सुरक्षितता
3
Answer link
मुलींनी बाहेर वावरताना घ्यायची काळजी किंवा नियम खालीलप्रमाणे आहेत:
- सुरक्षित ठिकाणी जा: शक्यतोवर भरवस्तीच्या आणि प्रकाश असलेल्या ठिकाणांहूनच प्रवास करा. अनोळखी आणि सुनसान ठिकाणी जाणे टाळा.
- सोबत कोणीतरी असावे: शक्य असल्यास, एकट्याने जाणे टाळा आणि मित्र किंवा कुटुंबातील सदस्यांना सोबत घ्या.
- मोबाइल फोनचा वापर: तुमचा फोन चार्ज ठेवा आणि तो सहज उपलब्ध ठेवा. आपत्कालीन स्थितीत मदतीसाठी 112 नंबरवर संपर्क साधा.
- आत्मविश्वास: चालताना आणि बोलताना आत्मविश्वास ठेवा. तुमचा आत्मविश्वास बघून गैरवर्तन करणारे लोक दूर राहू शकतात.
- परिस्थितीनुसार निर्णय: जर तुम्हाला कोणाबद्दल शंका आली, तर तत्काळ तिथून निघून जा. तुमच्या अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवा.
- गैरवर्तन झाल्यास: जर तुमच्यासोबत गैरवर्तन झाले, तर त्वरित पोलिसात तक्रार करा.
- सुरक्षिततेची साधने: तुम्ही पेपर स्प्रे किंवा तत्सम साधने सोबत ठेवू शकता.
- वेळेचं भान: रात्री उशिरापर्यंत बाहेर राहणे टाळा.
- स्थानिक संपर्क: तुम्ही ज्या ठिकाणी जात आहात, तेथील स्थानिक लोकांचे संपर्क क्रमांक ठेवा. ज्यामुळे गरज पडल्यास तुम्ही त्यांना संपर्क करू शकता.
0
Answer link
असुरक्षित कृती म्हणजे अशी कोणतीही कृती जी धोकादायक असते आणि ज्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते.
उदाहरणार्थ:
- सुरक्षा उपकरणे न वापरणे.
- घाई करणे.
- नियमांचे उल्लंघन करणे.
- धोकादायक स्थितीत काम करणे.
असुरक्षित कृती टाळणे महत्त्वाचे आहे कारण ते अपघात आणि जखमांचे मुख्य कारण आहे.
0
Answer link
राजकीय उपाय:
- आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवणे: जगातील सर्व राष्ट्रांनी एकत्र येऊन काम करणे, ज्यामुळे शांतता आणि सुरक्षितता टिकून राहील.
- संघर्ष निवारण: दोन देशांमधील वाद शांततेने सोडवण्यासाठी संवाद आणि मध्यस्थीचा वापर करणे.
- शस्त्रांवर नियंत्रण: घातक शस्त्रांची निर्मिती आणि प्रसार रोखण्यासाठी नियम बनवणे.
आर्थिक उपाय:
- गरिबी निर्मूलन: जगातील गरिबी कमी करण्यासाठी उपाययोजना करणे, कारण गरिबीमुळे असंतोष वाढतो आणि त्याचा परिणाम सुरक्षिततेवर होतो.
- समान विकास: सर्व देशांना समान संधी मिळायला हवी, ज्यामुळे कोणताही देश मागासलेला राहणार नाही.
सामाजिक उपाय:
- शिक्षण आणि जागरूकता: लोकांना शांतता, सहिष्णुता आणि मानवाधिकार यांबद्दल शिक्षित करणे.
- सांस्कृतिक आदानप्रदान: वेगवेगळ्या संस्कृतींमधील लोकांना एकत्र आणून त्यांच्यात समंजसपणा वाढवणे.
तंत्रज्ञानाचा वापर:
- सायबर सुरक्षा: सायबर हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करणे आणि माहिती सुरक्षित ठेवणे.
- Early Warning Systems: लवकर धोक्याचा अंदाज देणारी प्रणाली विकसित करणे, ज्यामुळे नैसर्गिक आपत्ती आणि मानवनिर्मित संकटांपासून बचाव करता येईल.
टीप: हे काही उपाय आहेत ज्यांच्या मदतीने जागतिक सुरक्षितता वाढवता येऊ शकते.
0
Answer link
जास्त वेग नेहमीच आत्मघाती ठरतो असे नाही, पण अनेक प्रकरणांमध्ये तो धोकादायक नक्कीच ठरू शकतो.
या संदर्भात काही मुद्दे खालीलप्रमाणे:
- अपघाताची शक्यता: जास्त वेगाने गाडी चालवताना, नियंत्रण सुटण्याची शक्यता वाढते, ज्यामुळे अपघात होऊ शकतो.
- प्रतिक्रिया वेळ: अचानक काही समोर आल्यास, वेग जास्त असल्यामुळे प्रतिक्रिया देण्यासाठी कमी वेळ मिळतो.
- दुखापत: वेगामुळे अपघात झाल्यास, गंभीर दुखापत होण्याची शक्यता अधिक असते.
- मृत्यू: काही प्रकरणांमध्ये, जास्त वेगामुळे झालेले अपघात जीवघेणे ठरू शकतात.
त्यामुळे, वेग मर्यादेत गाडी चालवणे आणि सुरक्षित ड्राईव्हिंग करणे महत्त्वाचे आहे.
Disclaimer: हे उत्तर केवळ माहितीसाठी आहे आणि ते व्यावसायिक वैद्यकीय किंवा कायदेशीर सल्ला म्हणून मानले जाऊ नये.
3
Answer link
गिझर चालू करताना अगोदर पाणी चालू करावे नंतर सिलेंडरचा कॉक चालू करावा. गिझर बंद करताना अगोदर सिलेंडरचा कॉक बंद करावा नंतर पाणी बंद करावे. गिझर चालू असताना बादली भरेपर्यंत बाथरूमचा दरवाजा उघडा असावा, गिझर बंद केल्यानंतर दरवाजा लावून घ्यावा. शॉवर घ्यायचा असेल तर दरवाजा अर्धवट उघड ठेवावा.
एमपीसी न्यूज- गॅस गिझरमधून बाहेर पडलेल्या वायूमुळे एका 30 वर्षीय तरुणाचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी कोथरूडमध्ये घडली. या अनुषंगाने घरामध्ये गॅस गिझर वापरताना काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
अंघोळीला गरम पाण्यासाठी आता घरोघरी गॅस गिझरचा वापर केला जातो. परंतु गॅस गिझर वापरताना कोणती काळजी घ्यावी याबाबत अनेक जणांना माहिती नसते. त्यातूनच दुर्घटना घडून माणसाचा जीव जातो. या पूर्वी देखील पुण्यात गॅस गिझरच्या दुर्घटनेत काही जणांना आपला जीव गमवावा लागलेला आहे.
गॅस गिझर वापरताना कोणती काळजी घ्यावी ? गिझरसाठी गॅस सिलेंडर कुठे ठेवावा ? आंघोळीला जाताना काय काळजी घ्यावी, याबाबत पुण्यात पाषाण येथे असलेले गॅस गिझर विक्रेते मोहन हिंगडे यांनी माहिती दिली. मागील 25 वर्षांपासून समर्थ गॅस या नावाने ते गॅस गिझरची विक्री करतात.
गॅस गिझर खिडकीजवळ खिडकीच्या top पासून 6 इंच खाली बसवावा. गिझर चालू करताना अगोदर पाणी चालू करावे नंतर सिलेंडरचा कॉक चालू करावा. गिझर बंद करताना अगोदर सिलेंडरचा कॉक बंद करावा नंतर पाणी बंद करावे. गिझर चालू असताना बादली भरेपर्यंत बाथरूमचा दरवाजा उघडा असावा, गिझर बंद केल्यानंतर दरवाजा लावून घ्यावा. शॉवर घ्यायचा असेल तर दरवाजा अर्धवट उघड ठेवावा. कारण घरातील व्यक्तींना कोण अंघोळीला गेले आहे याची माहिती असते. त्यामुळे दरवाजाला थोडीशी फट ठेवण्यास हरकत नाही. गिझरचे बॅटरी सेल दर तीन महिन्यांनी बदलले गेले पाहिजेत. दरवाजा लावून अर्धा-अर्धा तास शॉवर घेतल्यास बाथरूममधील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊन जीव गुदमरला जाऊ शकतो. कारण दरवाजा लावल्याने अति गरम पाण्याने बाष्प तयार होते व श्वास कोंडला जाऊ शकतो. शक्य असल्यास गॅस गिझर आणि सिलेंडर बाथरूमच्या बाहेर ठेवावा.
वरील प्रकारे काळजी घेतल्यास होणाऱ्या दुर्घटना टाळता येऊ शकतात.
8
Answer link
🤔 _*फटाके वाजवताना काय काळजी घ्यावी?*_
---------------------------------
▪ माेठ्या व्यक्तींच्या देखरेखीखाली अाणि घरापासून दूर माेकळ्या जागेत फटाके उडवावेत.
▪ फटाके उडवताना जवळच पाण्याची किंवा वाळूची बादली भरून ठेवावी.
▪ फटाके उडवताना आजूबाजूला कोणी प्राणी नाही ना याची खात्री करून घ्या, कारण प्राणी फटाक्यांना खूप घाबरतात.
▪ रॉकेटसारखे उंच उडणारे फटाके आणले असतील तर ते इमारतीच्या गच्चीत किंवा मैदानात अथवा मोकळ्या जागीच लावा. कारण रॉकेटसारखे फटाके पटकन कोणाच्याही घरात घुसतात.
▪ फटाके उडवायला जाताना लांब ओढणीचे, नायलॉनचे, सिल्कच्या झब्ब्यासारखे कपडे घालणं शक्यतो टाळाच. कारण फटाके उडताना एखादी ठिणगी जरी त्यावर पडली तरी त्यामुळे आपल्याला हानी होऊ शकते. शक्यतो सुती कपडे घालावेत.
💁♂ _*खास मोठ्यांसाठी काही सूचना*_
👉 तेलाचे दिवे मुलांचे हात पाेहोचू नये अशा आणि लाकडी सामान, पडदे व इतर ज्वलनशील वस्तू असणार नाहीत अशा ठिकाणी ठेवावेत.
👉 झाेपायच्या अाधी दिवे विझवण्याचे लक्षात ठेवा.
👉 नेहमी मेणबत्ती स्टँडचा वापर करा. मेणबत्ती बाटलीवर किंवा पुस्तकावर ठेवू नका.
🧐 _*फटाके उडवताना 'हे' करा*_
▪ हात ताठ सरळ ठेवून फटाके लावा. फटाका आणि तुमच्यातलं अंतर वाढेल.
▪ एखादा आग लागल्यासारखा अपघात झालाच तर प्रथम ती आग विझवा, जळालेले कपडे काढा. जखमीला ब्लॅंकेट किंवा बेडशीटमध्ये लपेटा.
▪ फटाके फोडायला जाताना चपला घालूनच जा.
▪ आल्यावर हात स्वच्छ साबणाने धुवा.
🧐 _*फटाके उडवताना 'हे' करू नका!*_
▪ फुलबाजा किंवा अन्य कोणताही फटाका जळत-जळत घरापर्यंत आणू नका.
▪ खिशात फटाके बाळगू नका.
▪ अर्धवट जळालेल्या फटाक्यांपासून नवीन फटाके तयार करू नका.
फटाक्याने भाजले तर काय करावे....?
फटाक्याने त्वचा जळाली तर काय करावे?
-------- -----^--------^
💥
*🎇फटाके उडवतांना घ्या ही काळजी!*
-----------------------------^-------
दिवाळी जसा दिव्यांचा सण आहे तसाच दिवाळीत फटाक्यांची मजाही काही औरच असते. पण हे फटाके उडवतांना जरा काळजी घ्यावी... ध्वनी प्रदूषण आणि वायूप्रदूषण करणारे फटाके टाळावेच... फटाके उडवत असाल तर विशेष काळजी घ्यावी म्हणजे दिवाळीचा मनमुराद आनंद घेता येईल.
*👉फटाके उडवितांना ही काळजी घ्या -*
# फटाके उडविण्यासाठी शक्यतो मोकळ्या जागेचा वापर करा.
# फटाके उडवितांना शक्यतो सुती कपडे वापरावेत. कारण सुती कपडे लवकर पेट घेत नाहीत.
# गाड्यांजवळ फटाके उडवू नका. कारण गाड्यांजवळ ऑईल, पेट्रोल सांडलेलं असतं. या वस्तू लगेच पेट घेऊ शकतात.
# विजेच्या डिपीजवळ फटाके उडवणं टाळा.
# मोठा आवाज होणाऱ्या फटाक्यांपेक्षा शोभेचे आणि आसमंत उजळून टाकणारे फटाके वापरा.
# सुरसुऱ्या, फुलभाज्या विझल्यानंतर त्या पाण्यात टाकाव्या. त्या इतरत्र टाकल्यास इतर कुणाचा पाय पडून भाजण्याची शक्यता असते.
*👉जर फटाके उडवतांना काही दुर्घटना घडलीच तर हे उपाय करा -*
# दुर्घटनाग्रस्त व्यक्तीला लवकरात लवकर डॉक्टरकडे घेऊन जा.
# भाजलेल्या भागाचा त्रास कमी होईपर्यंत थंड पाण्याखाली धरा.
# जर जखम गंभीर स्वरूपाची असेल तर घरगुती उपाय करण्याच्या फंदात न पडता दवाखाण्यात जावं.
# जर कुठे आग लागली असेल तर ती विझविण्यासाठी जाड पोते अथवा जाड चादरीचा वापर करावा.
__________________________________
👨🏻⚕ _*त्वचा भाजल्यावर करा हे घरगुती उपाय*_
🔥 _गरम पाणी पडल्याने किंवा पेटल्याने वा गरम भांड्याला हात लागल्याने आपण भाजले जातो. भाजल्यामुळे जखमही होतात. कधी हे भाजणं साध असतं तर कधी गंभीर रूप धारण करतं. जखम तीव्र, मध्यम किंवा तीव्र रक्तस्त्रावी असते._
⬇ *भाजल्यानंतर ही काळजी घ्या:*
● जखमेवर बर्फ लावण्याऐवजी भाजल्याबरोबर त्यावर पाण्याची धार सोडा. हे शक्य नसल्यास एका भांड्यात थंड पाणी घेऊन त्यात जखमी भाग बुडवून ठेवा.
● तूप, तेल, टूथपेस्ट किंवा कोणताही तरल पदार्थ जखमेवर लावू नये. त्याऐवजी एखादं अॅटीबायोटिक क्रीम लावावं.
● भाजलेल्या भागाला कापूस किंवा कापडाने झाकू नये.
● जखमेवरील फोड फोडू नये.
● जखमेत जंतूसंसर्ग झाला असल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
⬇ *काही घरगुती उपाय*
● कोरफडीच्या गरामध्ये जखम बरी करण्याचे गुणधर्म असतात. जखमेमुळे त्वचेचा दाह होत असेल तर हा गर त्यावर लावावा.
● फ्रीजमध्ये ठेवलेली टी बॅग काही काळ जखमेवर दाबून धरा. याने वेदना आणि दाह कमी होईल.
● गरमऐवजी गार पाण्याने अंघोळ करा.
● व्हिनेगर आणि पाण्याचा मिश्रणात कापूस किंवा कापड बुडवून त्याला जखमेवर काही काळ दाबून ठेवा. नंतर जखमी भाग वाहत्या पाण्याखाली धरा.
📍 *हे उपाय साध्या जखमेसाठी असून भाजल्याचे स्वरूप तीव्र असल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या.*

5
Answer link
या प्रश्नाचं उत्तरं अर्थातच नाही असंच आहे.
चालत्या गाडीतून चठने उतरने धोकादायक आहे.
आपल्याला लांबचा प्रवास करायचा आहे. व दूसरा पर्यायच नाही तर इलाजच नाही. पण चढतांना लक्षात असू द्या की गाडीचा 'वेग' गाडीतील गर्दी प्लेट फॉर्म वरील गर्दी तुमच्या कडे चे लगेज यासर्व गोष्टी जर अनुकूल असतील तरच चालत्या गाडीत चठू शकता.