Topic icon

रेशीम शेती

0

रेशीम (Silk) पातीची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे:

  1. नैसर्गिक तंतुमय (Natural Fiber): रेशीम हे नैसर्गिकरित्या तयार होणारे तंतुमय प्रथिन आहे.
  2. चमकदार (Lustrous): रेशीम हे चमकदार असते, ज्यामुळे ते आकर्षक दिसते.
  3. मुलायम (Soft): रेशीम स्पर्शायला अतिशय मुलायम आणि मऊ असते.
  4. मजबूत (Strong): रेशीम हे नैसर्गिकरित्या मजबूत असते.
  5. लवचिक (Elastic): रेशीम लवचिक असल्यामुळे ते ताणले जाऊ शकते.
  6. उष्णतारोधक (Insulator): रेशीम उष्णतारोधक असल्याने ते थंडीत उष्णता टिकवून ठेवते आणि गर्मीत शरीर थंड ठेवते.
  7. रंगण्याची क्षमता (Dyeable): रेशीम सहजपणे रंगवता येते, त्यामुळे विविध रंग आणि डिझाईन्समध्ये ते उपलब्ध होते.
  8. वजनाला हलके (Lightweight): रेशीम वजनाला हलके असल्यामुळे ते परिधान करण्यास आरामदायक असते.
  9. ॲलर्जी होण्याची शक्यता कमी (Hypoallergenic): रेशीममध्ये ॲलर्जी निर्माण करण्याची शक्यता कमी असते, त्यामुळे संवेदनशील त्वचा असलेल्या लोकांसाठी ते उत्तम आहे.

अधिक माहितीसाठी हे उपयुक्त स्रोत:

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 980
0

रेशीम पाटी (रेशीम बोर्ड) ची वैशिष्ट्ये:

  • उत्पादन वाढ: रेशीम पाटी रेशीम उत्पादनाला प्रोत्साहन देते.
  • रोजगार: ग्रामीण भागात रोजगार निर्माण करते.
  • उत्पन्नाचे साधन: शेतकऱ्यांसाठी अतिरिक्त उत्पन्नाचे साधन आहे.
  • विकासाला चालना: ग्रामीण भागाच्या सामाजिक व आर्थिक विकासाला चालना देते.
  • पर्यावरणपूरक: रेशीम शेती पर्यावरणपूरक आहे.

अधिक माहितीसाठी, आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 980
0

तुम्ही रेशीम शेतीसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन खालील वेबसाइटवर करू शकता:

  • महाराष्ट्र रेशीम विकास महामंडळ (Maharashtra Resham Vikas Mahamandal): mahasilk.maharashtra.gov.in

या वेबसाइटवर तुम्हाला रेशीम शेती संदर्भात विविध माहिती आणि योजनांची माहिती मिळेल.

टीप: वेबसाइटवर नोंदणी करण्यापूर्वी, आवश्यक कागदपत्रे आणि पात्रता निकष तपासा.

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 980
7
अत्यंत कमी खर्चात व जास्तीत जास्त उत्पन्न मिळवून देणारा हा व्यवसाय शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या साहित्यातून करता येणारा आहे. तुतीच्या झाडावर रेशमाच्या किड्यांची पैदास होत असते. अशा या उपयुक्त तुतीची लागवड निचरा होणाऱ्या कोणत्याही जमिनीत करता येते. तुतीच्या झाडाला लागणारे पाणी हे एक एकर ऊसाला लागणाऱ्या पाण्याच्या तीन पट कमी असते. म्हणजे एक एकर ऊसाला लागणाऱ्या पाण्यात तीन एकर तुतीची शेती होते. तुतीच्या झाडाचा दुसरा फायदा म्हणजे एकदा तुतीच्या झाडाची लागवड केली की ते कमीत कमी पंधरा वर्षे तरी जीवंत राहते. त्यामुळे दरवर्षी लागवडीचा खर्च वाचतो.

स्थिती असते. त्यामुळे पिकांवर याचा परिणाम होतो. पण तुतीच्या लागवडीला या काळात पाणी मिळाले नाही तरी तुती मरत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा खूप मोठा फायदा आहे. त्यामुळे पाण्याची कमतरता असलेल्या ठिकाणच्या शेतकऱ्यांनाही हा व्यवसाय करता येतो. आपल्याकडे सुशिक्षीत बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अशा प्रत्येकाला या व्यवसायाचा विचार प्रामुख्याने करता येईल. रेशीम व्यवसायात तुती लागवड, कीटक संगोपन, धागानिर्मिती आणि कापडनिर्मिती असे प्रामुख्याने चार प्रकारचे व्यवसाय करता येतात. तुती लागवडीबाबत घ्यावयाची काळजी तुतीची लागवड करताना रहदारीच्या रस्त्यापासून दूर असणाऱ्या शेतजमिनीवर याची लागवड करावी. कारण रेशीमकीटक संगोपनासाठी धुळीने खराब झालेली पाने वापरता येत नाहीत. तसेच कीटकनाशकांच्या फवारणीपासूनही तुतीला दूर ठेवावे. तुतीची लागवड आणि त्यातून निर्माण होणारे रेशीम हा एक खूप मोठा व्यवसाय आहे. रेशीम उद्योगावर अवलंबून असणारा कापडनिर्मितीचा व्यवसाय जागतिक बाजारपेठेत खूप मोठी उलाढाल करतो त्यामुळे यातही अनेक संधी आहेत. कारण देश-विदेशात रेशमी कपड्याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. रेशीमकीटकांचे पालन रेशीम किडा हा या शेतीमधला महत्त्वाचा भाग. त्याची काळजी आणि व्यवस्थापन खूप महत्त्वाचे आहे. रेशीम किड्यांच्या पालनासाठी योग्य तंत्रज्ञान वापरल्यास वर्षभर रेशीमकीटकांचे पालन करण्याची खूप मोठी संधी असते. यात खूप काळजी मात्र घ्यावी लागते. अन्यथा कीटकपालनावर विपरित परिणामसुद्धा होऊ शकतो. दर्जा आणि उत्पन्नक्षमता यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे त्याचा भाव कमी मिळतो आणि मग नुकसान होते. रेशीमकीटकाच्या शरीराचे तापमान थंड असते त्यामुळे त्याच्यावर वातावरणातील तापमानादुसार बदल होत असतो. रेशीम कीटकांचे पालन १५ अंश ते ४० अंश या दरम्यान केले जाते.

रेशीमकीटक संगोपनगृह थंड जागेत असावे किंवा सावलीच्या ठिकाणी बांधावे. मातीच्या जाड भिंती, पालापाचोळा, कौलांचा वापर करून कीटक संगोपनगृह बांधावे. कीटक संगोपनाच्या छतावर नारळ, भात, गवत इत्यादीचा वापर केल्यास तापमान नियंत्रणास मदत होते. तसेच छतावर मारण्यासाठी विशिष्ठ पद्धतीचे पेंट बाजारात मिळतात, त्यांचा वापर केल्यास तापमान ५ ते ६ अंश से. कमी होते. कीटक संगोपनगृहाच्या आजुबाजूला वेगवेगळी झाडे लावावीत. प्रामुख्याने तुतीचे झाडे लावल्यास दुहेरी फायदा होतो. देशाभरात रेशीम उद्योग आणि तुती लागवड यांची झपाट्याने वाढ होत आहे. महाराष्ट्रात विदर्भात जास्त प्रमाणात हा उद्योग दिसून येतो. रोजगाराची प्रचंड क्षमता असणाऱ्या या उद्योगाचे ग्रामीण विकासात मोठे योगदान आहे. या उद्योगातून ग्रामीण भागातील लोकांना तुती लागवड, कीटकसंगोपन व धागानिमिर्तीमध्ये फार मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होतो. रेशीम उद्योगातून दिवसेंदिवस आपल्या देशाला मिळणाऱ्या परकीय चलनात वाढ होत आहे. रेशीम उद्योगातून कापड निर्मिती रेशीम उद्योगात हातमागावर कापड निर्मिती करणे जास्त सोयीचे आहे. रेशीम कापडावर करण्यात येणारे डिझाईन्स हे रंगीत धागे वापरून काढता येतात. प्लेन कापडावर रंगकाम व छपाई चांगल्या प्रकारे करता येते. त्याचसोबत हातमागावर कातलेल्या कापडावर भरतकाम आणि वेगवेगळी डिझाइन्स करता येतात. आर्थिक गणितांचा विचार केला तर यंत्रमागापेक्षा हातमाग कमी खर्चिक व रेशमाच्या कपड्यापासून अनेक प्रकारचे नमुने तयार करण्यास जास्त उपयोगी ठरतो. हातमागाचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यापैकी अर्धस्वयंचलित हातमाग, पॅडल हातमाग हे काही वांगणी दाखल.
उत्तर लिहिले · 13/5/2018
कर्म · 20065
1
रेशीम आळीबद्दल काही माहिती हवी असेल तर 7028372831 राजेश शिर्के यांच्याशी संपर्क साधा.
उत्तर लिहिले · 9/9/2017
कर्म · 6000
0

रेशीम शेती (Silk farming) करण्यासाठी तुम्ही खालील व्यक्ती आणि संस्थांची मदत घेऊ शकता:

  • कृषी सहाय्यक (Agriculture Assistant):

    गावातील कृषी सहाय्यक तुम्हाला रेशीम शेती विषयी मार्गदर्शन करू शकतात.

  • जिल्हा रेशीम अधिकारी (District Silk Officer):

    जिल्हा रेशीम कार्यालयात रेशीम अधिकारी असतात, जे तुम्हाला रेशीम शेतीची माहिती आणि प्रशिक्षण देऊ शकतात.

  • कृषी विज्ञान केंद्र (Agricultural Science Center):

    कृषी विज्ञान केंद्रामध्ये रेशीम शेती संदर्भात तज्ज्ञ असतात. ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन करू शकतात.

  • रेशीम शेतीमधील अनुभवी शेतकरी (Experienced silk farmers):

    तुमच्या এলাকায় जर कोणी अनुभवी रेशीम शेतकरी असतील, तर ते तुम्हाला त्यांच्या अनुभवावरून मदत करू शकतात.

  • सरकारी योजना (Government schemes):

    रेशीम शेतीसाठी सरकार विविध योजना राबवते. त्या योजनांची माहिती घेऊन तुम्ही लाभ घेऊ शकता.

अधिक माहितीसाठी, तुम्ही तुमच्या जिल्ह्यातील कृषी विभाग किंवा रेशीम कार्यालयात संपर्क साधावा.

उत्तर लिहिले · 15/3/2025
कर्म · 980
4
⚀रेशीम शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने स्वतंत्र रेशीमसंचालनालय सुरु करण्यात आले आहे. रेशीमशेतीसाठी संचालनालयाच्या वतीने शेतकऱ्यांना सर्वप्रकारचे सहकार्य व मार्गदर्शन केले जाते. नैसर्गिक रेशीम धाग्याची निर्मिती रेशीम अळीच्या कोषापासून होते.निसर्गात पाच प्रकारच्या रेशीम अळ्या आढळतात यापासून निर्माण होणारा रेशीमधागा अतिशय लोकप्रिय असून त्याला मिळणारी किंमतही चांगली असल्याने शेतकऱ्यांनी त्याच्या उत्पादनाकडे वळावे, असा शासनाचा प्रयत्न आहे. इतर कोणत्याही जोडधंद्यापेक्षा हा अधिक उत्पादन देणारा व कमी खर्चाचा जोडधंदा असल्याने अलिकडे शेतकरीही याला पसंती दर्शवित आहे.रेशीम शेतीसाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे म्हणून मोठ्या प्रमाणावर अनुदान दिले जाते. तुती लागवड व साहित्याच्या खरेदीसाठी युनिट कॉस्ट म्हणून २० हजार रुपये अनुदान देण्यात येते. या शेतीसाठी पक्के किटक संगोपन गृह बांधकामासाठी दोन लाख रुपये इतका खर्च अपेक्षित असून त्याच्या ५० टक्के म्हणजे एक लाख रुपये रक्कम अनुदान दिलीजाते.एक एकरपर्यंत ठिबक सिंचनासाठी एकूण खर्चाच्या ७५ टक्के म्हणजे १५ हजार इतकी रक्कम अनुदान दिली जात असून शेतकऱ्यांना केवळ यासाठी पाच हजार रुपये इतका खर्च करावा लागतो. किटक संगोपन साहित्यासाठी अपेक्षीत ५० हजार रुपये खर्चापैकी ७५ टक्के म्हणजे ३७ हजार ५०० रुपये इतकी रक्कमही अनुदानदेण्यात येते.या अनुदानाच्या लाभासाठी मात्र शेतकऱ्यांना ७५ टक्के तुतीची झाडे जीवंत ठेवणे आवश्यक आहे. तसेच पहिल्या वर्षी ५० किलो, दुसऱ्या वर्षी १०० किलो,तिसऱ्या वर्षी २०० किलो प्रति एकर कोष उत्पादन काढणे अनिवार्य आहे.शेतकऱ्यांनी योग्य पध्दतीने रेशीम शेतीचे नियोजन केल्यास या शेतीतून चांगले उत्पादन मिळते. रेशीम शेतीच्या पहिल्या वर्षी १५ जुन ते १५ जुलै दरम्यान एक एकरात तुती लागवड केल्यास १डिसेंबर ते ३० डिसेंबर दरम्यान पहिले पिक येते. त्यानंतर १५ मार्च ते १५ एप्रिल दरम्यान दुसरे पिक घेता येते. दोनही वेळी प्रत्येकी १२५ किलो इतके म्हणजे वर्षभरात २५० किलो कोष उत्पन्न मिळते.दुसऱ्या वर्षी २५ मे ते १ जुन दरम्यान तुतीची तळ छाटणी करुन १५ जुलै ते १५ ऑगष्ट दरम्यान पहिले पिक घेता येते. १ ऑक्टोंबर ते २० ऑक्टोंबर दरम्यान दुसरे, १ जानेवारी ते ३० जानेवारी दरम्यान तिसरे व १५ मार्च ते १५ एप्रिल दरम्यान चौथे पिक घेता येते. दुसऱ्या वर्षी चारही पिके मिळून ५०० किलो कोष उत्पादन शेतकरी घेवू शकतो.या पध्दतीने ही शेती केल्यास केवळ एक एकर तुती लागवडीतून ५० हजार रुपयांचे निव्वळ उत्पन्न शेतकऱ्यांना मिळते. जास्त एकरांचे नियोजन केल्यास एकरी ५० हजार या प्रमाणे उत्पन्न वाढत जाते.रेशीम शेती अल्प कालावधीतील पिक असून वर्षातून चार ते पाच पिके घेता येतात. तुतीची लागवड, किटक संगोपनगृह बांधकाम,संगोपन साहित्य यासाठी केवळ पहिल्याच वर्षी खर्च करावा लागतो. त्यानंतर त्याचा उपयोग मात्र पुढील १५ वर्षापर्यंत होत राहतो. तुतीच्या झाडांच्या फांद्या, किटकांची विष्ठा यापासून उत्कृष्ट सेंद्रीय खत मिळते. तुतीचा शिल्लक पाला जनावरांना उत्तम खाद्य म्हणून उपयोगात येते.रेशीम शेती करु इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात बेणे पुरवठा करण्यात येतो. तसेच विद्यावेतनासह रेशीम शेतीचे प्रशिक्षण, तांत्रिक मार्गदर्शन व सवलतीच्या दरात अंडीपुंजांचा पुरवठाही केल्या जातो. शेतकरी गटामध्ये अथवा समुहामध्येही ५० ते १०० एकर पर्यंत तुती लागवड करुन रेशीम कोष उत्पादन सहकारी संस्था स्थापन करुन प्रक्रिया उद्योग सुरु करु शकते. त्यामुळे अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठीही रेशीम शेती ही अतिशय फायदेशिर आहे.रेशीम शेतीसाठी किटक संगोपनगृह बांधकाम, ठिबक सिंचन संच व इतर अनुदानासाठी शेतकऱ्यांना ७/१२ आठ अ, गाव नमुना, तुती लागवडीच्या अद्ययावत नोंदी नमूद करणे आवश्यक आहे. पक्के किटक संगोपनगृह बांधकामासाठी मात्र नियोजन व अंदाजपत्रक मान्यता प्राप्त अभियंत्यांकडून सादर करणे अपेक्षित आहे. बांधकाम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र, संगोपनगृह बांधकामाचा दाखला, संगोपनगृह बांधकाम व ठिबक सिंचनबसविल्याचा दाखला, सात वर्ष कोष उत्पादन कार्यक्रम सुरु ठेवण्याचा करारनामा, लाभार्थी अनुसूचित जाती जमातीचा असल्यास जातीचा दाखला जोडणे अपेक्षित आहे.रेशीम शेती वाढविण्याचा शासनाचा प्रयत्ना असल्याने यासाठी अनुदानासह सर्व प्रकारचे तांत्रिक व प्रत्यक्ष मार्गदर्शन रेशीम संचालनालयाच्या वतीने वेळोवेळी पुरविण्यात येते. रेशीम शेती जोडधंदा म्हणून अतिशय उपयुक्त असल्याने शेतकऱ्यांनी या शेतीकडे सकारात्मक भावनेने पाहणे आवश्यक आहे.

माहिती येथे विचारा
संपर्क : विठ्ठल थेटे - ☎9766330712
.डॉ. कविता देशपांडे - ☎9423790749.