
शेती योजना
2
Answer link
बांबू लागवड करायच्या ठिकाणी उन्हाळ्यात 3 x 3 मीटर अंतरावर आखणी करून कंदांपासून लागवड करण्यासाठी 60 x 60 x 60 सें.मी आकाराचे खड्डे खोदून ठेवावेत. रोपांपासून लागवड करावयाची असल्यास 30 x 30 x 30 सें.मी. आकाराचे खड्डे खोदावेत. कंद लागवडीसाठी जर कंदाचा आकार मोठा असेल, तर त्यानुसार खड्ड्याचा आकार वाढवावा.
पावसाळ्याच्या सुरवातीस चांगली माती, शिफारशीत कीडनाशक भुकटी, 250 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेटही मातीमध्ये मिसळावे. अशा भरून घेतलेल्या खड्ड्यांमध्ये कंद, पॉलिथिन पिशवीत वाढलेली रोपे किंवा गादीवाफ्यावर वाढविलेली रोपे रोपांच्या मुळांना इजा होणार नाही, अशा तऱ्हेने मातीसह काढून लावावीत. बांबूस पाणथळ जमीन चालत नाही, त्यामुळे पावसाळ्यात खड्ड्यांत पाणी साठणार नाही याची काळजी घ्यावी.
बांबू रोपांची पावसाळ्यात लागवड झाल्यानंतर पहिल्या वर्षी डिसेंबर ते मे महिन्यात लागवडीस पाणी द्यावे. निंदणी व भर देण्याचे काम लागवडीपासून तीन वर्षांपर्यंत करावे. मोकाट जनावरे, वन्यप्राणी आणि आगीपासून संरक्षण करावे.
दर वर्षी पावसाळ्याच्या सुरवातीस प्रत्येक रोप/ कंदाला 100 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट व 25 ग्रॅम युरिया याप्रमाणे खते द्यावीत. त्यानंतर दोन महिन्यांनी हीच मात्रा पुन्हा द्यावी. बांबू खतांना चांगला प्रतिसाद देतात, असे आढळून आलेले आहे. कंदांपासून लागवड केल्यास चार ते पाच वर्षांपासून उत्पादनास सुरवात होते.
बांबूची लागवड जर रोपांपासून केली, तर सहा ते आठ वर्षांनी उत्पादन मिळण्यास सुरवात होते. कोंबातून बाहेर पडणारा बांबू पूर्णपणे वाढून बेटातील अगोदरच्या बांबूच्या आकाराएवढा झाला असेल, तर जुना बांबू जमिनीपासून 30 सें.मी. उंचीवर कापावा. पहिल्या कापणीपासून प्रत्येकी दोन वर्षांच्या कालावधीने पुढील बांबूच्या कापण्या कराव्यात. एक वर्षाचा कोवळा बांबू कापू नये. जितके नवीन कोंब आले असतील, तितकेच जुने बांबू तोडावेत. पक्व बांबू ठेवून नवीन बांबू तोडू नयेत.
अधिक माहितीसाठी संपर्क -
दूरध्वनी क्र. - 02426 - 243252
अखिल भारतीय समन्वित वनशेती संशोधन प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
तुम्ही सरकारी योजनॆबदिदल माहिती वरील नंबरवर विचारू शकता किंवा मला व्हॉटस् आप करा.
7038123808 वर.
धन्यवाद.
0
Answer link
होय, बांबू लागवडीसाठी सरकार विविध योजना अंतर्गत अनुदान देते. त्याबद्दलची माहिती खालीलप्रमाणे:
राष्ट्रीय बांबू मिशन (National Bamboo Mission):
- हे मिशन भारत सरकारद्वारे चालवले जाते.
- या मिशन अंतर्गत, बांबू लागवड, प्रक्रिया आणि मार्केटिंगसाठी शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य दिले जाते.
- अनुदान वेगवेगळ्या राज्यानुसार बदलते.
- अधिक माहितीसाठी, राष्ट्रीय बांबू मिशनच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या: nbm.nic.in
Krishi Vanikaran Yojana (कृषी वनीकरण योजना):
- ही योजना राज्य सरकारद्वारे चालवली जाते.
- यात शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात बांबूची लागवड करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते.
- या योजनेत, बांबू रोपे, खते आणि लागवड खर्चासाठी अनुदान दिले जाते.
- अधिक माहितीसाठी, आपल्या राज्याच्या कृषी विभागाच्या वेबसाइटला भेट द्या.
महाराष्ट्र बांबू विकास मंडळ (Maharashtra Bamboo Development Board):
- हे मंडळ महाराष्ट्र राज्यात बांबू लागवड आणि उद्योगाला प्रोत्साहन देते.
- मंडळ शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी प्रशिक्षण आणि मार्गदर्शन पुरवते.
- तसेच, काही योजना अंतर्गत अनुदान देखील दिले जाते.
- अधिक माहितीसाठी, महाराष्ट्र बांबू विकास मंडळाच्या वेबसाइटला भेट द्या: mahambdb.org
इतर माहिती:
- बांबू लागवडीसाठी अनुदान आणि योजनांची माहिती वेळोवेळी बदलू शकते. त्यामुळे, अर्ज करण्यापूर्वी संबंधित विभागाकडून खात्री करून घ्यावी.
- तुम्ही तुमच्या जिल्ह्यातील कृषी विभाग किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून अधिक माहिती मिळवू शकता.
टीप:Grant (अनुदान) बद्दलची माहिती शासनाच्या नियमानुसार वेळोवेळी बदलू शकते.