Topic icon

किसान क्रेडिट कार्ड

5
कोरोना व्हायरस (covid-19) मुळे देशातील शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे बँकांकडून शेतकऱ्यांना केसीसी किसान क्रेडिट कार्डची सुविधा पुरवली जात आहे. या कार्डची मदतीने शेतकरी आपल्या शेतीसाठी लागणारी अवजारे, खते, खाद्य घेऊ शकतो. इतकेच काय आता या कार्डमधील १० टक्के रक्कम शेतकरी आपल्या घरगुती खर्चासाठी वापरू शकतो. यासह सरकार विविध योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक साहाय्य करत आहे.

🇦 आरबीआय म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आपल्या अधिकृत संकेतस्थळावरून माहिती दिली आहे की, शेतकरी किसान क्रेडिट कार्डची १० रक्कम आपल्या घरगुती खर्चासाठी वापरू शकते. यासह कार्डधारक १.६० लाखाचे कर्ज घेऊ शकता. जे शेतकरी किसान योजनेचा लाभ घेत आहेत आणि ज्यांच्याकडे https://pmkisan.gov.in/ लिंक आहे ते किसान क्रेडिटसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=685312032035113&id=187866231779698


किंवा जो या योजनेचा लाभार्थी नाही तोही या संकेतस्थळावर जाऊन कार्ड घेऊ शकतो.
---------------------------------------
शेअरचॅट https://sharechat.com/post/AgRPXJa?referrer=copiedLink
---------------------------------------
या क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक होमपेज दिसेल. त्यावर केसीसी डाऊनलोड असा एक पर्याय असेल तो निवडावा लागेल. त्यानंतर विचारण्यात आलेली सर्व माहिती भरावी लागेल. या लिंक व्यतिरिक्त तुम्ही या संकेतस्थळावरुन https://pmkisan.gov.in/Documents/Kcc.pdf. अर्ज मिळवू  शकता.
*📣क्रेडिट कार्डच्या कर्जासाठी लागणारी कागदपत्रे :*
क्रेडिट कार्ड कर्जाचा अर्ज आपल्या स्वाक्षरीसह , आधारकार्ड, पॅनकार्ड,  मतदान कार्ड, आदी.  अर्जदाराचा राहण्याचा पत्ता, सातबारा उतारा किंवा शेत जमीन कसण्यासाठी घेतली असल्यास त्याचे प्रतिज्ञापत्र, पासपोर्ट साईज फोटो, कर्जासाठी तुम्ही थेट बँकेत जाऊ शकता. बँकेतील अधिकाऱ्यांकडून तुम्ही माहिती मिळवू शकता. त्याच्या आवश्यकतेनुसार तुम्हाला ते कागदपत्र सांगतील. ती कागदपत्रे आपण जमा करु दिल्यास बँक आपल्याला कर्जाची पुर्तता करेल.  स्टेट बँकेतून जर तुम्ही कार्ड घेत असाल तर तुम्ही ऑनलाईनही यासाठी अर्ज करु शकता. https://sbi.co.in/ या संकेतस्थळावर गेल्यास आपल्याला अर्ज मिळेल.
दरम्यान पीएम किसान योजनेतील शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड वाटण्याच्या सुचना केंद्राने दिल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांला तीन लाखपर्यंतचे कर्ज मिळू शकते. महाराष्ट्रात २० लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळू शकतो. मात्र केसीसी किसान क्रेडिट कार्ट वाटण्याकडे बँकांना दुर्लक्ष करत असल्याती तक्रारी येत आहेत. पीएम किसान योजनेत समावेश झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने किसान क्रेडिट कार्डचे वाटप करुन खरिपासाठी प्राधान्याने कर्जपुरवठा करावा अशा सुचना केंद्र शासनाने दिल्या आहेत. साधरण ६ कोटी शेतकऱ्य़ांकडेच केसीसी कार्ड आहे.    
         
0
तुम्ही दिलेला व्हिडिओ बघा. तुम्हाला केसीसी (KCC) किसान क्रेडिट कार्ड बद्दल संपूर्ण माहिती मिळेल.
https://youtu.be/tFdvPg7Q6Wg
उत्तर लिहिले · 27/2/2020
कर्म · 7245
0
किसान क्रेडिट कार्ड (KCC)

किसान क्रेडिट कार्ड (KCC) ही योजना शेतकऱ्यांना अल्प मुदतीसाठी कर्ज उपलब्ध करून देते. ह्या कर्जाचा उपयोग शेतीविषयक गरजा, जसे की बियाणे, खते, आणि कीटकनाशके खरेदी करण्यासाठी तसेच इतर खर्च भागवण्यासाठी केला जातो.

किसान क्रेडिट कार्डाची वैशिष्ट्ये:
  • हे कार्ड शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी लागणाऱ्या आवश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी कर्ज देते.
  • यामध्ये कर्जाची परतफेड करण्याची मुदत असते.
  • कार्डद्वारे घेतलेल्या कर्जावर व्याजदर लागू होतो, जो सामान्यतः इतर कर्जांपेक्षा कमी असतो.
किसान क्रेडिट कार्डासाठी पात्रता:
  • शेतकरी असणे आवश्यक आहे.
  • शेतजमीन नावावर असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त असावे.
आवश्यक कागदपत्रे:
  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • जमिनीचे कागदपत्र ( Land Record )
  • पासपोर्ट साइज फोटो
किसान क्रेडिट कार्डाच्या रकमेची परतफेड:
  1. मुदत: किसान क्रेडिट कार्डाद्वारे घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्याची मुदत बँकेनुसार बदलते. साधारणपणे, ही मुदत १२ महिने ते ५ वर्षांपर्यंत असू शकते.
  2. परतफेड करण्याची प्रक्रिया:
    • तुम्ही बँकेत जाऊन थेट पैसे भरू शकता.
    • ऑनलाईन बँकिंगद्वारे देखील तुम्ही कर्जाची रक्कम भरू शकता.
    • चेकद्वारे देखील परतफेड करता येते.
  3. व्याजदर आणि शुल्क: कर्जावर लागणारे व्याजदर आणि इतर शुल्क बँकेनुसार ठरतात. त्यामुळे, अर्ज करण्यापूर्वी बँकेकडून सर्व माहिती घेणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी:

तुम्ही तुमच्या जवळच्या बँकेत जाऊन किसान क्रेडिट कार्डाबद्दल अधिक माहिती मिळवू शकता.

Government Website: PM Kisan Samman Nidhi

टीप: ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी आहे. कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी बँकेकडून सविस्तर माहिती घेणे आवश्यक आहे.
उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 3480
1
शेतीवर कमी व्याजदरात कर्ज भेटेल आणि पिक विमा आणि बऱ्याच सुविधांचा लाभ घेता येईल.
उत्तर लिहिले · 25/10/2018
कर्म · 20
4
*👨‍🌾किसान क्रेडिट कार्ड म्हणजे काय? कसा करायचा अर्ज? त्याचे नेमके फायदे काय? चला बघू.💁‍♂️*

*🔰📶महा डिजी | विशेष माहिती*

         आत्मनिर्भर भारत योजनेविषयी माहिती देताना अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी किसान क्रेडिट कार्ड म्हणजेच केसीसीचा उल्लेख केला आणि शेतकरी वर्गात किसान क्रेडिट कार्डविषयीची चर्चा सुरू झाली.
         निर्मला सीतारमन यांनी म्हटलं, की "पीएम किसान योजनेचे 9 कोटी लाभार्थी आहेत आणि त्यापैकी अडीच कोटी शेतकऱ्यांकडे केसीसी नाहीये. आता आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना केसीसी आणि त्याद्वारे 2 लाख कोटी रुपयांचं कर्ज वाटप करणार आहोत."

         आता आपण किसान क्रेडिट कार्ड म्हणजे काय, ते कसं मिळवायचं आणि त्याचा उपयोग काय, याविषयीची सविस्तर माहिती आता आपण जाणून घेऊ.

____________________________________
*🤳🌐आत्ता तुम्ही मिळवू शकता तुमच्या व्हाट्सअप्प वर बातम्या,मनोरंजन,जॉब,माहिती-तंत्रज्ञान,सरकारी योजना,सण-उत्सव,आरोग्य,आहार विषयक लेख ते ही तुमच्या व्हाट्सअप्प वर अगदी विनामूल्य.*

_अपडेट्स मिळवण्यासाठी फॉर्म भरून पाठवा_
https://bit.ly/34kRwdy
_____________________________________
*📍किसान क्रेडिट कार्ड म्हणजे काय?🤔*
         किसान क्रेडिट कार्ड म्हणजेच केसीसी ही एक योजना आहे, जिचा उद्देश शेतकऱ्यांना शेतीसंबंधीच्या कामासाठी आर्थिक मदत करणं हा आहे. केसीसीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बी-बियाणे, खतं, कीटकनाशकं इ. शेतीच्या कामांसाठी कर्ज दिलं जातं.
         केसीसीसाठी सगळेच शेतकरी अर्ज करू शकतात. यामध्ये स्वत:च्या मालकीची जमीन असणारे, इतरांची जमीन भाडेतत्वावर करणाऱ्या शेतकऱ्यांचा समावेश होतो.
         याशिवाय 2018-19च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान पशुपालन (शेळीपालन, मेंढीपालन कुक्कुटपालन इ.) आणि मत्स्यपालन करणाऱ्या शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ देण्याचं निश्चित करण्यात आलं.

*📍KCC साठी अर्ज कसा करायचा?📄*
          फेब्रुवारी 2019मध्ये भारत सरकारनं एक परिपत्रक काढलं. त्यानुसार देशात 6.95 कोटी शेतकरी केसीसी वापरत असल्याचं सांगण्यात आलं. असं असलं तरी मोठ्या प्रमाणावर शेतकरी केसीसी आणि पर्यायी त्याद्वारे मिळणाऱ्या कृषी कर्जापासून वंचित राहत असल्याचं सरकारच्या निर्दशनास आलं.
        त्यामुळे मग अधिकाधिक शेतकऱ्यांना केसीसी उपलब्ध करून देण्याकरता सरकारनं फेब्रुवारी 2020मध्ये पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या सगळ्या लाभार्थ्यांचा केसीसी योजनेत समावेश करण्याची मोहीम हाती घेतली.
          या मोहिमेचा भाग म्हणून सरकारनं पीएम-किसान योजनेच्या वेबसाईटवरच किसान क्रेडिट कार्डसाठीचा अर्ज उपलब्ध करून दिला.
          हा अर्ज डाऊनलोड करण्यासाठी सर्वप्रथम गुगलवर PM Kisan असं टाईप केलं की तुमच्यासमोर पंतप्रधान किसान सन्मान निधीची वेबसाईट ओपन होईल. या वेबसाईटवर उजव्या कोपऱ्यात Download KCC Form हा पर्याय तुम्हाला दिसेल. त्यावर क्लिक केल्यास क्रेडिट कार्डसाठीचा अर्ज तुमच्यासमोर ओपन होईल.
इथे तुम्ही हा क्रेडिट किसान कार्डसाठीचा एक पानी अर्ज पाहू शकता.
          म्हणजेच पीएम-किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी कृषी कर्जासाठीचा अर्ज असं या अर्जाचं शीर्षक आहे.

*📍आता हा अर्ज कसा भरायचा त्याविषयीची माहिती पाहूया.💁‍♂️*

▪️सगळ्यात वरती टू ब्रँच मॅनेजर आहे, त्याखाली बँकेचं नाव आणि शाखेचं नाव टाकायचं आहे.

▪️त्यानंतर अर्जातील A या भागासमोर "फॉर ऑफिस यूझ" लिहिलं आहे. या भागातील माहिती बँक भरणार आहे. शेतकऱ्यांनी यात काहीही माहिती भरणं अपेक्षित नाही.

▪️B या भागात तुम्हाला कोणत्या प्रकारचं केसीसी हवं जसं की (नवीन केसीसी, जुनं केसीसी पण त्याची कर्ज मर्यादा वाढवायची आहे, काही कारणानं केसीसी बंद पडलं असेल, तर पुन्हा सुरू करणं) याची माहिती भरावयाची आहे. आणि त्याखाली किती रुपयांचं कर्ज हवं ते लिहायचं आहे.

▪️त्यानंतर C या भागात अर्जदाराचं नाव, पीएम-किसान सन्मान योजनेचे पैसे ज्या बँक खात्यात जमा होतात, तो खाते क्रमांक आणि जर का तुम्हाला प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा योजनेअंतर्गत इन्शुरन्स घ्यावयाचा असल्यास त्यासमोरच्या YES या पर्यायावर टिक करायचं आहे.

▪️पण, इथं एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे, ती म्हणजे तुम्ही YES म्हटलं, तर दरवर्षी प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजनेसाठी 12 रुपये आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा योजनेसाठी 330 रुपये म्हणजे एकूण 342 रुपये तुमच्या खात्यातून कापले जाणार आहेत. या दोन्ही योजनांसाठी तुम्हाला 2 लाख रुपयांचं विमा कवच मात्र मिळणार आहे.

▪️पुढे D या रकान्यात तुमच्या सध्या असलेल्या कर्जाची माहिती द्यायची आहे. यामध्ये कोणत्या बँकेकडून कर्ज घेतलं, शाखेचं नाव काय, कर्जाची किती रक्कम शिल्लक आहे आणि थकबाकी किती आहे, ते लिहायचं आहे.

▪️त्यानंतर E या रकान्यात जमिनीबद्दलची माहिती द्यायची आहे. यात गावाचं नाव, सर्वे किंवा गट क्रमांक, जमीन स्वत:च्या मालकीची आहे की भाडेतत्वानं करत आहात की सामायिक मालकीची आहे, तो पर्याय टिक करायचा आहे. पुढे तुमच्याकडे किती एकर शेतजमीन आहे आणि खरीप, रबी आणि इतर कोणती पीकं घेतली जातात, त्याबद्दल माहिती भरायची आहे.

▪️त्यानंतर F रकाना मत्स्यपालन आणि पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आहे. यात तुमच्याकडे एकूण दुध देणारे प्राणी, शेळ्या आणि मेंढ्या, डुकरं तसंच कोंबड्या किती आहेत, यांची माहिती सांगायची आहे.

▪️त्याखाली मत्स्यपालन यात इनलँड फिशरिज म्हणजे टँक, पाँड यात मच्छिलापन करता की मरिन फिशरिज समुद्रात जाऊन मासेमारी करता ते सांगायचं आहे.

▪️यानंतर सिक्युरिटी म्हणून काय मालमत्ता देणार, त्याची माहिती भरावयाची आहे. सगळ्यात शेवटी सही करायची आहे.

▪️त्यानंतर Acknowledgment हा भाग बँकेसाठी आहे. त्यात शेतकऱ्याला काही माहिती भरायची गरज नाही.

▪️हा अर्ज भरल्यानंतर शेतकऱ्यांनी त्याची प्रिंट आऊट घेऊन बँकेत घेऊन जायचा आहे. त्यासोबत सातबारा उतारा आणि 8-अ, दुसऱ्या बँकेतून कर्ज न घेतल्याचं शपथपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि तीन पासपोर्ट साईज फोटो ही कागदपत्रं घेऊन जावी लागणार आहेत.

▪️एकदा तुम्ही ही कागदपत्रं बँकेत जमा केली की, पुढच्या दोन आठवड्यात तुमच्या पत्त्यावर बँकेनं कार्ड पाठवायला हवं, असं सरकारनं स्पष्ट केलं आहे.

▪️केसीसी हे डायरेक्ट शेतकऱ्याच्या बचत खात्याशी लिंक केलेलं असतं. त्याची वैधता 5 वर्षं असली, तरी दरवर्षी ते 'रिन्यू' करणं गरजेचं आहे.

▪️किसान क्रेडिट कार्ड मिळवण्याची ही सगळी प्रक्रिया निशुल्क करण्यात आली आहे. 3 लाख रुपयांपर्यंतच्या कर्ज प्रक्रियेसाठी बँकांनी कोणतेही शुल्क आकारू नये, असे आदेश इंडियन बँक असोसिएशननं दिले आहेत.

         आता इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे वरील अर्ज फक्त पीएम-किसान सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आहे. पण, याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही पीएम किसान योजनेचे लाभार्थी नसाल तर तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड मिळणार नाही. तुम्हालाही किसान क्रेडिट कार्ड मिळेल.
         त्यासाठी तुम्ही बँकेत गेला आणि सांगितलं की, तुम्ही पीएम किसान योजनेचे लाभार्थी नाही आहात, पण तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड हवं आहे, तर तिथं तुम्हाला इंडियन बँक असोसिएशननं कृषी कर्जासाठी बनवलेला स्टँडर्ड फॉरमॅटमधील अर्ज दिला जाईल. तुम्ही तो फॉर्म भरून कागदपत्रांसहित बँकेत सबमिट करू शकता.
          हे झालं ऑफलाईन अर्ज करण्याच्या बाबतीत. पण, किसान क्रेडिट कार्डसाठी ऑनलाईन पद्धतीनंही अर्ज करता येतो.
          ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचा असल्यास ही फॅसिलिटी फक्त CSC (Common Service Centre) किंवा आपले सरकार सेवा केंद्रावर उपलब्ध आहे. वैयक्तिकरित्या शेतकरी किसान क्रेडिट कार्डसाठी ऑनलाईन अर्ज दाखल करू शकत नाही. त्यासाठी त्यांना CSC किंवा आपले सरकार सेवा केंद्रावरच जावं लागतं. तिथं जाऊन क्रेडिट कार्डसाठीचा फॉर्म भरावा लागतो. पण, हे करत असताना शेतकऱ्यांकडून एक ठरावीक शुल्क आकारलं जातं.

*💁‍♂️आता पाहूया किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत किती क्रेडिट लोन शेतकऱ्यांना दिलं जातं ते.📍*

*🧐कर्ज किती आणि उपयोग काय?*
         केसीसी अंतर्गत एखाद्या शेतकऱ्याला किती कर्ज द्यायचं, हे त्या शेतकऱ्याचं उत्पन्न किती आहे, त्याच्याकडे जमीन किती आहे आणि त्या जमिनीवर लागवडीखालील क्षेत्र किती आहे, यावरून ठरवलं जातं.
        केसीसी अंतर्गत शेतकऱ्याला 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज दिलं जातं. इथं एक गोष्ट लक्षात घ्यायची ती म्हणजे 1 लाख 60 हजार रुपयांपर्यंत विनातारण कर्ज दिलं जातं, तर त्यापेक्षा अधिक पण 3 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी तारण ठेवणं गरजेचं असतं.
          केसीसीवरून जे काही कर्ज दिलं जातं त्यावर 7 टक्के व्याजदर आकारला जातो. पण, शेतकरी कर्जाची परतफेड वर्षभरात करणार असेल, तर व्याजदरात 3 टक्के सवलत दिली जाते. म्हणजे एकूण 4 टक्के व्याजदारानं शेतकऱ्यांना कर्ज मिळतं. शेतमालाच्या विक्रीतून शेतकऱ्यांनी या कर्जाची परतफेड करणं अपेक्षित असतं.

*यात अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे 1 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज बिनव्याजी दिलं जातं.*

         याशिवाय, किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत लोन घेणाऱ्या शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाला किंवा अपंगत्व आलं, तर त्याला 50 हजार रुपयांचं विमा संरक्षण दिलं जातं, तसंच इतर धोक्यांसाठी 25 हजार रुपयांचं विमा संरक्षण दिलं जातं.

         मंडळी आता तुमचं काम ही महत्वाची बातमी आपल्या प्रत्येक शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवा. त्यांना समजून सांगा. आपल्याकडील बहुतेक शेतकऱ्यांना अश्या योजना माहीत नसतात. त्यामुळे ते कोणत्याही योजनेचा लाभ घेत नाहीत. आता तुम्ही त्यांना ही योजना समजावून सांगाल, त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवाल अशी आम्ही आशा करतो.
उत्तर लिहिले · 19/7/2020
कर्म · 569265
22

💳 *किसान क्रेडिट कार्ड*
________________________
💰 शेतकऱ्यांना कर्ज मिळवणं सोपं व्हावं यासाठी किसान क्रेडिट कार्ड ही उपयुक्त योजन शासनाने आणली आहे. शेतकरी बँकेकडून एटीएमप्रमाणे किसान क्रेडिट कार्ड मिळवू शकतात. घेतलेल्या कर्जाचे पैसे लागतील तसे शेतकऱ्यांना वापरता येतात.


शेतकऱ्यांना त्यांचे शेतीसाठीचे खर्च आवश्यकतेनुसार भागवता येणं, हा या योजनेमागचा मुख्य हेतू आहे. एटीएममधून जसे गरजेप्रमाणे पैसे काढू शकतो, तसे किसान क्रेडिट कार्डद्वारे पैसे काढून शेतकरी प्रत्येकवेळी कर्जासाठी प्रत्येक वेळी बँकेत जाण्याचा त्रास वाचवू शकतात.


💳 _*किसान क्रडिट कार्डसाठी पात्रता*_

शेतकऱ्यांना क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी जवळच्या बँकेत संपर्क साधणं गरजेचं आहे. कार्ड मिळवण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःची शेती असणं आवश्यक आहे.शिवाय शेतमजुर, संयुक्त शेती करणारे शेतकरी देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतात.


📝 _*असा करा अर्ज*_

शेतकरी किसान क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकांमध्ये अर्ज करु शकतात. सर्व राष्ट्रीयकृत बँकांमध्ये यासाठीचे अर्ज उपलब्ध आहेत. याशिवाय शेतकऱ्यांना क्रेडिट कार्ड वापरण्याच्या अटी आणि नियमही बँकेद्वारे सांगितले जातात. शेतकऱ्यांनी कार्ड घेण्यापूर्वी संबंधित बँकेला आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे आहे.

*किसान क्रेडिट कार्ड योजनेचा काय लाभ आहे*

☆पैशाच्‍या वाटपाच्‍या पध्‍दती सोप्‍या करते.
☆नगद आणि स्‍वरूपासंबंधी कठिणपणा काढून टाकते.
☆प्रत्‍येक पिकासाठी कर्जाकरीता अर्ज करण्‍याची गरज नाही.
☆शेतकऱ्यांसाठी व्‍याजाचा भार कमी करणे शक्‍यतो करीत कोणत्‍या ही वेळी खात्रीलायकपणे कर्ज मिळण्‍याची हमी
☆शेतकऱ्यांच्‍या सवडी आणि निवडीप्रमाणे बियाणे, उर्वरके खरेदी करण्‍यास मदत करते.
☆डीलर्स कडून कॅश अव्‍हेल डिस्‍काउंट (नगद लाभ सूट) वर खरेदी करण्‍यास मदत करते.
☆वर्षांपर्यंत कर्जाची सुविधा - हंगामी मूल्‍यांकनाची गरज नाही.
☆जास्‍तीत जास्‍त कर्जाची मर्यादा (सीमा) शेतीच्‍या उत्‍पन्नावर आधारित.
☆किती वेळा पैसे काढू शकता ती संख्‍या कर्ज सीमेवर अवलंबून.
☆परतफेड फक्‍त हंगामा नंतर शेतीसाठी घेतलेल्‍या आगावू रकमेवर व्‍याज दर लागू असल्‍याप्रमाणे.
☆जमीन, मार्जिन व दस्‍तऐवजांचे मानक शेतीसाठी घेतलेल्‍या आगावू रकमेवर लागू असल्‍याप्रमाणे.

_*💳किसान क्रेडिट कार्ड कसे मिळवावे*_

आपल्‍या नजीकच्‍या पब्लिक सेक्‍टर बँकेस भेट द्या आणि तपशील मिळवा
पात्र असलेल्‍या शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड आणि एक पासबुक मिळेल. त्‍यामध्‍ये नांव, पत्ता, जमिनीच्‍या मालकीचे (स्‍वामित्‍वाचे) विवरण, कर्ज घेण्‍याची सीमा, कायदेशीर मान्‍यता काळ, धारकाचा एक पासपोर्ट आकाराचा फोटो ज्‍याचा उपयोग ओळख पत्र आणि नेहमीच्‍या व्‍यवहाराची नोंद करण्‍याची सोय असे दोन्‍ही हेतू साध्‍य करण्‍यासाठी करण्‍यात येईल.हे पासबुकवजा कार्ड धारकाने दाखवावे जेव्‍हां ती/तो खात्‍याचे संचालन करील.

*भारतातील अग्रगण्‍य बँकांची किसान क्रेडिट कार्डस्*

*★अलाहाबाद बँक*– किसान क्रेडिट कार्ड (केसीसी)
*★आंध्रा बँक*– एबी किसान ग्रीन कार्ड
*★बँक ऑफ बडोदा*– बीकेसीसी (बीकेसीसी)
*★बँक ऑफ इंडिया*– किसान समाधान कार्ड
*★कॅनरा बँक*– केसीसी
*★कॉरपोरेशन बँक*– केसीसी
*★देना बँक*– किसान गोल्‍ड क्रेडिट कार्ड
*★ओरिएन्‍टल बँक ऑफ कॉमर्स*– ओरिएन्‍टल ग्रीन कार्ड (ओजीसी)
*★पंजाब नॅशनल बँक* – पीएनबी कृषि कार्ड
*★स्‍टेट बँक ऑफ हैदराबाद*– केसीसी 
*★स्‍टेट बँक ऑफ इंडिया*- केसीसी
*★सिंडिकेट बँक*– एसकेसीसी     
*★विजया बँक*– विजया किसान कार्ड
______________________

उत्तर लिहिले · 31/7/2018
कर्म · 569265