
मोसाद
5
Answer link
मोसाद ही इस्रायलची गुप्तहेर यंत्रणा आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणातील शह-काटशह यांना पुरून उरणारी ही मूठभर देशाची चिमूटभर संस्था असली, तरी तिच्या कारवाया जगद्व्यापी आहेत. आजूबाजूला असलेली अरब शत्रुराष्ट्रे व इस्लामी दहशतवादी अशा अनंत अडचणी आणि प्रतिकूल परिस्थिती असूनही मोसादनेच आतापर्यंत आपल्या मातृभूमीला तारले आहे. मोसादच्या कारवायांनी मोठमोठ्या महासत्तांनाही हिसका दाखवला आहे.