Topic icon

शहरांचा इतिहास

0

मुंबई शहराचे नाव बदलून 'मुंबई' करण्यामागे एक मोठा इतिहास आहे. या बदलाची काही प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत:

  1. मराठी अस्मिता आणि संस्कृती: 'बॉम्बे' हे नाव ब्रिटिशांनी दिलेले नाव होते. त्यामुळे, नावातील परकेपणा कमी करून स्थानिक भाषेला आणि संस्कृतीला महत्त्व देणे हा मुख्य उद्देश होता. 'मुंबई' हे नाव मुंबादेवी या स्थानिक देवतेवरून आले आहे, ज्या शहराच्या संरक्षिका मानल्या जातात.
  2. राजकीय इच्छाशक्ती: १९९५ मध्ये महाराष्ट्र सरकारने शहराचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला. शिवसेना या राजकीय पक्षाने हा मुद्दा उचलून धरला आणि 'मुंबई' हे नाव अधिकृतपणे स्वीकारले जावे यासाठी प्रयत्न केले.
  3. सामाजिक भावना: अनेक इतिहासकार आणि समाज सुधारकांनी 'मुंबई' हे नाव परत आणण्याची मागणी केली, कारण ते स्थानिक लोकांच्या भावनांशी जोडलेले होते. 'बॉम्बे' हे नाव लोकांना ब्रिटिशांच्या राजवटीची आठवण करून देणारे वाटत होते.
  4. अधिकृत बदल: महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या निर्णयाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आणि १९९५ मध्ये 'बॉम्बे'चे अधिकृतपणे 'मुंबई' असे नामकरण करण्यात आले.

या बदलामुळे शहराला एक नवी ओळख मिळाली, जी स्थानिक संस्कृती आणि इतिहासाशी अधिक जोडलेली आहे.

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 2820
2
पुणे हे नाव 'पुण्यनगरी' या नावावरून आले असल्याचे समजले जाते. इ.स. ८ व्या शतकात ते 'पुन्नक' (किंवा 'पुण्यक') नावाने ओळखले जात असल्याचे संदर्भ सापडतात. इ.स. ११ व्या शतकात ते 'कसबे पुणे' किंवा 'पुनवडी' नावाने ओळखले जाऊ लागले. मराठा साम्राज्याच्या कालखंडात या शहराचे नाव 'पुणे' , आणि बोलीभाषेत ’पुणं’ असे वापरले जात होते. त्यामुळे ब्रिटिशांनी ’पुणं’चे स्पेलिंग Poona असे केले. त्यावरून परप्रांतीय लोक पुण्याला 'पूना' असे संबोधू लागले. पुढे शहराच्या नावाचे स्पेलिंग Puneअसे केले. पूर्वीपासूनच हे शहर पुणे याच मराठी अधिकृत नावाने ओळखले जात होते.
उत्तर लिहिले · 24/1/2019
कर्म · 705
2
पुणे→पुणे शहर→पुणे शहर तालुका→पुणे (लोकसभा मतदारसंघ)→पुणे महानगर क्षेत्र→पुणे जिल्हा→पुणे (प्रशासकीय) विभागहा लेखपुणेशहराविषयी आहे.पुणे जिल्ह्याच्यामाहितीसाठीयेथेटिचकी द्यापुणेउच्चारहेभारताच्यामहाराष्ट्रराज्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. हे शहर महाराष्ट्राच्या पश्चिम भागात,मुळावमुठाह्या दोन नद्यांच्या किनारी वसलेले असूनपुणे जिल्ह्याचेप्रशासकीय मुख्यालय आहे. नागरी सोयीसुविधा व विकासाबाबतीत पुणे हे महाराष्ट्रातमुंबईनंतरअग्रेसर आहे. या शहराच्या नावाचे Poona हे इंग्रजी स्पेलिंग सुमारे १५०वर्षे प्रचलित होते.विद्येचे माहेर घर म्हणून ओळखले जाते.?पुणेमहाराष्ट्र • भारत—  शहर  —पुणे गुणक:18°32′N73°51′E/18.53°N 73.85°Eप्रमाणवेळभाप्रवे(यूटीसी+५:३०)क्षेत्रफळ•उंची७०० चौ. किमी• ५६० मीजिल्हापुणेलोकसंख्या•घनता५०,४९,९६८ (२००८)• ७,२१४/किमी२महापौरकोड•पिन कोड•दूरध्वनी•आरटीओ कोड•त्रुटि: "411 xxx" अयोग्य अंक आहे• +०२०• MH 12 (पुणे ) MH 14 (पिंपरी चिंचवड ) [MH 53 (दक्षिण पुणे) MH 54 (उत्तर पुणे) लवकरच ]संकेतस्थळ:पुणे महानगरपालिका संकेतस्थळगुणक:18°32′N73°51′E/18.53°N 73.85°Eशिवाजीच्या आधीच्या काळापासून ज्ञात इतिहास असलेले पुणे हे भारतातील सातवे मोठे शहरअसून महाराष्ट्रातील दुसरे मोठे शहर आहे.[संदर्भ हवा].समृद्ध सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारसा लाभलेले पुणे शहर ही महाराष्ट्राची 'सांस्कृतिक राजधानी'; शहरात असलेल्या नामांकित शिक्षणसंस्थांमुळे पुणे हे विद्येचे माहेरघर मानले जाते. पुणे शहर उद्योग आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातसुद्धा अग्रेसर आहे.मराठीही शहरातील मुख्य भाषा आहे.पुणे हे विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. पुणे तिथे काय उणे हा वाक्प्रचार प्रसिद्ध आहे.लाल किला,तुलसी बाग,ई.प्रसिद्ध आहेत.नावपुणे हे नाव 'पुण्यनगरी' या नावावरून आले असल्याचे समजले जाते. इ.स. ८ व्या शतकात ते 'पुन्नक' (किंवा 'पुण्यक') नावाने ओळखले जात असल्याचे संदर्भ सापडतात. इ.स. ११ व्या शतकात ते 'कसबे पुणे' किंवा 'पुनवडी' नावाने ओळखले जाऊ लागले.मराठा साम्राज्याच्याकालखंडात या शहराचे नाव 'पुणे' , आणि बोलीभाषेत ’पुणं’ असे वापरले जात होते. ब्रिटिशांनी ’पुणं’चे स्पेलिंग Poona असे केले. त्यावरून परप्रांतीय लोक पुण्याला 'पूना' असे संबोधू लागले. पुढे शहराच्या नावाचे स्पेलिंगPuneअसे केल्यापासून हे शहरपुणेया अधिकृत नावाने ओळखले जाते.पुणे काबीज केल्यावर औरंगजेबाला ते खूपच आवडले. त्याने या शहराला ’मुहियाबाद’ नाव दिले होते. पण प्रत्यक्ष पत्रव्यवहारात तो या शहराचा उल्लेख’शहर नमुना’ असा करीत असे.इतिहासशनिवारवाडामुख्य पान:पुण्याचा इतिहासआठव्या शतकात पुणे हेपुन्नकम्हणून ओळखले जात असे. शहराचा सर्वांत जुना पुरावाइ.स. ७५८चाआहे ज्यात त्या काळातीलराष्ट्रकूटराजवटीचा उल्लेख आढळतो. मध्ययुगीन काळाचा अजून एक पुरावा म्हणजेजंगली महाराज रस्त्यावरअसलेलीपाताळेश्वर लेणी. ही लेणी आठव्या शतकातील आहेत.१७ व्या शतकापर्यंत हे शहर निजामशाही, आदिलशाही,मुघलअशा वेगवेगळ्या राजवटींच्या अंमलाखाली होते. सतराव्या शतकामध्येशहाजीराजे भोसलेयांना निजामशहाने पुण्याची जहागिरी दिली होती.. या जहागिरीमध्ये शहाजीच्या पत्नीजिजाबाईवास्तव्यास असतानाइ.स. १६२७मध्येशिवनेरीकिल्ल्यावरशिवाजीराजे भोसलेयांचा जन्म झाला. शिवाजी महाराजांनी आपल्या साथीदारांसह पुणे परिसरातील मुलखापासून सुरुवात करतमराठ्यांचे स्वराज्यस्थापले. या काळात पुण्यात शिवाजीमहाराजांचे वास्तव्य होते. पुढेपेशव्यांच्याकाळातइ.स. १७४९सालीसाताराही छत्रपतींची गादी असलेली राजधानी राहून पुणेमराठा साम्राज्याचीप्रशासकीय राजधानी बनली. पेशव्यांच्या या काळात पुण्याची मोठी भरभराट झाली.इ.स. १८१८पर्यंत पुण्यावर मराठ्यांचेराज्यहोते.लाल महालशनिवारवाडा,विश्रामबाग वाडाही पुण्यातील ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाची ठिकाणे आहेत. लाल महाल हे छत्रपति शिवाजी महाराजांचे, शनिवारवाडा हे थोरले बाजीराव पेशवे ते सवाई माधवराव पेशव्यांचे तर विश्रामबागवाडा दुसर्या बाजीराव पेशव्यांचे निवासस्थान होते.भूगोलजगाच्या नकाशावरती पुण्याचे अक्षांश १८° ३१' २२.४५" उत्तर, आणि रेखांश ७३° ५२' ३२.६९ पूर्व असे आहेत.पुण्याचा संदर्भ बिंदू (Zero milestone) हा पुण्यातील कॅम्प भागात असलेल्या जनरल पोस्ट ऑफिसच्या इमारतीबाहेर आहे. पुणे शहर हे सह्याद्रीपर्वतरांगाच्या पूर्वेस, समुद्रसपाटीपासून ५६० मीटर (१,८३७ फूट) उंचीवर आहे.भीमा नदीच्याउपनद्या मुळा व मुठा यांच्या संगमावर हे शहर वसले आहे.पवनावइंद्रायणीया नद्यादेखील पुणे शहराच्या वायव्येच्या भागांतून वाहतात. शहराचा सर्वोच्च बिंदुवेताळ टेकडीसमुद्रसपाटीपासून ८०० मीटरवर आहे तर शहराच्या जवळ असलेल्या सिंहगड किल्ल्याची समुद्रसपाटीपासूनची उंची १३०० मीटर आहे. पुणे शहर हे कोयना भूकंपप्रवण क्षेत्रात येते. कोयना गाव पुण्याच्या दक्षिणेस १०० किलोमीटरवर आहे. पुण्याला मध्यम व लहान भूकंप झालेले आहेत. कात्रज येथेमे १७,२००४रोजी ३.२ रिश्टर स्केल चा भूकंप झाला होता.
उत्तर लिहिले · 17/7/2017
कर्म · 4405