Topic icon

प्रोसेसर

4
सध्या इंटेलचे १० वे जनरेशनचे CPU चालू आहेत. त्या मानाने ७ वे जनरेशन जुने आहे. तरी पण SSD मेमरी बरोबर ७वे जनरेशन चांगले चालते. मिळत असेल तर ८ जनरेशनला प्राधान्य द्या. जर पैसे फारच कमी असतील तर ७ जनरेशनचा CPU घ्यायला काही हरकत नाही.
उत्तर लिहिले · 26/10/2019
कर्म · 283320
6
5000 रुपयांत एकदम अद्ययावत CPU येणे अवघड आहे, तरीपण इंटेल चा i-3 CPU तुम्ही 5 हजाराच्या आसपास घेऊ शकता.
i-3 चा 9th जनरेशन CPU जर तुम्हाला 5 हजारात मिळत असेल तर तुम्ही त्याला प्राधान्य द्या. i-3 9th जनरेशन हा i-5 7th जनरेशन पेक्षा चांगला चालतो.
तसेच, तुमच्या मदरबोर्डवर नवीन CPU साठी सुविधा आहे की नाही हे तपासून मगच नवीन CPU घ्या.
उत्तर लिहिले · 24/10/2019
कर्म · 283320
5
मोबाइलमध्ये प्रोसेसर जसे महत्त्वाचे आहे, तसेच रॅमदेखील तेवढेच महत्त्वाचे आहे. संगणकात आणि मोबाइलमध्ये रॅम यांची प्रक्रिया सारखीच असते, मात्र त्यांची काम करण्याची प्रणाली मात्र वेगळी असते. रॅम जर काम करत नसेल तर मोबाइल बंद पडू शकतो. यासाठी मोबाइलमध्ये रॅमचे महत्त्व खूप आहे. आजच्या सदरात आपण रॅमचे महत्त्व तसेच अंतर्गत साठवणूक व बाह्य साठवणूक याचे महत्त्व जाणून घेऊ या....

रॅम म्हणजे काय?
रॅम म्हणजे ‘रॅँडम अ‍ॅक्सेस मेमरी’ होय.आपल्या फोनमधील एसडी कार्ड किंवा बाह्य एसडी कार्ड किंवा अंतर्गत साठवणूक प्रणालीपेक्षाही जलद गतीने काम करणारी ही प्रणाली आहे. रॅम म्हणजे माहिती आणि प्रोसेसर यांच्यातील दुवा म्हणता येईल. आपल्या मेंदूप्रमाणेच रॅम हा मोबाइलचा किंवा अगदी संगणकाचा मेंदू म्हणता येऊ शकेल. आपण मोबाइलमध्ये साठवू इच्छित असलेली माहिती किंवा मोबाइलमधील उपलब्ध माहिती शोधू इच्छित असू, तर जी प्रक्रिया करतो ती सर्व प्रक्रिया रॅमच्या माध्यमातून होत असते. आपल्या फोनमधील प्रोसेसर ज्या वेळेस एखादी माहिती मिळविण्याचा प्रयत्न करत असतो, त्या वेळेस जर ही माहिती रॅमच्या माध्यमातून उपलब्ध झाली तर लागणारी बॅटरीची ऊर्जा ही नियमित साठवणूक प्रणालीपेक्षा कमी लागते. यामुळे बॅटरी साठवणुकीच्या दृष्टीनेही रॅम उपयुक्त ठरते.

रॅम आणि अ‍ॅँड्रॉइड
जेव्हा आपण एखादे अ‍ॅप डाऊनलोड आणि इन्स्टॉल करत असतो तेव्हा हे प्रथम ते अ‍ॅप रॅममध्ये साठवले जाते आणि नंतर इन्स्टॉल होते. जे अ‍ॅप्स रॅममध्ये कायम राहतात आणि जे आपण वापरत नसतो ते अ‍ॅप्स काही वेळाने बॅकग्राऊंडला पाठविले जातात. जर आपण हे अ‍ॅप फोनमधून काढले नसतील आणि कधी तरी आपल्याला वापरायची गरज पडेल त्या वेळेस ते अ‍ॅप रॅमच्या माध्यमातून पुन्हा कार्यान्वित होतात. रॅम संगणकापेक्षा अँड्रॉइड फोनवर वेगळ्यापद्धतीने काम करत असते.

जेव्हा रॅमची क्षमता पूर्ण भरते
अ‍ॅँड्राइड फोन यूजर्सची एकच समस्या असते ती म्हणजे रॅमचा जास्त वापर होणे. पण अँड्रॉइड आॅपरेटिंग प्रणालीची रचनाच अशी आहे की ज्याचा जास्तीत जास्त वापर हा रॅमच्या माध्यमातून केला जातो. यामुळे तुम्हाला जास्त काळजी करायची गरज नाही किंवा एखादे अ‍ॅप वापरून झाल्यावर ते बंद केलेच पाहिजे असेही नाही. अँड्रॉइड आॅपरेटिंग प्रणाली ज्या वेळेस गरज भासेल त्या वेळेस स्वत:हून रॅम रिकामी करत असते. यामुळे रॅममध्ये जास्तीत जास्त जागा रिकामी व्हावी यासाठी सतत रॅम क्लिअर करत राहू नये.

रॅममध्ये अ‍ॅप्स राहिले तर बॅटरीवर परिणाम होतो का?
फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅप, ट्विटरसारखे अ‍ॅप्सचे नोटिफिकेशन्स येणे अपेक्षित असते ते अ‍ॅप्स आपली बॅटरी खर्च करत असतात. कारण हे अ‍ॅप सतत संबंधित सर्व्हरशी संपर्कात असतात. काही अ‍ॅप्स एकदा इन्स्टॉल केले की आपण ज्या वेळेस उघडू त्याच वेळेस काम करतात ते अ‍ॅप्स बॅटरीच्या कामकाजावर परिणाम करत नाहीत.  त्यातीलही काही अ‍ॅप्स छुप्या मार्गाने आपली बॅटरी खर्च करत असतात. जर तुम्हाला तुमचा बॅटरी बॅकअप सातत्याने कमी होतोय असे वाटत असेल तर अशा वेळी तुम्ही सेटिंग्जमध्ये जाऊन बॅटरी आॅप्शनचा पर्याय निवडा. जर तो पर्याय नसेल तर बॅटरी चेकर अ‍ॅप वापरून तुम्ही तुमची बॅटरी नेमकी कुठे खर्च होते हे तपासून पाहू शकता. जर त्यात काही अनावश्यक अ‍ॅप्स असतील तर ते तुम्ही बंद करू शकता.

रॅमची क्षमता वाढता येऊ शकते का?
मोबाइलची रॅम वाढविणे शक्य नसते. मात्र जास्त रॅम असलेले मोबाइल उपलब्ध आहेत. रॅमची क्षमता जेवढी जास्त तेवढी क्षमता तुमच्या फोनच्या कामकाजाची वाढते. जर तुम्हाला अगदीच उत्तम प्रकारचे फोनचे कामकाज चालवायचे असेल तर किमान दोन जीबी रॅम हवी. साधारणत: ५१२ एमबी रॅम असेल तर आपण २०० एमबीपर्यंतचे अ‍ॅप्स त्यामध्ये वापरू शकतो.

रॉम आणि एसडी कार्ड
मोबाइलमध्ये रॅमच्या जोडीला रॉमही कार्यरत असतो. रॉम म्हणजे 'रीड ओन्ली मेमरी' होय. रॉम हा मोबाइलमधील अंतर्गत साठवणूक क्षमतेचाच एक भाग होय. त्यात साठवलेली गोष्ट आपल्याला कधीच मोबाइलच्या बाहेर काढता येत नाही. उर्वरित अंतर्गत साठवणुकीमध्ये आपण आपले अ‍ॅप्स आणि मीडिया फाइल्स इत्यादी गोष्टी साठवून ठेवत असतो. यात साधारणत: फ्लॅश मेमरी वापरली जाते किंवा त्यांना तांत्रिक भाषेत 'इलेक्ट्रिकली इरेझेबल अँड प्रोग्रामेबल रीड ओन्ली मेमरी' (ईईपीआरओएम) असे म्हणतात. या प्रकारची मेमरी विशिष्ट ब्लॉक्समध्ये वाचली जाते किंवा त्याच ब्लॉक्समध्ये डिलिटही केली जाते.


साठवणुकीची अडचण
अँड्रॉइड आॅपरेटिंग प्रणालीमध्ये अंतर्गत साठवणुकीची अडचण गुगलहीदेखील अनेक वर्षे प्रयत्न करत आहे. मात्र दरवेळेस उभे राहणारे नवे आव्हान गुगलला या ध्येयापर्यंत पोहचण्यास आडकाठी निर्माण होत आहे. यामुळे अनेकदा अँड्रॉइड वापरकर्त्यांकडून माज्याकडे फोन स्टोअरेजमध्ये जागा आहे मात्र जागा उपलब्ध नाही असे दाखविले जाते अशा तक्रारी येत असतात. याचबरोबर अंतर्गत साठवणूक क्षमता असतानाही अ?ॅप्स डाऊनलोड न होण्याच्या अनेक तक्रारी सातत्याने येत असतात.

मात्र स्टोअरजेच्या या अडचणीची दखल नवीन अँड्रॉइडच्या आवृत्तीमध्ये घेण्यात आली असून, त्यावर आधारित नवीन मोबाइलमध्ये ही अडचण येणार नाही अशी अपेक्षा करण्यास हरकत नाही. ज्यांच्याकडे अँड्रॉइड किटकॅटपेक्षा खालच्या आॅपरेटिंग सिस्टीमचे फोन आहेत त्यांनी अंतर्गत साठवणुकीतील नको असलेले अ‍ॅप्स डिलिट करावे तसेच जे पूर्वअंतर्भूत अ‍ॅप्स आहेत त्यापैकी काही अ‍ॅप्स डिसेबल करून ठेवली तरी बºयापैकी जागा उपलब्ध होऊ शकते.
उत्तर लिहिले · 27/8/2019
कर्म · 3750
0

लॅपटॉपसाठी Intel Core i5 आणि AMD Ryzen 5 दोन्ही प्रोसेसर चांगले आहेत. कोणता प्रोसेसर तुमच्यासाठी उत्तम आहे, हे तुमच्या गरजा आणि बजेटवर अवलंबून असते.

Intel Core i5:

  • Intel Core i5 प्रोसेसर हे चांगले performance आणि energy efficiency साठी ओळखले जातात.
  • हे प्रोसेसर सामान्यतः AMD Ryzen 5 प्रोसेसरपेक्षा महाग असतात.
  • जर तुम्ही लॅपटॉप gaming आणि productivity साठी वापरणार असाल, तर Intel Core i5 प्रोसेसर चांगला पर्याय आहे.

AMD Ryzen 5:

  • AMD Ryzen 5 प्रोसेसर हे उत्तम performance आणि affordability साठी ओळखले जातात.
  • हे प्रोसेसर सामान्यतः Intel Core i5 प्रोसेसरपेक्षा स्वस्त असतात.
  • जर तुम्ही लॅपटॉप gaming आणि content creation साठी वापरणार असाल, तर AMD Ryzen 5 प्रोसेसर चांगला पर्याय आहे.

निवड करताना खालील गोष्टी विचारात घ्या:

  • तुमच्या गरजा काय आहेत?
  • तुमचे बजेट किती आहे?
  • तुम्ही लॅपटॉप कशासाठी वापरणार आहात?

तुम्ही तुमच्या गरजा आणि बजेटनुसार प्रोसेसर निवडू शकता.

अधिक माहितीसाठी तुम्ही खालील वेबसाइट्सला भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 5280
0
दिव्य (div) टॅग वापरून HTML मध्ये रूपांतरित केलेले उत्तर खालीलप्रमाणे आहे:

i5 5th जनरेशन (Generation) आणि i3 7th जनरेशन (Generation) प्रोसेसरची तुलना करणे काही गोष्टींवर अवलंबून असते, जसे की तुमचा उपयोग काय आहे.

i5 5th जनरेशन:

  • क्वाड-कोर प्रोसेसर (Quad-core processor) असल्याने मल्टीटास्किंग (Multitasking) आणि काही विशिष्ट कामांसाठी चांगला.

  • बेस क्लॉक स्पीड (Base clock speed) जास्त असू शकते.

i3 7th जनरेशन:

  • ड्युअल-कोर प्रोसेसर (Dual-core processor) आहे, परंतु काहीवेळा हायपर-थ्रेडिंग (Hyper-threading) मुळे चांगले कार्यप्रदर्शन देऊ शकते.

  • नवीन आर्किटेक्चर (Architecture) असल्यामुळे ऊर्जा कार्यक्षम (Energy efficient) असू शकते.

सर्वसाधारणपणे:

जर तुमचा उपयोग मल्टीटास्किंग, व्हिडिओ एडिटिंग (Video editing) किंवा तत्सम कामांसाठी असेल, तर i5 5th जनरेशन चांगला राहील. पण जर तुम्ही ऑफिस (Office) काम, वेब ब्राउझिंग (Web browsing) आणि कमी लोड (load) असणारे ऍप्लिकेशन्स (applications) वापरणार असाल, तर i3 7th जनरेशन ठीक आहे.

तुम्ही तुमच्या गरजेनुसार प्रोसेसर निवडू शकता.

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 5280
0

oppo A57 मध्ये MediaTek Helio G35 प्रोसेसर आहे आणि त्यामध्ये IMG GE8320 हा GPU (Graphics Processing Unit) आहे.

अधिक माहितीसाठी, तुम्ही oppo च्या वेबसाइटला भेट देऊ शकता: oppo A57.

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 5280
0
प्रोसेसर व रॅम हे दोन महत्त्वाचे घटक आहेत. प्रोसेसर व रॅम मोठे असतील तर स्पीड चांगले मिळते.
उत्तर लिहिले · 29/9/2018
कर्म · 9340