Topic icon

विधी

0
गर्भधारणेदरम्यान महिलेचे ओटी भरणे हा एक महत्वाचा आणि आनंदी सोहळा असतो. हा सोहळा विविध प्रकारचा असतो आणि त्यामध्ये विविध विधी केले जातात. खाली काही सामान्य प्रकार आणि विधी दिले आहेत:
ओटीभरणाचे प्रकार:
  1. केळवण:

    केळवण म्हणजे गरोदर स्त्रीला तिच्या नातेवाईकांकडे आणि मित्र-मैत्रिणींकडे जेवणासाठी आमंत्रित करणे. या जेवणादरम्यान, तिला साडी, ब्लाউজ पीस, फळे, फुले आणि भेटवस्तू दिल्या जातात.

  2. डोहाळे जेवण:

    डोहाळे जेवण हा ओटीभरणाचा एक महत्वाचा भाग आहे. ह्या कार्यक्रमात गर्भवती महिलेला विविध प्रकारचे पदार्थ खाऊ दिले जातात, जे तिची आवड आणि इच्छा पूर्ण करतात.

  3. देवकार्य:

    काही कुटुंबांमध्ये ओटीभरण्यापूर्वी देवकार्य केले जाते. यात घरातील देवी-देवतांची पूजा केली जाते आणि त्यांच्याकडून आशीर्वाद घेतले जातात.

ओटीभरणाचे विधी:
  • ओटी भरणे:

    या विधीमध्ये महिलेच्या साडीच्या पदरात तांदूळ, नारळ, सुपारी, हळद-कुंकू आणि फळे ठेवतात. हे समृद्धी आणि शुभ संकेत मानले जाते.

  • आरती:

    ओटी भरल्यानंतर, गर्भवती महिलेची आरती करतात आणि तिच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करतात.

  • भेटवस्तू:

    या कार्यक्रमात सहभागी झालेले लोक गर्भवती महिलेला भेटवस्तू देतात, ज्यात सहसा बाळ आणि आईसाठी उपयुक्त वस्तू असतात.

  • गायन आणि नृत्य:

    ओटीभरण्याच्या कार्यक्रमात महिला पारंपरिक गाणी गातात आणि नृत्य करतात, ज्यामुळे आनंदाचे वातावरण निर्माण होते.

हे विधी आणि प्रकार प्रदेशानुसार आणि कुटुंबानुसार बदलू शकतात, परंतु मूळ उद्देश गर्भवती महिलेला आनंदित करणे आणि तिच्या गर्भाशयाला आशीर्वाद देणे हाच असतो.

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 3000
1


सुतक म्हणजे काय? सुतक कसे आणि किती‌ दिवस पाळायचे असते





सुतक ही हिंदु धर्मातली एक प्रथा आहे. घरातील एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्याच्या क्षणापासून सुतक सुरू होतं. सुतकाचे काही नियम असतात जे त्या घरात पाळले जातात. नात्यातल्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर काही दिवस सुतक पाळले जाते. नाते किती जवळचे आहे यावर सुतकाचे दिवस अवलंबून असतात. ही सर्व माहिती पंचांगात असते. बाहेरगावच्या माणसाठी मृत्यूची वार्ता समजल्यानंतर सुतक सुरू होते. सुतक म्हणजेच अशौच, मृत माणसाबद्दल धरावयाचा विटाळ. सुतकालाच अशौच असेही म्हटले जाते. व्यक्तीच्या निधनानंतर 1 ते 13 दिवस अशौच पाळण्याची प्राचीन प्रथा आहे. 
 
सुतक कसे पाळावे नियम
सुतकामध्ये घरातील देवपूजा व कोणतेही मंगल कार्य करू नये अथवा कुठल्याही मंगल कार्यास जाऊ नये.
कुठल्याही देवळात जाऊ नये मात्र देवतेचे बाहेरून दर्शन घेण्यास हरकत नाही.
आपला जो नित्यक्रम आहे तो करावा, उदाहरणार्थ हरिपाठ वाचन, गायत्री मंत्र सोडून इतर नाम जप, किर्तन, प्रवचन करण्यास हरकत नाही.

नित्याची नोकरी, कामधंद्यास जायला हरकत नाही. मात्र ज्याने अग्नी दिला आहे, त्याने वरील कोणत्याही गोष्टी करू नयेत व दहा दिवस घराबाहेर जाऊ नये.

सुतकामध्ये पलंग, गादीवर झोपू नये.
दररोज आंघोळ करावी मात्र कपाळाला तिलक लाऊ नये.
अत्तर किंवा सेंट वापरू नये.
नवीन वस्त्र परिधान करू नये. बाकी नित्याचे व्यवहार चालू ठेवावेत.
दहाव्या व अकराव्या दिवशी घरातील सर्वांनी डोक्यावरून आंघोळ करावी, सूतकातील सर्व कपडे धुवावीत आणि घरात गोमूत्र शिंपडावे.
अकराव्या दिवशी कपाळाला कुंकू, टिकली किंवा गंध लावावे.
या आत्म्याला पुढील गतीकरता अकरावा, बारावा व तेराव्या दिवशीचे विधी करावे.
चौदाव्या दिवशी घरात निधनशांत व उदकशांत करावी आणि मगच घरातील देवपूजा करावी. त्या दिवशी खांदेकऱ्यांना, नातेवाईकांना गोडाचे भोजन द्यावे. संध्याकाळी अग्नी देणाऱ्याने डोक्यावर नवीन टोपी घालावी. खांद्यावर टॉवेल किंवा उपर्णे घ्यावे व शंकराच्या मंदिरात जाऊन गाभाऱ्यात तुपाचे निरांजन लावून ठेवावे, शंकर ही मृत्यूची देवता आहे, आत्म्यास सद्गती प्राप्त व्हावी व कुटुंबातील सर्वांचे रक्षण करावे, अशी प्रार्थना करून डोक्यावरील टोपी व उपर्णे तेथेच काढून ठेवावे. लावलेले निरांजन घरी आणू नये.
 
या लोकांना सुतक नसते
मरणाच्या इच्छेने उपवास करून देह ठेवणे, शस्त्राने, विष पिऊन, पाण्यात बुडी घेऊन, फाशी घेऊन, पर्वतावरून किंवा उंचावरून उडी मारून इ. कारणाने मृत असता किंवा आत्महत्या केली असता अशौच नाही म्हणजे सुतक नसतं.
तसेच गुरुहत्या करणारा वगैरे अशा प्रकारच्या व्यक्तीचे दाहकर्म करू नये अथवा त्याचे शौचही पाळू नये. नास्तिक, नीच कर्म करणारे, पितृकर्म न करणारे अशा लोकांकडे जेवण सुद्धा करू नये तसेच पाणी सुद्धा पिऊ नये. 
 
आधार : निर्णयसिंधू, गरूड पुराण
 
विविध ठिकाणी आपल्या परंपरेनुसार पाळले जाणरे नियम
व्यक्तीचे निधन झालेल्या घरातील कोणत्याही स्त्री व पुरूषाने तिलक किंवा टिकली लावू नये.
घरामध्ये दहा दिवस काळा चहा सोडून काहीही बनवत नाही.
शेजारील किंवा इतर नातेवाईक अन्न आणून देतात ते ग्रहण केलं जातं.
घरात अन्न शिजवणारे त्यात फोडणी घालत नाही.
सुतकामध्ये केस व दाढी कापत नाही.
सुतक घरासोबत भावकी तसेच आडनाव बंधूनाही असत.
सुतकात घरातील सदस्य बाहेर पडत नाही.
दहाव्या दिवशी दशक्रिया विधी असतो ज्यात पिंडाला कावळा शिवला म्हणजे निधन झालेल्या व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळाली असे मानले जाते.
दहावा झाल्यानंतर सुतक फिटलं जातं.
दहाव्याच्या विधीला निधन झालेल्या व्यक्तीच्या घरातील पुरूष व्यक्तींचा टक्कल केला जातो.
दहावा झाल्यानंतर तिसर्‍या दिवशी तेरावा विधी केला जातो.
तेराव्या विधीला नातेवाईकांना बोलावतात आणि गोडधोड खायला केलं जातं.
या दिवशी मयत व्यक्तीच्या कुटुंबातील पुरूष सदस्यांना गंध लावून त्या परिवाराच सुतक संपत.
स्त्रियाही दहाव्या किंवा तेराव्यानंतर टिकली किंवा गंध लावायला सुरू करतात.
 
पार्थिव स्मशानात पोहोचवून आलेले लोक घरी गेल्यावर अंघोळ का करतात
शास्त्रात सांगितले आहे की मृतात्म्याभोवती नकारात्मक ऊर्जा निर्माण झालेली असते. निधनामुले वातावरणातील सकारात्मकता, चैतन्य लोप पावलेलं असतं तसेच स्मशानातही होणारी कार्यं ही नकारात्मक प्रभाव पाडत असतात. येथे मृत व्यक्तीचं स्थूल शरीर जरी दहन होत असलं तरी सूक्ष्म शरीर काही काळ या ठिकाणीच वास्तव्य करून राहत ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते. या ऊर्जेचा मनावर वाईट परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच अंत्यदर्शनामुळे मनावर एक प्रकारचे मृत्यूचे सावट आलेलं असतं. या सर्व विचारांना तसेच भावनांना मनातून काढण्यासाठी स्नान करण्याची पद्धत आहे. स्नान केल्यावर आपोआप शूचिर्भूत झाल्यासारखे वाटते त्यामुळे अंत्यदर्शनानंतर स्नान करायची पद्धत आहे.
 
तसेच यामागील वैज्ञानिक कारण बघितले तर मृतदेह हळूहळू सडण्यास सुरूवात होते आणि त्यामुळे वातावरणात अनेक प्रकारचे सूक्ष्म किटाणू पसरतात. स्मशानातील वातावरणातही अशा किटाणूंची संख्या कितीतरी पटीने वाढलेली असते. या किटाणूंचा संसर्ग होऊन त्याचे आपल्या शरीरावर घातक परिणाम होऊ नये यामुळे स्नान करून स्वच्छ होणं हे वैज्ञानिक दृष्टिकोनातून आवश्यक आहे.

उत्तर लिहिले · 13/6/2022
कर्म · 53750
2
माझ्या मावस बहिणीचे लग्न ठरले होते,तर सर्व नातेवाईक जमलो होतो केळवण करण्यासाठी, माझा लहान भाऊ सर्व पहात होता,सारखं केळवण,केळवण ऐकलं होतं,तर जेवण वगैरे झाल्यावर अगदी निरागस पणे त्याने विचारलं, केळवण सम्पलं का..? पण मला केळी कुठेच नाही दिसली..!!!

गमतीचा भाग झाला तो..

तर, लग्न,मुंज करायचे ठरल्यानंतर मुलगी/मुलगा ,मुंजा आणि त्यांचे आई-वडील,आजी-आजोबा वगैरे घरातील माणसांना जवळचे नातेवाईक, ओळखीचे लोक आपल्या घरी रीतसर आमंत्रण देऊन जेवायला बोलावतात त्याला केळवण म्हणतात.

कार्य ठरलेल्या घरात हजार कामे असतात,अशा वेळी स्वयंपाक वगैरे चा वेळ वाचतो.

तसेच पूर्वी लग्न झाले की मुलगी एकदा सासरी गेली की सम्पर्काची-दळणवळणाची साधने कमी असल्याने भेटीगाठी फार कमी होत, तसेच मुंज झाल्यावर मुलगा गुरुगृही जाई. तर ह्या केळवणाच्या निमित्ताने निवांत भेटणे,कोडकौतुक वगैरे करता येणे हा उद्देश असावा असे माझे मत आहे

केळवण हा काही धार्मिक विधी नाही,त्या मुळे बोलावलेल्या पाहुण्यांचे योग्य आदरातिथ्य करणे, ऐपतीप्रमाणे ओटी भरणे,भेटवस्तू देणे, इतकंच करतात

एकंदरीत 2 कुटुंबातील संबंध प्रेमाचे रहावेत ह्या उद्देशाने समाजप्रिय माणसाने सुरू केलेली प्रथा,इतकाच साधा उद्देश असावा













उत्तर लिहिले · 30/11/2021
कर्म · 121765
0

लग्नाची पत्रिका (लग्नपत्रिका) वधू आणि वर दोघांकडील नातेवाईक आणि मित्रमंडळींना पाठवली जाते. त्यामुळे ती दोघांकडील असते.

परंतु,

पत्रिका छापण्याची आणि वाटण्याची जबाबदारी साधारणपणे वराकडील लोकांची असते. त्यामुळे, बहुतेक वेळा पत्रिका वराकडील मानली जाते. काहीवेळा दोन्हीकडील मंडळी वाटून घेतात.

ingatale.com या वेबसाइटनुसार, पूर्वी पत्रिका छापणे आणि वाटणे हे वराचे वडील किंवा कुटुंबातील सदस्य करत असत.

ingatale.com
उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 3000
1
आगळीच्या बाबतीतील दोन दिव्ये कोणती?
उत्तर लिहिले · 27/10/2021
कर्म · 20
2
चंडी हे देवी दुर्गेचे एक नाव आहे.  नवरात्रीच्या काळात सप्तशतीचा पाठ केला जातो त्यालाच चंडीपाठ म्हणतात.

चंडीपाठाचे फायदे:
मार्कंडेयपुराणात चंडीदेवीचे माहात्म्य सांगितले असून त्यात तिच्या अवतारांचे आणि पराक्रमांचे विस्ताराने वर्णन केले आहे. त्यातील जवळजवळ सातशे श्लोक एकत्र घेऊन ‘श्री सप्तशती’ नावाचा एक ग्रंथ देवीच्या उपासनेसाठी निराळा काढलेला आहे. ‘सुख, लाभ, जय इत्यादी अनेक कामनांच्या पूर्तीसाठी या सप्तशतीचा पाठ करावा’, असे सांगितले आहे. हा पाठ विशेषतः आश्विनातील नवरात्रीत करतात. काही घराण्यांत तसा कुलाचारही असतो. पाठ केल्यानंतर हवनही करायचे असते. या सगळ्याला मिळून ‘चंडीविधान’ असे म्हणतात.
उत्तर लिहिले · 6/1/2021
कर्म · 61495
2
पत्रिका जुळल्या आणि नवरा-नवरींची एकमेकांची पसंती झाली की वधू-वरांच्या कुटुंबीयाकडील लोक लग्न ‘पक्के’ करण्यासाठी हा विधी साखरपुडाकरतात. पूर्वी या विधीला ‘कुंकू लावणे’म्हणत.अगदी पूर्वी ह्या विधीला अजिबात महत्त्व नव्हते. परंतु त्याविषयी धार्मिक विधी व मंत्र मात्र अस्तित्वात आहेत. प्रथम वराचा पिता चार नातेवाईक व प्रतिष्ठित लोकांना घेऊन कन्येच्या पित्याकडे जातो व आपल्या मुलासाठी त्यांच्या कन्येला विवाहाची मागणी घालतो. कन्येचा पिता घरच्यांची व मुलीची संमती घेऊन होकार कळवितो. सर्वांच्यादेखत वरपिता व वधूपिता हा विवाह निश्चित झाल्याचे जाहीर करतात. ह्याला वाङनिश्चय म्हणतात. म्हणजेच या विवाहाचा तोंडी व्यवहार पक्का झाला. हा विधी काही ठिकाणी गुरुजींमार्फत संस्कृतमधून होतो.
त्यानंतर लगेच साखरपुडा हा विधी केला जातो. वरपिता मुलीला कुंकू लावून साडी-चोळी व नारळ देतो आणि या शुभप्रसंगी तोंड गोड करण्यासाठी साखर देतो. म्हणून या विधीला ‘साखरपुडा’ असे नाव प्राप्त झाले आहे. हल्ली साखरेऐवजी पेढयाचा पुडा मुलीला देण्याची पध्दत आहे. तसेच ऐपतीनुसार मुलीला सोन्या-हि-याचा दागिनाही देतात. बहुधा हा दागिना म्हणजे अंगठीच असते. मुलीचा पिताही भावी जावयाची पूजा करून त्याला पोषाख देतो व सोन्याची किंवा खडयाची अंगठी देतो. हल्ली मुलगा-मुलगी यांनीच एकमेकांना अंगठी घालण्याची पध्दत प्रचलीत आहे. या समारंभानंतर चहा-फराळाचे आदरातिथ्य मुलीच्या वडिलांकडून केले जाते.
प्रत्येकाच्या हौशीनुसार व ऐपतीनुसार हा विधी हल्ली खूप मोठया प्रमाणावरही साजरा केला जातो. कित्येकदा हा ‘लघु-विवाहसोहळा’च असतो. कार्यालय घेऊन, जेवणावळ घालून वाजतगाजत हा विधी केला जातो. यानंतर प्रत्यक्ष विवाह होईपर्यंत मुलगा-मुलगी यांना एकमेकांचा अधिक सहवास घडावा, नीट परिचय व्हावा या उद्देशाने एकमेकांना वारंवार भेटणे थोडया प्रगतशील पालकवर्गाने मान्य केलेले आहे. प्रत्यक्ष विवाहबध्द होण्यापूर्वीचा हा ‘फुलपाखरी’ आनंदाचा काळ माणसांच्या आयुष्यातील सर्वात सुखाचा काळ म्हणून गणला जातो.
यानंतर वधू-वर व त्यांचे कुटुंबीय यांच्या सोयीनुसार लग्नाचा मुहूर्त शोधला जातो. पूर्वी अशी पध्दत होती की दिवाळी नंतर तुळशीचे लग्न झाल्याशिवाय कोणताच लग्नमुहूर्त काढला जात नसे. हल्ली मात्र ही प्रथा पूर्णपणे पाळली जात नाही. हल्ली कार्यालयाच्या उपलब्धतेनुसार लग्नाची तिथी निश्चित होते. निमंत्रण पत्रिका छापल्या जातात. चांगला मुहूर्तपाहून प्रथम आपल्या कुलदैवताला मंगलकार्याला येण्याचे निमंत्रण केले जाते. निमंत्रणपत्रिका देताना तांदूळ व कुंकू एकत्र करून अक्षता तयार करतात व अक्षता आणि सुपारी घेऊन निमंत्रणासाठी वधू – वराचे आईवडील देवाला जातात. त्यानंतर मित्रमंडळी व नातेवाईक यांना निमंत्रणपत्रिका वाटल्या जातात व विवाहासाठी निमंत्रित केले जाते.
साखरपुडयापासून ते विवाहाच्या मधील काळात वधूचा पोशाख व दागदागिने यांची तसेच वराचा पोशाख यांची खरेदी केली जाते. ऐपतीनुसार वरपक्षाकडून वधूला वस्त्रे व दागिने खरेदी केले जातात. त्याचप्रमाणे वधूपक्षाकडूनही वरासाठी एखादा दागिना व वरमाई आणि इतर मानापानाच्या साडया, कापडे इत्यादींची खरेदी केली जाते. या कापडखरेदीला ‘बस्ता बांधणे’ असे नाव आहे.
उत्तर लिहिले · 15/12/2020
कर्म · 14895