Topic icon

सुरक्षा रोखे

10
सुरक्षा कवचाच्या श्रेण्या :

व्यक्तीच्या जीवाला असणाऱ्या धोक्याच्या अनुसार Security चार प्रमुख श्रेण्यांमध्ये विभागण्यात आली आहे.

X Security, Y Security, Z Security आणि Z+Security !

X Security श्रेणीमध्ये साध्या प्रकारची सुरक्षा प्रदान केली जाते. X Security मध्ये २ सुरक्षा अधिकारी आणि १ वैयक्तिक सुरक्षा अधिकारी सेवेत असतात.

Y Security श्रेणीमध्ये ११ सुरक्षा अधिकारी आणि ३ वैयक्तिक सुरक्षा अधिकारी संरक्षण प्रदान करतात.

वरील दोन्ही श्रेण्यांच्या मानाने Z Security बरीच मोठी असते. एक प्रकारचा सुरक्षा ताफाच असतो म्हणा ना ! Z Security श्रेणीमध्ये २२ सुरक्षा अधिकारी, एक एस्कोर्ट कार आणि दिल्ली पोलीस किंवा सीआरपीएफ कडून प्रदान केलेली अतिरिक्त सुरक्षा यांचा समावेश असतो.

Z+Security सर्वात उच्च दर्जाची आणि सर्वात सुरक्षित Security मानली जाते. Z+ Security श्रेणीमध्ये व्यक्तीला SPG अर्थात स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपचे (विशेष सुरक्षा गट) संरक्षण उपलब्ध करून दिले जाते. देशाचे विद्यमान पंतप्रधान आणि देशाचे माजी पंतप्रधान आणि त्यांचे कुटुंबीय, तसेच देशातील अतिशय महत्त्वाच्या व्यक्तींनाचं  Z+Security आणि SPG संरक्षण दिले जाते. Z+ Security श्रेणीमध्ये ३६ सुरक्षा अधिकाऱ्यांसह अत्याधुनिक उपकरणे आणि अत्याधुनिक शस्त्रांनी सज्ज असलेले अधिकारी देखील तैनात असतात.

या श्रेणीचे सेवा कवच ज्या व्यक्तीला मिळते तिला २४ तास वैयक्तिक सुरक्षा मिळते. सुरक्षा अधिकारी एक सेकंदही या व्यक्तीला नजरेआड होऊन देत नाहीत. या सुरक्षारक्षकांमध्ये २८ नॅशनल सिक्युरिटी गार्ड कमांडो, एक एस्कोर्ट, एक पायलट, कोब्रा कमांडो आणि १२ होम गार्डसचा समावेश असतो.

१९८४ मध्ये भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच एका सुरक्षा रक्षकाने गोळी झाडून हत्या केल्यानंतर पंतप्रधानांच्या वैयक्तिक सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. त्यावर उपाय म्हणून SPG अर्थात स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपची (विशेष सुरक्षा गट) स्थापना करण्यात आली.

एका अहवालानुसार SPG मध्ये सध्या ४००० अधिकारी सेवेत आहेत. आणि त्यांचा वार्षिक खर्च जवळपास ३०० करोडच्या वर असतो. मनुष्यबळानुसार खर्च केल्या जाणाऱ्या इतर सिक्युरिटी फोर्सचा विचार करता SPG ही अतिशय महागडी VIP guarding security force आहे.

Z+Security श्रेणीमध्ये माजी पंतप्रधानांसाठी एक अट आहे ती म्हणजे- Z+Security सोबत मिळणारे SPG सुरक्षा कवच हे पंतप्रधानांनी पद सोडल्यापासून पुढील एक वर्षचं त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सेवेत राहील. परंतु जर त्यांच्या जीवाला काही धोका असेल आणि तश्या धमक्या येत असतील तर मात्र SPG सुरक्षा कवच त्यांना वर्षभरानंतरही प्रदान करण्यात येईल.

सध्या भारतात केवळ सहाच व्यक्तींना SPG संरक्षण दिले जाते. त्या व्यक्ती आहेत- पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि त्यांच्या भगिनी प्रियांका गांधी वद्रा..!!

उत्तर लिहिले · 4/7/2017
कर्म · 0