Topic icon

मृत्यू प्रमाणपत्र

1
त्यासाठी तुम्हाला नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये नोंद सापडते का किंवा ती पावती परत भेटते का पहा. साधारणपणे जिथे मृत्यू किंवा जन्म झाला असेल तिथेच हॉस्पिटल नोंद करते. कुटुंबातील व्यक्तींना करण्याची गरज नसते. तुमच्या पुतणीच्या मृत्यूची नोंद नागपूर महानगरपालिकेत किंवा त्या भागात असलेल्या शासकीय संस्थेत होते. एवढे करून नोंद सापडली नाही तर कोर्टामार्फत नोंद करता येते, त्यासाठी तुम्ही जवळच्या वकिलाला भेटा.

उत्तर लिहिले · 9/12/2022
कर्म · 11785
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
0

मृत्यूच्या दाखल्यावर पत्ता (Address) महत्त्वाचा असतो. कारण,

  • ओळख: मृत व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी पत्ता एक महत्त्वाचा पुरावा असतो.
  • कायदेशीर प्रक्रिया: मालमत्ता हस्तांतरण, विमा पॉलिसी, पेन्शन आणि इतर कायदेशीर कामांसाठी मृत्यू दाखल्यावरील पत्ता आवश्यक असतो.
  • सरकारी नोंदी: सरकारी नोंदींमध्ये अचूक माहिती असणे आवश्यक आहे, ज्यामुळे भविष्यात कोणतीही अडचण येऊ नये.

त्यामुळे, मृत्यू दाखल्यावर योग्य पत्ता नमूद करणे आवश्यक आहे.

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 2400
2

व्यक्तीच्या मृत्युनंतर २१ दिवसांच्या आत संबंधित व्यक्तीच्या मृत्यूची नोंद करणे कायद्याने बंधनकारक आहे.त्यानंतर त्याच्या नातेवाईकांना मृत्यू प्रमानपत्र दिले जाते. ज्यात व्यक्तीचे नाव, मृत्यूचे कारण, वेळ, दिनांक ,इ.माहिती नमूद असते.

१ व्यक्ती मृत आहे हे कायदेशीर प्रमाणित करण्यासाठी.

२.न्यायालयीन प्रकरणामध्ये.

३. वारसाहक्क प्रमाणपत्र काढण्यासाठी सिद्ध करण्यासाठी .

४. मयत व्यक्तीचा विमा असल्याचा विमा रक्कम प्राप्तीसाठी व इ. महत्वाच्या सरकारी कामांसाठी होतो.

मृत्यू प्रमाणपत्र प्राप्तीसाठी पद्धत

. जर व्यक्ती घरी मयत झाली असेल तर मयताच्या कुटुंबाच्या जेष्ठ व्यक्तीने जन्ममृत्यु नोंदणी कार्यालयात मयत व्यक्तीची माहिती द्यावी.

.जर व्यक्ती दवाखान्यात मयत झाली असेल तर चिकित्सा प्रभारी द्वारा

. जर व्यक्ती जेलमध्ये मयत झाली असेल तर जेलप्रमुख द्वारा

. व्यक्ती बेवारस अवस्थेत मयत झाली असेल तर सम्बन्धित गावातील सरपंच/पोलिस पाटील द्वारा.

व्यक्तीच्या मयत होण्याच्या सूचनेत नंतर २१ दिवसाच्या आत कार्यालयाच्या विहित नमुन्यातील प्रपत्र भरल्यावर मृत्यूची सत्यता पडताळून मृत्यू प्रमाणपत्र दिले जाते.

अ. एक वर्षावरील मृत्यू नोंदणीचा दाखलासाठी लागणारी कागदपत्रे

.विहीत नमुन्यातील कोर्ट फी स्टँप लावलेला अर्ज व शपत पत्र.

.ग्रामसेवक यांचा दाखला.

.वैद्यकीय अधिकारी /आरोग्य अधिकारी यांचे प्रमाणपत्र

ब. जिल्हा परिषदेसाठी मृत्यू दाखला करिता लागणारी आवश्यक कागदपत्रे

.विहित नमुन्यातील अर्ज व अंगणवाडी / आशावर्कर यांचा मृत्यूचा अहवाल दिनांकासह.

.वैद्यकीय अधिकारी यांचा रिपोर्ट दिनांकासह.
उत्तर लिहिले · 26/4/2020
कर्म · 210095
0
मृत्यू प्रमाणपत्र ऑनलाईन काढण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे:

1. राज्य सरकारचे संकेतस्थळ:

  • प्रत्येक राज्याचे स्वतःचे संकेतस्थळ असते. तिथे जाऊन तुम्ही 'डेथ सर्टिफिकेट' (Death Certificate) साठी अर्ज करू शकता.
  • उदाहरणार्थ, महाराष्ट्रासाठी महाऑनलाइन हे संकेतस्थळ आहे.

2. आवश्यक कागदपत्रे:

  • मृत व्यक्तीचा जन्म दाखला
  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • पॅन कार्ड (असल्यास)
  • मृत्यूचा दाखला (डॉक्टरांनी दिलेला)
  • अर्जदाराचे ओळखपत्र (आधार कार्ड, ভোটার আইডি कार्ड)

3. अर्ज करण्याची प्रक्रिया:

  • संबंधित संकेतस्थळावर जाऊन 'डेथ सर्टिफिकेट' चा पर्याय निवडा.
  • आवश्यक माहिती भरा आणि कागदपत्रे अपलोड करा.
  • अर्ज शुल्क भरा (ऑनलाईन पेमेंटद्वारे).
  • अर्ज सबमिट करा आणि पोचपावती डाउनलोड करा.

4. पडताळणी आणि प्रमाणपत्र:

  • तुमच्या अर्जाची पडताळणी केली जाईल.
  • पडताळणीनंतर, तुम्ही तुमचे डेथ सर्टिफिकेट डाउनलोड करू शकता.

नोंद: प्रक्रिया राज्य सरकारनुसार बदलू शकते. त्यामुळे, अर्ज करण्यापूर्वी तुमच्या राज्याच्या संकेतस्थळावरील सूचना काळजीपूर्वक वाचा.

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 2400
9
मृत्यू प्रमाणपत्र

मृत्यू दाखला मृत्यू प्रमाणपत्र

व्यक्तीच्या मृत्युनंतर २१ दिवसांच्या आत संबंधित व्यक्तीच्या मृत्यूची नोंद करणे कायद्याने बंधनकारक आहे.त्यानंतर त्याच्या नातेवाईकांना मृत्यू प्रमानपत्र दिले जाते. ज्यात व्यक्तीचे नाव, मृत्यूचे कारण, वेळ, दिनांक ,इ.माहिती नमूद असते.

१ व्यक्ती मृत आहे हे कायदेशीर प्रमाणित करण्यासाठी.

२.न्यायालयीन प्रकरणामध्ये.

३. वारसाहक्क प्रमाणपत्र काढण्यासाठी सिद्ध करण्यासाठी .

४. मयत व्यक्तीचा विमा असल्याचा विमा रक्कम प्राप्तीसाठी व इ. महत्वाच्या सरकारी कामांसाठी होतो.

मृत्यू प्रमाणपत्र प्राप्तीसाठी पद्धत

. जर व्यक्ती घरी मयत झाली असेल तर मयताच्या कुटुंबाच्या जेष्ठ व्यक्तीने जन्ममृत्यु नोंदणी कार्यालयात मयत व्यक्तीची माहिती द्यावी.

.जर व्यक्ती दवाखान्यात मयत झाली असेल तर चिकित्सा प्रभारी द्वारा

. जर व्यक्ती जेलमध्ये मयत झाली असेल तर जेलप्रमुख द्वारा

. व्यक्ती बेवारस अवस्थेत मयत झाली असेल तर सम्बन्धित गावातील सरपंच/पोलिस पाटील द्वारा.

व्यक्तीच्या मयत होण्याच्या सूचनेत नंतर २१ दिवसाच्या आत कार्यालयाच्या विहित नमुन्यातील प्रपत्र भरल्यावर मृत्यूची सत्यता पडताळून मृत्यू प्रमाणपत्र दिले जाते.

अ. एक वर्षावरील मृत्यू नोंदणीचा दाखलासाठी लागणारी कागदपत्रे

.विहीत नमुन्यातील कोर्ट फी स्टँप लावलेला अर्ज व शपत पत्र.

.ग्रामसेवक यांचा दाखला.

.वैद्यकीय अधिकारी /आरोग्य अधिकारी यांचे प्रमाणपत्र

ब. जिल्हा परिषदेसाठी मृत्यू दाखला करिता लागणारी आवश्यक कागदपत्रे

.विहित नमुन्यातील अर्ज व अंगणवाडी / आशावर्कर यांचा मृत्यूचा अहवाल दिनांकासह.

.वैद्यकीय अधिकारी यांचा रिपोर्ट दिनांकासह.

उत्तर लिहिले · 27/7/2018
कर्म · 4255