Topic icon

जमिनी

3
मित्रा,
भविष्यात घर बांधते वेळी आपणास pile foundation चा आधार घ्यावा लागेल.
pile foundation म्हणजे काळ्या मातीत/भुसभूशीत मातीत जर जमिनीत खूप खाली कठीण स्तरापर्यंत (Hard rock) सिमेंट काँक्रीटचा (column) खांब टाकण्याची प्रक्रिया.

अशा प्रकारे काळ्या मातीत आपणास काम करता येईल.


उत्तर लिहिले · 24/12/2019
कर्म · 20800
5
जमिनीचे साधारणतः दोन प्रकार शासनाने ठरवून दिलेले आहेत.
१) Agriculture Land
२) Non Agriculture Land ज्याला आपण NA म्हणतो.

एखादी जागा जर Agriculture Land असेल तर त्या जागेवर कोणतेही कमर्शियल बांधकाम करता येत नाही. ती जागा शेतीसाठीच वापरली गेली पाहिजे असा नियम आहे. तसेच ती जागा शेतकऱ्यालाच विकली पाहिजे असाही नियम आहे. म्हणून अश्या जागेवर बांधकाम करायचे असेल तर ती जागा नगरपालिका, किंवा जिल्हा परिषदेकडून NA करून घ्यावी लागते.
आता शहरिकारणात अश्या अनेक जागा NA करून घेऊन बांधकाम करण्यात येते.
NA म्हणजेच non agriculture जागा. हि जागा राहण्यासाठी बांधकाम, कमर्शियल कॉम्प्लेक्स, इत्यादी साठी वापरता येते. NA आणि Agriculture लँड मध्ये पाणीपट्टी, मालमत्ता कर इत्यादी गोष्टींमध्ये फरक असतो. म्हणून घरासाठी जागा घ्यायची असेल तर लोक NA आहे की नाही हे पाहून घेतात.

उत्तर लिहिले · 2/8/2017
कर्म · 48240