Topic icon

फुलशेती

0
ऑर्किडच्या फुलांची शेती कशी करायची याची माहिती खालीलप्रमाणे आहे:

हवामान: ऑर्किडच्या वाढीसाठी योग्य हवामान आवश्यक आहे. बहुतेक ऑर्किडला उष्ण आणि दमट हवामान लागते. तापमान १८°C ते ३०°C दरम्यान असावे.

जागा: ऑर्किडच्या शेतीसाठी योग्य जागा निवडा. जिथे भरपूर सूर्यप्रकाश असेल आणि हवा खेळती राहील अशी जागा निवडा.

माती: ऑर्किडला विशेष प्रकारची माती लागते. पाण्याचा निचरा होणारी माती आवश्यक आहे, जसे की लाकडी कोळसा, नारळाच्या शेंड्या आणि पाइनची साल यांचे मिश्रण.

लागवड: ऑर्किडची लागवड काळजीपूर्वक करावी लागते. रोपटे हळूवारपणे मातीत लावा आणि त्याला आधार द्या.

पाणी: ऑर्किडला नियमितपणे पाणी द्यावे लागते, परंतु जास्त पाणी देऊ नका. माती कोरडी झाल्यावरच पाणी द्या.

खत: ऑर्किडला नियमितपणे खत द्यावे लागते. संतुलित खत वापरा आणि ते पाण्यात मिसळून रोपांना द्या.

काळजी: ऑर्किडच्या रोपांची नियमितपणे काळजी घ्या. किड आणि रोगांपासून त्यांचे संरक्षण करा.

छाटणी: वेळोवेळी रोपांची छाटणी करा जेणेकरून त्यांची वाढ चांगली होईल.

इतर काळजी: ऑर्किडला योग्य प्रमाणात प्रकाश मिळणे आवश्यक आहे.



हे काही महत्वाचे मुद्दे आहेत जे तुम्हाला ऑर्किडच्या फुलांची शेती सुरू करण्यास मदत करतील.

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 2300
3

सध्या फुलशेती महत्त्वाची व किफायतशीर ठरत आहे. यामध्ये गुलाबशेती हा महत्त्वाचा उद्योग होऊ शकतो. जगात गुलाबाची मोघ्या प्रमाणात लागवड होते. भारतात दिल्ली, मुंबई, कोलकत्ता, चंदीगड, लखनौ व बेंगलोर या शहरांभोवती गुलाबशेती मोठ्या प्रमाणात केली जाते. महारष्ट्रात नाशिक, पुणे, सांगली आणि शिर्डी तेथे गुलाबाची लागवड केली जाते.

Gulabसर्व फुलांमध्ये गुलाबास वरचे स्थान आहे. गुलाबास 'फुलांचा राजा' म्हटले जाते. उत्तरे, सुगंधी तेल (ओटो), गुलकंद यासारखी मौल्यवान उत्पादने गुलाबापासून मिळतात. गुलकंद आरोग्यवर्धक असून उत्तम टॉंनिक आहे. रोझ दमास्काना या जातीपासून उत्तर व गुलाबपाणी काढले जाते. गुलाबाची फुले केशशृंगार, पुष्प सजावट, फुलदाणी सजावट, हार, गुच्छ बनविण्यासाठी वापरली जातात. आजारी माणसाला लवकर बरे होण्यासाठी सदिच्छा देताना गुलाबाची फुले दिली जातात. बग्गेरियाना या जातीच्या फुलबोंडापासून 'क' जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात मिळते. याशिवाय भावना व्यक्त करण्यासाठी या फुलाचा वापर केला जातो. तांबड्या रंगाचा गुलाब प्रेमाचे व पिवळ्या रंगाचा गुलाब मैत्रीचे प्रतिक मानला जातो.

जमीन : गुलाब बहुवर्षायू फुलझाड असल्याने जमीन काळजीपूर्वक निवडावी. उत्तम निचऱ्याची, भरपूर सेंद्रिय पदार्थयुक्त व आम्ल - विम्ल निर्देशांक (सामू) ६ ते ७.५ च्या दरम्यान असणारी जमीन लागवडीयोग्य असते. जमिनीची खोली एक मीटर असावी. कठीण खडकाच्या, चुनखडी व क्षारयुक्त जमिनी या फुलझाडास मानवत नाहीत. त्यामुळे अशा जमिनीत लागवड टाळावी.

हवामान : गुलाबास थंड व कोरडे हवामान मानवते. १५ टे २० अंश सेल्सिअस तापमानात गुलाबाची वाढ चांगली होऊन उत्पादन भरपूर मिळते. स्वच्छ हवा, भरपूर सुर्यप्रकाश आणि मध्यम तापमान वाढीस योग्य असते. समुद्रसपाटीपासून ४००० मीटर उंचीपर्यंत गुलाबाची लागवड होऊ शकते. हवेतील सापेक्ष आर्द्रता ६० ते ६५% असावी.

जाती : गुलाबात अनेक प्रकार आहेत. विविध रंगांच्या व आकारांच्या जाती आहेत. काही जातीच्या फुलांना सुगंध असतो. तर काही जातीच्या पाकळ्या बारीक असतात. गुलाबाच्या फुलांची संख्या व वाढ यामध्ये जातींमध्ये फरक आढळतो. या वैशिष्ट्यावरून गुलाबाचे सहा प्रकार पडतात.

१) हायब्रीड टी, २) फ्लोरीबंडा, ३) पॉलीएंथा, ४) मिनीएचर, (छोटे गुलाब). ५) वेली गुलाब, ६) रानटी गुलाब, यापैकी हायब्रीड टी व फ्लोरीबंडा या जातीची लागवड व्यापारी तत्त्वावर केली जाते.

१) हायब्रीड टी : टी गुलाब आणि परपेच्युअल गुलाब यांच्या संकरातून ही जात तयार केली आहे. फुले आकाराने मोठी, एका रंगाची, दोन रंगाची अथवा विविध रंगी आकर्षक असतात. गुलाबाचा आकार सर्वात लोकप्रिय आहे. यामध्ये अनेक जाती आहेत.

अ) लाल रंगाच्या जाती : पपा मिलांड, ग्लॅडिएटर मिस्टर लिंकन, खिश्चन डिऑर, सोफिया लॉरन्स, हॅपीनेस, क्रिमसन ग्लोरी, ओक्मा होमा.

ब) गुलाबी रंगाच्या जाती : क्वीन एलिझाबेथ, सुपर स्टार, फ्रेंडशिप, सोनिया मिलांद, मारीया क्लास, फस्र्ट प्राईझ, सिंदूर, पिटर फ्रँकेन फेल्ड,

क) पिवळ्या रंगाच्या जाती : लांडोरा, समर सनशाईन, सनकिंग, किंग्ज रॅमसन, गंगा गोल्डन जाएंट, पूर्णिमा, गोल्डन स्पेंडॉंर, ग्रॅन्ड मेरी जेनी.

ड) पांढऱ्या रंगाच्या जाती : ऑनर व्हर्गो, पास्कली डॉ. होमी भाभा, जॉन ऑफ केनेडी, मेसेज, मेमोरियम, चंद्रमा.

इ) निळ्या रंगाच्या जाती : ब्ल्यू मून, लेडी एक्स, पॅराडाइस, स्टर्लिंग सिल्व्हर.

ई) बहुरंगी जाती : डबल डिलाईट, पीस, अॅनव्हील स्पार्स्क, अमेरिकन हेरीटेज, सी पर्ल, किस ऑफ फायर, गार्डन पार्टी.

फ) सुगंधी जाती : नूरजहान, दमास्क, क्रिमसन ग्लोरी, एडवर्ड

२) फ्लोरीबंडा : फ्लोरीबंडा ही जात हायब्रीड टी व पॉलिएंथा यांच्या संकरातून निर्माण केली आहे. फुले घोसात व मोठ्या संख्येने येतात. फुलांचा आकार चांगला असून हंगाम मोठा असतो. काही महत्त्वाच्या फ्लोरीबंडा जाती, त्यांच्या फुलाचा रंग खाली दिला आहे.

अ) ऑल गोल्ड: फुलांना पिवळा रंग असून मंद सुवास असतो.

ब) अँगल फेस : गुलाबी फुले असतात. फुलांना भरपूर सुवास असतो.

क आरथर बेल : फुले पिवळी व सुवासिक असतात.

ड) एलिझाबेथ ऑफ ग्लॅमिस : सालमन रंगाची सुवासिक फुले असतात.

इ) फ्रेंच लेस : पांढरी मंद सुवासिक फुले असतात.

ई) गोल्डन टाईम्स : या जातीची फुले पिवळ्या रंगाची असतात.

उ) लिटल डार्लिंग : पिवळसर गुलाबी फुलांना भरपूर सुवास असतो.

ऊ) मरसेडिस : शेंदरी रंगाची व मंद सुवास असणारी फुले येतात.

ए) सिंप्लीसिटी : गुलाबी रंगाची फुले असतात.

ऐ) आईस बर्ग : पांढऱ्या रंगाची फुले खूपच सुवासिक असतात.

काही महत्त्वाच्या भारतीय जाती व फुलांचा रंग :

१) अभिसारिका - नारंगी,

२) आकाश सुंदरी - गुलाबी,

३) अनुपमा - लाल,

४) अनुरंग - रोझी,

५) अप्सरा - गुलाबी,

६) अर्जुन - रोझी,

७) भीम - गर्द लाल,

८) गंगा - सोनेरी,

९) हसीना - गुलाबी,

१०) जवाहार - पांढरा (मंद सुवास),

११) राजकुमार - गुलाबी,

१२) सुगंधा - लाल (गोड सुवास)

* अभिवृद्धी : गुलाबाची अभिवृद्धी बिया लावून, छाट कलम, गुटी कलम व डोळे भरून केली जाते. व्यापारी तत्त्वावर लागवड करताना अभिवृद्धी टी (T) पध्दतीने डोळे भरून करावी. गुलाबाच्या अभिवृद्धीसाठी प्रथम खुंट रोप (Root Stock) तयार करून त्यावर डोळा भरावा.

अ) खुंटरोपाची निवड (Selection of Root Stock) : गुलाबासाठी प्रामुख्याने चार खुंट रोपे वापरली जातात.

१) रोझा इंडिका,

२) रोझा मल्टिफ्लोरा,

३) रोझा स्पेसीज,

४) थॉर्नलेस (काटे नसणारे) वरीलपैकी पहिल्या दोन खुंटरोपाचा वापर सर्रास केला जातो. ७.५ पेक्षा जात सामू (विम्लधर्मी) असणाऱ्या जमिनीसाठी 'रोझा इंडिका' हे खुंटरोप वापरावे. ७.५ पेक्षा कमी सामू (आम्लधर्मी) असल्यास त्या जमिनीत 'रोझा मल्टिफ्लोरा' या खुंट रोपावर डोळे भरावेत. प्रथम फांदीकलमाद्वारे खुंट रोप वाढवावे व त्यावर टी (T) पद्धतीने चांगल्या जातीचा डोळा भरावा.

ब) डोळा भरणे : पावसाळी हंगामात खुंट रोपाची, पॉलिथिनच्या पिशवीत लागवड करावी. खुंटरोपाची चांगली वाढ होऊ द्यावी. ज्या जातीचा डोळा भरावयाचा आहे. त्या काडीवरील टी (T) आकाराचा डोळा काळजीपूर्वक काढावा, असा डोळा १० मिली जर्मिनेटर + ५ ग्रॅम प्रोटेक्टंट + १ लि. पाणी या द्रावणामध्ये ५ ते १० मिनिटे भिजवून, खुंटरोपावर याच टी (T) आकाराची खाची पाडून त्यात भरावा. प्लॅस्टिक पट्टीच्या सहाय्याने हा डोळा खुंट रोपाशी घट्ट बांधतात. एक महिल्यानंतर डोळा व फांदी कलम एक होऊन फूट होऊ लागते. मात्र याच दरम्यान खुंट रोपावर येणारी कोवळी फूट वरचे वर काढावी. चांगली वाढ झाल्यानंतर रोप शेतात किंवा बागेत कायमच्या जागी लावावे.

क) पॉलिबॅग मेथड : ही गुलाबावर डोळे भरण्याची अतिजलद पद्धत आहे. कमी वेळात रोपे तयार होतात. यासाठी ६ ते १० सेंमी. रुंद व १५ ते २० सेंमी. उंचीची पॉलिथिन पिशवी १ भाग सुपीक माती, १ भाग शेणखत, १ भाग भाताचे पिंजर व बी. एच. सी. पावडरचे मिश्रण भरावे. मिश्रण भरताना पिशवी फुटू नये म्हणून १०० ते २०० गेज पॉलिथीन पिशवी वापरावी. मातीचे मिश्रण चाळून घेऊन दाबून पिशवीत भरावे.

ज्या जातीचे खुंटरोप निवडले आहे त्याची पेन्सिल आकाराची १५ सेंमी लांबीची खोडकाडी घेऊन पिशवीत लावावी. पाच ते सहा आठवड्यात काही मुले धरते. भरपूर मुळे फुटल्यानंतर काडी डोळे भरण्यास योग्य समजली जाते. योग्य जातीचा डोळा घेऊन तो खुंटरोपावर 'इंग्रजी टी (T) पद्धतीने भरावा.

पूर्व मशागत : लागवडीपूर्वी उभी - आडवी खोल नांगरणी करावी. त्यानंतर ढेकळे फोडून कुळवणी करावी. जमीन तणविरहित करून योग्य अंतरावर खड्डे घ्यावेत. गुलाबाची लागवड चर काढून अथवा खडडे घेऊन करता येते. खड्डे अथवा चराचा आकार जमिनीचा प्रकार व गुलाबाच्या जातीवर अवलंबून असतो.

१) खड्डयाचा आकार : उन्हाळ्यात सर्वसाधारणपणे

१) ५० x ५० x ५० सेंमी. (लांबी, रुंदी, खोली)

७५ x ७५ x ७५ सेंमी. (लांबी, रुंदी, खोली)

५० x ५० x ५० सेंमी. (लांबी, रुंदी, खोली)

२) चराचा आकार :

४५ x ४५ सेंमी. (रुंदी, खोली)

४५ x ५० सेंमी. (रुंदी, खोली)

६० x ६० सेंमी. (रुंदी, खोली)

६० x ४५ सेंमी. (रुंदी, खोली)

* लागवडीतील अंतर : गुलाबाची लागवड विविध अंतरावर करता येते. परंतु जमिनीचा प्रकार, जातीची निवड व मशागतीची पद्धत यानुसार पुढील अंतरावर लागवड करता येते. खड्ड्यात १ मी. x १ मी. व १.५ मी. x १.० मी. वर लागवड करावी. तर चरामध्ये १.५ मी. x ६.६ मी. अंतरावर लागवड करावी.

खड्डे भरणे : चर अथवा खड्डे मातीचे चांगले मिश्रण तयार करून भरावेत. योग्य प्रतीचे गार्डन मिक्चर (Garden Mixture) तयार केल्यास झाडांची वाढ चांगली होते. गार्डन मिक्श्चरसाठी खड्डयातून निघालेली माती, शेणखत आणि कल्पतरू सेंद्रिय खताचा वापर करावा. खड्डे पावसाळ्यापूर्वी भरून घ्यावेत.

लागवडीची वेळ : गुलाबाची लागवड वर्षभर करता येते, परंतु लागवड करताना काही गोष्टी विचारात घ्याव्यात. कमी पर्जन्यमानाच्या भागात जून - जुलै महिन्यात लागवड करावी. जास्त पाऊस पडून पाणी साचत असल्यास ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान लागवड करणे फायदेशीर ठरते. महाराष्ट्रातील हवामानाचा विचार केल्यास जून, ओक्टोबर व जानेवारी महिन्यातील कालावधी लागवडीस अधिक योग्य आहे.

* लागवड : गुलाबाची लागवड दोन पद्धतीने केली जाते. पहिल्या पद्धतींत निवडलेल्या अंतरावर कलमांची रोपे लावून लागवड केली जाते. दुसऱ्या पद्धतीत अगोदर लागवडीच्या जागी खुंट लावून त्यावर योग्य जातीचा डोळा भरतात.

आंतरमशागत : गुलाब बहुवर्षायू असल्याने ६ ते १० वर्षे शेतात राहतो. त्यामुळे आंतरमशागतीकडे लक्ष द्यावे. आंतरमशागत वेळेवर केल्याने गुणवत्ता व उत्पन्नात भर पडते. खुरपणी, भरणी, खुंटरोपावरील फुटवे काढणे इत्यादी गोष्टींचा यात समावेश होतो. लागवडीपासूनच शेत खुरपूण स्वच्छ ठेवावे. हरळी अथवा नटग्राससारखी तणे एकदा वाढली तर नियंत्रण करणे अवघड जाते. गोखारूसारख्या तणांचा नायनाट करण्यासाठी २ ते ३ वेळा पंधरा दिवसांच्या अंतराने खुरपण्या कराव्यात.

पाणीपुरवठा : गुलाबास नियमित पाण्याची गरज असते. जमिनीचा प्रकार, हंगाम व वाढीच्या अवस्थेवर पाण्याची गरज अवलंबून असते. भारी जमिनीत जास्त अंतराने तर हलक्या जमिनीत कमी अंतराने पाणी द्यावे. झाडे फुलाधारणेच्या अवस्थेत असताना पाणी कमी पडू नये, याची काळजी घ्यावी. हंगामाचा विचार केल्यास पावसाळी हंगामात १५ - २० दिवसांच्या अंतराने तर उन्हाळ्यात ८ ते १० दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे.

ठिबक किंवा तुषार सिंचन पद्धतीला पीक चांगला प्रतिसाद देते. या पद्धतीने पाण्याची बचत होऊन जास्त पाण्यामुळे होणारे दुष्परिणाम टाळतात. पाण्याचे नमुने तपासून पाणी देणे योग्य असते. पाण्यात क्लोराइडसारखे हानिकारक क्षार असणार नाहीत याची काळजी घ्यावी.

उत्पादन व गुणवत्ता वाढ : गुलाब फुलाझाडास पाणी, खते व्यवस्थापन व इतर नियोजन अनुकूल असूनही गुणवत्ता व उत्पन्नात भर पडत नाही. अशा वेळी गुणवत्ता वाढीच्या पुढील पद्धती अवलंबाव्या लागतात.

१) डी - सकरिंग (De - Sukering) : डोळा भरल्यानंतर खुंट रोपावर येणारे फुटवे काढण्याच्या क्रियेस 'डी - संकरिंग' म्हणतात. कोवळी फूट वेळेतच काढावी. अन्यथा ती डोळे भरलेल्या फांदीच्या वाढीवर परिणाम करते. डोळा भरल्यानंतर वर्षभर डी - सकरिंग केले जाते. कोवळे फुटवे झाडातील अन्न मोठ्या प्रमाणात वापरतात. त्यामुळे ते योग्य वेळी काढून टाकणे महत्त्वाचे ठरते.

२) पिंचिंग (Pinching) : वाढीच्या काळात टोकाकडील फांदीचा जोमाने वाढणारा थोडा भाग कापण्याच्या क्रियेस 'पिंचिंग' असे म्हणतात. झाडास योग्य व एकसारखा आकार आणण्यासाठी पिंचिंग करतात. लागवडीनंतर काही फांद्या जोमाने व उरलेल्या हळुवार वाढतात. जोमाने वाढणाऱ्या फांद्या टोकाकडे थोड्या प्रमाणात कापल्यास त्यांची वाढ थांबते. आपोआप इतर फांद्यांच्या वाढीला संधी मिळते. यामुळे सर्व फांद्यासारख्या वाढून झाडाला आकर येतो. पिंचिंगमुळे झाडावरील फांद्या वाढण्यास सुद्धा मदत होते. त्यामुळे फुलांची संख्या वाढते.

३) डिस - बडिंग (Dis Budding) : गुलाबावरील लहान फुले व कळ्या काढण्याच्या क्रियेला 'डिस -बडिंग' म्हणतात. झाडावर भरपूर फुले आल्यास झाड त्यांना पोसू शकत नाही. त्यामुळे त्यांचा आकर लहान राहतो. याउलट मर्यादित फुले झाडावर ठेवल्यास फुलांचा दर्जा चांगला राहतो. म्हणून डिस - बडिंग फायदेशीर ठरते, परंतु आवश्यकता असेल तेव्हाच डिस - बडिंग करावे.

४) मल्चिंग (Mulching) : प्लॅस्टिक कागद अथवा पालापाचोळ्याने दोन रोपांमधील जमीन झाकण्याच्या क्रियेस 'मल्चिंग' (आच्छादन) म्हणतात. जमिनीत ओलावा टिकवून तणांची वाढ रोखण्याच्या उद्देशाने आच्छादन करतात. आच्छादनासाठी वाळलेले गवत. पालापाचोळा व काळ्या पॉलिथिन कागदाचा वापर करावा. आच्छादन करण्यासाठी ३०० गेजची काळी पॉलिथिन शीट योग्य असते, आच्छादनाचा हंगामानुसार चांगला उपयोग होतो. पावसाळ्यात तणांची वाढ रोखली जाऊन उन्हाळ्यात मातीतील ओलावा टिकवून ठेवण्यास मदत होते.

५) पाचवी महत्त्वाची गोष्ट म्हणजे : उत्पादन दर्जेदार आणी सतत, भरघोस येण्यासाठी खालीलप्रमाणे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या फवारण्या घ्याव्यात त्याने कीड रोगास आळा बसतो. फवारणी

१) पहिली फवारणी : ( लागवडीनंतर १५ दिवसांनी ) : जर्मिनेटर २५० मिली.+ थ्राईवर २५० मिली. + क्रॉंपशाईनर २५० मिली.+ राईपनर १०० मिली + प्रोटेक्टंट १०० ग्रॅम + प्रिझम १०० मिली. + न्युट्राटोन १०० मिली + हार्मोनी १५० मिली + स्प्लेंडर १५० + १०० लि.पाणी.

२) दुसरी फवारणी : (लागवडीनंतर २१ ते ३० दिवसांनी) : जर्मिनेटर ३५० मिली.+ थ्राईवर ५०० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० मिली. राईपनर १५० मिली + प्रोटेक्टंट २५० ग्रॅम + प्रिझम २५० मिली.+ न्युट्राटोन २५० मिली. + हार्मोनी २५० मिली + स्प्लेंडर २५० मिली + १५० लि.पाणी.

३) तिसरी फवारणी : ( लागवडीनंतर ३० ते ४५ दिवसांनी ) : थ्राईवर ७५० मिली. + क्रॉंपशाईनर ७५० मिली.+ राईपनर २५० मिली. + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + प्रिझम ५०० मिली. + न्युट्राटोन ५०० मिली. + हार्मोनी ३५० मिली + स्प्लेंडर ३५० मिली + २०० लि.पाणी.

४) चौथी फवारणी : (लागवडीनंतर ४५ ते ६० दिवसांनी) : थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १ लि. + राईपनर ५०० मिली. + प्रोटेक्टंट ७५० ग्रॅम + न्युट्राटोन ७५० मिली.+ हार्मोनी ४५० ते ५०० मिली + स्प्लेंडर ४५० मिली + २५० लि. पाणी.

५) तोडे चालू झाल्यानंतर हवामानातील बदलानुसार : (१० ते १५ दिवसाच्या अंतराने ) थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १ लि. + राईपनर ७५० मिली. + प्रोटेक्टंट ७५० ग्रॅम + न्युट्राटोन ७५० मिली.+ हार्मोनी ४५० ते ७५० मिली + हार्मोनी ४५० ते ५०० मिली + स्प्लेंडर ५०० मिली + २५० लि. पाणी.

बहार संपल्यानंतर छाटणी केल्यावर नवीन फुटीसाठी : (छाटणीनंतर ८ ते १० दिवसांत)

जर्मिनेटर ५०० मिली.+ थ्राईवर ५०० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० मिली. + प्रिझम ५०० मिली.+ १०० लि.पाणी.

त्याचबरोबर जर्मिनेटर एकरी १ लि. २०० लि. पाण्यातून मुळावाटे द्यावे.

* छाटणी (Pruning) : फुलांची संख्या वाढविण्यासाठी फांदीचा काही भाग काढण्याच्या क्रियेला 'छाटणी' म्हणतात. गुलाबाला नवीन वाढीवर फुले येतात. जुन्या फांद्यावर फुले येत नाहीत. नवीन फांद्यांची संख्या मर्यादित राहण्यास मदत होते. फांद्यांची गर्दी वाढल्यास झाडाचा आकार बिघडतो. छाटणीत जोमदार वाढीच्या निरोगी फांद्या ठेवून बारीक, कमजोर रोग व कीडग्रस्त, वाळलेल्या, अयोग्य दिशेत वाढणाऱ्या फांद्या काढाव्यात.

छाटणीचे उद्देश : १) जुनाट भाग व निर्जीव फांद्या काढणे.

२) फुलांची संख्या वाढविणे.

३) रोग व कीडग्रस्त फांद्या काढणे.

४) फवारणी, फुलांची तोडणी व इतर आंतरमशागती सोप्या करणे.

५) कोवळ्या, गर्दी करणाऱ्या व वांझ फांद्या काढणे.

६) योग्य वेळी झाड बहारात आणणे.

झाडाच्या वाढीच्या सुरुवातीला चांगला आकर आणण्याकडे लक्ष द्यावे. निवडक फांद्या ठेवून बाकीचा भाग काढावा. झाड फुलावर येण्यास सुरुवात झाल्यानंतर नियमित छाटणी करावी. छाटणीची तीव्रता लक्षात घेतल्यास, गुलाबाच्या छाटणीचे प्रकार पडतात.

१) सौम्य छाटणी (Soft Pruning) : फुलांचा बहार व पावसाला संपल्यानंतर छाटणी केली जाते. ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीस छाटणी केली जात असल्याने 'हिवाळी छाटणी' असेही म्हणतात. पावसाळी बहार झाल्यानंतर दुसरा बहार येण्यासाठी ही छाटणी केली जाते. बहार नोव्हेंबरमध्ये सुरू होऊन फेब्रुवारी - मार्चपर्यंत चालतो. सौम्य छाटणीत फांदीचे शेंडे छाटले जातात. यामुळे झाडास फुले भरपूर लागतात, परंतु ती आकाराने लहान असतात.

२) मध्यम छाटणी (Medium Pruning) : या छाटणीत फांद्याची खरडून अथवा फार उंचीवर छाटणी करत नाहीत. मध्यम उंचीवर म्हणजेच फांदीवर ७ ते ८ डोळे ठेवून छाटणी करतात. छाटणीनंतर ४० ते ५० दिवसांत नवीन फुटीवर फुले येतात. फुले भरपूर व मध्यम ते मोठ्या आकाराची असतात. मध्यम छाटणी झाडाची उंची मध्यम राहून डौलदार वाढतात.

३) कडक छाटणी (Heavy Pruning) : कडक छाटणी उन्हाळा संपल्यानंतर म्हणजे मे महिन्याच्या शेवटी करावी. फांदीच्या खोडाकडील भागावर ३ ते ४ डोळे राखून छाटणी करावी. कडक छाटणीस 'उन्हाळी छाटणी' असेही म्हणतात. छाटणी उन्हाळ्यात लवकर करू नये. तसे केल्यास कोवळ्या कोंबांना इजा पोहोचते. छाटणी खोलवर केल्याने फुले संख्येने कमी असतात. परंतु आकाराने मोठी असतात.

* छाटणीनंतर घ्यावयाची काळजी :

१) छाटणी योग्य वेळी करावी.

२) रोग - कीडग्रस्त व गर्दीच्या फांद्या काढाव्यात.

३) छाटणी केलेल्या भागावर बोर्डो पेस्ट लावावी.

४) धारदार सिकेटरने एकाच कापात छाटणी करावी.

५) छाटणीनंतर मशागत करून खत घालावे.

फुलांची तोडणी, प्रतवारी व उत्पन्न : गुलाबाची लागवड केल्यानंतर साधारणपणे सहा महिन्यांनी फुले लागण्यास सुरुवात होते. सुरुवातीला फुलांची संख्या कमी असते, परंतु एक वर्षानंतर नियमित व भरपूर फुले येण्यास सुरुवात होते. फुलांच्या बाहेरील एक ते दोन पाकळ्या उमलण्यास सुरुवात झाल्यानंतर त्यांची तोडणी करावी. फुलांच्या वापरावरून तोडणी वेगवेगळ्या प्रकारे करावी. हार, अत्तरे तयार करण्यासाठी तसेच देवाला वाहण्यासाठी पूर्ण उमललेली फुले तोडावीत. अशी फुले उघड्या टोपलीत गोळा करावीत.

फुलदाणी वापरण्यासाठी (कट फ्लॉवर्स) १५ ते ६० सेंमी लांबीची देठ ठेवून फुले तोडावीत. निरोगी डोळ्याच्या वरील बाजूस देठावर धारदार चाकूने कट द्यावा. गुलाबपुष्पाची तोडणी सूर्योदयापूर्वी अथवा सूर्यास्तवेळी करावी. त्यामुळे उन्हामुळे होणारे फुलांचे नुकसान टळते. उशिरा तोडल्याने फुलदांडी व फुलांचे आयुष्य कमी होते. अत्तरे तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी फुले उशिरा तोडल्याने सुगंधी द्रव्याचे प्रमाण कमी होते. फुलदांडी (कट फ्लॉवर्स) तोडणी केल्यानंतर फुलांचे देठ मानेपर्यंत पाण्यात बुडवून ठेवावेत. यामुळे फुलांचे आयुष्यमान वाढते. तोडणी संपेपर्यंत फुले सावलीत ठेवावीत.

प्रतवारी : तोडणीनंतर सावलीत ठेवलेल्या फुलांची प्रतवारी करावी. सुकलेली व खराब फुले बाजूला काढावीत. चांगल्या व निरोगी फुलांची देठाच्या लांबीनुसार प्रतवारी करावी. जास्त देठाच्या लांबीची फुले चांगल्या प्रतीची समजली जातात. तसेच त्यांना बाजारात किंमत जास्त मिळते. देठाच्या लांबीनुसार पुढील ग्रेडमध्ये फुलांची प्रतवारी केली जाते.

ग्रेड        देठाची लांबी

अ        ६० सेंमी पेक्षी जास्त

इ        ४५ ते ६० सेंमी

उ        ३० ते ४५ सेंमी

ऊ        १५ ते ३० सेंमी

ए        १५ सेंमी पेक्षा कमी

प्रतवारी जाती व रंगानुसार करावी. समान दांडे असलेली ६ किंवा १२ फुले एकत्र बांधून जुड्या खोक्यात पॅक करून बाजारात विक्रीसाठी पाठवाव्यात.

उत्पादन : प्रतिवर्षी फुलांचे सरासरी एकरी १.२५ लाख फुले मिळतात. दुसऱ्या वर्षापासून स्थिर उत्पादन येते.

गुलाबावरील रोग :

१) भुरी (Powdary Milde)

२) काले ठिपके (Black Spots)

३) शेंडा मर (Die -Back)

४) तांबेरा (Rusty)

१) भुरी : भुरी हा बुरशीजन्य रोग आहे. स्पेरोथिका पेनोसा नावाच्या बुरशीमुळे होतो. उष्ण - दमट वातावरणात प्रादुर्भाव जास्त आढळतो. पानावर भुरकट पांढऱ्या रंगाची बुरशी वाढून नंतर पानाच्या दोन्ही बाजूस पसरते. बुरशी कळ्या, फुलांचे देठ व कळीच्या मानेखाली पसरते. बुरशी आकुंचन पावतात. कळ्यांनी नैसर्गिक वाढ होत नाही. झाडाची वाढसुद्धा खुंटते.

उपाय : भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी हार्मोनी २ मिली/लि. याप्रमाणे थ्राईवर, क्रॉंपशाईनर सोबत फवारावे.

२) शेंडा मर : हा बुरशीजन्य रोग आहे. फांदी शेंड्याकडून पाठीमागे काळपट पडून वाळत येते. छाटणीतून होणाऱ्या जखमांमधून बुरशी आत शिरते व मर रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. पावसाळ्यात व पाणथळ जागी रोगाची तीव्रता जास्त असते.

उपाय : जर्मिनेटर, प्रिझम प्रत्येकी ५ मिली आणि हार्मोनी २ मिली/लि. पाणी याप्रमाणे फवारणी घ्यावी. त्याचबरोबर जर्मिनेटर एक लि./२०० लि. पाण्यातून एकरी मुळावाटे सोडावे.

३) काळे ठिपके : डिप्लोकारपॉन रोझी या बुरशीमुळे रोग होतो. जमिनीलगतच्या जुन्या पानांपासून रोगाची सुरुवात होऊन अनुकूल हवामानात वरपर्यंत पसरतो. पानावर गोलाकार काळपट ठिपके पडतात. रोगट पाने पिवळी पडून थोड्याशा धक्क्याने गळून पडतात. झाड कमकुवत होऊन फुलांची प्रत व उत्पादनावर परिणाम होतो.

उपाय : थ्राईवर, क्रॉंपशाईनर प्रत्येकी ३ ते ४ मिली आणी हार्मोनी २ मिली/लि. पाणी याप्रमाणे फवारणी घ्यावी.

४) तांबेरा : फ्रॅग्मीडियम म्युक्रोनॅटम या बुरशीमुळे तांबेरा होतो. हिवाळा व पावसाळ्यात रोगाचा प्रादुर्भाव आढळतो. रोगग्रस्त पाने तपकिरी पडून झाडाची वाढ खुंटते. पानगळ होऊन झाड अशक्त बनते. यामुळे फुलधारणेस उशीर लागतो.

उपाय: हार्मोनी २ मिली किंवा झेड - ७८ दोन ग्रॅम/लि. पाणी याप्रमाणे फवारावे.

गुलाबावरील किडी:

१) सुरवंट (Hairy Catter Piller),

२) भुंगेरे (Chafer Beetle),

३) फुलकिडे (Thrips),

४) मावा (Aphids),

५) खवले कीड (Scale Insects),

६) लाल कोळी (Red Mites)

१) सुरवंट : हे किडे पानांच्या शिरामधील भाग खातात, फक्त शिरा शिल्लक राहतात. यामुळे पान जाळीदार बनते. पाने व फुलांच्या कळ्यांचे नुकसान होते. सुरवंटाची अंडी पानाच्या खालील बाजूस आढळतात. किडीचा प्रादुर्भाव झालेल्या फुलांना भाव मिळत नाही.

२) भुंगेरे : भुंगेरे काळपट तपकिरी ते लालसर असतात. ते निशाचर असतात. दिवस तणांमध्ये व बुंध्याजवळ जमिनीत लपून बसतात. आणि रात्री पाने व कोवळी फूट कुरतडतात.

जास्त प्रादुर्भाव असल्यास भुंगेरे फुगलेले डोळे व कळ्या खातात.

३) फुलकिडे : फुलकिडे भुरकट पिवळ्या रंगाचे व लांबट आकाराचे असतात. कोवळे शेंडे. पाने, कळ्या व फुलांच्या पाकळ्या खरडून स्त्रवणारा रस शोषतात. असा भाग प्रथम पांढरा व नंतर तपकिरी होऊन खरचटल्यासारखे डाग पडतात. पाने व फुले आकसून वेडीवाकडी होतात.

४) मावा : तपकिरी, राखी हिरवट किंवा तपकिरी रंगाचे आणि लहान आकाराचे किडे असतात. शरीर गोल व मऊ असते. समूहाने पानाच्या खालच्या बाजूस अथवा शेंड्याकडील बाजूस आढळतात. हिवाळ्यात प्रादुर्भाव जास्त असतो. पिल्ले व पूर्ण वाढ झालेले किटक पाने, कळ्या व फुलातील रस शोषतात. कीडग्रस्त कळ्या उमलत नाहीत. माव्याच्या प्रादुर्भावने पानांवर व फुलांवर चिकटपणा आढळतो.

५) खवले कीड : काळसर करड्या रंगाची, पापद्यासारख्या आकाराची कीड, खोड व पानांना चिकटलेली असते. खवले एकाच ठिकाणी राहून रस शोषतात. प्रादुर्भाव जास्त झाल्यास फांद्या वाळतात.

६) लाल कोळी : किटक लांबट - गोल व तांबूस रंगाचे असतात. पूर्णावस्थेत आठ गाय असतात. खालच्या बाजूकडील पानांचा रस शोषतात. त्यामुळे पाने निस्तेज बनून झाडातील जोम कमी होतो.

धन्यवाद।।
उत्तर लिहिले · 27/11/2019
कर्म · 19610
0
मी तुम्हाला फुलशेती कशी करायची आणि त्यातून किती फायदा होऊ शकतो याबद्दल माहिती देतो.

फुलशेती कशी करायची:

1. योग्य जमीन आणि हवामान:

  • फुलांच्या लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन आवश्यक आहे.
  • हवामान फुलांच्या प्रकारानुसार निवडावे लागते.

2. फुलांची निवड:

  • तुम्ही कोणत्या फुलांची लागवड करू इच्छिता हे ठरवा.
  • स्थानिक बाजारात कोणत्या फुलांना जास्त मागणी आहे, याचा विचार करा.

3. रोप तयार करणे:

  • तुम्ही बियाण्यांपासून रोपे तयार करू शकता किंवा रोपवाटिकेमधून तयार रोपे खरेदी करू शकता.

4. लागवड:

  • रोपांची लागवड योग्य अंतरावर करा.
  • लागवड करताना मातीमध्ये योग्य प्रमाणात खत टाका.

5. पाणी व्यवस्थापन:

  • फुलांना नियमितपणे पाणी द्या.
  • पाणी देताना ते मुळांना व्यवस्थित पोहोचेल याची काळजी घ्या.

6. खत व्यवस्थापन:

  • फुलांच्या वाढीसाठी नियमितपणे खत द्या.
  • रासायनिक खतांचा वापर टाळा आणि जैविक खतांचा वापर करा.

7. रोग आणि कीड नियंत्रण:

  • फुलांवर येणाऱ्या रोगांवर आणि किडींवर नियंत्रण ठेवा.
  • आवश्यक असल्यास कीटकनाशकांचा वापर करा.

8. काढणी आणि विक्री:

  • फुले पूर्णपणे उमलल्यावर त्यांची काढणी करा.
  • फुले ताजी असतानाच बाजारात विक्रीसाठी पाठवा.

फुलशेतीतून मिळणारा फायदा:

फुलशेतीतून मिळणारा फायदा हा अनेक गोष्टींवर अवलंबून असतो, जसे की:

  • तुम्ही कोणत्या फुलांची लागवड करता.
  • तुमच्या फुलांची गुणवत्ता.
  • बाजारात फुलांची मागणी.
  • तुमची उत्पादन खर्च.

सर्वसाधारणपणे, फुलशेतीतून तुम्ही चांगला नफा मिळवू शकता. काही शेतकरी फुलशेतीतून वर्षाला लाखों रुपये कमावतात.


टीप:

  • फुलशेती सुरू करण्यापूर्वी, कृषी तज्ञांचा सल्ला घ्या.
  • तुम्ही तुमच्या जिल्ह्यातील कृषी विभागाकडून फुलशेतीबद्दल अधिक माहिती मिळवू शकता.

तुम्हाला याबद्दल आणखी काही प्रश्न असल्यास, तुम्ही मला विचारू शकता.

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 2300
1
गलांडा हे अत्यंत कणखर, भरपूर उत्पादन देणारे आणि बाजारात वर्षभर मागणी असणारे फुलपीक आहे. या पिकांच्या रोपवाटिका जून -जुलै या कालावधीत करण्याची आवश्यकता असते. या पिकाच्या व्यवस्थापनाविषयी संपूर्ण माहिती खाली दिलेल्या लिंक वरती मिळेल
फुलशेती – तंत्र गलांडा लागवडीचे
उत्तर लिहिले · 16/8/2017
कर्म · 13530
3
भारतात बहूतेक राज्यांतून मर्यादित स्वरूपात फुलशेती केली जाते. यात प्रामुख्याने बिनदांड्याच्या फुलांचा मोठ्या प्रमाणावर समावेश असतो. निशिगंध हे सुद्धा अशाच गटातील फुलपीक असले तरी त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्मामुळे, सुवासिकपणामुळे आणि लांब दांड्यावर उमलणाऱ्या पांढऱ्याशुभ्र फुलांमुळे ह्या फुलपिकाला भारतात तसेच परदेशी बाजारपेठांतही चांगली मागणी आहे. याशिवाय बागेतील शोभा वाढविण्यासाठी तसेच बागेतील, परिसरातील, घराभोवतालचे वातावरण सुगंधी आणि प्रसन्न राखण्यासाठी या फुलझाडाची लागवड केली जाते. निशिगांधाच्या फुलांत नैसर्गिक सुवास असल्यामुळे या फुलांतून सुवासिक तेल काढता येते. त्यामुळे औद्योगिक दृष्टीनेही हे महत्त्वाचे फुलपीक आहे या सुगंधी द्रव्यांचा उपयोग औषधे, सुवासिक तेले, उत्तरे, साबण इत्यादींसाठी करतात. परदेशात या तेलाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे.महत्त्व :निशिगंध हे बहुवर्षीय फुलझाड आहे. निशिगंधाच्या पिकाला 'रजनीगंधा' अथवा 'गुलछडी' असेही म्हणतात. भारतात निशिगंधाचे फुल फार महत्ताचे मानले जाते. कारण एकदा लागवड केल्यानंतरत्याचा लागवडीपासून ३ ते ४ वर्षांपर्यंत फुले मिळतात. निशिगंध हे कंदवर्गीय फुलझाड आहे. निशिगंधाच्या लावलेल्या कंदापासून असंख्य फुटवे फुटून एका वर्षातच अनेक रोपे मिळतात. निशिगंधाचे फुलपीक १७ व्या शतकात मेक्सिको या देशातून युरोपमार्गे भारतात आले. भारतातील उष्ण हवामान यापिकास चांगले मानवते. भारतात बहुतेक सर्व राज्यांत निशिगंधाची लागवड केली जाते. निशिगंधाच्या झाडाला २० ते २५ पाने फुटून आल्यानंतर त्यांच्या मध्यातून लांब फुलदांडा निघतो. फुलदांडा ५० ते १०० सेंटिमीटर उंचीचा असतो.या फुलदांड्यावर २५ ते ३० जोडफुले येतात व ती क्रमाक्रमाने खालून वर उमलत जातात. उमललेली फुले पांढऱ्या रंगाची आणि उत्यंत सुवासिक असतात. म्हणून या फुलांचा उपयोग प्रामुख्याने वेणी, गजरा,पुष्पहार, गुच्छ लग्नमंडपावरील सुशाभित आरास आणि मुकुटावर खोवाण्यासाठी केला जातो. लांब दांड्याची फुले फुलदाणीत पुष्परचना करण्यासाठी वापरतात. यामुळ निशिगंधाच्या फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. फुले वर्षभर येतात व त्यांना चांगला बाजारही मिळतो. असे असले तरी निशिगंधाची लागवड साधारणपणे मोठ्या शहरांच्या जवळपास, वाहतुकीच्या सोईने शहरांशी निशिगंधाच्या नुकत्याच उमललेल्या फुलांमध्ये दुर्मिळ असे उत्तम प्रतीचे सुवासिक तेल (अर्क) असते. ह्या तेलाचा उपयोग औषधव्यवासायात तसेच सुवासिक तेले, साबण, पावडर, स्नो, शॅम्पू यामध्ये केला जातो. निशिगंधाच्या तेलाचा दर्जा गुलाबाच्या अत्तरा इतकाच चांगला असतो, यामुळे काही शेतकरी निशिगंधाच्या लागवडीकडे आकर्षित होत आहेत.गुलछडी अथवा निशिगंधाची सोपी व सुटसुटीत लागवडीची पद्धत, वर्षभर मिळणारी फुले, त्यामुळे उपलब्ध होणारा रोजगार, बाजारातून बारमाही मागणी, सतत चांगला भाव, रोग व किडींचा कमी प्रादुर्भाव, औद्योगिक महत्त्व यामुळे या पिकाच्या लागवडीस भरपूर वाव आहे.क्षेत्र आणि उत्पादन :मेक्सिको हा देश निशिगंधाचेउगमस्थान असून मेक्सिकोमधून त्याचा प्रसार प्रथमयुरोपात इंग्लंड, हॉलंड, फ्रान्स, इटली आणि स्पेन या देशांत झाला. नंतर भारत, केनिया, मोरोक्को या देशात निशिगंधाची लागवड केली गेली. भारतात निशिगंधाची लागवड मुख्यत: पश्चिम बंगाल, कर्नाटक, महाराष्ट्रा, उत्तरप्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांत होते. भारतात निशिगंधाची लागवड सुमारे २०,००० हेक्टर क्षेत्रावर होते. महाराष्ट्रात ३,००० हेक्टर क्षेत्र या फुलपिकाखाली आहे. पुणे, अहमदनगर, नाशिक, सोलापूर, सांगली, ठाणे, औरंगाबाद या जिल्ह्यांत निशिगंधाची लागवड मोठ्या प्रमाणावर होते.निशिगंधाच्या मोहक आणि सुवासिक फुलांमुळे त्यांचा रोजच्या जीवनातील वापर वाढत असून या फुलांना बाजारात वर्षभर चांगली मागणी व भाव असतो. म्हणून या पिकाचे क्षेत्रही झपाट्याने वाढत आहे.महराष्ट्रात निशिगंधाच्या लागवडीखालील क्षेत्र खालीलप्रमाणे आहे.अ.क्र.जिल्हाक्षेत्र (हेक्टर)१.पुणे१,४००२.सांगली२००३.अहमदनगर१५०४.सातारा१५०५.सोलापूर१५०६.नाशिक१५०७.कोल्हापूर१००८.धुळे१००९.जळगाव१००१०.इतर५००हवामान आणि जमीन :निशिगंधाच्या पिकाला उष्ण आणि काही प्रमाणात दमट हवामान चांगले मानवते. अती उष्ण (४० डी. सेल्सिअसपेक्षा जास्त) किंवा अती थंड(१० डी . सेल्सिअसपेक्षा कमी) तापमान निशिगंधाच्या पिकास अपायकारक ठरते. यामुळे झाडांची वाढ खुंटते. झाड नीट वाढत नाहीत आणि फुले येण्याचे प्रमाण कमी होते. म्हणून साधारणपणे २५ ते ३० डी. सेल्सिअस तापमान आणि ५० ते ५५% आर्द्रताअसलेल्या भागात निशिगंधाची चाग्नाली वाढ होते आणि जास्त उत्पादन मिळते. अती थंड आणि धुके पडणाऱ्या ठिकाणी निशिगंधाच्या पिकाची वाढ नीट होत नाही. पिकाच्या चांगल्या जोमदार वाढीसाठी भरपूर स्वच्छ सुर्यप्रकाशाची आवश्यकता असते. अन्यथा झाडे नीट वाढत नाहीत आणि फुले चांगल्या प्रतीची मिळत नाहीत. थंडीची लाट अथवा अती उष्ण वारे या पिकाला सहन होत नाही. कडक उन्हात पाने गळणे , कळ्या सुकणे, फुले लवकर उमलणे असे प्रकार पिकावर होतात. महाराष्ट्रातील बहुतेक सर्वच ठिकाणचे हवामान निशिगंधाच्या पिकाला चांगले आहे.निशिगंधाचे पीक कोणत्याही प्रकारच्या जमिनीत चांगले येते. क्षारयुक्त जमिनीतही निशिगंधाचे पीक घेता येते. उथळ आणि हलक्या जमिनीत निशिगंधाचे फुलदांडे आणि फुले लहान राहतात आणि पिकाचा हंगामही थोड्याच दिवसात संपतो. भारी काळ्या जमिनीत मर आणि कुज रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. फुलांसाठी जांभ्या दगडाच्या वाळूमिश्रित आणि सामू ६.५ ते ७ असलेल्या जमिनीत निशिगंधाची लागवड करावी. जमीन पाण्याचा निचरा होणारी आणि भरपूर सेंद्रिय पदार्थ असलेली असावी.जाती :निशिगंधाच्या जातींचे फुलांच्या प्रकारानुसार सिंगल, डबल, सेमिडबल आणि व्हेरिगेटेड असे चार प्रकार पडतात.१) सिंगल :या प्रकारातील फुले पांढरीशुभ्र असून अत्यंत सुवासिक असतात. फुलांमध्ये फक्त ५ पाकळ्याअसून त्या आकर्षकरित्या एकाच वर्तुळाकार ओळीत असतात. या प्रकारची फुले हार, वेणी, गजरा ,माळा यासाठी विशेष योग्य असतात. परंतु काही वेळा गुच्छ आणि फुलदाणीत ठेवण्यासाठीही फुले वापरतात. उदाहरणार्थ मेक्सिकन सिंगल, कलकत्ता सिंगल.२) डबल :या प्रकारातील जातींचा फुलदांड भरपूर जाड असतो. फुलांमध्ये पाकळ्यांची संख्या १० पेक्षा ज्सात असते आणि पाकळ्या ३ - ४ घेरांमध्ये असतात. फुलांचा रंग फिकट पांढरा असतो. या प्रकारातील जातीच्या फुलदांड्यांना वास कमी असतो, मात्र दांडा भरपूर जाड असतो. या प्रकारातील जातींचे फुलदांडे फुलदाणीत ठेवण्यास आणि परदेशात पाठविण्यास योग्य असतात. उदाहरणार्थ कलकत्ता डबल,पर्ल, ड्वार्फ पर्ल, एक्सेलसियर.३) सेमिडबल :या प्रकारातील फुलात ५ पाकळ्यांची एकात एक दोन वर्तुळे असून १० पाकळ्या असतात. कळीच्या टोकाला गुलाबी छटा असते. कळी उमलताना पांढरीशुभ्र असते. फुलदाणीसाठी अथवा गुच्छ तयार करण्यासाठी या प्रकारातील जाती उपयुक्त आहेत.४) व्हेरिगेटेड :या प्रकारातील जातींची फुले सिंगल प्रकारासारखीच असतात. मात्र पानांवर पांढरट - पिवळे पट्टे असतात. रंगीत पानांमुळे झाड अधिक शोभिवंत दिसते. हा प्रकार कुंड्यांत अथवा बागेत रस्त्याच्या कडेला लावण्यासाठी जास्त प्रमाणात वापरतात.याशिवाय राष्ट्रीय बागवानी संशोधन संस्था, बंगलोरयांनी अनुक्रमे सिंगल प्रकारात श्रींगार तर डबल प्रकारात सुहासिनी या जातींची शिफारस केलेली आहे आणि त्यातील श्रींगार हा प्रकार दोन्ही उद्देशांसाठी म्हणजे सुटी फुले व लांब दांड्याच्या कटफ्लॉवर्ससाठी उत्तम असल्याचे पुणे केंद्रातील प्राथमिक चाचणीत आढळून आलेले आहे. तसेच राष्ट्रीय वनस्पती केंद्र, लखनौ यांनी सुवर्णरेखा व रजतरेखा अशा दोन जातींची शिफारस केलेली आहे. रंगीत गुलछडी अजून वनस्पती पैदासकरांना तयार करता आलेली नाही. परंतु कुत्रिमरंगांनी पिवळा, निळा, तांबडा अशी ती सजविता येते.अभिवृद्धी आणि लागवडीची पद्धत :निशिगंधाची अभिवृद्धी बियांपासून तसेच जमिनीत वाढणाऱ्या सुप्त कंदांपासून लागवड करतात. मात्र निशिगंधाची व्यापारी लागवड कंदांपासूनच केली जाते. निशिगंधाच्या लागवडीसाठी कंद निवडताना आधीच्या पिकाचे नीट निरीक्षण करणे आवश्यक असते. कारण या पिकातूनच फुलांचा हंगाम संपल्यानंतर बेण्याची निवड केली जाते. म्हणून ज्या पिकातून बेणे निवडायचे ते रोगमुक्त आणि चांगले उत्पादन देणारे असणे आवश्यक आहे. मूळ मातृकंदाभोवती लहान - मोठे बरेच कंद असतात. या सर्व समूहाचा उपयोग करून निशिगंधाची लागवड केली जाते. परंतु लहान - मोठ्या आकाराच्या कंदांमुळे येणारे पीक एकसारखे न वाढता कमी - अधिक प्रमाणात वाढते आणि उत्पादन कमी मिळते. शिवाय मर्यादित क्षेत्रच त्यामुळे लावता येते. हेटाळण्यासाठी समूहाने लागवड करण्यापेक्षा निवडक कंदाची लागवड करावी. यासाठी मूळ मातृकंदाभोवती असलेले सर्व लहान - मोठे कंद वेगवेगळे ठेवावेत. आधीच्या पिकातील निवडलेले क्षेत्र खोल खणून कंदसमूह सावलीत दोन आठवडे पसरवून ठेवावेत. नंतर त्यामधून सारख्या आकाराचे ५ ते ७ सेंटिमीटर व्यासाचे कंद लागवडीसाठी निवडावेत. अशा कंदाचे वजन साधारणपणे प्रत्येकी ३० ते ५० ग्रॅम असते. साधारणपणे उभट, त्रिकोणी कंद लागवडीसाठी निवडावेत. असे कंद वापरल्यास फुले लवकर मिळतात. फुलांचा दांडा लांब मिळून फुलांची सख्याही जास्त मिळते. ३० ग्रॅमपेक्षा कमी वजनाचे कंद वापरल्यास ५० ते ६० दिवसांत फुले येतात, तर २५ ग्रॅम किंवा त्यापेक्षा कमी वजनाचे कंद वापरल्यास फुले येण्यास २०० ते २५० दिवस लागतात. ५० ग्रॅमपेक्षा जास्त वजनाचे कंद वापरल्यास फक्त ४० दिवसांत फुलेयेतात. पर्यायाने त्यांची गुणवत्ता चांगली मिळत नाही. कंदांना काही काळ साठवणीची प्रक्रिया दिल्यास अथवा लागवडीपूर्वी जर्मिनेटरच्या द्रावणामध्ये बुडवून लागवड केल्यास त्यांच्या सुप्तावास्थेचा काळ कमी होतो व कंद लवकर उगवतात. त्यासाठी निवडलेले कंद १५ ते ३० मिनिटे जर्मिनेटरच्या द्रावणात बुडवून कंद सावलीत वाळवावेत आणि मग लागवडीसाठी वापरावेत. निशिगंधाची लागवड करण्यासाठी सरी - वरंबा अथवा सपाट वाफे पद्धतीने शेताची आखणी करून त्यात लागवडकरावी. जमीन जर हलकी, पाण्याचा चांगला निचरा होणारी असेल तर सपाट वाफे वापरावेत. जमीन मध्यम आणि पाण्याचा कमी निचरा होणारी असल्यास सरी - वरंबा पद्धत वापरावी.लागवड करण्यासाठी निवडलेल्या बागेतील जमीन उभी - आडवी खोल नांगरून कुळवाच्या दोन उभ्या - आडव्या पाळ्या घालून ती भुसभुशीत करावी. हेक्टरी ४० ते ५०टन चांगले कुजलेले शेणखत आणि २०० ते २५० किलो कल्पतरू सेंद्रिय खत मिसळावे. जमिनीच्या पोताप्रमाणे, उताराप्रमाणे भारी जमिनीसाठी सरी - वरंबे अथवा हलक्या जमिनीसाठी सपाट वाफे तयार करावेत. वाफे शक्यतो ३ मीटर लांब आणि २ मीटर रुंद आकाराचे करावेत.हंगाम आणि लागवडीचे अंतर :निशिगंध उष्ण कटिबंधातील बहुवर्षीय फुलझाड असून एकदा लागवड केल्यानंतर त्याच शेतात सतत तीन - चार वर्षे पीक ठेवता येते. काही ठिकाणी प्रत्येक वर्षी नवीन लागवड केली जाते. वर्षभर सतत फुले मिळविण्यासाठी निशिगंधाची जानेवारी - फेब्रुवारी, मे - जून आणि सप्टेंबर - ऑक्टोबर या महिन्यात लागवड करावी.निशिगंधाची सरी वरंब्यावर लागवड करताना ६० सेंटिमीटर अंतरावर सऱ्या काढून प्रत्येक वरंब्याच्या दोन्ही बाजूस ३० ते ४० सेंटिमीटर अंतरावर कंदांची लागवड करावी. सपाट वाफ्यात लागवडकरताना दोन ओळीत ३० ते ४० सेंटिमीटर आणि दोन कंदांमध्ये २० ते ३० सेंटिमीटर अंतर राखून करावी.लागवडीपूर्वी निवडलेल्या बेण्याला बुरशीनाशकाचीप्रक्रिया करून सपाट वाफ्यात २० ते ३० सेंटिमीटर अंतरावर प्रत्येक ठिकाणी एक चांगला कंद लावावा. कंद लावताना ५ ते ६ सेंटिमीटर खोल जमिनीत पुरावा. त्याचा निमुळता भाग वरच्या बाजूस राहील असे पहावेआणि त्याला मातीने झाकून टाकावे. लागवडीनंतर शेतास त्वरीत पाणी द्यावे. सरी - वरंबा पद्धतीमध्ये लागवड करावयाची झाल्यास ६० सेंटिमीटर अंतरावर सऱ्या काढून प्रत्येक फुटावर सरीच्या दोन्ही बाजूला एक - एक कंद लावावा.खते आणि पाणी व्यवस्थापन :निशिगंध हे कंदवर्गीय पीक असल्यामुळे खतांना चांगला प्रतिसाद देते. तसेच वेगवेगळ्या जमिनीत आणि हवामानात हे पीक वेगवेगळा प्रतिसाद देते. निशिगंधाच्या लागवडीसाठी जमिनीची पूर्वमशागत करताना एकरी २० ते २५ टन चांगले कुजलेले शेणखत आणि १०० किलो कल्पतरू सेंद्रिय खत मिसळावे. शेणखत उपलब्ध नसल्यास लागवडीसाठी निवडलेल्या जमिनीत प्रथम पावसाळ्यात तागासारखे हिरवळीचे पीक लावावे. ते पावसाळ्यात फुलण्यापूर्वी जमिनीत गाडावे आणि चांगले कुजल्यानंतर निशिगंधाची लागवड करावी.लागवडीनंतर लगेच पाणी द्यावे. दुसरे पाणी ५ ते ७ दिवसांनी द्यावे. त्यानंतर पावसाळ्यात पाऊस नसेल तर १० ते १२ दिवसांनी, हिवाळ्यात ८ ते १० दिवसांनी तर उन्हाळ्यात ५ ते ६ दिवसांनी, जमिनीच्या मगदुराप्रमाणे पाणी द्यावे. फुलांचे दांडे येण्यास सुरुवात झाल्यावर पाणी नियमित द्यावे. यावेळी पाण्याचा ताण पडल्यास पिकाच्या उत्पादनावर अनिष्ट परिणाम होतो.आंतरपिके :निशिगंध हे कमी अंतरावर लावले जाणारे फुलपीक असल्यामुळे निशिगंधाच्या पिकात आंतरपिके सर्वसाधारणपाने घेतली जात नाहीत. परंतु शहरी भागाजवळ फुलशेती असल्यास वाहतुकीची रोजची सोय असल्यास मेथी, कोथिंबीर, मुळा यांसारखी लवकर येणारी भाजीपाला पिके पाटाच्या कडेने अथवा सपाट वाफ्याच्या आतील कडेच्या बाजुने घेता येतात.महत्त्वाच्या किडी :१) नाकतोडे :नाकतोडे निशिगंधाची कोवळी पाने तसेच कोवळे फुलदांडेही खातात.२) पाने कुरतडणाऱ्या अळ्या :ह्या अळ्या रात्रीच्या वेळी निशिगंधाच्या कोवळ्या खोडावर आणि पानांवर राहून अन्नरस शोषण करतात. विशेषत: पानांच्या कडा कुरतडून त्यातील रस शोषून घेतात आणि त्यामुळे पाने कातरलेली दिसतात. ही अळी मुळांवरही आढळते. कंदाचा भाग खाऊन अळी कंदामधून बोगदे तयार करते.३) मावा :हे लहान, हिरव्या रंगाचे किडे फुलांच्या कोवळ्या पाकळ्यांवर, कळ्यांवर आणि शेंड्यावर राहतात आणि त्यातील अन्नरस शोषून घेतात.४) फुलकिडे :ही कीड पाने, फुलदांडा आणि फुलांवर राहून अन्नरस शोषून घेते. त्यामुळे झाड निस्तेज बनते.महत्त्वाचे रोग :१) खोडकुज :या रोगामुळे पानांवर तांबुस रंगाचे बुरशीचे ठिपके पडतात. पानांचा रंग फिकट हिरवा होतो. पानांवरील ठिपक्यांचा आकार वाढत जाऊन सर्व पानभर ठिपके पसरतात. काही दिवसांनी रोगट पाने गळून पडतात. हा बुरशीजन्य रोग पावसाळ्यात पाण्याचा योग्य निचरा न होणाऱ्या जमिनीत मोठ्या प्रमाणात आढळतो.उपाय :या रोगाच्या नियंत्रणासाठी रोगट झाडे उपटूननष्ट करावीत. रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून जमिनीतील पाण्याचा चांगला निचरा करावा. तसेच लागवड करण्यापूर्वी जर्मिनेटरची बीजप्रक्रिया व नंतर ड्रेंचिंग करावे. नवीन लागवड करताना रोगट झाडांचे कंद लागवडीसाठी वापरू नयेत.२) फुलदांडा सडणे :हा रोग जिवाणूंमुळे होतो. मुख्यत: कोवळ्या फुलांच्या कळ्यांवर या रोगाचा प्रादुर्भाव होतो. कळ्या कोरड्या होतात. त्यांच्यावर तपकिरी खोलगट खड्डे पडतात आणि निस्तेज होतात. कालांतराने कळ्या सुकतात. रोग कळ्यांच्या टोकाकडून देठाकडे पसरत जातो. फुलदांडे सुकतात.उपाय :वाळत जाणारे दांडे आणि झाडे काढून नष्ट करावीत. तसेच जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनर व न्युट्राटोन प्रत्येकी ३० मिलीची १० लि. पाण्यातून दाट फवारणी घ्यावी.३) कंदकुज :या बुरशीजन्य रोगामुळे कंद कुजतात, ज्या जमिनीत पाण्याचा चांगला निचरा होत नाही अशा जमिनीत या रोगाचे प्रमाण जास्त आढळते.उपाय :यारोगाच्या प्रतिबंधासाठी लागवडीपूर्वी कंद जर्मिनेटर व बुरशीनाशकाच्या द्रावणात १५ मिनिटे बुडवून नंतर सुकवून हे कंद लावावेत. पाण्याचा निचरा न होणाऱ्या जमिनीत कंदांची लागवड सरी - वरंब्यावर करावी. वाफ्यांमध्ये ०.६ % तीव्रतेच्या बोर्डो मिश्रणाच्या द्रावणाचे ड्रेंचिंग करावे.४) बंची टॉंप :या विषाणुजन्य रोगामुळे फुलांचा दांडा सारखा न वाढता चेंडूसारखा गोल होतो आणि त्याची लांबी नेहमीच्या लांबीच्या निम्मीच राहते.उपाय :यारोगाच्या नियंत्रणासाठी रोगट झाडे उपटून नष्ट करावीत. रोगाचा प्रसार फुलकिडी मार्फत होत असल्याने फुलकिडीचा योग्य प्रकारे बंदोबस्त करावा.वरील कीड, रोग तसेच विकृतीवर प्रतिबंधक व प्रभावी उपाय तसेच दर्जेदार उत्पादनासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या खालीलप्रमाणे फवारण्या कराव्यात.फवारणी :१) पहिली फवारणी : ( लागवडीनंतर १० ते १५ दिवसांनी ):जर्मिनेटर २५० मिली.+ थ्राईवर २५० मिली. + क्रॉंपशाईनर २५० मिली.+ प्रोटेक्टंट १०० ग्रॅम + प्रिझम १०० मिली. + हार्मोनी १५० मिली + १०० लि.पाणी.२) दुसरी फवारणी : (लागवडीनंतर २५ ते ३० दिवसांनी) :जर्मिनेटर ३५० मिली.+ थ्राईवर ५०० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० मिली. + प्रोटेक्टंट २५० ग्रॅम +प्रिझम २५० मिली. + न्युट्राटोन २५० मिली. + हार्मोनी २५० मिली + १५० लि.पाणी.३) तिसरी फवारणी : ( लागवडीनंतर ४० ते ४५ दिवसांनी ):थ्राईवर ७५० मिली. + क्रॉंपशाईनर ७५० मिली.+ राईपनर ५०० मिली. + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + न्युट्राटोन ५०० मिली. + हार्मोनी ३५० मिली + २०० लि.पाणी.४) चौथी फवारणी : ( लागवडीनंतर ५५ ते ६० दिवसांनी) :थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १ लि. + राईपनर ७५० मिली. + न्युट्राटोन ७५० मिली.+ हार्मोनी ५०० मिली + २५० लि. पाणी.पुढील फवारण्या आवश्यकतेनुसार दर १५ ते २० दिवसांच्या अंतराने आमच्या कृषी विज्ञान केंद्रावरील तज्ज्ञांना भेटून सल्ल्यानुसार कराव्यात.तणे आणि त्यांचे नियंत्रण :निशिगंध हे जमिनीलगतच वाढत असल्यामुळे त्याच्या वाढीचा वेग गवतासारखाचअसतो. लागवड केल्यापासून पहिल्या ३ ते ४ महिन्यांत वेळोवेळी तण काढून जमीन स्वच्छ व भुसभुशीत ठेवली तर मुख्य पिकाची वाढ जोमाने होते. काही दिवसांनी जमीन मुख्य पिकाने व्यापल्यानंतर तणांचा उपद्रव जास्त प्रमाणात होत नाही. पटाच्या पाण्याची शेती असेल तर किंवा वाऱ्याबरोबर शेतात दुसरीकडून काही तणांचे हलके बी येऊन पडल्यास पिकामध्ये तणांची वाढ दिसून येते. मुख्य पिकाचा काढणीचा बहर ओसरल्यानंतर त्याच्या आजूबाजूची पाने वाळल्यावर काही जमीन मोकळी मिळते. या मोकळ्या जमिनीत तणांचा उपद्रव वाढतो. अनेकदा हरळीआणि लव्हाळा या सारखी बहुवर्षायु तणेही मोठ्या प्रमाणावर निशिगंधाच्या पिकात आढळतात.निशिगंध हे बहुवर्षायु फुलपीक असल्यामुळे या पिकात मुख्य हंगाम संपल्यावर खोडवा म्हणजे दुबार अथवा तिबार पिके घेता येतात. यासाठी नवीन लागवड केलेल्या निशिगंधाच्या बागेतील फुलांची वेचणी झाल्यानंतर म्हणजेच एप्रिल महिन्यात बागेचे पाणीतोडून बागेला विश्रांती घ्यावी. ७ - ८ आठवड्यानंतरविश्रांतीनंतर हलकी खांदणी करून पुन्हा खते द्यावीत आणि बागेला पाणी देण्यास सुरुवात करावी. दुसऱ्या वर्षी फुलांचे उत्पादन १॥ ते २ पटीने जास्त येते. अशाप्रकारे ३ वर्षापर्यंत त्याचा शेतात पीक घेता येते. मात्र अशा खोडवा घेतलेल्या शेतात तणांचा योग्य बंदोबस्त करता येतो नाही. त्यामुळे हरळी आणि लव्हाळा या तणांचा उपद्रव वाढतो. हरळी आणि लव्हाळा निशिगंधाच्या शेतात आल्यास संपूर्ण बागच नष्ट होते. म्हणून सुरुवातीलाच लव्हाळा आणि हरळी मोठ्या प्रमाणात असलेले शेत निशिगंधाच्या लागवडीसाठी निवडू नये किंवा अशा शेतात निशिगंधाची लागवड करण्यापूर्वी अॅट्रॅझिन या तणनाशकाची ३ किलो दर हेक्टरी मात्रावापरून लागवडीपूर्वी जमिनीवर फवारावे. त्यामुळे उगवण होण्यापूर्वी किंवा उगवण झालेली सर्वच तणे नष्ट होतात. पांढरी फुली, घोळू, कुरडू अशी हंगामी तणे बागेत दिसल्यास लगेच निंदणी करून उपटून काढावीत.फुलांची काढणी, उत्पादन आणि विक्री :निशिगंधाच्या कंदांच्या लागवडीनंतर ६० ते ८० दिवसांत फुलांचे दांडे दिसू लागतात आणि एक आठवड्यात फुलदांड्यावरील सर्वांत खालची जोडी पूर्ण उमलते. यावेळी निशिगंधाच्या फुलदांड्याची काढणी करावी. या फुलदांड्याचा उपयोग फुलदाणीत सजावटीसाठी अथवा गुच्छ तयार करण्यासाठी करतात. फुलदांडे जमिनीपासून १० - १५ सेंटिमीटर उंचीवर धारदार चाकूने कापून लगेच पाण्यात बुडवून ठेवावेत. दांडा कापताना जमिनीलगत न कापता पानांच्या वरील बाजूस कापावा. पानांसह दांडा कापल्यास त्यामुळे कंदाच्या वाढीवर त्याचा अनिष्ट परिणाम होतो. सर्व फुलदांडे कापून बागेत झाडाखाली अथवा एखाद्या थंड खोलीत बादलीतच सहा तासठेवावेत. नंतर ९० - १०० सेंटिमीटर लांबीचे लांब दांडे, ८० ते ९० सेंटिमीटर लांबीचे मध्यम दांडे आणि ८० सेंटिमीटर लांबीचे लहान दांडे अशाप्रकारे फुलदांड्याची प्रतवारी करून एक डझनच्या जुड्या बांधाव्यात. वर्तमानत्राच्या कागदात वरच्या बाजूने गुंडाळून आणि वेताच्या लांब करंड्यातून अथवा खोक्यांत भरून लांबच्या बाजारपेठेत पाठवाव्यात. सर्वसाधारणपणे निशिगंधाचे दर हेक्टरी ७ ते ८ लाख फुलदांडे मिळतात.हार, वेणी, गजरा, यांसाठी सुटी पुर्ण वाढलेली फुले लागतात. अशी फुले, फुलदांडे यायला सुरुवात झाल्यानंतर १५ -२० दिवसांनी उमलू लागतात. यासाठी अशा फुलांची वेचणी दररोज करावी लागते. हार, वेण्यांसाठी पूर्ण उमललेली फुले वापरता येत नाहीत. म्हणून पूर्ण वाढ झालेल्या कळ्यांची तोडणीकरावी. ह्या कळ्या दांड्यावर जोडीने येतात. एका फुलदांड्यावर सर्वसाधारणपाने १६ -२० जोडकळ्या येतात. साधारणत: एका दांड्यावरील २ - ३ जोडकळ्या रोज काढणीस येतात. या जोडकळ्यांची रोज काढणी करावी. फुलदांड्याच्या टोकाकडे ३ - ४ जोडकळ्या अतिशय लहान असतात. त्या तशाच सोडून द्याव्यात. जोडकळ्या वेचताना फुलदांडी मोडणार नाही याची काळजी घ्यावी. त्याचप्रमाणे पूर्ण उमललेली फुले फुलदांड्यावर तशीच ठेवू नयेत. फुलदांड्यावरील कळ्यांची वेचणी पूर्ण झाल्यावर असे फुलदांडे कापून टाकावेत. यासाठी उद्देश लक्षात घेऊन योग्य अवस्थेतील फुले तोडून करंडीत अथवा कापडी पिशवीत भरावीत आणि बाजारात बिक्रीसाठी पाठवावीत. फुले करंड्यात भरण्यापूर्वी करंडीच्या तळाशी कडूनिंबाच्या पाल्याचा पातळ थर द्यावा आणि नंतर फुले अंथरावीत. करंडी बंद करून सुतळीने चांगली शिवून पाठवावी.वरील सर्व अवस्थांसाठी फुलांची काढणी शक्यतो सकाळी सुर्योदयापुर्वी करावी. लांब फुलदांड्यांसाठी ९ वाजेपर्यंत अथवा संध्याकाळी ५नंतर काढणी केली तरी चालते. हार, गजरा आणि वेणीसाठी शक्यतो सकाळी ५ - ६ पर्यंत फुलांची काढणीपूर्ण होणे आवश्यक आहे. सुट्या फुलांना भारतीय बाजारपेठेत नियमित मागणी असते. परंतु सर्व शेतकऱ्यांनी एकाच वेळी माल पाठविल्यामुळे बाजारभाव कमी मिळतो. सशक्त, लांब आणि फुलांची भरपूर संख्या असलेल्या फुलदांड्यांना मुंबई - पुणे बाजारात चांगला भाव मिळतो. अशा चांगल्या दांड्यांना विशेषत: 'डबल' निशिगंधास इंग्लंड आणि फ्रान्समध्ये भरपूर मागणी आहे.फुलांचे पॅकेजिंग आणि साठवण :सुटी फुले काढल्यानंतर ती १० ते १५ किलो वजनाच्या बांबूच्याअथवा वेताच्या टोपलीत भरून पाठवितात. बाजारासाठी फुले पाठविताना ट्रक, मोटारसायकल, सायकल इत्यादी साधनांचा उपयोग होतो. बाजारात फुलांची विक्री वजनावर होते. लांब दांड्याची फुले छोट्या - छोट्याजुड्यांच्या स्वरूपात बांधून बाजारपेठेत पाठवितात. त्यांचा भाव डझनावर ठरतो. लांब दांड्याची फुले जास्त काळ टिकविण्यासाठी क्रॉंपशाईनरचा वापर करावा. म्हणजे ती जास्त काळ टिकतात.परदेशी बाजारपेठेसाठी निशिगंधाच्या फुलांचे पॅकिंग करताना १०० फुलदांड्याचे एक अशी गोल बंडल्स बांधतात. बंडलच्या बुंध्याकडील भाग ओल्या वर्तमानपत्राच्या कागदात गुंडाळतात. कळ्यांना इजहोऊ नये, यासाठी फुलदांड्याचे पूर्ण बंडल नरम, पांढऱ्या टिश्यूपेपरमध्ये गुंडाळून हे फुलदांडे कार्डबोर्डे बॉक्समध्ये पॅक करून त्वरित विक्रीसाठी पाठवावे.कंदाची काढणी आणि साठवण :निशिगंधाच्या लागवडीनंतर तीन वर्षांनी वाफ्यातील सर्व जागा कंद आणि आजूबाजूस वाढलेल्या कंद पिल्लांनी व्यापली जाते. त्यानंतर पुन्हा खोडव्याचे पीक घेणे फायदेशीर होत नाही. म्हणून जास्तीत जास्त फुले काढून झाल्यानंतर बागेचे पाणी एक महिनाभर बंद करावे. सर्व जूनी पाने पिवळी पडून वाळू लागतातआणि जमिनीतील कंद चांगले पोसतात. नंतर खोलवर नांगरट करून अथवा टिकावाने खोल खणून कंद काढावेत. दोन आठवडे त्यांना चांगले सुकू द्यावे. त्या वेळेस कंदाच्या समूहाच्या आजूबाजूची माती वाळते आणि गळून पडते. असे कंद समूहनंतर थंड आणि कोरड्या सावलीच्या जागी पातळ थरात पसरून ठेवावेत. कंदावर बुरशी आणि किडींचा उपद्रव होऊ नये म्हणून गंधक भुकटी आणि ब्लॉयटॉंक्स यांचे एकत्रित मिश्रण धुरळून घ्यावे. या पद्धतीने ४ -५ महिन्यापर्यंत कंद चांगल्या स्थितीत टिकतात.
उत्तर लिहिले · 13/7/2017
कर्म · 4405
3
लिली हे एक महत्त्वाचे कंदवर्गीय फुलझाड आहे. हार,गुच्छ, तोरणे आणि मंडप सजावटीकरिता लिलीच्या फुलांना वर्षभर सतत मागणी असते. लिलीच्या विविध जाती आणि प्रकार असून त्यांचा उपयोग फुलांच्या वैशिष्ट्यानुसार हार, गुच्छ अथवा उद्यानाची शोभा वाढविण्याकरिता ताटवे लावून करतात. लिलीची फुले उत्तम प्रकारची कटफ्लॉवर्स म्हणून वापरली जातात. म्हणून च लिलीच्या लागवडीस भरपूर वाव असून पद्धतशीर लागवड केल्यास या पिकापासून भरपूर उत्पन्न मिळविता येते.महत्त्व :लिली हे अत्यंत सुंदर आणि डौलदार फुलझाड असून या फुलझाडाची लागवड उद्यानातील ताटव्यांमध्ये, इमारतीसमोरील प्रांगणात आणि लहान मोठ्या कुंड्यात केली जाते. लिलीच्या फुलांना फुलदाणीत ठेवण्याकरिता, हारतुरे तयार करण्यासाठी आणि तोरणे आणि मंडप सजावटीकरिता वर्षभर मागणी असते. विशेषत : सणासुदीच्या आणि लग्नसराईच्या दिवसांत लिलीच्या फुलांना चांगला बाजारभाव मिळतो. म्हणून शहराजवळच्या परिसरात लिलीची लागवड फायदेशीर ठरत आहे. चीनसारख्या देशात लिलीच्या काही प्रकारांचे कंद खाण्यासाठी वापरतात. लिलीच्या फुलांना मोठ्या शहरांतून असलेल्या मागणीचा विचार करता या फुलझाडाखालील क्षेत्र वाढविण्यास चांगलाच वाव आहे.क्षेत्र आणि उत्पादन :भारतामध्ये निलगिरी पर्वताच्या परिसरात लिलीचे उगमस्थान आहे. भारतामध्ये लिलीची लागवड प्राचीन काळापासून करण्यात येत आहे. बायबलमध्येही लिलीचा उल्लेख आढळतो. भारतामध्ये कर्नाटक, तमिळनाडू, पश्चिम बंगाल, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश हिमाचल प्रदेश, पंजाब, काश्मिर, महाराष्ट्र इत्यादी राज्यांत लिलीची लागवड केली जाते. महाराष्ट्रामध्ये ठाणे आणि पुणे या दोन जिल्ह्यांत लिलीची लागवड व्यापारी तत्त्वावर केली जाते.हवामान आणि जमीन :लिलीचे असंख्य प्रकार असून काही प्रकार कमी सूर्यप्रकाशात चांगले येतात तर काही प्रकार उष्ण - दमट हवामानात चांगले येतात. सरासरी १५ ते ३५ डी. सें. तापमानात लिलीच्या पिकाची चांगली वाढ होऊन भरपूर उत्पादन मिळते. दिर्ध काळ अतिकडक थंडी या पिकाला अपायकारक ठरते.लिलीच्या लागवडीसाठी सुपीक, काळी, भरपूर सेंद्रिय पदार्थ असलेली, पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन निवडावी. जमिनीचा सामू ६ ते ७ इतका असावा. जमिनीत पाणी साचून राहत असल्यास कंदांची कूज होऊन पिकाचेनुकसान होते.जाती :लिलीचे असंख्य प्रकार आणि जाती उपलब्ध आहेत.लिलीचे ३०० ते ४०० प्रकार असून त्यापैकी सुमारे १०० प्रकार व्यापारीदृष्ट्या महत्त्वाचे आहेत. लिलीचे अॅमरॅलिस (बेलाडोन लिली) आणि हिपॅस्ट्रम (ट्रंटेप लिली) हे दोन प्रकार खूपच प्रचलित आहेत. अमर लिली, स्पाईडर लिली, फायरबॉल लिली, क्रुपरँथम लिली, झिपरँथस लिली, डे लिली, फॉक्स टेल लिली, टायगरलिली, वॉटर लिली, प्लँटेन लिली हे प्रकार महाराष्ट्रात जास्त पसिद्ध आहेत.लिलीमध्ये संकरित जातींचीही सतत भर पडत आहे. ऑरेलियन हायब्रीड, बेलिंगम हायब्रीड, फिस्टा हायब्रीड, गोल्डन चॅलेस हायब्रीड, गोल्डन हारवेस्ट हायब्रीड , ग्रीन माउंटन हायब्रीड , ऑलिंपीक हायब्रीड, पेटेड लेडी हायब्रीड, शेलरोझ हायब्रीड आणि टेंपल हायब्रीड हे प्रमुख संकरित वाण प्रसिद्ध आहेत. लिलीच्या काही प्रचलित जाती आणि त्यांच्या फुलांचे रंग खाली दिले आहेत.लिलीच्या प्रचलित जाती आणि त्यांच्या फुलांचे रंगअ.क्र.जातफुलांचे रंग१)ब्लंक ड्रॅगानफुले तुतारीच्या आकाराची, मध्यावर सोनेरी तर पाकळ्या आतील बाजूस सफेद आणि बाहेरील बाजूस गडद लालसर.२)अॅप्रीकॉटग्लोनारिंगी रंगाची फुले३)ब्रँडीवाईनपिवळसर नारिंगी रंगाची फुले४)ब्रोकेडफिक्कट पिवळ्या रंगाची फुले५)डेस्टिनीलिंबासारख्या पिवळ्या रंगाची फुले६)हेलन कॅरॉलपिवळ्या रंगाची फुले७)लाईमलाईटतुतारीच्या आकाराची पिवळी फुले८)सनसेट ग्लोगुलाबी आणि मध्यभागी पिवळ्या रंगाची फुले९)रॉयल गोल्डपिवळ्या धमक रंगाची व मध्यावर लालसर रंगाची फुलेलिलीच्या अनेक जाती प्रचलित असल्या तरी महाराष्ट्रात खालील प्रकार जास्त प्रचलित आहेत.
१) अमर लिली :या प्रकाराला बेलाडोना लिली असेही नाव आहे. या प्रकारातील जाती उन्हामध्ये किंवा विरळ सावलीत वाढणाऱ्या आणि बहुवर्षायु आहेत. या प्रकारातील जाती रोग आणि किडींना जास्त प्रतिकारक आहेत. या प्रकारातील काही जाती कुंडीत लावण्यासाठी तर काही जाती जमिनीत लावण्यास योग्य आहेत. या प्रकारातील जातींना लांब दांड्यावर भोंग्याच्या आकाराची फुले येतात. अशी फुले फुलदाणीत ठेवण्यास योग्य असतात. फुले लाल, पिवळी, सफेद अशा विविध रंगांची असतात. स्नोव्हाईट लियो, ज्युपिटर, स्टार ऑफ इंडिया, ब्लॅक प्रिन्स आणि पिंक इंदोरा या प्रकारच्या जाती अमर लिली या प्रकारात येतात.
२) स्पाईडर लिली :लिलीच्या या प्रकारातील जाती अत्यंत कणखर आहेत. या प्रकारातील लिली बांधावर लावल्या तरी चांगली फुले येतात आणि कंद पुढील पावसळ्यापर्यंत जमिनीत तग धरून राहू शकतात. पांढऱ्या रंगाची फुले कळीच्या अवस्थेत तोडून हारासाठी आणि सजावटीसाठी मोठ्या प्रमाणावर वापरली जातात.
३) टायगरी लिली :या प्रकारातील लिलीला लांब दांड्यावर पिवळसर लालसर रंगाची फुले येतात. पाकळ्यांवर गर्द तपकिरी रंगाचे ठिपके असतात. या प्रकारातील फुले फुलदाणीत ठेवण्याकरिता योग्य असतात.
४) डे लिली :या प्रकारातील लिलीला लांब दांड्यावर पांढऱ्या, पिवळ्या आणि गुलाबी रंगांची फुले येतात. या प्रकारातील फुले फुलदाणीत ठेवण्याकरिता योग्य आहेत.५) झिपरँथस लिली :या प्रकारातील जाती बुटक्या असून जमिनीलागत वाढतात. या प्रकारातील दलदलीच्या जागी तग धरून राहतात. या प्रकारातील जाती इमारतीच्या सभोवती सुशोभनासाठी लावण्याकरिता योग्य आहेत. या प्रकारातील लिलीला पिवळ्या आणि फिकट गुलाबी रंगाची फुले येतात.
६) फायरबॉल लिली :नावाप्रमाणे लालभडक रंगाचा फुलांचा गोलाकार गेंद हिरव्या पानांवर अत्यंत आकर्षक दिसतो. कुंडीत अथवा जमिनीत लावून परिसर सुशोभनासाठी हा प्रकार उत्तम आहे.अभिवृद्धी आणि लागवड पद्धती :लिलीची अभिवृद्धी बियांपासून, पानाच्या बेचक्या तील कंद (बल्बिल) आणि जमिनीत वाढणाऱ्या लहानमोठ्या कंदांपासून करता येते. जमिनीतील मोठ्या कंदाभोवती लहान कंद (स्केल) वाढतात. या लहान कंदापासूनही लिलीची लागवड करता येते.लिलीच्या लागवडीसाठी कंद निवडताना खालील बाबी लक्षात घ्याव्यात :
१) कंद मोठ्या आकाराचे असावेत.
२) कंद निरोगी असावेत.
३) कंदाचा उभा व्यास ७.५ सेंटिमीटर तर आडवा ६ ते ९ सेंटिमीटर असावा. कंदाचा आकार जाती प्रमाणे निरनिराळा असू शकतो.
४) कंदाचे वजन ४० ते ५० ग्रॅम असावे.
5) कंद लागवडीपूर्वी किमान महिनाभर तरी सुकविलेले निवडावेत.६) हेक्टरी ४० ते ५० हजार कंद किंवा २ ते २.५ हजार किलो बेणे वापरावे.लागवडीसाठी मोठे कंद निवडल्यास त्यांना लवकर आणि मोठ्या आकाराची फुले येतात. सारख्या आकाराचे कंद लावल्यास जास्तीत - जास्त फुले थोड्या कालावधीत फुलतात. बियांपासून लिलीची अभिवृद्धी करण्यास जास्त वेळ लागतो, मात्र ही पद्धत सोपी आहे. हिवाळ्यात पॉलिथीन गृहात कुंडीत रोपे तयार करतात.उन्हाळ्यात उघड्या शेतात लिलीची बियांपासून रोपेतयार करता येतात. यासाठी गाडीवाफ्यावर बिया पेरूनत्यावर चाळलेल्या कंपोस्ट खताचा थर द्यावा. वाफ्यांना नियमित पाणी द्यावे आणि कंपोस्ट खताचा थर वाळणार नाही याची काळजी घ्यावी.हंगाम आणि लागवडीचे अंतर :लिलीची लागवड खरीप, रब्बी आणि उन्हाळी हंगामासाठी अनुक्रमे मे - जून, ऑक्टोबर - नोव्हेंबर आणि फेब्रुवारी - मार्च महिन्यांत करता येते.लागवडीपूर्वी १० लिटर पाण्यात ५० मिली जर्मिनेटर आणि ३० ग्रॅम प्रोटेक्टंट टाकून तयार केलेल्या द्रावणात कंद अर्धा तास भिजवून घ्यावेत.कुंडीमध्ये लिलीची लागवड करायची असल्यास पोयटा माती आणि शेणखत समप्रमाणात मिसळून कुंडीत भरावे आणि कंदाच्या आकारानुसार प्रत्येक कुंडीत १ ते २ कंद लावावेत.शेतात लागवड करताना जमीन नांगरून, कुळवून भुसभुशीत करून घ्यावी. ४५ ते ६० सेंटिमीटर अंतरावर सऱ्या काढाव्यात आणि सरीच्या बगलेत ३० ते५० सेंटिमीटर अंतरावर कंद लावावेत.खते आणि पाणी व्यवस्थापन :लागवडीपुर्वी एकरी ८ ते १० टन चांगले कुजलेले शेणखत आणि १०० किलो कल्पतरू सेंद्रिय खत द्यावे. नंतर दीड ते दोन महिन्यांनी ५० ते ७५ किलो कल्पतरू खत जमिनीच्या प्रकारानुसारखुरपणीनंतर द्यावे.पिकाला जरुरीपुरते परंतु नियमितपणे ७ ते ८ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. प्रमाणापेक्षा जास्त पाणी दिल्यास जमिनीतील कंद सडतात. म्हणून पिकाला पाणी देताना पिकामध्ये पाणी साचून राहणार नाही याची खबरदारी घ्यावी.महत्त्वाच्या किडी :लिलीच्या पिकाला मावा, फुलकिडे, पाने खाणाऱ्या अळ्या, खोड पोखरणाऱ्या अळ्या इत्यादी किडींपासून उपद्रव होतो.
१) मावा :ही कीड पाने, कोवळे शेंडे, फुलांचे देठ यावर राहून रस शोषून घेते. त्यामुळे पाने सुकतात, फुलांची प्रत खराब होते.
२) फुलकिडे : हे किडे लिलीच्या कंदातील रस शोषून घेतात, त्यामुळे कंदाच्या बाहेरील पाकळ्यांवर तांबूस रंगाचे खोलगट डाग पडतात. नंतर या बाहेरील पाकळ्या मऊ पडतात आणि गळून पडतात. अशा कीडग्रस्त कंदांची लागवड केल्यास झाडे खुरटी राहतात.
३) पाने खाणाऱ्या अळ्या :या अळ्या लिलीच्या झाडाची पाने कुरतडून खातात आणि पिकाचे नुकसान करतात.
४) खोड पोखारणारी अळी :या अळ्या लिलीच्या झाडाचे खोड पोखरून आत प्रवेश करतात आणि आतील भागावर उपजीविका करतात. झाडाचे खोड पोखरल्यामुळे पानांची वाढ होते नाही. फुले अतिशय कमी प्रमाणत येतात.रोग :
१ ) करडी भुरी (ग्रे मोल्ड) :या रोगाची लागण झाल्यास झाडांच्या पानांवर गोलाकार अथवा अंडाकृती पिवळ्या अथवा लालसर रंगाचे ठिपके दिसू लागतात आणि पाने सुकून वाळून जातात. उष्ण आणि ढगाळहवामानात या रोगाचा प्रसार झपाट्याने होतो.
२) कंदकूज :या बुरशीजन्य रोगाच्या प्रादुर्भावामुळेकंदावरील पाकळ्यांचा खालचा भागकुजतो व पाकळ्या गळतात. झाडाची खालची पाने पिवळी पडू लागतात. नंतर सुकून वाळतात.
३) मऊ कंदकूज (सॉफ्ट बल्ब रॉट) :हा रोग रायझोपस स्टोलोनिफर नावाच्या बुरशीमुळे होतो. ही बुरशी कंदावर झालेल्या जखमांमधून आत शिरते. बुरशीच्या प्रादुर्भावामुळे कंद लिबलिबीत होतात आणि सडतात कंदावर बुरशीची वाढ झालेली दिसून येते.
४) विषाणुजन्य रोग :मोझॅईक विषाणूची लागण झाल्यासलिलीचा झाडे खुरटी राहतात, झाडाची पाने वेडीवाकडी येतात. पानांचा रंग फिकट पिवळा अथवा फिकट हिरवा होतो. पाने गुंडाळली जातात. पाने अतिशय आखूड देठावर गुच्छासारखी येतात. अशा रोगट झाडांचे कंद चपटे आणि लहान राहतात. कंदांना भेगा पडतात.महत्त्वाच्या विकृती आणि त्यांचे नियंत्रण :
१) पाने करपणे :या विकृतीचे लिलीच्या पानांची टोके जळतात. नत्राची कमतरता आणि मँगनीज व अॅल्युमिनियम या अन्नद्रव्यांचे जास्त प्रमाण असलेल्या जमिनीता ही विकृती आढळून येते.उपाय :जमिनीत चुन्याचा (लाईम) पुरवठा केल्यास या विकृतीचे प्रमाण कमी होते
.२) कळी फुटणे :प्रामुख्याने पॉलिथीन - गृहात लागवडकेलेल्या पिकामध्ये लिलीच्या कळ्या फुटून सुकतात. कळीभोवतीच्या वातावरणात अतिशय कमी आर्द्रता, पाण्याची कमतरता, अन्नद्रव्यांची कमतरता यामुळे ही विकृती निर्माण होते.उपाय :पिकाला योग्य प्रमाणात अन्नद्रव्यांचा पुरवठा करावा. पाण्याचा ताण पडू देऊ नये.वरील किडी, रोगांचे तसेच विकृतीचे प्रतिबंधक व प्रभावी नियंत्रणासाठी तसेच जोमदार वाढ व दर्जेदार, अधिक उत्पादनासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या औषधांच्या खालीलप्रमाणे फवारण्या कराव्यात.फवारणी :
१) पहिली फवारणी : ( लागवडीनंतर २० ते ३० दिवसांनी ):जर्मिनेटर २५० मिली.+ थ्राईवर २५० मिली. + क्रॉंपशाईनर २५० मिली. + प्रिझम १०० मिली. + प्रोटेक्टंट १०० ग्रॅम + हार्मोनी १५० मिली. + १०० लि.पाणी.
२) दुसरी फवारणी : ( लागवडीनंतर ४० ते ५० दिवसांनी):जर्मिनेटर ३५० मिली.+ थ्राईवर ५०० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० मिली. + प्रोटेक्टंट २५० ग्रॅम +प्रिझम २५० मिली.+ न्युट्राटोन २५० मिली. + हार्मोनी २५० मिली. + १५० लि.पाणी.
३) तिसरी फवारणी : ( लागवडीनंतर ६० ते ७० दिवसांनी ):थ्राईवर ७५० मिली. + क्रॉंपशाईनर ७५० मिली.+ राईपनर ५०० मिली. + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + न्युट्राटोन ५०० मिली. + हार्मोनी ३५० मिली. + २००लि.पाणी.
४) चौथी फवारणी : ( लागवडीनंतर ९० ते १२० दिवसांनी ):थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १ लि.+ राईपनर ७५० मिली. + न्युट्राटोन ७५० मिली. + हार्मोनी ४०० मिली. + २५० लि.पाणी.वरील चौथ्या फवारणीप्रमाणे फुलांचे तोडे चालू झाल्यानंतर दर १५ ते २० दिवसांनी फवारणी करावी.तणांचे नियंत्रण :हरळी अथवा लव्हाळा यासारख्या बहुवर्षायु तणांच्या बंदोबस्तासाठी सुरूवातीलाचखोल नांगरट करून आणि तणांच्या काश्या अथवा गाठी वेचून जाळून टाकाव्यात. जमीन चांगली तापू द्यावी. पांढरी फुली, एकदांडी यांसारख्या तणांच्या नियंत्रणासाठी आवश्यकतेप्रमाणे खुरपणी करावी.फुलांची काढणी, उत्पादन आणि विक्री :लिलीची लागवड केल्यानंतर लागवडीसाठी निवडलेली जात, कंदांचा आकार आणि लागवडीचा हंगाम यानुसार ३.५ ते ४ महिन्यांनी लिलीची फुले उमलू लागतात. लिलीच्या काही प्रकारांत वर्षातील काही कालावधीतच फुले येतात. उदा. फायरबॉल लिलीची फुले मार्च ते मे या काळातच फुलतात. लिलीच्या फुलांची काढणी प्रमुख्याने हार आणि सजावटीसाठी तसेच फुलदाणीत ठेवण्यासाठी फुलांची कळी लांबट होऊन उमलण्याच्याअवस्थेत असताना फुले पूर्ण उमलण्यापूर्वी फुलांचे दांडे कापून फुलांची काढणी करतात. काही वेळा फुलातील परागकण फुलांवर पसरून फुलांचे सौंदर्य बिघडते. म्हणून फुलांचे परागकोश फुटण्यापूर्वीच ते काढून टाकले जातात. हारासाठी फुले काढली जातात तेव्हा हंगामामध्ये सर्वसाधारणपणे हेक्टरी ४.५ ते ५ लाख फुले मिळतात. तर फुलदाणीत ठेवण्याकरिता फुलांचे दांडे काढले जातात तेव्हा हेक्टरी एक लाख ते सव्वा लाख फुलांचे दांडे मिळतात.फुलांच्या कळ्या काढल्यानंतर बांबूच्या करंड्यांत सभोवती पाने अथवा गवत लावून मध्यभागी काळ्या ठेवतात. फुलांचे दांडे वर्तमानपत्राच्या कागदात गुंडाळून कागदी कार्डबोर्डा च्या खोक्यातभरून दूरच्या बाजारपेठेत पाठवितात.कंदांची काढणी आणि साठवण :लिलीच्या फुलांची काढणीकेल्यानंतर काही दिवसांनी झाडाची पाने पूर्णपणे सुकतात. या वेळी जमिनीतील कंद काढून घ्यावेत. कंदांची प्रतवारी करावी. नंतर कंदांना प्रोटेक्टंट पावडर किंवा बुरशीनाशक चोळावे आणि कंद हवेशीर जागेत थंड ठिकाणी ठेवावेत. शीतगृहात कंद २ ते ३ महिने साठवून ठेवता येतात.
उत्तर लिहिले · 13/7/2017
कर्म · 4405