Topic icon

प्राणी जीवनकाल

0
हत्तीचे सरासरी आयुष्य साधारणपणे ६० ते ७० वर्षे असते. काही हत्ती ८० वर्षांपर्यंतही जगू शकतात.

हत्तीचे आयुष्य:

  • सरासरी: ६०-७० वर्षे
  • कधी कधी: ८० वर्षे किंवा त्याहून अधिक
उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 980
6
जंगलात, वाघ 16-18 वर्षे जगतो. प्राणीसंग्रहालयात, वाघ सरासरी 20-25 वर्षे जगतात. . वाघांचा जीवन काळ 20 ते 25 वर्ष असतो, परंतु जर प्राणिसंग्रहालयात त्याला ठेवले तर तो दहा वर्षांपर्यंत जगतो. एका अनुमानानुसार शंभर वर्षांपूर्वी भारतात 40,000 वाघ होते. परंतु आज त्यांची संख्या 3000 राहिलेली आहे
उत्तर लिहिले · 16/5/2022
कर्म · 53720
0
माकडांचे आयुष्य त्यांच्या प्रजातीवर अवलंबून असते. काही लहान माकडे 10 ते 12 वर्षे जगतात, तर काही मोठी माकडे 30 ते 40 वर्षांपर्यंत जगू शकतात. मानवी वस्तीजवळ आढळणारी माकडे साधारणतः 20 ते 25 वर्षे जगतात. * लहान माकडे: 10-12 वर्षे * मोठी माकडे: 30-40 वर्षे * मानवी वस्तीजवळची माकडे: 20-25 वर्षे उदाहरणार्थ, कॅपुचीन माकड 50 वर्षांपर्यंत जगू शकते, तर स्पायडर माकड साधारणपणे 27 वर्षे जगते. माकडांच्या आयुष्यावर त्यांच्या राहणीमानाचा आणि आहाराचा देखील परिणाम होतो.
उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 980
0
भारतीय हत्ती हा ७० वर्षांपर्यंत जगतो.

🎌🎌🎌🎌🎌🎌🎌🎌🎌🎌🎌🎌🎌🎌🎌🎌
5
सरीसृप वर्गातील स्क्वॅमेटा गणाच्या ऑफीडिया उपगणात सापांचा समावेश होतो. ते सरपटणारे, शरीरावर खवले असणारे, पाय नसलेले, अनियततापी व कवचयुक्त अंडज, तर काही जरायुज प्राणी आहेत.
सापांच्या सु. २,५०० जाती असून भारतात ३४० जाती आढळतात. त्यांपैकी फक्त ६९ जातींचे सापविषारी आहेत. महाराष्ट्रात सापांच्या सु. ५२ जाती असून त्यांपैकी १२ जाती विषारी आहेत. साप प्रामुख्याने उबदार हवामानात आणि गवताळ व सुपीक प्रदेशांत आढळतात. साप जमिनीवर तसेच पाण्यातही आढळतात. समुद्रात आढळणारे सर्व साप विषारी, तर गोड्या पाण्यातील सर्व साप बिनविषारी असतात. न्यूझीलंड, आयर्लंड व बर्म्यूडा या प्रदेशांत साप आढळत नाहीत. प्वेर्त रीको, क्यूबा, हैती, हवाई, जमेका, मादागास्कर इ. प्रदेशांत विषारी साप आढळत नाहीत.
सापांच्या जीवाश्मांच्या (शिळारूप झालेल्या अवशेषांच्या) अभ्यासात त्यांचे १० कोटी वर्षांपूर्वीचे जीवाश्म आढळले आहेत. मानवनिर्मितीच्या अगोदरपासूनच साप पृथ्वीवर अस्तित्वात होते. सरीसृपांच्या क्रम-विकासात (उत्क्रांतीत) प्रथम सरडे व त्यानंतर साप निर्माण झाले. पूर्वी सापांना लहान पाय होते; परंतु साप बिळात राहत असल्याने त्यांना पायांचा अडथळा होऊ लागला व क्रमविकासात पाय अनावश्यक ठरल्याने हळूहळू सापांचे पाय नष्ट झाले.
अधिवास
साप सर्व प्रकारच्या अधिवासांत आढळतात. गोड्या तसेच समुद्राच्या पाण्यात, गवताळ व खडकाळ प्रदेशांत, दलदली जवळ व पर्वतावर सापांचे वास्तव्य असते. उष्णकटिबंधातील जंगलात ते मोठ्या प्रमाणावर आढळतात. वाळवंटात राहणाऱ्या या सापांच्या अंगावरील खवल्यांना बारीक उंचवटे असतात, त्यामुळे वाळूवरून सरपटताना त्यांना पकड मिळते. या सापांच्या डोक्यावरील भागास उंचवटे असल्याने त्यांना वाळूत पुरून घेण्यास मदत होते. रेड स्पॉटेड स्नेक व रजतवंशी (रॉयल स्नेक) हे वाळवंटात राहणारे साप आहेत.
काही साप झाडावर राहतात. या सापांचे वास्तव्य फांद्यांवर, झुडपांत व झाडांच्या ढोलीत असते. त्यांची शेपटी लांब असल्याने वरच्या फांदीवरून खालच्या फांदीवर येताना ते वरच्या फांदीस वेटोळे टाकून आपल्या शरीराचा पूर्ण भार पेलू शकतात; उदा., वाईन स्नेक, उडता सोनसर्प (फ्लाईंग स्नेक). नद्या, तळी व नाले यांच्या आसपास आढळणाऱ्या या सापांना पाणसर्प म्हणतात. या सापांची नासाद्वारे डोक्याच्या वरील बाजूस असतात. त्यांना श्वसनासाठी पूर्ण डोके पाण्याबाहेर काढण्याची गरज भासत नाही. उदा., विरोळा, पट्टेरी पाणसाप, पाणदिवड इत्यादी.
साप कायम एकाच प्रकारच्या अधिवासात राहत नाहीत. पाणसर्प जमिनीवर किंवा जमिनीवरील साप पाण्यात आढळू शकतात. साप जमिनीवर बिळात राहतात; परंतु ते स्वतः बिळे तयार करत नाहीत. मुंग्यांच्या वारूळात किंवा उंदीर व इतर प्राण्यांनी तयार केलेल्या बिळात ते राहतात.
जगात सर्वांत लांब असणारा बिनविषारी साप पायथॉन रेटिक्युलेटस [ ⟶ अजगर] हा असून त्याची लांबी ११–११·५ मी. असते. ⇨ ॲनॅकाँडा याची लांबी सु.९ मी. व वजन सु. ५०० किग्रॅ. असते. बिनविषारी सापांमध्ये सर्वांत लहान ⇨आंधळा साप (ब्लाइंड स्नेक) हा असून त्याची लांबी सु. १० सेंमी. असते. ⇨नागराज (किंग कोब्रा) हा विषारी सापांतील मोठा साप असून त्याची लांबी ४·५–५·४ मी. असते. वजनाने मोठा व विषारी साप ईस्टर्न डायमंडबॅक रॅटलस्नेक हा असून त्याची लांबी २-३ मी. व वजन सु. १५·५ किग्रॅ. असते. विषारी सापांमध्ये सर्वां लहान साप स्लाईड स्नेक (वार्म स्नेक) हा आहे.
हालचाल
साप एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सरपटत जातो. तो सरपटताना तोंडापासून शेपटीपर्यंत संपूर्ण शरीराचा वापर करतो. त्याच्या शरीरात १००–३०० मणके (कशेरुक) असतात. प्रत्येक मणक्यास दोन बरगड्या जोडलेल्या असतात. त्यामुळे त्याचे शरीर लवचिक व सहज वळण्यासारखे बनते. शरीर जमिनीला सपाट ठेवून त्याच्या शरीराला ‘S’ आकाराची अनेक वळणे तयार होतात. तो खडक व जमीन अशा कठिण भागांवर दाब देऊन सरपटत पुढे सरकत असतोसरीसृप वर्गातील स्क्वॅमेटा गणाच्या ऑफीडिया उपगणात सापांचा समावेश होतो. ते सरपटणारे, शरीरावर खवले असणारे, पाय नसलेले, अनियततापी व कवचयुक्त अंडज, तर काही जरायुज प्राणी आहेत.
सापांच्या सु. २,५०० जाती असून भारतात ३४० जाती आढळतात. त्यांपैकी फक्त ६९ जातींचे सापविषारी आहेत. महाराष्ट्रात सापांच्या सु. ५२ जाती असून त्यांपैकी १२ जाती विषारी आहेत. साप प्रामुख्याने उबदार हवामानात आणि गवताळ व सुपीक प्रदेशांत आढळतात. साप जमिनीवर तसेच पाण्यातही आढळतात. समुद्रात आढळणारे सर्व साप विषारी, तर गोड्या पाण्यातील सर्व साप बिनविषारी असतात. न्यूझीलंड, आयर्लंड व बर्म्यूडा या प्रदेशांत साप आढळत नाहीत. प्वेर्त रीको, क्यूबा, हैती, हवाई, जमेका, मादागास्कर इ. प्रदेशांत विषारी साप आढळत नाहीत.
सापांच्या जीवाश्मांच्या (शिळारूप झालेल्या अवशेषांच्या) अभ्यासात त्यांचे १० कोटी वर्षांपूर्वीचे जीवाश्म आढळले आहेत. मानवनिर्मितीच्या अगोदरपासूनच साप पृथ्वीवर अस्तित्वात होते. सरीसृपांच्या क्रम-विकासात (उत्क्रांतीत) प्रथम सरडे व त्यानंतर साप निर्माण झाले. पूर्वी सापांना लहान पाय होते; परंतु साप बिळात राहत असल्याने त्यांना पायांचा अडथळा होऊ लागला व क्रमविकासात पाय अनावश्यक ठरल्याने हळूहळू सापांचे पाय नष्ट झाले.
अधिवास
साप सर्व प्रकारच्या अधिवासांत आढळतात. गोड्या तसेच समुद्राच्या पाण्यात, गवताळ व खडकाळ प्रदेशांत, दलदली जवळ व पर्वतावर सापांचे वास्तव्य असते. उष्णकटिबंधातील जंगलात ते मोठ्या प्रमाणावर आढळतात. वाळवंटात राहणाऱ्या या सापांच्या अंगावरील खवल्यांना बारीक उंचवटे असतात, त्यामुळे वाळूवरून सरपटताना त्यांना पकड मिळते. या सापांच्या डोक्यावरील भागास उंचवटे असल्याने त्यांना वाळूत पुरून घेण्यास मदत होते. रेड स्पॉटेड स्नेक व रजतवंशी (रॉयल स्नेक) हे वाळवंटात राहणारे साप आहेत.
काही साप झाडावर राहतात. या सापांचे वास्तव्य फांद्यांवर, झुडपांत व झाडांच्या ढोलीत असते. त्यांची शेपटी लांब असल्याने वरच्या फांदीवरून खालच्या फांदीवर येताना ते वरच्या फांदीस वेटोळे टाकून आपल्या शरीराचा पूर्ण भार पेलू शकतात; उदा., वाईन स्नेक, उडता सोनसर्प (फ्लाईंग स्नेक). नद्या, तळी व नाले यांच्या आसपास आढळणाऱ्या या सापांना पाणसर्प म्हणतात. या सापांची नासाद्वारे डोक्याच्या वरील बाजूस असतात. त्यांना श्वसनासाठी पूर्ण डोके पाण्याबाहेर काढण्याची गरज भासत नाही. उदा., विरोळा, पट्टेरी पाणसाप, पाणदिवड इत्यादी.
साप कायम एकाच प्रकारच्या अधिवासात राहत नाहीत. पाणसर्प जमिनीवर किंवा जमिनीवरील साप पाण्यात आढळू शकतात. साप जमिनीवर बिळात राहतात; परंतु ते स्वतः बिळे तयार करत नाहीत. मुंग्यांच्या वारूळात किंवा उंदीर व इतर प्राण्यांनी तयार केलेल्या बिळात ते राहतात.
जगात सर्वांत लांब असणारा बिनविषारी साप पायथॉन रेटिक्युलेटस [ ⟶ अजगर] हा असून त्याची लांबी ११–११·५ मी. असते. ⇨ ॲनॅकाँडा याची लांबी सु.९ मी. व वजन सु. ५०० किग्रॅ. असते. बिनविषारी सापांमध्ये सर्वांत लहान ⇨आंधळा साप (ब्लाइंड स्नेक) हा असून त्याची लांबी सु. १० सेंमी. असते. ⇨नागराज (किंग कोब्रा) हा विषारी सापांतील मोठा साप असून त्याची लांबी ४·५–५·४ मी. असते. वजनाने मोठा व विषारी साप ईस्टर्न डायमंडबॅक रॅटलस्नेक हा असून त्याची लांबी २-३ मी. व वजन सु. १५·५ किग्रॅ. असते. विषारी सापांमध्ये सर्वां लहान साप स्लाईड स्नेक (वार्म स्नेक) हा आहे.
हालचाल
साप एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सरपटत जातो. तो सरपटताना तोंडापासून शेपटीपर्यंत संपूर्ण शरीराचा वापर करतो. त्याच्या शरीरात १००–३०० मणके (कशेरुक) असतात. प्रत्येक मणक्यास दोन बरगड्या जोडलेल्या असतात. त्यामुळे त्याचे शरीर लवचिक व सहज वळण्यासारखे बनते. शरीर जमिनीला सपाट ठेवून त्याच्या शरीराला ‘S’ आकाराची अनेक वळणे तयार होतात. तो खडक व जमीन अशा कठिण भागांवर दाब देऊन सरपटत पुढे सरकत असतो.
अजगर व घोणस यांसारखे वजनाने जड साप सरळ रेषेत सरपटत पुढे जातात. त्यांचे पोटाखालचे अधर शल्क पृष्ठभागामध्ये घट्ट रोवतात व त्वचेच्या आतील शरीर स्नायूंसह पुढे सरकते. अधर शल्काची पकड ढिली होते. तेव्हा ते पुढे सरकतात व पुन्हा पृष्ठभागात घट्ट पकड घेतात. या पद्घतीत सर्व शरीर जमिनीला घासत असल्याने या सापाचा वेग मंद असतो. रेताड प्रदेशातील सापाची वक्रगती (वेलांटी) चाल असते. ज्या दिशेला त्याला पुढे जायचे त्या दिशेच्या काटकोनात तो शरीर सरकवितो. पुढे सरकताना साप डोके व मान जमिनीपासून वर उचलून त्या दिशेच्या बाजूस फेकतो; जमिनीवर प्रथम मान व नंतर शेपटी टेकते. शेपटी जमिनीवर टेकल्यावर पुन्हा डोके व मान उचलून त्या दिशेच्या बाजूस फेकतो. कोकणात आढळणारा फुरसे हा साप या पद्घतीने हालचाल करतो.
सगळेच साप पाण्यात पोहू शकतात; परंतु पाण्यात दीर्घकाळ पोहण्याची व राहण्याची क्षमता फक्त पाणसर्पांमध्येच असते. पोहताना तो डोके पाण्याच्या वर काढतो. शरीराला हेलकावे देऊन पुढे सरकतो. तो शेपटीचा वापर वल्ह्यासारखा करतो.
अन्न
सापांना मेलेले भक्ष्य खाणे आवडत नाही. उंदीर, घुशी, सरडे, पाली, बेडूक इ. सापांचे अन्न आहे. पाणसाप बेडूक व मासे खातात. काही साप झाडावरील घरट्यांमध्ये असलेली पक्ष्यांची अंडी खातात. सापांच्या तोंडाच्या विशिष्ट रचनेमुळे ते स्वतःपेक्षा मोठ्या आकारमानाचे प्राणीही गिळू शकतात. नाग व घोणस यांसारखे विषारी साप भक्ष्याला पकडतात, त्यास दंश करून ठार मारतात. धामण व पाणसाप भक्ष्य पकडतात आणि ते जिवंत असतानाच गिळून टाकतात. ते डोक्याकडून भक्ष्य गिळतात. अजगरासारखे बिनविषारी साप दबा धरून बसतात. भक्ष्य जवळ आले की, त्यावर झडप घालून पकडतात आणि त्याच्याभोवती घट्ट वेटोळे घालून त्यास ठार मारतात. सापाला एकदा अन्न मिळाले की, त्याला काही दिवस अन्नाची गरज भासत नाही. काही साप अन्नपाण्याशिवाय कित्येक महिने जिवंत राहू शकतात. नागराज व मण्यार हे इतर सापांनादेखील अन्न म्हणून खातात.
त्वचा व व रंग
सर्व सापांच्या शरीरावर शुष्क व खरबरीत खवल्यांचे आवरण असते. हे खवले केराटिनापासून तयार झालेले असतात. साप स्वतःची त्वचा नियमित बदलत असतो, यास कात टाकणे असे म्हणतात. कात टाकताना त्याच्या हालचाली मंद होतात व त्यास डोळ्याने दिसत नाही. वरची त्वचा पूर्णपणे निघून जाते व आतमध्ये नवीन त्वचा तयार होते. कात टाकण्याची क्रिया विशिष्ट काळानंतर पुनःपुन्हा होत असते. साप वर्षातून एकापेक्षा अधिक वेळा कात टाकत असतात.
सापांचा रंग निसर्गनियमानुसार सभोवतालच्या वातावरणाशी मिळता-जुळता असणारा असतो. यामुळे साप अगदी जवळ गेल्याशिवाय दिसत नाहीत. या रंगसंगतीचा फायदा सापांना भक्ष्य शोधण्यासाठी तसेच शत्रूपासून बचाव करण्यासाठी होतो. साप विविध रंगांमध्ये आढळतात. रंगातील विविधता, शरीरावरील ठिपके व खुणा या गोष्टींची सापाची जात ओळखण्यास मदत होते.
सापाचे शरीर दोरीसारखे लांबट व लवचिक असते. ते डोके, धड व शेपटी यांमध्ये विभागलेले असते. त्याला बाह्य कर्ण नसतात. त्याच्या डोक्यावरील खवले सापाची जात ओळखण्यास उपयुक्त असतात. सापाची वाढ आयुष्यभर होत असते. शीतनिष्कियतेच्या काळात सापाची हालचाल मंदावते. तो सुरक्षित जागी पडून राहतो. त्याच्या शरीरातील सर्व क्रिया मंद होतात; शरीरात साठविलेल्या चरबीवर तो जिवंत राहतो.
कंकाल तंत्र : सापाचे कंकाल तंत्र पृष्ठवंशी प्राण्यांसारखे असते. ते अस्थियुक्त असून मेरुदंड (कशेरुक दंड) लांब असतो. यामध्ये २०० ते ३०० कशेरुक असतात. पहिले दोन मणके व शेपटीचे मणके सोडून, सर्व मणक्यांना बरगड्या असतात. शेपटीमधील मणके व बरगड्या यांचे एकत्रीकरण झालेले असते. सापामध्ये स्कंध मेखला, श्रोणी मेखला व उरोस्थी नसतात.
पचन तंत्र : सापांचे पचन तंत्र सरीसृप प्राण्यांसारखे असते. यामध्ये तोंड, लालाग्रंथी, ग्रसिका, जठर व अवस्कर यांचा समावेश होतो. त्यांना पित्ताशय, यकृत व प्लीहा असतात. तोंडवरचा जंभ (जबडा) व खालचा जंभ यांपासून तयार झालेले असते. खालचा जंभ कवटीला लवचिक बंधांनी जोडलेला असतो. जीभ मऊ असून दोन भागांत विभागलेली असते. ती जबड्यातून आत बाहेर हालचाल करीत असते. दोन्ही जंभांत आतील बाजूस वळलेल्या दातांची रांग असते. विषारी सापामध्ये लालाग्रंथींच्या एका जोडीचे रूपांतर विषग्रंथीमध्ये झालेले असते. पचन तंत्रामध्ये त्वचा, पिसे, हाडे (अस्थी) व शिंगे यांचेही पचन होते.
श्वसन तंत्र : बहुतेक साप फुप्फुसाच्या साहाय्याने श्वसन करतात. काही सापांमध्ये डावे फुप्फुस नसते. उजव्या फुप्फुसाचे दोन भाग असतात. ते लांबट असून वृक्कापर्यंत पसरलेले असते. नासीय छिद्रे व श्वासनलिका यांद्वारे हवा फुप्फुसात घेतली जाते. अजगरामध्ये दोन फुप्फुसे असतात.>
रुधिराभिसरण तंत्र : सापाच्या हृदयामध्ये तीन कप्पे असतात. दोन अलिंदे व एक निलय असते. निलय पडद्याने अपुरे विभागलेले असते. फुप्फुसाकडून शुद्घ रक्त निलयामध्ये येते. हृदयात शुद्घ व अशुद्घ रक्ताचे मिश्रण थोड्याफार प्रमाणात होत असते. रक्तवाहिन्यांमार्फत असे रक्त शरीराच्या सर्व भागांना पुरविले जाते.
उत्सर्जन तंत्र : या तंत्रामध्ये लांबट वृक्कांची एक जोडी, उत्सर्जन नलिका, मूत्रवाहिनी व अवस्कर यांचा समावेश होतो. स्वतंत्र मूत्राशय बऱ्याच सापांमध्ये नसते.
आ. १. पाण्यात राहणाऱ्या मोकॅसीन (नर) सापाचा सांगाडा व आतील इंद्रिये
तंत्रिका तंत्र : (मज्जासंस्था). सस्तन प्राण्यांच्या तुलनेत सापाचा मेंदू लहान असतो. यामध्ये गंधकंद, प्रमस्तिष्क गोलार्ध, अनुस्तिष्क व लंबमज्जा यांचा समावेश होतो. लंबमज्जेपासून अधर बाजूस मेरुरज्जू तयार झालेला असतो.
ज्ञानेंद्रिये : वातावरणातील उद्दीपनाचे आकलन होण्याकरिता सापांमध्ये ज्ञानेंद्रिये असतात. ज्ञानेंद्रिये त्रिका तंत्राशी संलग्न असतात. दृष्टी, श्रवण व गंध यांची ज्ञानेंद्रिये सापांना असतात.
दृष्टी : सापांच्या डोळ्यांवर पापण्या नसतात, त्यामुळे डोळे सतत उघडे असतात. त्यांची दृष्टी एकनेत्री असते. नेत्रभिंगाचा आकार गोल किंवा उभट असतो. स्नायूच्या दाबाने नेत्रभिंगाचे आकारमान कमी-जास्त होते; त्यामुळे एखाद्या वस्तूचे चित्र त्यांना दिसते. नेत्रभिंग लहान टप्प्याच्या मर्यादेपर्यंत फिरू शकतात. त्यांच्या नजरेचा टप्पा मर्यादित असतो.
श्रवण : सापांना सस्तन प्राण्यांसारखे बाह्यकर्ण व मध्यकर्ण नसतात. नाग व फुरसे यांच्या अंतर्कर्णामध्ये एक अस्थी आढळते. सापाच्या शरीरावर कर्णछिद्रे नसतात. यामुळे सापांना कान (कर्ण) नसतात असे म्हटले जाते. साप जमिनीच्या कंपनांद्वारे हालचाल ग्रहण करतात. मोठ्या आवाजाचा सापावर फारसा परिणाम होत नाही. आवाज करणाऱ्या वस्तूने हालचाल केल्यास सापाला धोक्याची जाणीव होते.
घाणेंद्रिये : सापांना गंधज्ञान जीभ व याकॉपसन अवयवामार्फत (मुखात उघडणाऱ्या दोन धानीसारख्या म्हणजे पिशवीसारख्या अंगामार्फत) होते. त्याची जीभ लांब असून बाहेरील टोकाजवळ विभागलेली असते. जिभेच्या साहाय्याने हवेतील सूक्ष्म धूलिकण व गंधकण याकॉपसन अवयवापर्यंत पाठविले जातात. या अवयवामध्ये धूलिकण व गंधकणांचे पृथक्करण केले जाते व सापांना गंधज्ञान होते. यासाठीच सापाची जीभ तोंडाबाहेर सतत वळवळत असते. सापाला याकॉपसन अवयवाचा उपयोग भक्ष्य शोधणे, शत्रू ओळखणे, प्रजननासाठी जोडीदार निवडणे इत्यादींसाठी होतो.
जनन तंत्र : साप एकलिंगी प्राणी असून त्यांचे प्रजनन लैंगिक प्रकाराने होते. नर व मादी बाह्य रूपावरून ओळखता येत नाहीत. नरामध्ये देहगुहेत कण्याच्या दोन्ही बाजूंस पिवळ्या रंगाचे लंबगोल वृषण असतात. यांत शुकाणू तयार होतात. प्रत्येक वृषणापासून शुक्रनलिका निघते. त्यांतून शुक्राणूचे वहन होते. शुक्रनलिका मूत्रनलिकेत उघडते. मूत्रनलिका अवस्करात असलेल्या मैथुनांगामध्ये उघडते. मिलनाच्या वेळी नरमैथुनांगाच्या साहाय्याने रेत मादीच्या अवस्करात सोडतो.
मादीच्या देहगुहेत कण्याच्या दोन्ही बाजूंस लांबट आकाराचे अंडाशय असतात. यांमध्ये अंडी तयार होतात. अंडाशयाच्या बाजूस अंडनलिका असतात व त्या अवस्करात उघडतात.
मिलन : बहुतेक सापांचा वर्षांतून एकदाच त्यांच्या जातीच्या माद्यांशीच समागम होतो. प्रत्येक जातीचा विणीचा हंगाम ठरलेला असतो. फुरसे, पट्टेरी पाणसाप व कवड्या साप यांची वीण वर्षातून दोनदा होते. प्रजनन काळात मादी योनी ग्रंथीतून सुगंधी स्राव सोडते. या स्रावाच्या वासामुळे नर मादीकडे आकर्षित होतो. नर मादीला मीलनासाठी उत्तेजित करतो. नर-मादीचे मीलन मादी जमिनीवर आडवी पडलेली असताना होते. समागमासाठी मादी नराच्या ज्या बाजूला असते त्या बाजूच्या अर्धशिश्नाचा (मैथुनांगाचा) समागमासाठी वापर होतो (नराच्या मैथुनागांत दोन अर्धशिश्नांची जोडी असते). नागराजामध्ये नर प्रतिसाद देणाऱ्या मादीवर बसतो. मादी डोके उचलते, फणा काढते व शेवटी त्यांचे मीलन होते. त्यांचे मीलन सु. दोन तास चालते.
मीलन काळात मादीसाठी नरांमध्ये स्पर्धा आढळते. दोन नर साप कित्येक तास एकमेकांना विळखे घालतात व मागील भागावर उभे राहून दुसऱ्यास हतबल करण्याचा प्रयत्न करतात.
मादीच्या शरीरात अंड्याचे फलन होते. मादी फलनानंतर सुरक्षित ठिकाणी अंडी घालते. अजगर, धामण, नाग व मण्यार हे साप अंडी घालतात. घोणस, समुद्रसाप, फुरशी व हरानाग हे साप पिलांना जन्म देतात. या जातीत गर्भाची वाढ अंड्यातील पीतकावर होते. अंड्यांची संख्या सापाच्या जातीवर व त्याच्या आकारमानावर अवलंबून असते. सापाची मादी ४ पासून १०० पर्यंत अंडी घालते. नागराजाची मादी बांबूची पाने व काटक्यांचा वापर करून शंक्वाकार घरटे तयार करते आणि त्यात अंडी घालते.
अंडी उबविणे : सापाचा गर्भावधी काळ ६० ते ८० दिवसांचा असतो. भ्रूणाची वाढ होण्यासाठी अंड्याला उष्णता मिळणे आवश्यक असते. अजगराची मादी स्वतःच्या अंगातील उष्णतेने अंडी उबविते. नाग, मण्यार व नागराज अंड्यांतून पिले बाहेर पडेपर्यंत अंड्यांच्या जवळपास राहतात.
अंड्यांतील पिलांची पूर्ण वाढ झाली की, ती नासिकेच्या शेंड्यावर असलेल्या दातांनी (एग टूथ) अंड्यांचे कवच फोडून बाहेर पडतात. अंड्यांतून पिले बाहेर पडताच मादी त्यांना सोडून निघून जाते. साधारणपणे पिले आठवडाभर एकत्रित राहतात व नंतर वेगवेगळ्या ठिकाणी निघून जातात.
वाढ व जीवनकाल : पिलांची वाढ पहिल्या दोन-तीन महिन्यांत वेगाने होते. सापाची पिले दिसायला त्याच्या कुलातील मोठ्या सापासारखीच (आकारमानाने लहान) दिसतात. सुरुवातीच्या एक-दोन महिन्यांत ती कात टाकतात. त्यांना पक्षी, मुंगूस व घोरपड यांपासून सावध राहावे लागते. लपून राहणे व शत्रूपासून सुटका करून घेण्यासाठी त्यांना फसविणे यांद्वारे ती स्वतःचे रक्षण करतात.
नैसर्गिक परिस्थितीत साप किती वर्षे जगतात हे सांगणे कठिण आहे. नैसर्गिक परिस्थितीत साप २५ ते ३० वर्षे जगत असावेत असे प्राणिशास्त्रज्ञांचे अनुमान आहे. पाळीव साप ५ ते ६ वर्षे जगतात. अजगर सु. २० वर्षे जगतात.
सापाचे शत्रू : सापाबद्दल असलेल्या गैरसमजुती व भीती यांमुळे मानवाकडून साप मोठ्या प्रमाणावर मारले जातात. यामुळे मानव हा सापाचा प्रमुख शत्रू आहे, असे मानले जाते. सापांच्या कातडीचा व्यापार करणारे लोक कातडीसाठी सापांना मारतात. बहिरी ससाणा, घुबड, बगळा, करकोचा व गरुड यांसारखे पक्षी साप मारून खातात. तसेच साप हे मुंगसाचे आवडते भक्ष्य आहे. ऑस्ट्रेलिया, आफ्रिका व अमेरिका या खंडांत आणि चीन व थायलंड या देशांत सापांचा खाद्यात उपयोग केला जातो. जपानमध्ये सापाच्या चरबीपासून मद्य बनवितात.
साप स्वसंरक्षणासाठी निरनिराळ्या युक्त्या योजतात. फुरसे, अजगर व रजतवंशीसारखे साप जोरजोराने सतत फुत्कार सोडतात. काही साप फण्यासारखी आपली मान उंच करून शत्रूला भीती दाखवितात. नाग चपळाईने फणा काढून शत्रूवर आक्रमणाचा पवित्रा घेतो. बिनविषारी पाणसापदेखील फणा काढल्यासारखे डोके व मान उंचावतात आणि फुत्कार सोडतात. काही साप त्यांच्या समोर आलेला शत्रू दूर जाईपर्यंत निपचित पडून राहतात, तर काही अंगाचे वेटोळे करून जमिनीवर पडून राहतात. काही साप पकडताच दुर्गंधी सोडतात. त्यांना डिवचले, त्यांच्या अंगावर पाय पडला किंवा त्यांना इजा केली तर ते चावा घेतात. साप शक्यतो मानवापासून दूर राहण्याची काळजी घेतात.
वर्गीकरण : प्राणिशास्त्राच्या नियमांनुसार सापांचे वर्गीकरण पुढील १३ कुलांत केले आहे : (१) बोइडी, (२) पायथॉनिडी, (३) टिफ्लॉपिडी, (४) लेप्टोटिफ्लॉपिडी, (५) ॲनिलिडी, (६) युरोपेल्टिडी, (७) झिनोपेल्टिडी, (८) ॲकोकॉर्डिडी, (९) कोल्युब्रिडी, (१०) इलॅपिडी, (११) हायड्रोफिडी, (१२) व्हायपरिडी व (१३) क्रोटॅलिडी. यांपैकी पहिली नऊ कुले बिनविषारी व उरलेली चार कुले विषारी सापांची आहेत.
स्नेक्स ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक पी. जे. देवरस यांच्या मतानुसार भारतात बिनविषारी सापांच्या १६४ जाती व विषारी सापांच्या ५२ जाती अशा एकूण २१६ जाती आहेत.
उत्तर लिहिले · 17/9/2018
कर्म · 3710
3
हत्ती अनेक प्रकारचे असतात. त्यामध्ये भारतातले हत्ती ७० ते ८० वर्षांचे असतात.
उत्तर लिहिले · 3/4/2017
कर्म · 705