मांडण्याची आणि न्याय मिळवण्याची संधी मिळते.
    ग्रामसभेचे अधिकार:
    • विकास योजनांना मान्यता: ग्रामपंचायत विकास योजना तयार करते, परंतु ग्रामसभेची मान्यता आवश्यक असते.
    • अर्थसंकल्पाला मान्यता: ग्रामपंचायतीच्या अर्थसंकल्पाला ग्रामसभेची मंजुरी लागते.
    • सामाजिक लेखा परीक्षण: ग्रामसभेला ग्रामपंचायतीच्या कामांचे सामाजिक लेखा परीक्षण करण्याचा अधिकार आहे.
    • लाभार्थ्यांची निवड: शासकीय योजनांमधील लाभार्थ्यांची निवड ग्रामसभेच्या माध्यमातून केली जाते.
    • ग्रामपंचायतीवर नियंत्रण: ग्रामसभा ग्रामपंचायतीच्या कामावर नियंत्रण ठेवते आणि आवश्यक वाटल्यास सूचना देऊ शकते.

    अधिक माहितीसाठी:

    उत्तर लिहिले · 25/3/2025
    कर्म · 3000
    0
    पेसा (PESA - Panchayat Extension to Scheduled Areas) अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये ग्राम कोष समिती (Village Fund Committee) बनू शकते. या समितीचा उद्देश गावातील नैसर्गिक साधनसंपत्तीचे व्यवस्थापन करणे, विकास कामांसाठी निधी जमा करणे आणि ग्रामसभेला आर्थिक अधिकार देणे हा आहे.
    ग्राम कोष समिती:
    • पेसा कायद्यानुसार, अनुसूचित क्षेत्रातील गावांना स्वतःच्या विकासाचे निर्णय घेण्याचा अधिकार आहे.
    • ग्रामसभा या समितीच्या माध्यमातून गावातील आर्थिक व्यवहारांवर नियंत्रण ठेवते.
    • समितीमध्ये गावातील सदस्य असतात, जे ग्रामसभेने निवडलेले असतात.
    अधिक माहितीसाठी:
    उत्तर लिहिले · 21/3/2025
    कर्म · 3000
    2
    शासन नियमानुसार वर्षातून 4 ग्रामसभा घेणे ग्रामपंचायतीस बंधनकारक आहे. त्यासाठी ग्रुप ग्रामपंचायतीसाठी असा काही वेगळा नियम नाही, सर्वांना सारखा नियम आहे. तसे जर काही होत नसल्यास गावातील एकूण मतदार यादीच्या 15% लोकांच्या सही घेऊन पंचायत समितीमार्फत जिल्हा परिषद व आयुक्त कार्यालयास लेखी तक्रार करा म्हणजे सरपंच सुद्धा अडचणीत येईल कारण ग्रामसभा बोलावणे हे त्याचे एक महत्त्वाचे काम आहे.
    उत्तर लिहिले · 16/11/2019
    कर्म · 0
    0

    ग्रामसभा होण्यासाठी कोणत्याही विशिष्ट मेजॉरिटीची (quorum) आवश्यकता नसते.

    • गणपूर्ती (Quorum): ग्रामसभा सुरू होण्यासाठी एकूण सदस्य संख्येच्या 15% सदस्य किंवा 100 सदस्य (यापैकी जे कमी असेल ते) उपस्थित असणे आवश्यक आहे.
    • निर्णय: ग्रामसभेमध्ये निर्णय घेण्यासाठी उपस्थित सदस्यांच्या साध्या बहुमताची आवश्यकता असते. म्हणजेच, जास्त सदस्यांनी एखाद्या प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले, तर तो प्रस्ताव मंजूर होतो.

    Gram Panchayat Act. https://www.mahaonline.gov.in/Site/Upload/ActsRules/Marathi/The%20Bombay%20Village%20Panchayats%20Act,%201958.pdf

    उत्तर लिहिले · 20/3/2025
    कर्म · 3000
    6
    जशी लोकसभा, विधानसभा तशी ग्रामसभा. लोकसभेचे सभासद खासदार असतात. विधानसभेचे सभासद आमदार असतात. तसेच ग्रामसभेचे सभासद मतदार असतात.


    माणूस १८ वर्षाचा झाला कि त्याला मतदान करण्याचा अधिकार मिळतो. मग तो प्रत्येक नागरिक आपोआपच ग्रामसभेचा सदस्य बनतो. एकदा सदस्य झाला कि तो मरेपर्यंत सदस्य असतो. ग्रामसभेला निवडणूक नाही. गावातील प्रत्येक मतदार नागरिक हा ग्रामसभेचा सदस्य आहे.


    ग्रामसभेत हजर राहण्याचा, ग्रामसभेत मत, विचार मांडण्याचा प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे. बहुमतांनी ठराव पास / नापास करण्याचा, मत देण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे.


    जसे हे अधिकार आहेत तसेच हे अधिकार बजावण्याचे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे. गावातील ग्रामपंचायत आपण सांगतो तशी चालविणे, चालते कि नाही हे पाहणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे.


    ग्रामसभेत जे ठरेल, जे ठराव होतील त्याची अंमलबजावणी करणे ग्रामपंचायतीवर बंधनकारक आहे. जर ग्रामसभेला गेलो नाही, आपण सांगतो त्याप्रमाणे ठराव करून घेतले नाहीत, तर ग्रामपचायतीमध्ये ग्रामसेवक, सरपंच उपसरपंच व सदस्यांचा मनमानी कारभार चालेल.


    अनेक गावात प्रत्यक्षात ग्रामसभा होत नाहीत. ग्रामसभेच्या ८ दिवस आधी लोकांच्या सह्या घेतल्या जातात, किंवा खोट्या सह्या / अगन्ठे  घेतात. व सरपंच / ग्रामसेवक मनानेच खोटे ठराव घेवून पंचायत समितीत पाठवून देतात. यामुळे प्रत्यक्षात गावात फार मोठा भ्रष्टाचार होवूनही लोकांना माहिती असू शकत नाही.


    वर्षातून किमान ६ ग्रामसभा घेणे ग्रामपंचायतीवर बंधनकारक आहे. ६ पेक्षा जास्त घेतल्या तर हरकत नाही. पैकी ४ ग्रामसभांच्या तारखाही फिक्स आहेत.


    २६ जानेवारी            - प्रजासत्ताक दिन 

    १   मे                       - कामगार दिन 

    १५ ऑगस्ट              - स्वातंत्र्य दिन 

    २   ऑक्टोबर           - गांधी जयंती 


    या दिवशी ग्रामसभा भरविणे बंधनकारक आहे. ग्रामसभेची नोटीस हि सभेच्या तारखेपूर्वी १० दिवस आधी बजावावी लागते. नोटीस हि ग्रामपंचायत कार्यालयात तसेच सर्वाना पाहता येईल, व सहजपणे वाचता येईल अशा ठिकाणी लावून प्रसिद्ध करावी लागते. तसेच सभेच्या ८ दिवस अगोदर व सभेच्या एक दिवस अगोदर अश दोन वेळा प्रत्येक वार्डात, वाडीत सविस्तर दवंडी हि द्यावी लागते.


    सभेचा अध्यक्ष 


     आर्थिक वर्षातील पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष तसेच निवडणुकीनंतरचा पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष सरपंच असतो. सरपंचांच्या गैरहजेरीत उपसरपंच हा अध्यक्ष असतो बाकी उर्वरित ग्रामसभेचा अध्यक्ष मतदारांनी बहुमताने निवडून दिलेला व्यक्ती हा ग्रामसभेचा अध्यक्ष असतो. 


    ग्रामसभेत कसे बोलावे ?


    ग्रामसभेत मतदारांना बोलण्याचा अधिकार आहे. मतदारांनी ग्रामसभेच्या अध्यक्षाची परवानगी घेवून बोलावे तसेच उभे राहून अध्यक्षांना अध्यक्ष महाराज असे संबोधून त्यांचेकडे पाहून बोलावे. अध्यक्षांनी सुद्धा माहिती विचारणाऱ्याकडे पाहून बोलावे.


    सभेत मतदारांच्या प्रश्नाला फक्त अध्यक्षच उत्तर देवू शकतात. इतरांना उत्तरे देण्याचा अधिकार नाही.


    सभेचे कामकाज 


    ग्रामसेवक हा ग्रामसभेचा सचिव असतो. ग्रामसभेचे इतिवृत्त सचिव तयार करून व्यवस्थित ठेवतो. मात्र त्याच्या अनुपस्थित अध्यक्ष सांगेल तो शिक्षक, तलाठी, अंगणवाडी सेविका या सारख्या शासकीय/ निमशासकीय / ग्रामपंचायत कर्मचारी तयार करील.


    अत्यंत महत्वाचे - 


    पुढील ग्रामसभेत ज्या विषयांचे ठराव व्हावेत असे आपणास वाटते, त्याचे निवेदन तयार करून तसा विनंती अर्ज सभेच्या ८ दिवस आधी ग्रामपंचायतीत जमा करून त्याची पोच घ्यावी.


    ग्रामसभेत ठराव मांडावा, त्यावर बहुमत घेण्यास भाग पाडावे. ठराव पास . नापास झालेला प्रोसिडिंग बुक मध्ये लिहिला कि नाही. ठराव जसा झाला तसाच लिहिला कि बदल करून लिहिला हे शिकलेल्या मुलाकडून मोठ्याने वाचून घ्यावे. अन्यथा ठराव होवूनही प्रोसिडिंग बुकात न लिहिणे किंवा चुकीचा लिहिणे हे प्रकार सर्रास घडतात.


    ग्रामसभेत आपण रस्ता, पाणी, गटार, वीज, शिक्षण, आरोग्य, शौचालये, रेशन, रोजगार, घरकुले, असे कोणतेही नागरी, सार्वजनिक हिताचे प्रश्न उपस्थित करू शकतो व त्यावर चर्चा घडवून आणू शकतो व ठराव करण्यास भाग पडू शकतो.


    आपण जर नियमितपणे ग्रामसभेत उपस्थित राहिलो व ग्रामसभेत सहभाग दिला व ग्रामपंचायतीच्या कारभारात हस्तक्षेप केला तर आपणास गावातील कोणत्याही अडचणीसाठी तालुका, जिल्ह्याच्या गावी जाण्याची गरज नाही.


    आर्थिक वर्षातील पहिली ग्रामसभा ग्रामपंचायतीच्या कार्यालयात घेणे बंधनकारक आहे. तसेच उर्वरित ग्रामसभा इंग्रजी मुळाक्षरांच्या (अल्फाबेटिकल्स प्रमाणे) अद्याक्षरांप्रमाणे इतर वाडे, वस्तीवर घ्याव्यात.


    आपण जर निवेदन दिले कि, अमुक तारखेला अमुक वाजता, अमुक या ठिकाणी ग्रामसभा घ्यावी, तर त्या प्रमाणे ग्रामसभा घ्यावी लागते.


    आपण जर ग्रामसभेला गेलो तर आपला रोज बुडेल असे वाटत असेल तर आदल्या ग्रामसभेला पुढील ग्रामसभेची वेळ ठरवून घ्यावी. किंवा निवेदन देवून सांगावे.


    संध्याकाळी किंवा सकाळी लवकर देखील मतदारांच्या सोयीच्या वेळेत ग्रामसभा घेणे बंधनकारक आहे.


    जर ग्रामसभेच्या दिवशी लग्न / मयत किंवा महत्वाचे कार्यक्रम असतील तर निवेदन देवून नागरिकांच्या सोयीच्या दिवशी ग्रामसभा भरविण्यास सुचवता येवू शकते.


    प्रत्येक  ग्रामसभेपुर्वी एक दिवस अगोदर महिलांची ग्रामसभा घेणे आवश्यक आहे. त्या सभेमध्ये पारित झालेले ठराव जसेच्या तसे ग्रामसभेने मान्य करावे लागतात.


    लक्षात घ्या महिलांनी महिला ग्रामसभा व जनरल ग्रामसभेच्या दोन्ही दिवशी मोठ्या संखेनी उपस्थिती दर्शवावी. ग्रामसभेत ८० % हून अधिक उपस्थिती असेल तरच गाव लोकांच्या म्हणण्याप्रमाणे चालेल.


    पुढील ग्रामसभा कधी कुठे व केंव्हा होईल याचा ठराव आदल्याच ग्रामसभेत घ्या. 

    उत्तर लिहिले · 15/8/2017
    कर्म · 13530