Topic icon

वाहन चालक परवाना

8
☙एसटी बस व खासगी प्रवासी वाहने चालविण्यासाठी चालकाला व वाहकाला बॅचबिल्ला काढणे गरजेचे असते. चालक-वाहकांसाठी बॅच बिल्ला एक महत्त्वाचे दस्तऐवज असून त्याशिवाय सार्वजनिक प्रवासी वाहन चालविणे गुन्हा ठरतो. हा बॅचबिल्ला प्रादेशिक परिवहन कार्यालयात मिळत असून तो कसा काढावा, याची अनेकांना माहिती नसल्यामुळे त्यांची दलालांकडून फसवणूक होण्याची शक्यता असते.■ चालक व वाहकांसाठी बॅच बिल्ला देताना त्याचा चारित्र्य अहवाल तपासून प्राप्त अहवालावरून मोटार वाहन निरीक्षकांच्या चाचणीत उत्तीर्णझाल्यास त्याला प्रादेशिक परिवहन कार्यालयातून बॅच बिल्ला देण्याची प्रक्रिया आहे.
1) शाळेचा दाखला
2) रेशन कार्ड़
3)आधार कार्ड
4) noc सर्टिफिकेटस
इ. कागदपत्रे लागतील.