
सोशल मीडिया सुरक्षा
1. फेसबुकला रिपोर्ट करा:
- फेसबुकच्या हॅक्ड अकाउंट रिपोर्ट पेजवर जा.
- 'माझे अकाउंट compromised झाले आहे' (My Account Is Compromised) हा पर्याय निवडा.
- फेसबुक तुम्हाला अकाउंट रिकव्हर करण्यासाठी काही प्रश्न विचारेल आणि स्टेप्स देईल, त्या फॉलो करा.
2. पासवर्ड बदला:
- जर तुम्ही अकाउंटमध्ये लॉग इन करू शकत असाल, तर त्वरित तुमचा पासवर्ड बदला.
- एक मजबूत पासवर्ड तयार करा, ज्यात अक्षरे, अंक आणि चिन्हे असतील.
3. ईमेल आणि फोन नंबर सुरक्षित करा:
- तुमच्या फेसबुक अकाउंटशी जोडलेले ईमेल आणि फोन नंबर सुरक्षित असल्याची खात्री करा.
- त्यांचे पासवर्ड बदला आणि टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन (Two-Factor Authentication) सुरू करा.
4. मित्रांना आणि कुटुंबाला सूचना द्या:
- तुमच्या मित्रांना आणि कुटुंबाला सांगा की तुमचे अकाउंट हॅक झाले आहे. त्यामुळे हॅकर तुमच्या अकाउंटवरून कोणालाही चुकीचे मेसेज पाठवणार नाही.
5. संशयास्पद ऍक्टिव्हिटी तपासा:
- तुमच्या अकाउंटवर काही संशयास्पद ऍक्टिव्हिटी (activity) दिसत आहे का ते तपासा. जसे की नpost केलेले पोस्ट किंवा मेसेज.
6. सायबर क्राइम पोलिसांकडे तक्रार करा:
- तुम्ही सायबर क्राइम पोर्टलवर ऑनलाइन तक्रार दाखल करू शकता.
टीप:
- कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका.
- आपला पासवर्ड कोणालाही देऊ नका.
- वेळोवेळी आपला पासवर्ड बदलत राहा.
*_🚫हे मेसेज आहेत धोकादायक; चुकूनही करू नका क्लिक_*
_WhatsApp हे संवाद साधण्याचं लोकप्रिय माध्यम आहे. मात्र WhatsApp च्या माध्यमातून अनेकांना गंडा घातल्याच्या काही घटना समोर आल्या आहेत. WhatsApp वर दिवसाला अनेक मेसेज येत असतात. पण त्यातील काही धोकादायक मेसेजवर क्लिक केल्यास फसवणूक होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशाच काही वायरल मेसेजबाबत जाणून घेऊया._
◾अॅमेझॉनच्या बिग बिलियन सेल ऑफरच्या नावाने एक स्पॅम मेसेज जोरदार व्हायरल होतो. यामध्ये एक लिंक देण्यात आलेली असते. त्यावर क्लिक केल्यास भेटवस्तू मिळतील असं ग्राहकांना सांगितलं जातं. मात्र असा मेसेज आल्यास लिंकवर क्लिक न करता डिलीट करा.
*❌'भाई सून जल्दी से ऑर्डर कर' हा फसवा मेसेज फॉरवर्ड करू नका*
---------------------------------------
⚡सध्या अमेझॉनची फेक वेबसाईट बनवून 99% डिस्काउंट अशी ऑफर देऊन लोकांची माहिती चोरली जात आहे.
❌ कृपया ''भाई सून जल्दी से ऑर्डर कर'' हा मेसेज आल्यानंतर तो फॉरवर्ड करू नका.
👉 अमेझॉनची एक फेक लिंक सध्या व्हाट्सअपवर धुमाकूळ घालत आहे या लिंकवर क्लिक केल्यानंतर आपली माहिती विचारून आपल्याला त्यांची लिंक पुन्हा 10 जणांना फॉरवर्ड करण्यास सांगितले जाते आणि मग आपल्यासह अनेकांची माहिती चोरली जात आहे.
🚫 कृपया कोणीही अशाप्रकारे आपली माहिती शेयर करू नका व दुसऱ्यांनाही याबाबत साक्षर करा
*अमेझॉनची खरी वेबसाईट*
👉 https://www.amazon.in
_📍कृपया हा मेसेज सर्व मित्र, ग्रुप्सवर, आपल्या नातेवाईकांना पाठवून त्यांची माहिती चोरीला जाण्यापासून वाचवा..._
◾WhatsApp वर अनेक लोकांना पिझ्झा हटच्या नावाने फेक मेसेज येत असतात. त्यामधील लिंकवर क्लिक केल्यास मोफत पिझ्झा मिळेल असं सांगितलं जातं. मात्र अशाप्रकारे अनेकांना पिझ्झाच्या नावाने फसवण्यात आले आहे.
◾WhatsApp एक निशुल्क मेसेजिंग अॅप आहे. त्यामुळेच हे अॅप कोणताही सर्विस चार्ज घेत नाही. मात्र जर तुम्हाला WhatsApp च्या काही सेवांसाठी पैसे भरण्याचा मेसेज आला तर तो एक फेक मेसेज आहे हे लक्षात ठेवा.
◾अॅमेझॉनप्रमाणे फ्लिपकार्टवर असलेल्या सेलच्या नावानेही अनेक मेसेज हे येत असतात. मात्र मेसेजमधील लिंकवर क्लिक केल्यास वैयक्तिक डेटा चोरीला जाण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे अशा लिंक क्लिक करू नका.
◾अॅपलच्या नावाने WhatsApp वर अनेक मेसेज जोरदार व्हायरल होत असतात. त्यामध्ये ऑफर्सअंतर्गत 999 रुपयांमध्ये आयफोन दिले जाईल असे सांगितले जाते. मात्र अॅपल कंपनी अशी कोणतीही ऑफर देत नाही त्यामुळे असा मेसेज आल्यास सावध व्हा.
◾WhatsApp सारख्या दिसणाऱ्या थर्ड पार्टी अॅपच्या जाळ्यात अजिबात फसू नका. अशा प्रकारचे फेक अॅप डाऊनलोड केल्यास तुमची सुरक्षितता धोक्यात येऊ शकते. नेहमी प्ले स्टोर अथवा अॅप स्टोरवरून अधिकृत अॅप इन्स्टॉल करा.
◾adidas हा एक लोकप्रिय ब्रँड आहे. 3,000 शूज कंपनी मोफत देत असल्याचा एक मेसेज व्हायरल होत आहे. मात्र कंपनीने अशी कोणतीही ऑफर दिलेली नाही त्यामुळे अशा मेसेजवर विश्वास ठेऊ नका.
◾adidas प्रमाणे ZARA हा ब्रँडही खूपच प्रसिद्ध आहे. त्यामुळेच ZARA च्या फ्री वाउचर्सच्या नावाने स्पॅम मेसेज व्हायरल होत आहे. यामध्ये ग्राहकांकडे डेटा मागितला जातो. त्यानंतर फसवले जाण्याचा धोका असतो. त्यामुळे या मेसेजपासून सावध राहा.
*_❗अॅमेझॉन प्राइम किंवा प्रीमियम सर्विसप्रमाणे WhatsApp वर गोल्ड नावाची सर्विस अपग्रेड करण्याचा एक मेसेज येतो. मात्र WhatsApp Gold नावाची कोणतीही सेवा नाही. त्यामुळे अशा मेसेज आल्यास त्याकडे दुर्लक्ष करून तो मेसेज डिलीट करा._*
..............................................
😱 *व्हॉट्सअॅपवर व्हायरल होत असलेला ‘तो’ मेसेज फेक*
📵 *कृपया शेतकरी कर्जमाफीची लिंक वॉट्सअप्प टाकू नका*
◼ शेतकरी कर्जमाफीची लिंक वॉट्सअप्प वर फिरत आहे त्यामध्ये कोणीही आपली माहीती किंवा आधार कार्ड नंबर,राशन कार्ड नंबर, खाते नंबर कोणीही टाकू नये किंवा भरू नये
◼ हि माहिती चोरीला जाते हे लक्षात घ्या व कोणीही तश्या प्रकारची लिंक पुढे पाठवू नका
🙋♂ *जनजागृती करा हि माहिती इतर ग्रुप मध्ये पाठवा*
___________________________________
👤व्हॉट्सअॅप प्रोफाईलवर असलेला तुमचा डीपी इसिस हॅक करत असल्याचा मेसेज सध्या व्हायरल होतोय. मात्र हा मेसेज फेक असल्याचा समोर येतेय. त्यामुळे अशा प्रकारचा मेसेज पुढे पाठवू नका असे आवाहन करत आहोत.
👀व्हॉट्सअॅपवर तुम्ही तुमचा फोटो ठेवला असल्यास तो तात्काळ बदला. कारण इसिस तुमचा फोटो हॅक करून दहशतवादी कारवायांसाठी गैरवापर करीत आहे. या मेसेजखाली A. K Mittal (IPS) असेही लिहिलेय. असा मेसेज सध्या व्हॉट्सअॅपवर व्हायरल होतोय.
💁♂दिल्लीत आतापर्यंत ए. के. मित्तल नावाचे पोलीस आयुक्त राहिलेले नाहीत. तसेच व्हॉट्सअॅपच्या सीईओकडूनही यासंदर्भात कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे हा मेसेज निव्वळ एक अफवा असल्याचे समोर येतेय.
_____________________________________
*_👌फेक बातम्या ओळखण्यासाठी या ७ टिप्स पाहून घ्या !!_*
_सध्याचं वातावरण हे फेक गोष्टी व्हायरल होण्यासाठी अगदी अनुकूल वातावरण आहे. सोशल मिडीयावर हे अगदी ठळक दिसतं. २६ तारखेचीच गोष्ट घ्या ना. भारताने केलेल्या एअरस्ट्राईकचा व्हिडीओ म्हणून इराण-इराकच्या युद्धातले फुटेजेस व्हायरल झाले होते. आपल्या भारतीय जनतेने ते फुटेजेस शेअर केले, एवढंच काय आपल्या स्टेटसवरही ठेवले होते. खरं तर एअरस्ट्राईकचा अधिकृत व्हिडीओ अजून प्रसिद्ध झालेला नाही. हे तर झालं एक उदाहरण, सध्या बातमी, माहिती, व्हिडीओ, फोटो अशा हर तऱ्हेने फेक गोष्टी व्हायरल होत आहेत. अशा गोष्टी आपण पसरवू नये ही एक नागरिक म्हणून आपली जबाबदारी आहे._
*_◼प्रश्न विचारा_*
माथी भडकवणारा कोणताही मेसेज जेव्हा तुम्हाला येतो तेव्हा त्याच्यावर लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी प्रश्न विचारा. हा मेसेज खरा आहे का ? तो अधिकृत आहे का ? जर शंका असेल तर शेअर करू नका. गोष्टी पडताळून पाहा.
*_◼Forwarded लेबल लक्षात घ्या._*
हल्ली whatsapp वर फॉरवर्ड मेसेजवर Forwarded लिहून येतं. Forwarded लेबल असलेला मेसेज पडताळून पाहा.
*_◼फेक लिंकपासून दूर राहा_*
बऱ्याचदा आपल्याला एक लिंक पाठवली जाते आणि लिंकवर जाऊन माहिती किंवा अमुक तमुक पाहा असं सांगितलं जातं. लिंक मधली माहिती खरी की खोटी हे तपासायचं असेल तर स्पेलिंगकडे पाहा. अशा लिंक मध्ये बऱ्याचदा स्पेलिंगच्या बालिश चुका असतात.काही वर्षापासून अमेझॉनची एक लिंक फिरत आहे ज्यावर १ रुपयात शॉपिंग करता येते. अशा लिंक पासून लांबच राहा.
*_◼व्हायरल फोटो व्हिडीओवर लगेच विश्वास ठेवू नका_*
सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे सध्या इराक-इराणच्या युद्धातील फुटेज व्हायरल होत आहेत. सोबतच जुने फोटो पण व्हायरल होत आहेत. काही वेळा तर फोटो एक आणि बातमी भलतीच असाही प्रकार असतो. तुम्हाला जर अशा गोष्टी फॉरवर्ड होऊन आल्या तर त्यांची फेरतपासणी नक्की करा.चुकीच्या फोटोंमुळे बरेचदा दंगली झाल्या आहेत, फक्त आलं म्हणून फॉरवर्ड करण्यापेक्षा कोणत्याही न्यूजपेपरच्या साईटवर जाऊन ते खरं आहे का तपासा आणि मगच पुढे पाठवा.
*_◼फेक मेसेज_*
फेक लिंकच्या बाबतीत जशी स्पेलिंगची बोंब असते तसंच मेसेजच्या बाबतीतही असतं. इंग्रजी आणि मराठी कोणतीही भाषा घ्या फेक बातमीत अनेक चुका आढळतात. आम्ही तर असा सल्ला देतो की ज्या मेसेजच्या शेवटी ‘माहिती आवडली तर शेअर करा’ किंवा ‘माहिती पुढे पाठवा’ अशा पद्धतीचा मजकूर असतो ती माहिती नक्कीच पडताळून बघितली पाहिजे.
*_◼माहिती अविश्वसनीय वाटत असेल तर....._*
एखादी बातमी अगदीच अविश्वसनीय वाटत असेल तर ती आधी तपासून पहिली पाहिजे. बऱ्याचदा अशा गोष्ट खोट्या असतात.
*_◼पडताळून कसं पाहाल ?_*
बातमी खरी की खोटी हे पाहण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी ती आली आहे का हे तपासून पाहणे गरजेचे आहे. फोटो खरा की खोटा हे पाहण्यासाठी गुगलवर इमेज सर्चचं ऑप्शन असतं. त्या फोटो बद्दल बरीच माहिती उकरून काढता येते.
*_📍फेक न्यूज पसरवू नका आणि त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. याला पण देशासाठी एक योगदानच म्हणता येईल !!_*
____________________________________
📣 _*सोशल मीडियावर 'या' गोष्टींपासून दूर राहा!*_
_हल्ली काही ‘मत’सम्राटांना वाटू लागले की आपण कोणत्याही मुद्द्यावर काहीही लिहू शकतो आणि आपल्याला वाटेल त्यावर टीका-टिप्पणी करु शकतो, असा गैरसमज निर्माण झाला आहे. जेव्हा आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार प्राप्त होतो, त्याचवेळी एकप्रकारची जबाबदारीही आपल्यावर असते. ती म्हणजे कुणाच्या भावना न दुखावून मत मांडण्याची. मात्र अभिव्यक्ती स्वातंत्र्यांच्या नावाखाली वादाग्रस्त विधानं, टीका, मतं मांडली जातात. अशा ‘मत’बहाद्दरांनी खालील काही गोष्टी वाचल्याच पाहिजेत..._
_1._ _*प्रक्षोभक लेखन*_ : _कुणी जर सोशल मीडियाच्या माध्यमातून कुणाच्याही विरोधात अश्लिल भाषेचा, शब्दांचा वापर करत असेल तर त्याच्याविरोधात आयपीसी 294 अन्वये कारवाई होऊ शकते. त्यामुळे सोशल मीडियावर प्रक्षोभक लिहिणं टाळावं. शिक्षा : जर गुन्हा सिद्ध झाला, तर तीन महिन्यांची शिक्षा होऊ शकते._
_2._ _*धार्मिक भावाना दुखावणे*_ : _जर कुणी जाणीवपूर्वक इतर धर्मावर टीका करत असेल किंवा जाणीवपूर्वक भावना दुखावण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्यावर कारवाई होऊ शकते. धार्मिक चिन्हांचा अपमानही करु नका. असे केल्यास या प्रकरणात आयपीसी 295A अन्वये केस दाखल होऊ शकते. शिक्षा : दोषी आढळल्यास 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास भोगावा लागेल._
_3._ _*अपमान*_ : _सोशल मीडियावर कोणत्या पोस्टमध्ये किंवा कमेंटमध्ये कुणाचा अपमान केल्यास आणि शिवीगाळ केल्यास कारवाई होईल. जर असे केलात तर आयपीसी कलम 499 आणि 500 अन्वये तक्रार दाखल होऊ शकते. शिक्षा : हे प्रकरण सिद्ध झाल्यास 2 वर्षांपर्यत तुरुंगवास होऊ शकतो._
_4._ _*देशाविरोधात लिहिणे*_ : _जर कोणत्या पोस्टमध्ये किंवा कमेंटमध्ये देशाविरोधात भाष्य केल्यास कारवाई होऊ शकते. देशाची एकात्मता आणि अखंडतेला धोका निर्माण होईल असे काही मत मांडल्यास आयपीसी कलम 124A अन्वये खटला सुरु होऊ शकतो. शिक्षा : या प्रकरणी जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद आहे._
_5._ _*विशिष्ट समूहाविरोधात लेखन*_ : _विशिष्ट समूहाविरोधात लेखन करु नये. कुणाच्या वर्णावरुन किंवा कुणाच्या जाती-धर्मावरुन प्रक्षोभक लिहू नये. अन्यथा आयपीसी कलम 153A अन्वये कारवाई होऊ शकते. शिक्षा : याप्रकरणी तीन वर्षांची शिक्षा होऊ शकते._
_6._ _*अफवा पसरवणे*_ : _सोशल मीडियावर असे लिहिणे ज्यामुळे अफवा पसरु शकतात आणि हे लेखन जाणीवपूर्वक केलेले असेल तर कारवाईला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी लागेल. कारण जाणीवपूर्व अफवा पसरवल्यास आयपीसी कलम 505 अन्वये गुन्हा दाखल होऊ शकतो. शिक्षा : अफवा पसरवल्यास 3 वर्षांची शिक्षा होऊ शकते._
_7._ _*जीवे मारण्याची धमकी*_ : _सोशल मीडियावर कुणाला जीवे मारण्याची धमकी दिलीत, तर तुमच्यावर पोलिस कारवाई होऊ शकते. सोशलमीडियावरुन धमकी देणाऱ्याविरोधात आयपीसी कलम 506 अन्वये खटला दाखल होऊ शकतो. शिक्षा : जर धमकी दिल्याचे सिद्ध झाले तर 7 वर्षांची शिक्षा होऊ शकते._
*📍अफवा आणि खोट्या बातम्यांचा प्रसार थांबविण्यासाठी काही टिप्स*
*🧐 फॉरवर्ड केलेला संदेश कोणता ते समजून घ्या*
तुमच्या मित्राने किंवा तुमच्या नातेवाईकाने संदेश स्वतः लिहिला आहे की तो त्यांना दुसऱ्या कोणी पाठविलेला आहे हेे “फॉरवर्डेड” या लेबल मुळे समजण्यास मदत होते. मूळ संदेश कोणी लिहिला आहे याबद्दल तुम्हाला खात्री नसल्यास तथ्ये दोनदा तपासून पहा.
*🧐 फोटो आणि मीडिया काळजीपूर्वक तपासा*
तुम्हाला चुकीची माहिती कळावी यासाठी फोटो, ऑडिओ आणि व्हिडिओ यामध्ये फेरफार केलेले असू शकतात. ही बातमी इतर विश्वासार्ह प्रसारमाध्यमांकडे देखील रिपोर्ट केली गेली आहे का ते पहा. ही बातमी अनेक ठिकाणी प्रसारित होत असल्यास, ती सत्य असण्याची शक्यता अधिक असते.
*🧐 विचित्र दिसणाऱ्या संदेशांकडे लक्ष ठेवा*
फसवणुकीच्या किंवा खोट्या बातम्या असलेल्या अनेक संदेशांमध्ये शब्दलेखनाच्या चुका असतात. या संकेतांकडे बारीक लक्ष ठेवा त्यामुळे माहिती अचूक आहे किंवा नाही ते तुम्ही तपासू शकता.
*🧐 तुमची मते पुन्हा एकदा तपासून पहा*
तुमच्या पूर्वग्रहांना मान्यता दर्शविणारी माहिती असेल तर त्याकडे बारकाईने बघा आणि ती माहिती शेअर करण्याअगोदर त्याची सत्यता पडताळून घ्या. अशक्य आणि अविश्वसनीय वाटणाऱ्या बातम्या शक्यतो खोट्याच असतात.
*🧐 खोट्या बातम्या सहसा व्हायरल होतात*
केवळ अनेक वेळा संदेश शेअर केल्याने, तो सत्य होत नाही. केवळ पाठविणाऱ्याने तुम्हाला कळकळीची विनंती केली आहे म्हणून तो संदेश फॉरवर्ड करू नका.
*🧐 इतर माध्यमांद्वारे त्याची सत्त्यता पडताळून बघा*
तुम्हाला अजूनही खात्री नसेल की आलेला संदेश खरा आहे की खोटा, तर ऑनलाईन विश्वासार्ह वृत्तपत्रांच्या वेबसाईटवर जाऊन याविषयी माहिती मिळते का ते पहा. तुम्ही अजूनही साशंक असाल तर याविषयी ज्या व्यक्तींना खरोखर माहिती असेल अशा व्यक्तींना विचारा.
*🧐 प्रसार थांबविण्यासाठी मदत करा*
तुम्हाला जर खोटी माहिती फॉरवर्ड होऊन आली असेल तर ज्यांनी तुम्हाला ती पाठविली त्यांना संदेश पाठविण्याअगोदर त्यामधील माहिती तपासत जा असे सांगा. तुम्हाला एखाद्याने संदेश पाठविण्यास सांगितले म्हणून तो उगीचच शेअर करू नका.
____________________________________
🚨 *SBI चा खबरदारीचा इशारा; 'या' व्हॉट्सअॅप मेसेजपासून राहा सावधान!*
👉 स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या बँक खातेदारांना एका व्हॉट्सअॅप मेसेजपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. हा मेसेज ग्राहकांची फसवणूक करुन बँकिंग डिटेल्स काढून घेऊ शकतो. त्यामुळे बँक खातेदारांनी व्हॉट्सअॅपवरुन येणाऱ्या मेसेजला कोणताही ओटीपी शेअर करु नये, असे बँकेकडून सांगण्यात येत आहे.
📲 हा मेसेज पहिल्यांदा ग्राहकांनी ओटीपी संबंधित माहिती देऊन सतर्क करतो. त्यानंतर ग्राहकांनी भरोसा केल्यानंतर ओपीटी शेअर करण्यास सांगण्यात येते. हा व्हॉट्सअॅप मेसेज सतत कोणत्याही लिंक सोबत येतो. ज्या लिंकवर क्लिक केल्यानंतर बॅकग्राऊंडमध्ये कोणतेतरी अॅप इंस्टॉल होते. या अॅपच्या मदतीने हॅकर्स फोनमधून ओटीपी चोरी करु शकतात.
👨🏻💻 याचबरोबर, फसवणूक करणारा व्यक्ती ग्राहकांसोबत बँक कर्मचारी असल्याचे भासवतो. त्यानंतर ग्राहकांना डेबिट किंवा क्रेडिट कार्ड रिन्यू किंवा अपग्रेड करण्याचे कारण देत बँकेचे डिटेल्स मागतात. यामध्ये डेबिट/क्रेडिट कार्ड नंबर, सीव्हीव्ही आणि कार्डची एक्सपायरी डेट विचारली जाते. यानंतर कोणत्याही टेक्स्ट किंवा व्हॉट्सअॅप मेसेज येण्यासंदर्भात विचारले जाते आणि सांगितले जाते की हे कार्ड अपग्रेडचे कंफर्मेशन आहे.
💳 त्यानंतर स्कॅमरकडून येणाऱ्या मेसेजच्या लिंकवर क्लिक केल्यानंतर कार्ड अपग्रेड कन्फर्म करण्यासाठी सांगितले जाते. या लिंकवर क्लिक केल्यानंतर स्कॅमरची मदद करणारा अॅप बॅकग्राऊंडला इंस्टॉल होतो. या अॅपच्या माध्यमातून ओटीपी स्कॅमरला मिळतो. अशा पद्धतीने कार्ड नंबर, सीव्हीव्ही आणि एक्सपायरी डेट पासून ओटीपीपर्यंत सर्व माहिती स्कॅमरजवळ पोहोचते. त्यामुळे स्कॅमर काहीही अनऑथराइज्ड ट्रांजक्शन करु शकतात.
📍 *अशा फसवणुकीच्या तक्रारी करण्यासाठी 1800-11-1109 वर कॉल करु शकता. तसेच, बँक कर्मचाऱ्याजवळ तक्रार दाखल केली जाऊ शकते. याशिवाय, 'Problem' असे लिहून 9212500888 वर एसएमएस पाठवू शकता. तसेच, एसबीआयच्या ट्विटरवर @SBICard_Connect तक्रार करु शकता.*
____________________________
कोरोना व्हायरसमुळे आलेल्या आणीबाणीच्या परिस्थिती फेक न्यूजचा सुळसुळाट आहे. खोट्या बातम्यांचे सत्य समोर आणण्याचे काम Fact Crescendo Marathi तर्फे करण्यात येते. आपणही या लढाईत आमची साथ द्या. ते कसे?
* तुमच्याकडे येणारे फोटो/मेसेज/व्हिडियोची सत्यता जाणून घेण्यासाठी ते आमच्याकडे व्हॉट्सअपद्वारे पाठवा - 9049043487
* आमच्या फॅक्ट चेक आर्टिकल्सच्या लिंक मोबाईलवर मिळवण्यासाठी 9049043487 हा क्रमांक सेव्ह करून व्हॉट्सअपवर Hi मेसेज पाठवा.
* हा क्रमांक तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्येदेखील Add करू शकता.
* कोरोना व्हायरसविषयी सर्व फॅक्ट-चेक येथे वाचा - https://marathi.factcrescendo.com/category/coronavirus/
कोरोना व्हायरससंबंधी फेक न्यूजचा सुळसुळाट वाढला असून, त्यामुळे चुकीची माहिती पसरत आहे.
नागरिकांपर्यंत खरी माहिती पोहचविण्याच्या उद्देशाने जगभरातील फॅक्ट चेकिंग कंपन्यांची प्रमुख संस्था म्हणजेच इंटरनॅशनल फॅक्ट चेकिंग नेटवर्कतर्फे (IFCN) व्हॉट्सअप चॅटबॉट तयार करण्यात आला आहे.
खाली दिलेला नंबर सेव्ह करून Hi मेसेज पाठवा आणि मिळवा विश्वसनीय माहिती.
Save ▶️ +1 727-291-2606
https://wa.me/17272912606
किंवा
विश्वास न्यूज
https://vishvasnews.com
*India Today* is publishing fact checks in *Hindi* and *English*.
💬 Get in touch on WhatsApp _https://wa.me/917370007000_
🌐 _https://www.indiatoday.in/_
किंवा
PIB
https://wa.me/918799711259
वरील वेबसाईटवर तुम्हाला येणारे फेक मेसेज पाठविल्यानंतर त्यांच्याकडून सत्यता पडताळणी केली जाते व तुम्हाला ती माहिती अथवा पोस्ट खरी की खोटी या बद्दल माहिती दिली जाते.
Profile वर गेल्यावर तिथे about चा option असतो.
About वर click करा.
About मध्ये तुमची सगळी details असतात.
तिथं फोन नंबर कुठाय शोधून त्याच्या खाली public म्हणून option असतो,तो public ऐवजी only me करायचा.
मग तुमच्याशिवाय नंबर कोणालाही दिसणार नाही.
धन्यवाद
फेसबुकवर सिक्युरिटी कमेंट (सुरक्षितता टिप्पणी) टाकण्यासाठी, तुम्ही खालील गोष्टी करू शकता:
- तुमच्या पोस्टवर कमेंट करा: तुम्ही तुमच्या स्वतःच्या पोस्टवर कमेंट करू शकता आणि लोकांना सावध करू शकता.
- ग्रुपमध्ये पोस्ट करा: जर तुम्ही एखाद्या ग्रुपचे सदस्य असाल, तर तुम्ही तिथे सिक्युरिटी टिप्स (सुरक्षितता सूचना) पोस्ट करू शकता.
- मेसेज पाठवा: तुम्ही तुमच्या मित्रांना किंवा कुटुंबातील सदस्यांना थेट मेसेज पाठवून त्यांना धोक्यांपासून सावध करू शकता.
उदाहरणार्थ:
''मित्रांनो, सध्या फेसबुकवर एक नवीन घोटाळा सुरू आहे. कोणीतरी तुम्हाला आकर्षक ऑफर देत असेल, तर त्यावर लगेच विश्वास ठेवू नका. कृपया अधिक माहितीसाठी [reliable link] ला भेट द्या.''
याव्यतिरिक्त, तुम्ही फेसबुकच्या सुरक्षा सेटिंग्ज (सुरक्षितता सेटिंग्ज) तपासा आणि 'टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन' (Two-Factor Authentication) सुरू करा, जेणेकरून तुमचे खाते अधिक सुरक्षित राहील.
अधिक माहितीसाठी, फेसबुकचे सुरक्षा केंद्र (https://www.facebook.com/safety/) पहा.
जर तुमचा फोटो कोणी शेअर केला, आणि तो तुम्हाला काढायचा असेल, तर तुम्ही खालील गोष्टी करू शकता:
-
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला रिपोर्ट करा:
- फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर अशा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुम्ही त्या पोस्टची तक्रार करू शकता. त्यांच्या पॉलिसीनुसार, तुमची परवानगी नसताना कोणी तुमचा फोटो वापरत असेल, तर ते तो फोटो काढू शकतात.
-
व्यक्तीला संपर्क साधा:
- ज्या व्यक्तीने फोटो शेअर केला आहे, त्याला थेट संपर्क करून फोटो काढायला सांगा. अनेकदा समजूतदारपणे बोलल्याने प्रश्न सुटू शकतो.
-
कायदेशीर मदत घ्या:
- जर फोटो काढला नाही, तर तुम्ही सायबर क्राईम पोलिसांकडे तक्रार करू शकता. तुमच्या परवानगीशिवाय फोटो वापरणे हे कायद्याचे उल्लंघन असू शकते.
-
गुगल सर्चमधून हटवण्यासाठी:
- जर फोटो गुगल सर्चमध्ये दिसत असेल, तर तुम्ही गुगलला तो फोटो त्यांच्या सर्च रिझल्टमधून काढण्यासाठी रिक्वेस्ट पाठवू शकता. यासाठी गुगलचे Remove Outdated Content Tool वापरू शकता.
हे काही उपाय आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमचा फोटो काढू शकता.
तुमच्या वॉल मधील लॉग वर तुमचं लक्ष असुद्या, म्हणजे शेवटी जे काही लाईक, कंमेंट केली हे तुमचंच आहे का हे कळेल.
फेसबुक सिक्युरिटी मधून लॉग इन नोटिफिकेशन्स ऑन ठेवा, म्हणजे इतर कुठे लॉग इन झाली तर तुम्हाला मेल/sms येईल.
फेसबुक वर फालतू गेम खेळणं टाळा, जस की तुम्ही कोण होणार/ तुमचं बेस्ट फ्रेंड/पुढच्या जन्मात तुम्ही कोण होणार? वैगरे वैगरे. ज्यांना तुम्हीच नेम/birthdate ची वैगरे परमिशन देता.
अधिक सुरक्षेसाठी पासवर्ड वेळोवेळी बदलत रहा, सारख बदललं तर आठवत नाही, तर मग अश्या प्रकारे बदला जस की आता पासवर्ड abcd@95 आहे, तर बदलताना abcd@95+ अस बदला किंवा मग "+" च्या जागी इतर काही ठेवा, म्हणजे पासवर्ड विसरलो हा प्रॉब्लेम येणार नाही.
एवढं केलं तरी पुरेस आहे.
धन्यवाद!