Topic icon

किरकोळ

0

समीरने दिवाळीच्या काही आठवडे आधी फटाके विकण्याचा व्यवसाय सुरू केला होता की नाही, याबद्दल मला निश्चित माहिती नाही. माझ्याकडे या विषयावर कोणताही डेटा उपलब्ध नाही.

तथापि, सर्वसाधारणपणे, दिवाळीच्या आसपास फटाक्यांची मागणी वाढते आणि अनेक लोक या काळात फटाके विक्रीचा व्यवसाय सुरू करतात.

तुम्ही तुमच्या स्थानिक परिसरात चौकशी करून खात्री करू शकता.

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 1040
1
.



एकच किंमत असलेल्या दुकानांची वैशिष्ट्ये:

१) एकसारखी किंमत एकच किंमत असणाऱ्या दुकानात सर्व प्रकारच्या मालाच्या मोठ्या किंवा छोट्या वस्तूंची किंमत एकाच स्वरूपाची असते. तिथे घासाघीस करण्याला वाव नसतो.

२) कमी किंमत एकच किंमत असणाऱ्या दुकानात वस्तूंची किंमत रास्त व कमी असते..

३) विविध प्रकारचा माल एकच किंमत असणाऱ्या दुकानात मोठ्या प्रमाणावर विविध प्रकारच्या मालाची विक्री

करण्यात येते. या दुकानात माल निवडीचे स्वातंत्र्य पूर्णपणे दिले जाते. उदा. खेळणी, स्टेशनरी, प्लॅस्टिकच्या वस्तू,

सौंदर्यप्रसाधने इ.

४) ठिकाण एकच किंमत असणारी दुकाने सर्वसाधारणपणे शहराच्या व्यापारी केंद्र, रेल्वेस्थानकाजवळ, बसस्थानकाजवळ व इतर गर्दीच्या ठिकाणी स्थापन झालेली असतात. काही वेळा अशी दुकाने तात्पुरत्या काळासाठी यात्रा व प्रदर्शन या ठिकाणी स्थापन करण्यात येतात.

५) रोखीने विक्री एकच किंमत असणाऱ्या दुकानात मालाची विक्री रोखीने करण्यात येते. ग्राहकांना कोणत्याही प्रकारे उधारीची सवलत दिली जात नाही. त्यामुळे बुडीत रकमेचा धोका निर्माण होत नाही.

६) कमी व या दुकानांमध्ये कमी प्रमाणात व लहान-लहान वस्तू असल्याने कमी भांडवल लागते.

इ) मॉल

मॉल हे एक मोठे बंदिस्त खरेदीचे ठिकाण असते ज्यात विविध प्रकारची दुकाने, व्यापार व उपहारगृहे असतात. आधुनिक खरेदीचे मॉल ही एक अमेरिकन संज्ञा आहे ज्यामध्ये एक किंवा अनेक इमारती मिळून एक समूह निर्माण होतो. ज्यामधून ग्राहकाला विविध वस्तूंची खरेदी एका विभागातून वा अनेक विभागातून करता येते.

२० व्या शतकात मॉलमधील खरेदी हे मनोरंजनाचे केंद्र झाले आहे. ज्यात सिनेमा, उपहारगृह, प्रेक्षागृह समाविष्ट आहेत. विविध प्रकारच्या वस्तूंच्या उपलब्धतेमुळे मॉल हे आत्ताच्या काळात विशेष लोकप्रिय झालेले आहेत. उदा. अभिरुची मॉल, सिटी प्राईड, फिनिक्स मार्केट सिटी.

विविध किरकोळ दुकाने जसे की, एकछती दुकाने, साखळी पद्धतीची दुकाने आणि मॉल यांच्यामध्ये अतिशय सूक्ष्म फरक आहे.


उत्तर लिहिले · 12/9/2023
कर्म · 53710
0
होलसेल गोळ्या चॉकलेटचे दुकान सुरू करण्यासाठी तुम्ही खालील ठिकाणांहून माल भरू शकता:

1. घाऊक बाजारपेठ (Wholesale Market):

  • मुंबई: क्रॉफर्ड मार्केट, मस्जिद बंदर
  • पुणे: महात्मा फुले मंडई
  • नागपूर: इतवारी
  • दिल्ली: सदर बाजार
  • या बाजारपेठांमध्ये तुम्हाला विविध प्रकारच्या गोळ्या, चॉकलेट आणि इतर खाद्यपदार्थ घाऊक भावात मिळतील.

    2. उत्पादक आणि वितरक (Manufacturers and Distributors):

  • Parle Products: parleproducts.com
  • Nestlé India: nestle.in
  • Cadbury India (Mondelez): mondelezinternational.com
  • ITC Foods: itcportal.com
  • या कंपन्यांशी थेट संपर्क साधून तुम्ही त्यांच्या वितरकांमार्फत माल खरेदी करू शकता. यामुळे तुम्हाला चांगल्या किमतीत आणि खात्रीशीर उत्पादने मिळतील.

    3. ऑनलाइन प्लॅटफॉर्म (Online Platforms):

  • IndiaMART: indiamart.com
  • TradeIndia: tradeindia.com
  • Udaan: udaan.com
  • यांसारख्या बी2बी (B2B) ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर तुम्हाला अनेक होलसेल विक्रेते मिळतील. येथे तुम्ही विविध उत्पादने आणि त्यांच्या किमतींची तुलना करू शकता आणि ऑर्डर देऊ शकता.

    4. स्थानिक वितरक (Local Distributors):

    तुमच्या शहरातील किंवा परिसरातील घाऊक विक्रेत्यांशी संपर्क साधा. ते तुम्हाला विविध कंपन्यांची उत्पादने पुरवू शकतात.

    टीप:

  • खरेदी करण्यापूर्वी उत्पादनांची गुणवत्ता आणि किंमत तपासा.
  • वितरकांकडून मालाची वाहतूक आणि वितरण व्यवस्था तपासा.
  • पेमेंट आणि क्रेडिट सुविधांविषयी माहिती घ्या.
  • उत्तर लिहिले · 24/3/2025
    कर्म · 1040
    1
    माझ्यामते, तुम्ही आधी आपले शिक्षण पूर्ण करावे किमान 12  वी पर्यंत तरी नंतर पुढे व्यवसाय किंवा लहान- मोठी नोकरी किंवा व्यवसाय करावा,  जे फक्त स्वतः वरील खर्च भरू शकतील. शिक्षण करता करता  सुरवातीला जर कापड दुकानात थोडे दिवस काम केलं तर बरे होईल म्हणजे तेथील अनुभव कामी येईल. व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवल लागते, त्यासाठी मार्केट जवळ गाळा व इतर सुविधा पाहिजे. व्यवसाय कोणत्या भागात सुरू करता यावर भांडवल अवलंबून आहे. शहरी भागात जास्त निमशहरी भागात कमी तर ग्रामीण भागात त्यापेक्षा कमी लागेल. व्यवसाय करणे चांगलेच आहे पण आपली परिस्थिती पाहता  कमी  भांडवलात छोट्या दुकानाने सुरवात केलेली चांगली म्हणजे तोटा कमी होईल आणि नफा जर झाला तर व्यवसाय वाढवता येईल. पण आधी लक्ष शिक्षणावर द्यावे असे मला वाटते.
    उत्तर लिहिले · 21/5/2022
    कर्म · 11785
    2
     

    जेव्हा एकाच छपराखाली व व्यवस्थापनाखाली दुकानाचे अनेक विभाग पाडून प्रत्येक विभागातून विशिष्ट वस्तूंची विक्री केली जाते तेव्हा अशा दुकानाला एकछत्री दुकाने किंवा ⇨ विभागीय भांडारे असे म्हणतात. हे बहुविभागीय दुकान म्हणजे एक भव्य विक्रीकेंद्रच होय. टाचणीपासून मोटारीपर्यंत सर्व प्रकारच्या वस्तू या दुकानांत विकल्या जातात. ग्राहकांच्या क्रय-प्रेरणांना आवाहन करण्यासाठी वस्तु-दालने (शोकेस), वस्तूंची आकर्षक मांडणी, अत्याधुनिक फर्निचर, तत्पर सेवक व भव्य सजावट यांवर मोठा खर्च केला जातो. दूरध्वनीवरून मालाची मागणी स्वीकारली जाते. माल घरपोच करण्यासाठी दुकानाची गाडी असते. थोडक्यात, गिऱ्हाईकांच्या जास्तीत जास्त सुखसोयींकडे लक्ष पुरविण्यात येते. पाश्चिमात्य देशांत बहुविभागीय दुकाने अत्यंत लोकप्रिय झाली आहेत. या दुकानांना मोठ्या प्रमाणावर भांडवल लागते. मालांच्या किमती वाजवीपेक्षा जास्त असल्याने छोटी गिऱ्हाईके या दुकानांकडे फारशी फिरकत नाहीत. धंद्याचा पसारा प्रचंड असल्याने मालक आणि ग्राहक यांच्यात जिव्हाळा निर्माण होणे अशक्य होते. अनेकदा व्यवसायाचा व्याप आटोक्याबाहेर जातो, माल पडून राहतो आणि व्यवस्थापनाला प्रचंड नुकसानही सोसावे लागते. वाढती स्पर्धा, मोठ्या प्रमाणावरील वाहतूक समस्या, मोटारगाड्या ठेवण्यासाठी अपुरे वाहनतळ, प्रदूषण यांमुळे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेली एकछत्री दुकाने अनेक देशांमध्ये ग्राहकांना आकृष्ट करण्यात अपयशी ठरली आहेत. त्यामुळे अशा दुकानांनी आपल्या शाखा उपनगरांमध्ये उघडण्यास सुरुवात केली आहे. अनेक वस्तूंची विक्री एकाच ठिकाणी न करता केवळ विशिष्ट वस्तूंचीच विक्री शहरातील निरनिराळ्या भागांत करणाऱ्या दुकानांना बहुशाखा अगर साखळी दुकाने असे म्हणतात. जसजसे धंद्यात यश मिळत जाईल, तसतशा दुकानांच्या शाखा शहराच्या विविध भागांत उघडण्यात येतात. शहरभर विखुरलेल्या सर्व दुकानांवर मध्यवर्ती कार्यालयाचे नियंत्रण असते. स्वत: उत्पादक साखळी दुकाने सुरू करून ग्राहकांशी प्रत्यक्ष संबंध ठेवू शकतो. त्यामुळे मध्यस्थाचे उच्चाटन होते. अशा दुकानांतून भपक्यापेक्षा चांगल्या दर्जाचा नित्योपयोगी माल शहराच्या विविध भागांतील रहिवाशांना माफक किमतीत देण्यावर अधिक कटाक्ष असतो. ग्राहकांच्या तक्रारी असतील, तर मुख्य कचेरी तक्रारीचे निवारण करते. मात्र ग्राहकांना बहुविभागीय दुकानांत मिळतो, तसा विविध प्रकारचा वैविध्यपूर्ण माल येथे मिळत नाही. साखळी दुकाने चालविण्यासाठी कार्यक्षम नोकरवर्गाची गरज भासते. अन्यथा ही दुकाने ग्राहकांच्या सदिच्छा गमावतात.

    कराराने बांधलेली दुकाने वेगळ्या तत्त्वावर चालविली जातात. किरकोळ व्यापारी एरवी स्वतंत्र असला, तरी उत्पादकाचे नियंत्रण तो काही विशिष्ट बाबतींत स्वत:वर लादून घेतो. हा किरकोळ दुकानदार वरकरणी सर्व उत्पादकांचा माल विकत असला, तरी तो एकदोन उत्पादकांचा माल अधिक प्रमाणात खपविण्याचा प्रयत्न करतो. या उत्पादकांकडून दुकानदारास उधारीवर वा स्वस्त किमतीत माल मिळत असतो म्हणून दुकानदार उत्पादकाशी अलिखित कराराने बांधलेला असतो. मात्र हा करार गुप्त असतो. दुकानात माल ठेवणाऱ्या इतर उत्पादकांना त्याची कुणकुण लागणार नाही, याची खबरदारी घेतली जाते.
    स़कल्पना
     भारती एंटरप्रायझेस लिमिटेड यांनी संयुक्त उपक्रमाद्वारे 10 ते 15 'कॅश अॅण्ड करी येत्या सात वर्षात सुरू करण्याचे नियोजन केले आहे. त्यातील पहिले दुकान ग्रोसरी, ग्राहकोपयोगी वस्तू, फळे, भाजीपाला व किरकोळ छोटे व्यवसाय असलेले 2008 या अखेरीस उत्तर भारतात सुरू केले आहे. जगातील 5 व्या क्रमांकाची किरकोळ व्यापार क्षेत्रातील कंपनी कोस्टको होलसेल कार्पोरेशन भारतात येण्यासाठी उत्सुक असून योग्य त्या संधीची वाट पाहत आहे. परंतु आजही भारतीय किरकोळ व्यापार क्षेत्रात काही आव्हाने आहेत. ती म्हणजे

    1. किरकोळ व्यापरी क्षेत्रातील गुंतवणूकीला आपोआप मान्यता दिली जात नाही.

    2. 3. रियल इस्टेट खरेदी करण्यावरील नियंत्रण अतिशय कडक आहेत. भारताची कररचना लहान व्यवसायांच्या हिताचीच आहे.

    4. देशामध्ये विकसित वितरण साखळी व एकात्मिक माहिती तंत्रज्ञान व्यवस्थापनाचा अभाव आहे.

    5. प्रशिक्षित कामगार वर्गाचा अभाव आहे..

    6. किरकोळ व्यापार व्यवस्थापनाचा दर्जा सामान्य आहे.

    7. किमतीत वारंवार होणारे चढ उतार, नफ्याचे कमी अधिक प्रमाण ही देखील ह्या क्षेत्रातील आव्हाने आहेत. ही आव्हाने असली तरी आज भारतातील किरकोळ व्यापारी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर विकासाला संधी उपलब्ध आहेत आणि म्हणूनच भारतीय तसेच अंतरराष्ट्रीय कंपन्यांची पावले या क्षेत्राकडे वळत आहेत. भारताची वाढती लोकसंख्या दिवसेंदिवस रोजगारासाठी मोठ्या प्रमाणावर सेवा क्षेत्राकडे वळत आहे. शेती व्यवसाय व उत्पादन क्षेत्रात उपलब्ध असणारा अल्प रोजगार यामुळे सेवा क्षेत्राचे महत्व दिवसेंदिवस वाढत असून भारताच्या संघटीत किरकोळ व्यापार क्षेत्रात दरवर्षी 35 टक्क्याने वाढ होत आहे तर त्या तुलनेने असंघटीत व्यापार क्षेत्रात फक्त 6 टक्के वाढ होत आहे. भारतातील किरकोळ व्यवसाय सध्या विकासाच्या टप्प्यावर आहे. ओ. टी. किअरनर्स (A. T. Kearneys) यांनी प्रसिद्ध केलेल्या 'ग्लोबल रिटेल डेव्हलपमेंट इंडेक्स च्या अहवालानुसार सलग तीन वर्ष भारतातील किरकोळ व्यापार जगात आघाडीवर आहे तसेच गुतंवणूकीचे आकर्षक क्षेत्र राखण्यात देखील आघाडीवर आहे. 2011 पर्यंत भारतात 900 मॉल्स
    उत्तर लिहिले · 25/11/2021
    कर्म · 121765
    1
    https://shubhvaani.com/start-mobile-shop-business-hindi/
    वरील लिंकवर क्लिक करून सर्व माहिती मिळेल.
    उत्तर लिहिले · 6/9/2020
    कर्म · 1950
    0
    नमस्कार! साताऱ्यामध्ये तुम्हाला फुटवेअरचे दुकान सुरू करायचे आहे आणि त्यासाठी होलसेल माल कुठून खरेदी करावा याबद्दल मार्गदर्शन हवे आहे, तर खाली काही पर्याय आणि सूचना दिल्या आहेत:
    मुंबई:
    • दादर: दादरमध्ये तुम्हाला अनेक होलसेल फुटवेअर विक्रेते मिळतील. इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या चप्पल, बूट आणि सँडल होलसेल दरात मिळू शकतात.
    • Crawford Market: क्रॉफर्ड मार्केट हे मुंबईतील सर्वात जुन्या आणि मोठ्या मार्केटपैकी एक आहे. येथे तुम्हाला फुटवेअरचे अनेक होलसेल व्यापारी मिळतील.
    • Bhuleshwar Market: भुलेश्वर मार्केट हे देखील मुंबईतील एक प्रसिद्ध मार्केट आहे. येथे तुम्हाला विविध प्रकारच्या फुटवेअर होलसेल दरात मिळतील.
    पुणे:
    • M.G. Road: पुण्यातील एम.जी. रोडवर तुम्हाला अनेक होलसेल फुटवेअरचे दुकानदार मिळतील. येथे तुम्हाला चांगल्या प्रतीचे आणि वेगवेगळ्या डिझाइनचे फुटवेअर मिळू शकतात.
    • Laxmi Road: लक्ष्मी रोडवर तुम्हाला लहान-मोठे अनेक होलसेल फुटवेअर विक्रेते मिळतील. येथे तुम्हाला तुमच्या बजेटनुसार फुटवेअर खरेदी करता येईल.
    दिल्ली:
    • Karol Bagh: दिल्लीतील करोल बाग हे फुटवेअर होलसेलसाठी प्रसिद्ध आहे. येथे तुम्हाला विविध प्रकारच्या फुटवेअरचे होलसेल व्यापारी मिळतील.
    • Sadar Bazaar: सदर बाजार हे दिल्लीतील सर्वात मोठे होलसेल मार्केट आहे. येथे तुम्हाला फुटवेअरचे अनेक होलसेल विक्रेते मिळतील.
    इतर पर्याय:
    • तुम्ही ऑनलाईन होलसेल वेबसाइट्स जसे की Indiamart (https://www.indiamart.com/) आणि Tradeindia (https://www.tradeindia.com/) वरून देखील होलसेल दरात फुटवेअर खरेदी करू शकता.
    टीप:
    • प्रत्येक विक्रेत्याकडे वेगवेगळ्या प्रकारची उत्पादने उपलब्ध असतात, त्यामुळे तुमच्या गरजेनुसार आणि बजेटनुसार विक्रेत्याची निवड करा.
    • खरेदी करण्यापूर्वी उत्पादनांची गुणवत्ता तपासा आणि किमतीची तुलना करा.
    • तुम्ही थेट उत्पादकांशी संपर्क साधून देखील होलसेल दरात माल खरेदी करू शकता.
    उत्तर लिहिले · 22/3/2025
    कर्म · 1040